सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २२

चेहरा मोहरा

संपादन

अभय आणि संकल्प नमस्कार ,

अपेक्षे प्रमाणे एकीकडे चावडीवर नाकोत्या बाबी जरुरतीपेक्षा जास्त चर्चिल्या जात आहेत, आपण त्या रेट्याला सांभाळत असतानाच दुसरीकडे मी आणि माहितीगाराने चावडी बांधणीचे काम जोमाने सुरु केले आहे. माहितीगाराने इंग्रजी विपी वरून सुचालानाचा नवीन साचा नकलवला आणि त्यावर काम सुरु आहे.

 
चावडी (ध्येय आणि धोरणे)

पुढे जाण्या अगोदर काही गोष्टींवर निर्णय घेणे जरुरी आहे तेव्हा मार्गदर्शन करावे

  1. चावडीच्या मुखपृष्ठ हे पान चर्चेसाठी नसून संबधित विभागांचा वापर चर्चेसाठी करावा का ?
  2. मुखपृष्ठ केवळ इतर विभागांच्या सुचालानाचे icons दाखवेल (इंग्रजी विपी प्रमाणे)
  3. माहितीगाराने ७-८ दुवे ह्या पानावर देण्या साठी सांगितले आहे
  4. असलेल्या गरजेला उत्तम प्रकारे प्रदर्शित करण्या साठी Matrix Layout वापरावा असे वाटते.
  5. इंग्रजी विपिच्या साच्यात बदल करून मी Matrix layout बनवला आहे
  6. सोबत दिलेल्या आकृती प्रमाणे आपण Matrix भविष्यातही गरजे प्रमाणे लहान मोठे करू शकू
  7. विकिपीडिया:धूळपाटी/चावडी/ध्येय आणि धोरणे येथे परीक्षणासाठी उभारण्यात आलेली संकल्पना पहावी
  8. ३ X ३ चे Matrix वापरून उजव्या बाजूला जागा वाचवण्यात आलीआहे ज्याचा उपयोग आपण विदागार, सूचना, विपी बद्दल बातम्या, कार्यक्रम आदीसाठी वापरू शकू (काही चित्रे बनवावी लागतील तसेच दुवेपण पूर्ण पणे दिलेले नाहीत ) जर हा ढाचा मान्य असेल तर बाकी तुरळक कामे करता येतील.
  9. सर्वच चर्चा पाने एकाच ठिकाणावरून विभागवार उपलब्ध केल्याने इतरही चर्चा पानांची लोकप्रियता/उपयोगिता वाढेल, मध्यवर्ती चावडीवरचा दबाव कमी होईल.
  10. तसेच सोबतच सर्व विभागा वरील चर्चा एकत्रित पाहण्याची सुविधा पण साच्यात आहे.

चावडीचा चेहरा मोहरा बदलेल. जास्त चांगला User Friendly GUI कदाचित आपण मराठी विपी समुदायाला उपलब्ध करून देऊ शकू असे वाटते. ( लोक त्यावरही चर्चा करतीलच पण आता आधी लगीन कोंढाण्याचे, गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न असेल.)

राहुल देशमुख २३:०८, १० जुलै २०११ (UTC)

स्मरण पत्र

संपादन

नमस्कार अभय,

चावडीचा "चेहरा मोहरा" वर आपल्या कडून अजून पर्यंत प्रतक्रिया/निर्देश प्राप्त नझाल्याने काम खोळंबले आहे. आपण इतरही कामात व्यस्त असलच हे मी जाणतो, तरी सातत्याने पाठपुरावा करणे हे माझे काम आहे म्हणून स्मरण पत्र देत आहोत. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत राहुल देशमुख १७:१४, १२ जुलै २०११ (UTC)

संकल्पना

संपादन

नमस्कार अभय,

हे पान विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा म्हणजेच आजचे "चावडी " व्हवे ज्यावर कोणतेही Posting नकरुदेता इतर सर्व चावड्या, चर्चा पाने ह्या करिता navigation फक्त इथे असावे आणि सदस्यांनी विभागवार चर्चा करावी असे अपेक्षित आहे (इंग्रजी विपी सारखे). हि मूळ संकल्पना मान्य असेल तर प्रोटोतील डिझाईन मध्ये costmatic changes करता येतील. त्यासाठी Exact final requirement freeze करावी लागेल. राहुल देशमुख १८:००, १२ जुलै २०११ (UTC)

घोषणा आणि चवडीच्या पानावर पहिले शुभसंदेश

संपादन

नमस्कार अभय,

साचा सुचालन चावडीत बदल करून तो क्रमपरिवर्तन आणि संयोजन द्वारे परीक्षण करून यथा स्थितीत आणला आहे. मध्यवर्ती चावडी सोडून बाकी सर्व चवड्यांवर साचा कार्यरत आहे. मध्यवर्ती चावडीवर साचास कार्यरत करणे त्याबाबतचे आणि नवीन चावडी ध्येय आणि धोरणे बाबतची अधिकॄत घोषणा करणे आणि चवडीच्या पानावर पहिले शुभसंदेश देण्याचे करावे.

गुरुपोर्निमेच्या आपणास हार्दिक शुभेच्या...!

राहुल देशमुख ०९:१४, १३ जुलै २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

चावडी ध्येय आणि धोरणे हि संकल्पना मांडणे, सदस्यांना त्याचे महत्व पटवणे, मान्यता मिळवणे आणि उभारून प्रत्यक्षात आण्याच्या कमी आणि चावडीचा चेहरा बदलवण्याच्या कमी आपण केलेल्या सहकार्य बद्दल मी आपला आभारी आहो. आशा करतो कि भविष्यात सदर चावडी विपीच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात कमी येईल. आपण सदर चावडीची घोषणा केलेलीच आहे. दि १५ जूलैला गुरु पोर्णिमा आहे त्या अगेदार एक दिवस चावडी पूर्णतः कार्यान्वित झालेली आहे. १५ तारखेपासून चावडीचा वापर सुरु व्हावा. सुरुवातीला आपण आणि काही जेष्ठ सदस्यांनी शुभसंदेश देऊन चावडीचा श्री गणेशा करावा असे वाटते.

भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याचा अभिलाषी राहुल देशमुख १७:२९, १३ जुलै २०११ (UTC)

मदत मागणी

संपादन

As you know Marathi, I will say the following question: How do you say in Marathi as follows: Denisse Lilian Laval Soza (born in santiago de Chile on January 19, 1977), more known as Nicole, is a Chilean singer, songwriter, actress and TV-radio host?

--Víctor Alexis Cantillano Oviedo ०१:२३, १४ जुलै २०११ (UTC)

अडगळीची खोली

संपादन

वरील ग्रे पट्टीत अडगळीची खोली , आवश्य पहा आणि आपले मत नोंदवण्या साठी टिचकवा वैगरे गोष्टी काही दाखवा लपवा साचाद्वारे बसवले होते. त्यामध्ये एक स्क्रोलेबिलीटीची छोटी अडचण होती ती बगझीला वरून CCS मध्ये बदल करून सोडवण्याचे पण ठरले होते. परंतु १७:०९, १३ जुलै २०११ (UTC) च्या दरम्यान माहितीगाराने तो कोड, धूळपाटीवर (३३) स्थानांतरीत करून साचा सुरक्षित केला (कदाचित मी मधातच पुन्हा काही करू नये म्हणून )ह्या बाबत मला अधिकृतरित्या त्याचे काहीही संदेश नाही पण अलीकडील बदल मध्ये मी हे पहिले होते कदाचित ते काही दुरुस्त्या करून कोड पुन्हा वापस आणतील. राहुल देशमुख ०३:२२, १४ जुलै २०११ (UTC)

कोहिम्याची लढाई

संपादन

लेख उमदा बनतोय.. सहीच ! पण त्याचे मुख्य शीर्षक 'कोहिम्याची लढाई' ठेवणे व्याकरणदृष्ट्या योग्य ठरेल. अकारान्त ग्रामनामांच्या विकाराबद्दल मतमतांतरे असली, तरीही मराठीच्या व्याकरणप्रवृत्तीनुसार आकारान्त ग्रामनामे रूपे चालवताना याकारान्त होतात, असे 'बडोदा', 'वर्धा', 'भंडारा', 'गोवळकोंडा', 'विजयवाडा' 'शिरोडा', 'शिमोगा' इत्यादी (मराठी व अमराठी) ग्रामनामांच्या रूपांवरून दिसते. त्यानुसार कोहिम्याची लढाई ये शीर्षक अधिक योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१३, १४ जुलै २०११ (UTC)


विलीनीकरण

संपादन

Namskar म्हणतात की, "कृपया, लेखनाव ’तुंबा’ व ’तुंबी’ यांचे, तसेच लेखनाव ’नारळ’-’श्रीफळ’-’शहाळे’ यांचे विलीनीकरण व्हावे." हे विलीनीकरण कसे करायचे? हे मला जमेल असे वाटत नाही. एकदा प्रयत्न केला होता, पण तो अंगाशी आल्यावर सर्व परत उलटवावे लागले होते. आपण हे विलीनीकरण कराल, किंवा कुणाकडूनतरी करवून घ्याल? विलीनीकरण चर्चापानांचेही व्ह्यायला पाहिजे....J १९:२४, १७ जुलै २०११ (UTC)

कामकाज

संपादन

नमस्कार अभय,

चावडी ध्येय आणि धोरणे प्रक्त्यक्षात अवतरल्या नंतर तिचे कामकाज आणि उद्देश सदस्यांना अंगवळणी पडण्याच्या दृष्टीने काही काम सुरु केले आहे. ह्याच कार्याचा एक भाग म्हणून खालील विनंती काही सक्रीय सदस्यांना पाठवली आहे. आपणा कडून काही सूचना असल्यास कळवणे. राहुल देशमुख ०२:५६, १८ जुलै २०११ (UTC)

प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा

संपादन

नमस्कार,

चावडी ध्येय आणि धोरणे वर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरु आहे. जेष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे भाषा निर्देश आपल्या लेख द्वारे सदर चावडीवर मांडले आहेत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चाविडी ध्येय आणि धोरणे वर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कमी अमुल्य योगदान करावे हि विनंती. राहुल देशमुख ०२:२९, १८ जुलै २०११ (UTC)

आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

कृपया नारळ श्रीफळशहाळे हे लेख बघावेत. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०५:४९, २० जुलै २०११ (UTC)

कोलॅप्सिबल याद्या

संपादन

अभय,

साचा:Collapsible list ह्यामध्ये काय घोटाळा झाला आहे? कोणतेही नवीन बदल सेव्ह होत नाहीयेत. By default हा साचा सर्व याद्या उघडून दाखवत आहे (त्या लपलेल्या हव्यात). उदा. आग्नेय आशिया
अभिजीत साठे १९:४३, २२ जुलै २०११ (UTC)

  • दर्श अमावस्या म्हणजे सुर्योदयाचे वेळेस असलेली (सुर्याने बघितलेली) अमावस्या. कधी कधी अमावस्या(किंवा एखादी तिथी) एखादे दिवशीच्या सुर्योदयानंतर सुरू होते. परंतु, दुसर्‍या दिवशीचे सुर्योदयाचे वेळेस अमावस्या (किंवा ती तिथी)राहते. सुर्याने बघितलेल्या तिथीस त्या तिथीचे वैशिष्ट्य पाळावे असे मानतात.म्हणुन (या वर्षी) आषाढ अमावस्या दि. २९/७/११ ला ०२.०४ उत्तररात्री जरी सुरू होत असली तरी ती सुर्योदयी दि.३०/०७/११ ला असल्यामूळे गटारी अमावस्या दिनविशेष पालन हे दि. ३०/०७/११ ला करतात/करावे.त्यानुसार लेखात आवश्य्क ते बदल केले आहेत.गैरसमज नकोत म्हणुन हा लेखनप्रपंच.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:४९, २५ जुलै २०११ (UTC)

Bot flag request for PixelBot

संपादन

Hi, please take a look here for one week old bot flag request. Thank you :) --Pixelfire १६:३४, २६ जुलै २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

धन्यवाद. रोज जमतेच असे नाही पण तरी प्रयत्न करतो. रिकामे लेख बघून वैताग येतो व काही तरी भर घालावीशी वाटते. मातृभाषेसाठी खारीची मदत केल्याचे समाधान तर आहेच...
अभिजीत साठे ०४:५२, २८ जुलै २०११ (UTC)


नमस्कार

संपादन

कृपया चित्र:Shindechhatri.jpg हे चित्र बघावे. ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:१७, २८ जुलै २०११ (UTC)

सोशल नेट्वर्किंग वर धमाल

संपादन

मी सदर माहिती फलक चावाडी वरून काढला आहे. आपण दिलेला दुवा हा रोमन अक्षरात नसल्याने तो टंकलिखित करणे कठीण असल्याने चावडीच्या थेट निमंत्रांची योजना तूर्त स्थगित करतो आहे. आपणा कडे काही पर्याय असल्यास जरूर कळवावे.

चावडीवर रंगत असलेल्या चर्चा वाचण्या साठी जरी लोकांना आकर्षित आपण करू शकलो (ग्रुप मेल, मेसेंजर्स, फेसबुक, ट्युटर द्वारा) तर हळू हळू त्यानाही मुख्य प्रवाहात यावेसे वाटेल आणि त्यातून प्रचार आणि प्रसार होईल अशी ह्यामागची कल्पना होती. एक अतिशय लोकप्रिय झालेली चर्चा जिने सोशल नेट्वर्किंग वर धमाल केली येथे देत आहो. राहुल देशमुख २०:०६, २९ जुलै २०११ (UTC)

दिनविशेष

संपादन

कृपया आषाढ शुद्ध प्रतिपदा या लेखात मी नुकतेच केलेले बदल बघावेत.असा मजकूर इतरही दिवसांच्या लेखात टाकावा काय? आपली प्रतिक्रिया कळवावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:५५, ३० जुलै २०११ (UTC)

दिनविशेषच्या दृष्टीने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#तांत्रिक प्रस्ताव येथे राहूलने काही प्रस्ताव मांडला आहे, दिनविशेष हा विषय तुम्हाला सखोल माहिती आहे तेव्हा त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करणे अधीक उचित असेल.माहितगार ०८:४१, २ ऑगस्ट २०११ (UTC)


पवई हा शब्द

संपादन

>>>>'पवई'हा शब्द देवी पदमावतीच्या नावावरुन घेतला आहे.


नमस्कार, ह्याला काही पुरावे आहेत का? सागर:मराठी सेवक १२:४८, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

चैत्र

संपादन

चैत्र शु.प्रतिपदा/द्वितिया- हे नुकतेच टाकलेले लेख बघावेत. काही दुरुस्त्या /त्रुटी असतील तर सुचवाव्यात ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४६, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

घर-दार

संपादन
घर-दार नावाच लेखन व्यंकटेश माडगूळकरांच्या प्रकाशित साहीत्यात असावे असे गूगल शोधावरून दिसते आहे आपण मगाशी उलटवलेल्या संपादनाबद्दल पुर्नविचार करावा असे वाटते.

गूगल शोध

माहितगार १५:३९, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
नो प्रॉब्लेम त्या मूमेंटला इतर एका अनामिका कडून जाणिवपूर्वक मोठ्या उत्पाताचा प्लान आढळला त्याला ब्लॉक करताना सहज म्हणून या ही अनामिका कडे लक्ष गेले मलाही बहूधा उत्पातच आहे असे वाटले पण हा कुणी वेगळा आहे हे लक्षात आल्यामुळे मग सहज म्हणून पाहीले तर माडगूळकरांनी खरेच असे लेखन केलेले आढळले. माहितगार २०:२४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

अवर्गीकृत चित्रे

संपादन

मला अवर्गीकृत चित्रे या मध्ये अशी अनेक चित्रे सापडली की जी मूळ लेखात आहेत वर्गीकृत केलेली आहेत. उदा. आर्या आंबेकर, लालकृष्ण अडवाणी..... तसेच अनेक इंग्लिश मधील वर्ग सापडले की जे अवर्गीकृत आहेत. ते काढून टाकायला हवेत ना?...मंदार कुलकर्णी ०७:२२, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

There is a group "अवर्गीकृत चित्रे" in which there are some pictures I found like Arya Ambekar , Lalkrishna Adwani which are already been linked in the respective articles and can be seen the articles. My understanding is that, once these are linked to the article, it should not be seen in the tab "अवर्गीकृत चित्रे". Am I made it clear now?.....मंदार कुलकर्णी ०९:२५, १० ऑगस्ट २०११ (UTC)

Cood ह्या साच्यात काहीतरी घोटाळा झाला आहे. गुणक title मधे दिसायला हवेत ते inline दिसतायेत. उदा. स्ताद दा फ्रान्स. मी प्रयत्न केला काय झाले आहे ते बघण्याचा. आपणही एकदा नजरेखालून घाला.
Abhijitsathe ०४:१३, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

धूळपाटी

संपादन

तांत्रिक प्रारुपासाठी हि काही पाने मी तात्पुत्या स्वरुपाची बनवली आहे ज्याचा उपयोग फक्त तंत्राच्या पडताळणीसाठीच होणार आहे. एकदा काम झाले कि सर्व पाने पण काढा साचा लाऊन उडवून देऊ. या पुढे भविष्यातील धूळपाट्या मात्र विकिपीडिया याच नामविश्वात बनवण्याची मी काळजी घेईन. राहुल देशमुख १६:४०, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

हे ऊतीर्णेबल आहे काय ?

संपादन
सध्या संस्कृत विकिपीडीयात transliteration करता mw:Extension:Narayam हि काही नवी विकिमिडीया एक्सटेंशन प्रणाली वापरात आणली जात आहे. एकदा लोड झाल्यानंतर टायपिंग स्पीड छान येतो आहे. अर्थात सिस्टीम वर दाक्षीणात्यमडळींनी काम केले असल्यामुळे किबोर्ड मॅपींग वर काहीसा त्यांचा प्रभाव आहे पण मला वाटते ते बदलता येणारे असावे.
कदाचित ही प्रणाली जावा वापरत नसावी असा कयास आहे अर्थात माझ तांत्रिक बॅकग्रांऊंड नसल्यामुळे मी सपशेल राँगही असू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून तुमचे जावा प्रणालींवर आक्षेप आहेत तर ही प्रणाली आपल्या सुरक्षा परीक्षेतून ऊतीर्णेबल आहे का हे तुम्हीच तपासून पाहू शकता.
जो पर्यंत मराठी विकिपीडियावर मराठी माणसे इंग्रजीतन सदस्य नावांची निर्मिती आणि वापर करतात आणि शीर्षकांची निर्मिती आणि मज्कुर निर्मितीस रोमन लिपीचा वापराचा प्रयत्न दिसतो तो पर्यंततरी वेबसाईट बेस्ड transliteration सपोर्ट कंटीन्यू ठेवावयास लागेल या दृष्टीने हा विषय आजही महत्वाचा आहे असे वाटते.माहितगार ०९:३२, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे माहितगार १०:१८, २० ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi अभय नातू,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

संपादन

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०२, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिपीडिया:आंतरविकि_दूतावास#Disimbig_templates

संपादन

अभय, थँक्स ! अशोक आणि माँटेरे या लेखांमध्ये नवीन साचा दिसला. मात्र कोयनेवरच्या लेखात दिसला नाही.

या साच्यात राखाडी रंगांच्या निर्देशक बाणांचे चित्र इंग्लिश विकिपीडियावर जसे दिसते, तसे का दिसत नाहीये, ते हुडकायला हवे. काल मी रात्री उशिरापर्यंत खटपट केली; पण ही गोष्ट अजून जमली नाहीय.

आता हा साचा मीडियाविकी नामविश्वातल्या त्या विवक्षित पानावर टाकायला हवा. तो टाकून पायविकीवरचा प्रॉब्लेम सुटेल. इथे सांगकाम्या चालवून सर्व निःसंदिग्धीकरण पानांवर साचा टाकता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:०६, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिपीडिया:प्रमाणपत्र

संपादन

अभय आणि संकल्प, बार्नस्टारच्याच धर्तीवर पण इतर काही उद्दीष्ट्ये साधण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:प्रमाणपत्र नावाचे पान मागेच मी सुरू केले होते शिवाय स्ट्रॅटेजी विकिवर सविस्तर प्रस्तावही मांडला होता.स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडीयाकरता प्रस्ताव अमलात यावा म्हणून व्यवस्थित दिसणार्‍या सर्टीफिकेट टेम्प्लेटची आवश्यकता होती ते काम राहूल देशमुखांनी चांगलेच पार पाडले आहे.त्यांनी बनवलेल टेम्प्लेट आणि संबधीत चर्चा विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र नमूद केली आहे विकिपीडिया:प्रमाणपत्र स्ट्रॅटेजी विकिवर मांडलेला प्रस्ताव तसेच विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र चर्चा सविस्तर पाहून घेऊन विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र#प्रमाणपत्र झलक येथे आपली सविस्तर प्रतिसाद नोंदवावा तसेच काही शुद्धलेखन किंवा इतर सुधारणा नोंदवायच्या असल्यास त्या देखिल नोंदवाव्यात. या प्रकल्पात सध्याच्या सक्रीय सदस्यातून राहूल शिवाय निनाद,मनोज हे ऑन लाईन तर मंदार आणि अभिजीत सुर्यवंशीना फिल्ड मध्ये म्हणजे पुण्यातील विकिभेटी आणि एजूकेशन प्रोग्रमच्या माध्यमातून आणि कार्यशाळातून पोहोचवण्याच्या दृष्टीने सामिल करून घ्यावे असा मानस आहे. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असेन माहितगार ०९:२२, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

खेमकरण

संपादन

खेमकरण या लेखातील संदर्भ नीट करण्यास कृपया मदत करा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:३१, ३१ ऑगस्ट २०११ (UTC)

तक्ते

संपादन

मराठी विकिपिडीयावर इतक्यात मोठ्या प्रमाणात तक्ते/याद्या स्वारूपाचे लेख/माहिती पुढे येत असल्याचे दिसते. योगदान करण्यास याद्या सोप्या असल्याने त्यास सहभागही चांगला मिळणे स्वाभाविकच आहे. पण विपी वर याद्या द्याव्या का ? विश्वकोशिय लेखनाच्या परिघात त्या येतात का ? जर याद्यांना मान्यता दिली तर मग कुठे थांबायचे तेपण ठरवावे लागेल का ? कारण मग समजा कोणी "दैनंदिन लागणाऱ्या किराण्याची यादी" बनवली तर ती पण योग्यच ठरेल.

तक्ते हा प्रकार इतर विकी कसे हाताळतात ? ते हाताळत नसतील तरीही आपण नवीन सुरुवात करावी का ? त्या दृष्टीने काही नियम, मर्यादा आहेत/असावे का? आणि हाताळायचे ठरल्यास काही सुविधा बनवाव्या का जसे नामविश्व, वर्ग, साचे आदी. कुपया आपले विचार कळवावे. राहुल देशमुख ०४:०९, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

Initials / Short Names

संपादन

Initials अथवा Short Names ह्या मध्ये "full stop" नंतर "space" असावी असे मला वाटते. त्यामुळे ग.ह. खरे ऐवजी ग. ह. खरे जास्त बरोबर आहे असे मला वाटते. या पानाचा इतिहास पाहिल्यानंतर यात आपण संपादन केले आहे असे कळाले. तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. प्रबोध १३:०७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

तुमचे nomenclature पटते. या पुढे जर space असलेल्या लेख नावाची गरज भासल्यास ते तयार करून त्या लेखास पुनर्निर्देशन लावीन. -प्रबोध ०८:१६, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

याद्या

संपादन

राहुल, तुमचे चर्चा पानावरील मत वाचले.याद्या हव्यात का किंवा कशा हव्यात याविषयी चर्चा व्हायलाच हवी. पण या याद्या मुख्य लेखात ठेवण्यापेक्षा वेगळा उपलेख बनवून ठेवल्या तर मुख्य लेखाची लांबी आणि उपयुक्तता अबाधित राहील. त्या हिशोबाने हे उपलेख बनवले आहेत. याद्या या विश्वकोशात असायला हव्यात असे मला वाटते कारण अनेक जणांना थोडक्यात पुरेशी माहिती मिळते. इंग्लिश विपी मध्ये अशा याद्या अनेक आहेत आणि मी त्यात मला शक्य असेल तेंव्हा भर घालत असतो. नुसत्या याद्या देवून भागणार नाही हे मला मान्य. पण त्यातून कुठेतरी लेखाच्या शीर्षकाची सुरुवात तरी होते. तद नंतर जाणते मंडळी त्याचे नवीन लेख लिहून विपी मध्ये भर घालू शकतात. याचा अर्थ "याद्या नकोतच" असे नसावे असे वाटते....मंदार कुलकर्णी १४:१०, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

लेख वगळावा

संपादन

ही सूची नाशिक या लेखातून हलवून स्वतंत्र लेख बनवण्याचे प्रयोजन विवाद्य वाटते. अश्याने 'पुणे परिसरातील नाट्यगृहे', 'पुणे परिसरातील चित्रपटगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील नाट्यगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील चित्रपटगृहे', 'इंदापूर परिसरातील हंगामी व कायमस्वरूपी चित्रपटगृहे' (महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या गावागणीक एक आणि मुंबई वगैरेंसारख्या शहराबाबत तर प्रत्येक उपनगरागणीक बनवायचा पायंडा पडेल.) असे लेखही बनायचे पायंडे पडतील. कृपया या लेखातील माहिती नाशिक या मुख्य लेखात संक्षेपाने लिहावी. ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या आणि त्यामुळे बर्‍यापैकी विश्वकोशीय उल्लेखनीयता सापडण्याजोग्या मोजक्या नाट्यगॄहांबद्दल/चित्रपटगॄहांबद्दल माहिती नोंदवायची असल्यास या लेखाचा पुनर्विचार करण्यात हशील वाटते. कारण काही वर्षांमध्ये नवीन ठिकाणांची या सूचीत भर टाकण्याचे व "कै." झालेली केंद्रे उडवण्याचे तुलनेने कमी महत्त्वाचे काम करण्याचे कष्ट कायम घेतले जायची व त्यायोगे पान कायम अद्ययावत राहायची शक्यता फार कमी! ही माहिती शिळी झाल्यावर, आधीच फारश्या महत्त्वाचा नसलेल्या माहितीवर एवढे का झिजावे, हा प्रश्न मनात उमटल्यास नवल वाटू नये.

