वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी.

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकीली करणाऱ्याला ॲडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकीलाला बॅरिस्टर म्हणतात.

भारतामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला ॲडव्होकेट म्हणले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ मध्ये ॲडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकीली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन