येल विद्यापीठ अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यू हेवन शहरातील विद्यापीठ आहे. आयव्ही लीग विद्यापीठांतील एक असलेल्या या शिक्षणसंस्थेची स्थापना १७०१ मध्ये झाली होती. अमेरिकन क्रांतीच्या आधी सुरू झालेल्या नऊ कलोनियल कॉलेजांपैकी एक असलेले येल विद्यापीठ अमेरिकतील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जुनी उच्चशिक्षणसंस्था आहे.

या विद्यापीठात अंदाजे १२,००० विद्यार्थी ४,४१० प्राध्यापकांकडून शिक्षण घेतात. येथील माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेचे पाच राष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि उद्योजकांचा समावेश आहे.