तस्मात, आताच अश्या जंत्रीपर लेखांच्या निर्मितीआधी साधक-बाधक विचार करावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

मी यासाठी इंग्रजी विपी चा आधार घेतला आहे. तेथे अशाच प्रकारचे लेख आणि उपलेख आहेत. हे पाहूनच मी उपलेख सुचवले. जर सगळ्यांनाच ते मान्य नसेल तर माझे काही म्हणणे नाही. अभय आणि माहितगार यांचे यावर असेच मत आहे का?.....मंदार कुलकर्णी १७:५५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
तूर्तास, जी पाने एकाही वाक्याविना लिहिली गेली आहेत, त्यावर पानकाढा साचा लावून ते लेख आठवड्याभरात वगळावेत. यातून बोध घेऊन आधी केलेल्या विनंत्यांचे गांभीर्य सागर मरकळ यांच्या ध्यानी येईल, अशी आशा वाटते. तरीही हा प्रकार चालू राहिला, तर येत्या दोन-तीन आठवड्यात समस्येचे गांभीर्य पाहून ठरवणे इष्ट.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०१, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

टोकाची पाने

संपादन

विशेष:टोकाची पाने येथील विदा ताजा करता येऊ शकेल काय? कृपया मदत करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:०५, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


धन्यवाद !

संपादन

सागर:मराठी सेवक १५:२१, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

अनावश्यक संपादने

संपादन

विकिपिडीयाच्या अनेक पानात अनावश्यक संपादने केलेली आढळून येतात. याला पायबंद घालता येणार नाही का? उदाहरण द्यायचे झाले तर अनुभवी सदस्य :--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) आणि :--मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान) यांच्या चर्चा पानाला कुणीतरी वर्ग:२००६ मधील मराठी चित्रपट हा वर्ग टाकलेला आहे. हे जर कुणी जाणकाराने केले असेल तर या वर्गात हि चर्चा पाने टाकण्याचे कारण काय? सांगायचा मुद्दा एवढाच की हे जर चुकीचे असेल तर अशा अनावश्यक संपादनाचेच संपादन करावे लागेल. :संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संतोष दहिवळ १७:२५, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट विमान अपघात

संपादन

या साच्यात काही इंग्रजी शब्द मराठी करावयाचे राहीलेत.कृपया मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:४०, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

रिनो हवाई शर्यत अपघात

संपादन

रिनो हवाई शर्यत अपघात या पानावर सुरूवातीलाच summary हा इंग्रजी शब्द आला आहे तो कसा जाईल ? किंवा आपणच संपादित करून तो घालवावा.

संतोष दहिवळ १९:२१, २६ सप्टेंबर २०११ (UTC)
ता.क. अशीच अडचण बुद्ध एरवेझ दुर्घटना, २०११ या पानावरही आहे. -संतोष दहिवळ १९:३३, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

आभारी आहे.

संपादन

मदत केल्याबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:४४, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

स्थलांतरण साचा?

संपादन

{{पानकाढा}} या साच्या प्रमाणे स्थलांतरण सुचविण्यासाठी एखादा साचा असावा का? उदा.: एके ४७ हा लेख ए.के. ४७ कडे स्थलांतरित करण्यात यावा.

स्थलांतरण विनंती

संपादन

मणी मंगलसूत्र (म‍राठी चित्रपट) हे पान मणी मंगळसूत्र (मराठी चित्रपट) कडे स्थलांतरित करावे अशी विनंती.

चर्चा पानावर बदल

संपादन

नमस्कार !

स्वताच्या नावाचा आणि प्रामुखाने आडनावाचा वापर कुठे होत असेल तर त्यावर लक्ष असेल तर असे कोणीही करणार नाही यात वाद नाही! आणि जर चेष्टा म्हस्कारी म्हणून जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर कोणाच्या परवानगीची गरज भासेल असे मला वाटत नाही! माझी ओळख मी मराठी सेवक म्हणून मराठी विकी वर देत आलो आहे त्यात माझ्या आडनावाचा कुठेही मी उलेख केला नाही आहे आणि जर उच्चार नीट जमत नसेल तर प्रयान्न हि करू नये ! धनयवाद ! सागर:मराठी सेवक १४:५८, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

>>>> "".प्रश्न आहे आचारसंहितेचा""
नातू साहेब !!
चुथडा आसे शब्द आचारसहिंता ला धरून आहेत का ?? आणि अशा शब्धांमुळे जर मी काही चुकीचे बोललो असेल तर दाखवून द्यावे! आणि रिकामे खोके का कायमचे तसेच राहणार हे कोणत्या विद्वानाने सांगितले ? मी आतापर्यंत रिकामे खोकेच भरत आलो आहे याची नोंद घेण्यास सांगावे लागत आहे याचे दुख !!
धन्यवाद ! सागर:मराठी सेवक १५:३१, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

या चहाला !

संपादन

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



चहाचे सादर निमंत्रण.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:५६, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

चर्चा पान

संपादन

चर्चा:अजिंठा-वेरूळची लेणी हे पान काढले तर बरे होईल किंवा जुन्या चर्चा म्हणून याच पानावर एका बाजूला तरी काढून ठेवण्याचे बघावे. संतोष दहिवळ १७:४३, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)

पान सुरक्षित करा

संपादन

कृपया सदस्य:संतोष दहिवळ/vector.js हे पान सुरक्षित करा. परत बदल करतेवेळी आपणास सुचित करता येईल. संतोष दहिवळ १०:०१, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकि टूलबार

संपादन

लेखाची 'संपादन' कळ टिचकवल्यानंतर जेंव्हा संपादनास लेख उघडतो, त्यात विकि टूलबार काम करीत नाही. कोणी यात मदत करेल काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:२३, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)


थोडा धीर धरा

संपादन

सागर:मराठी सेवक १७:२३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

सहाय्य

संपादन

एडब्ल्यूबीत अजिंठा-वेरूळची लेणी हे पान घेऊन हीनयान शब्द replace साठी टाकला होता पण पानात हा शब्द असतानाही पान skip होते. या पानाच्या सुरक्षानोंदीमुळे असे होईल का? संतोष दहिवळ १८:५२, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

Change in Username

संपादन

Namaste, I am Shubha working for Samskrit wiki. I want to have a global account in the name of Shubha instead of my previous user name Shubhabangalore. In this I am facing some problem in Mr wiki. I was guided to make the request in this page. Will you please help me in renaming ? Shubhabangalore ०५:३८, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

Hello! Could you please have a look at my bot request and see if you can grant the bot flag for HiW-Bot? Request for approval: here. Thanks for your time! --Hedwig in Washington ११:१३, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

सदस्य:Tatyabot खाते बनवले आहे त्याला बॉट फ्ल्याग देशिल - तात्या

अभय, तू रिकाम्या चालवून श्रीवर्धन तालुका यात काही वर्गीकरणाचे बदल केलेस का ? असशील, तर त्या संदर्भाने : सहाय्य:वर्ग#वर्गीकरणाचे संकेत येथे नोंदवल्याप्रमाणे लेखांचे वर्गीकरण चपखल असावे. उदा., श्रीवर्धन तालुका या लेखाचे वर्गीकरण .वर्ग:महाराष्ट्रातील तालुके अश्या स्थूल वर्गात करण्याऐवजी .वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके या वर्गात करणे अधिक चपखल ठरते. त्यामुळे स्थूल वर्गीकरण शक्यतो ठेवू नये.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३२, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)

असा-असे-अशी-अशा-अश्या

संपादन

मासा पुल्लिंगी, अनेकवचन मासे, सामान्य रूप माशा आणि माशां. उदा० माशाने, माशांना. असेच पैसा, पैसे, पैशाने, पैशांना; ससा, ससे, सशाने, सशांना वगैरे.

