हिलरी क्लिंटन
हिलरी रॉडहॅम क्लिंटन (Hillary Rodham Clinton; जन्मनाव: हिलरी मरी रॉडहॅम; २६ ऑक्टोबर १९४७) ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, २००९-१३ दरम्यान बराक ओबामाच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६७वी परराष्ट्रसचिव, २००१-०९ दरम्यान न्यू यॉर्क राज्याची सेनेटर व १९९३-२००१ दरम्यान बिल क्लिंटनची पत्नी ह्या नात्याने अमेरिकेची प्रथम महिला राहिली आहे.
हिलरी रॉडहॅम क्लिंटन | |
अमेरिका देशाची ६७वी परराष्ट्रसचिव
| |
कार्यकाळ २१ जानेवारी २००९ – १ फेब्रुवारी २०१३ | |
राष्ट्राध्यक्ष | बराक ओबामा |
---|---|
मागील | काँडोलीझ्झा राईस |
पुढील | जॉन केरी |
कार्यकाळ ३ जानेवारी २००१ – २१ जानेवारी २००९ | |
मागील | डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन |
पुढील | कर्स्टन जिलिब्रँड |
अमेरिकेची प्रथम महिला
| |
कार्यकाळ २० जानेवारी १९९३ – २० जानेवारी २००१ | |
मागील | बार्बारा बुश |
पुढील | लॉरा बुश |
जन्म | २६ ऑक्टोबर, १९४७ शिकागो, इलिनॉय |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पक्ष |
पती | बिल क्लिंटन |
अपत्ये | चेल्सी क्लिंटन |
गुरुकुल | वेलेस्ली महाविद्यालय येल विद्यापीठ |
व्यवसाय | वकील, राजकारणी |
धर्म | युनायटेड मेथॉडिस्ट |
सही | |
संकेतस्थळ | http://www.hillaryclinton.com |
जन्म
संपादनहिलरी क्लिंटनचा जन्म २६ ऑक्टोबर १९४७ रोजी शिकागो येथे झाला. त्यांच्या आईचे नाव डोरोथी हॉवेल रॉडहॅम होते. त्यांच्या वडिलांचे नाव ह्यूज इ. रॉडहॅम असे होते.
बालपण
संपादनहिलरी यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. हिलरी यांच्या बालपणी त्यांच्या आईला तुरुंगवास झाला.त्यांनतर त्यांच्या आईचा व वडिलांचा घटस्फोट झाला. हिलरी यांना त्यांच्या आजीकडे दुर्लक्षित वाढावे लागले.हिलरी यांनी त्याच्या लिव्हिंग हिस्टरी या पुस्तकात त्यांच्या लहानपणीच्या आठवणी लिहिल्या आहेत.
विवाह
संपादनत्यांनी आर्कान्सा राज्यात वास्तव्य हलवले व १९७५ साली बिल क्लिंटनसोबत त्यांचा विवाह झाला.
कार्य
संपादन१९७३ साली हिलरी यांनी येल विद्यापीठाच्या विधी विभागामधून वकीलाची पदवी मिळवली. वकील पेशामध्ये चांगले यश मिळवल्यानंतर हिलरी अमेरिकेमधील एक यशस्वी वकील मानली जाऊ लागल्या. १९९२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर हिलरी क्लिंटन १९९३ ते २००० दरम्यान वॉशिंग्टन, डी.सी.च्या व्हाईट हाउसमध्ये वास्तव्यास होत्या. २००० साली हिलरी क्लिंटनने न्यू यॉर्क राज्यामधून सेनेटरपदाची निवडणुक लढवली व विजय मिळवला. पुढील ८ वर्षे ती ह्या सेनेटरपदावर राहिल्या.डेमोक्रॅटिक पक्षामधील एक आघाडीची नेता असलेल्या क्लिंटनने २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु बराक ओबामा यांना हे नामांकन मिळाले. न्यू यॉर्क शहरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिलरीने,अमेरिकेच्या अफगाणिस्तानसोबतच्या युद्धाला तसेच २००२ सालच्या इराकवरील हल्ल्याला पाठिंबा दिला होता. २००६ साली सेनेटरपदावर पुन्हा निवडून आल्यानंतर २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळवण्यात हिलरीला अपयश आले.अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर बराक ओबामाने हिलरीला आपल्या मंत्रीमंडळामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण स्वीकारून हिलरी क्लिंटनने २१ जानेवारी २००९ रोजी अमेरिकेच्या परराष्ट्रसचिव पदाची शपथ घेतली. ४ वर्षे ह्या पदावर राहिल्यानंतर १ फेब्रुवारी २०१३ रोजी हिलरी क्लिंटनने राजीनामा दिला. २०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीसाठी घेण्यात येणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीमध्ये हिलरीने व्हरमाँटचा सेनेटर बर्नी सँडर्स ह्याचा पराभव करून पक्षाचे नामांकन मिळवले. नोव्हेंबर २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीत तिचा सामना थेट रिपब्लिकन पक्षाच्या डॉनल्ड ट्रम्पसोबत झाला. तिने उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी व्हर्जिनियाचा सेनेटर टिम केन ह्याची निवड केली आहे. जुलै २०१६ मधील डेमोक्रॅटिक पक्ष अधिवेशनादरम्यान तिच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत क्लिंटनने ट्रम्पविरुद्ध संपूर्ण मताधिक्य मिळवले परंतु इलेक्टोरल कॉलेजमधील मतविभागणीत तिचा पराभव झाला व त्याद्वारे ट्रम्प अमेरिकेचा ४५वा राष्ट्राध्यक्ष झाला.