असा पुल्लिंगी, अनेकवचन असे, सामान्य रूप अशा आणि अशा/अशां. उदा० अशा(माणसाने)ने घरी जावे; अशा माणसांना/अशांना घरी पाठवावे लागेल. वगैरे.

असे नपुंसकलिंगी, अनेकवचन अशी, सामान्य रूप अशा आणि अश्या/अश्यां. उदा० कासें पासून काशाची भांडी; वेड्यापिशा डुकरापासून सावध रहावे. वेड्यापिश्यांचे कोण ऐकेल? वगैरे.

अशी स्त्रीलिंगी, अनेकवचन अश्या, सामान्य रूप अश्या/अश्यां. अश्या बायका, अश्या बाईने, अश्या बायकांनी, अश्यां(बायकां)नी. वगैरे....

त्यामुळे अशा रानात, अश्या अरण्यांमध्ये, अशा मार्गाने, आणि अश्या वाटेने...J १७:२४, २० ऑक्टोबर २०११ (UTC)

शुद्ध लिखीत शीर्षक सुचवावे

संपादन

नमस्कार अभय, विकि अ‍ॅम्बॅसॅडर प्रोग्राम अंतर्गत काम करणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने साचा बनवायचा आहे साचा:विकि विद्यार्थी (लेख पानावर लावण्याकरता) आणि साचा:विकिअ‍ॅम्बॅसॅडर साचा लेख चर्चा पानावर लावण्याकरता बनवायचे आहेत कृपया शुद्ध लिखीत शीर्षके सुचवावीत माहितगार ०८:१९, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)

I have put request for Bot flag. Please kindly grant it. Thanks viju pande

I have changed it. But it seams that the flag is not enabled. Viju pande-bot २१:५६, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)

  • Thanks for the FLAG विजू पांडे २२:०३, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)

अगदी कबूल

संपादन

>>नारायण सूर्याजी ठोसर असे शोधले असता वाचक/लेखक समर्थ रामदास स्वामी येथे आपोआपच जाईल.<< अगदी कबूल. पण नारायण सूर्याजी ठोसर असे कुणी शोधणारच नाही. त्यासाठी मूळ लेख रामदास स्वामी या नावावरच असला पाहिजे. मला वाटते लेख-शीर्षक A वरून B कडे नेले की ते पुनःपुनर्निर्देशित करून A कडे नेता येत नसावे. A नावाचा लेख आधीच अस्तित्वात आहे, त्यामुळे पुनर्निदेशन होणार नाही असे काहीसे येते. ...J १६:४८, २० ऑक्टोबर २०११ (UTC)


ते योग्यच आहे

संपादन

>>शीर्षक अ (पूर्ण नाव) असावे की ब (टोपणनाव) यावर पूर्वी बरीच साधकबाधक चर्चा झाली होती आणि त्यानंतर आपण अ शीर्षक असावे असा संकेत ठरवला.<< हे योग्यच आहे. पण त्यासाठी आधी लेख टोपण किंवा प्रचलित नावाने लिहायला पाहिजे. प्रचलित नाव हे टोपण नाव असेलच असे नाही. महात्मा गांधीं या प्रचलित नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव (हल्लीच्या) नव्वद टक्के विद्यार्थ्यांना माहीत नसते. बा.गं टिळक किंवा बळवंत गंगाधर टिळक हे किती (मराठी) लोकांना माहीत असतील? नारायण सीताराम फडके, विष्णु सखाराम खांडेकर आणि बाळकृष्ण भगवंत बोरकर ही नावे अनेकांनी ऐकली नसतील.

टिळकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रसिद्ध होणर्‍या उत्तरी भारतातील हिंदी आणि अन्य भाषांतील लेखांत "आज गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आहे"असे नित्यनियमाने छापून येते. श्री, श्रीमतीसारखे बाळ हेदेखील उपपद आहे, अशीच सर्वत्र समजूत असते. महाराष्ट्रात मधले व दक्षिणी भारतात पहिले नाव वडिलांचे असते हे अनेकांना, अगदी वार्ताहरांनाही माहीत नसते. ...J १८:१६, २० ऑक्टोबर २०११ (UTC)

लेख अ कडून ब कडे किंवा उलट करता येतो हे माहीत आहे.पण प्रश्न असा आहे की कवीच्या टोपण नावाचा लेख अस्तित्वातच नाही, आहे तो फक्त पूर्ण नावाखाली. त्यामुळे तो आधी टोपण नावाकडे निर्देशित करावा लागेल. असे केल्यानंतर जर 'उलटवले' तर आधीचे पुनर्निर्देशन रद्द होईल आणि त्याबरोबर टोपण नावाखालचा लेखही. याला उपाय म्हणजे लेख प्रचलित नावानेच लिहिला गेला पाहिजे आणि मगच तो अन्य नावांकडे पुनःपुनः ढकलता येईल...J १८:२९, २० ऑक्टोबर २०११ (UTC)

कवीच्या टोपण नावाचा लेख अस्तित्वातच नाही, आहे तो फक्त पूर्ण नावाखाली. त्यामुळे तो आधी टोपण नावाकडे निर्देशित करावा लागेल - मला असे वाटते, टोपण नावाने लेख बनवून त्यास पूर्ण नावाचा लेखाकडे पुनर्निर्देशन लावावे (उदा: सौमित्र). J यांच्या शंकेचे यातून निरसन होईल. ज्यांना कवींची टोपण नावे माहीत असतील त्यांना या मुळे कवीचे पूर्ण नाव देखील कळेल (उदा: डॉ. वसंत अवसरे) व त्यांना हवी असलेली माहिती देखील मिळेल. - प्रबोध (चर्चा) ०४:४७, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

मी अजून AWB explore करतो आहे (AWB द्वारे केलेला प्रत्येक बदल मी तपासून पाहतो आहे). म्हणून अजून तरी नवीन सदस्य खाते तयार केले नाही. परंतु लवकरच एक नवीन सदस्य खाते तयार करून त्या नावाने AWB चालवेन. एखादा सांगकाम्या लिहायची देखील इच्छा आहे, पण त्या आधी AWB पूर्णपणे शिकून घ्यायची इच्छा आहे. - प्रबोध (चर्चा) ०४:४७, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

Ok. मदत लागल्यास किंवा AWB बद्दल काही शंका असल्यास कळवालच. - जरूर - प्रबोध (चर्चा) ०४:५५, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

सदस्य स्वागत

संपादन

हिंदी विपी मध्ये नवीन सदस्यांचे स्वागत करण्यासाठी एक स्वयंचलित सदस्य खाते आहे, सदस्य:नया_सदस्य_सन्देश. मराठी विपी वर हे करायचे असेल तर कसे करावे?

डोळ्यांत तेल

संपादन

पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते.

होय, मलाही तीच काळजी वाटते, आंतरजालावरून इतरत्रची झालेली कॉपी पेस्टींग भाषाशैलीवरून बरेच सहजतेने लक्षात येते.शासकीय विश्वकोशातील कुणी संदर्भ न देता कॉपी पेस्टींग केल्यास भाषेत अलंकृतता नसल्यामुळे आपल्या नजरेतून सुटेल पण त्याच वेळी तज्ञांनी स्वतःची भाषाशैली टिकवत लेखन केले आहे त्यामुळे कॉपीराईट भंग सिद्ध करणे तसे झाल्यास कायदेतज्ञांच्या मात्र हातचा मळ असेल आणि याचे गांभीर्य नवागत सदस्यांना कसे समजवावे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे चएचेतून भविष्याकारता काही मार्ग सुचावा याच उद्देशाने मी हा विषय चावडीवर मांडला आहे माहितगार १८:१२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... Also we need to guide and teach the editors how to right the article by taking help of "Vishwakosh" without getting caught in Copyright issue. I guess some discussion is required in this topic. Just to tell you, the information in http://manase.org/ was earlier free (no copyright) and that was mentioned specifically on the website. On that basis, some articles in Marathi Wipi are been created/copied from that site and given the reference on page by some editors. Now during last 2 months http://manase.org/ has put back dated line "Copyright @ 2009 Maharashtra Navnirman Sena. All rights reserved." What to do now? मंदार कुलकर्णी ०७:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hi. I made a request for bot flag, I hope you approve it. Thanks..--M.Gedawy २०:४१, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

जरूर वाचावा.तो वाचण्यासाठीच लिहीला आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:१७, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

Is There any problem in my request? I hope you reply in English.--M.Gedawy ०२:५५, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

Fine, I did 25 edits, And i will continue editing. Thanks for your speedy respond.--M.Gedawy ०३:०५, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)
My bot made more than 50 edits as you requested; Can it has bot flag please?--M.Gedawy १०:३१, २० नोव्हेंबर २०११ (UTC)

सांगकाम्या

संपादन

नमस्कार,

तुम्ही सांगकाम्या तयार केलेले पाहिले. तो चालविण्यात काही अडचण आली किंवा मदत लागली तर जरुर कळवावे.

अभय नातू १८:१९, ५ नोव्हेंबर २०११ (UTC)

ता.क. तुमचे AWB बदल सांगकाम्यातर्फे न होता तुमच्याच सदस्यानावाखाली होत आहेत.

धन्यवाद! (बाकी मी नवीन बॉट्-खाते आजच तयार केलंय, autoconfirm, bot flag वगैरे होईपर्यंत माझ्याच जुन्या खात्यातून बदल करीत आहे.) Kaajawa १८:२८, ५ नोव्हेंबर २०११ (UTC)

अखिल भारतीय पहिले विकी संम्मेलन

संपादन

नमस्कार , खूपच दिवसानी आपण भेटलो.मी १-२ महिन्यापूर्वी १८,१९,२० नोव्हेबर साठी early bird नोंदणी केली आहे.पण त्यासंबधात मला फ़क्त pay recipt मिळाली.आपण जरा मला जरा व्यवस्थित सांगाल का? भ्रमणध्वणि मिळाला तर उत्ताम .......कळावे. ही मदत मी महितगारांकडून पण मागितली आहे.विनोद रकटे १३:११, ९ नोव्हेंबर २०११ (UTC

शुभेच्छा

संपादन

नमस्कार, मी विकिपीडियाच्या वाचकांपैकी एक आहे. इथे कधी लेखन काम केले नसल्यामुळे संपर्क करण्याचा मोह टाळत आलो आहे.आपण या उपक्रमात भरीव काम करता तसेच मानाने आणि पदाने ज्येष्ठ आहात आणि एक मराठी माणूस म्हणून या सर्वाचे कौतुकच आहे.

कोणतेही पद सांभाळणे हा एक काटेरी मुकुट असतो.असे बरेच प्रसंग असतात की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती असते किंवा दातही आपलेच आणि ओठही आपलेच असतात.भारतीय तत्त्वज्ञानं अशा प्रसंगात खूप चांगले मार्गदर्शन पुरवण्यास सक्षम आहे याबद्दल आपले माझ्याशी दुमत होणार नाही असा विश्वास आहे.


व्यक्तीची प्रगती तमोगुणा कडून राजस आणि मग पुढे सत्वगुणा कडे व्हावी हे अभिप्रेत असते, यात वाटेत खूप अडचणी येतात वाट बिकट आहे हेही खरेच.आपण आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ केलेल्या उभय भारती नावाच्या विदुषीचे नाव ऐकले आहे काय ? या विदुषींबद्दल एक कथा आहे की एकदा त्या आपल्या शिष्यांसमवेत कुठेशा चालल्या होत्या,वाटेत त्यांना एक संन्यस्त मुनी डोक्याखाली उशास कमंडलू घेऊन विराम करताना दिसले, शिष्यांना उपदेश करण्याच्या दृष्टीने त्यांनी मुनींची सर्व त्यागूनही कमंडलू बद्दल लालसा कशी शिल्लक आहे याचा आपल्यास शिष्यांसमोर उल्लेख करून आपल्यातील लालसेस ओळखण्याबद्दल उपदेश केला, ते विरामकरणार्‍या मुनींनी ऐकले . उभय भारती जेव्हा परतीच्या वाटेवर पुन्हा भेटल्या तेव्हा मुनींनी डोक्या खालचा कमंडलू उभय भारतींच्या दिशेने भिरकावला आणि त्याचा त्याग केल्याचे सांगितले तेव्हा उभय भारतींनी शिष्यांना मुनींनी वस्तुत्याग केला तरी अजून अहंकार कसा शिल्लक आहे आणि आपल्यातला अहंकार ओळखावा असा शिष्यांना उपदेश केला.

ज्ञानदेवांनी चांगदेव प्रसंग तर आपल्या परिचयाचा असेलच.या उल्लेखांचा उद्देश आपणास कमीपणा देण्याचा मुळीच नाही. आपण आणि आपला हा प्रकल्प उचित प्रगती करतच आहात त्यास माझ्या शुभेच्छाच आहेत. आपण आपल्या चर्चापानाच्या सर्वात वर मत मोकळेपणाने मांडण्याचा आपण उल्लेख केला आहे.कुणास शिव्या देण्याचा माझा स्वभाव नाही.माझ्या जवळ आपणास प्रश्न विचारावेत एवढे ज्ञान नाही. सूचना द्यावी असा अधिकार नाही.आपणास शाबासकी दिल्यास आपणास अभिमान वाटावा एवढाही मोठा आहे का याबद्दल शंकाच आहे.केवळ शुभेच्छा देऊ शकतो.आपल्याशी मित्र होण्याचा योग येईल का ते माहीत नाही पण किमान सदहेतू असलेल्या व्यक्तीने सदहेतू हेतू असलेल्या व्यक्तीस सदहेतू ठेवून आपले उचितवेळी मत व्यक्त करावे . मत व्यक्त करू शकतो , न पटल्यास मनास क्लेश करून घेऊ नये हि सादर विनंती.

आपला

परमहंस


हॉट कॅट

संपादन

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.

संतोष दहिवळ १४:३६, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
हॉट कॅट विषयीची कालची तांत्रिक चावडीवरील चर्चा पाहिली असेलच. पण बग रीपोर्टला आलेल्या उत्तरानुसार हा बदल विकिपीडिया प्रचालकांकडूनच (तांत्रिक कौशल्य असलेल्या) केला जाऊ शकतो. विषय किचकट असल्याचे व पूर्ण अभ्यासाअंतीच तो तडीला न्यावा लागेल असे संकल्पने मला लिहिलेल्या संदेशात लिहिले आहे. विकिपीडियात by default हा बदल घडेपर्यंत मी एक वेगळी पद्धत हॉटकॅट वापरण्यासाठी अवलंबून पाहिली व ती यशस्वीपणे वापरता आली. तरी अशा पद्धतीने ही सुविधा वैकल्पिपकपणे कुणा सदस्यांना वापरायची असेल तर त्याच्या सविस्तर माहितीसाठी मी Gadget-HotCat.js हे सविस्तर पान आपला होकार असेल तर दोन तीन दिवसात तयार करतो. दुसरे असे की माझे सदस्य:संतोष दहिवळ/vector.js हे पान सुरक्षित केले असल्या कारणाने त्याची सुरक्षा पातळी हा बदल करेपर्यंत मोकळी करावी ही विनंती. संतोष दहिवळ ०७:१९, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

After you told me on सदस्य_चर्चा:MerlIwBot i wrote on विकिपीडिया:चावडी#MerlIwBot the reson why this edit happend: It was an manual assisted edit. But till today nobody responds. I think the main problem is that the article does not have any content and languagelinks must link to an article having the same content. If you only translate the word different meanings are possible. If you can tell me which interwiki e.g. of enwiki would be correct, i can add all interwikis of the same interwiki group. But leaving the interwiki conflict as after your revert only causes trouble. So, can you help? Merlissimo ०५:२०, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)

संपादन

मुखपृष्ठ has got many content blocks which have got titles (i.e. सुस्वागतम्, मासिक सदर etc.). Most of these titles are liked to wiki pages. The following links do not exist:


The following links to pages already deleted:


This broken links on homepage may lead to creating on unwanted pages i.e. spam. I myself clicked on of the links (आणि हे आपणास माहीत आहे का?) and was confused on the page that I saw. I was about to create the page, however stopped when i read the message carefully. Can we have them removed?

परभाषीक सदस्याने मराठी विपी वर लिहितांना वापरावयाची भाषा याविषयीचा संकेत

संपादन

नमस्कार अभय जी,

माझा मूळ मुद्दा, हा परभाषीक सदस्याने मराठी विपी वर लिहितांना वापरावयाची भाषा याविषयीचा संकेत याविषयीचा होता. आपल्याकडून प्रचालक या नात्याने त्याबाबतीत स्पष्टीकरण अपेक्षीत होते. पण, प्रथम, आपण उपस्थीत केलेल्या प्रश्नांवर येतो.

>>भांडाभांडीच्या चावडीवर (वादनिवारण चावडी) तुम्ही लिहिलेत -- हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व मराठीची भाषा-भगिनी असतांना. मला यावर तुम्हाला विचारायचे आहे की याबद्दल तुम्हाला माहिती कोठे मिळाली? हा फक्त माझ्या माहिती/ज्ञानाकरता विचारलेला प्रश्न आहे. भांडायचा किंवा वादावादी करण्याचा मुळीच उद्देश नाही. मूळ भांडणातही मला (शक्यतो) पडायचे नाही.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा : en:Standard_Hindi या लेखाप्रमाणे, Official status या विभागात, The Constitution of India, adopted in 1950, declares Hindi in the Devanagari script as the official language of India.हे नमूद आहे.


hi:हिन्दी या लेखाप्रमाणे, हिन्दी संवैधानिक रूप से भारत की प्रथम राजभाषा है और भारत की सबसे अधिक बोली और समझी जानेवाली भाषा है। चीनी के बाद यह विश्व में सबसे अधिक बोली जाने वाली भाषा भी है। तसेच , हिन्दी और इसकी बोलियाँ उत्तर एवँ मध्य भारत के विविध राज्यों में बोली जाती हैं । भारत और अन्य देशों में में ६० करोड़ से अधिक लोग हिन्दी बोलते, पढ़ते और लिखते हैं। हे नमूद आहे.


>>माझ्या माहितीनुसार मराठी मुख्यत्वे संस्कृतोद्भव भाषा आहे आणि त्यावर काही प्रमाणांत द्रविडी भाषांचाही प्रभाव (अगदी थोडा) आहे. तर हिंदी ही पूर्णपणे synthetic भाषा असून ती फारसी, पश्तो या मध्यपूर्वेतील तसेच उर्दू, प्राकृत, अर्धमागधी या एतद्देशीय भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. तरी मराठी-हिंदी भगिनी कशा ठरतील?

मराठी ही en:Indo-Aryan languages या लेखाप्रमाणे, The Indo-Aryan languages (within the context of Indo-European studies , constitutes a branch of the Indo-Iranian languages, itself a branch of the Indo-European language family. व Indo-Aryan has more than half of all recognized Indo-European languages, according to Ethnologue. The largest in terms of native speakers being Hindustani (Standard Hindi and Urdu, about 240 million), Bengali (about 230 million), Punjabi (about 90 million), Marathi (about 70 million), हेही नमूद केलेले आहे.
आणखीन एक म्हणजे, आपल्या साने गुरुजींच्या विशाल दृष्टीच्या 'आंतर-भारती' च्या कल्पनेप्रमाणे भारतात जन्मलेल्या सर्वच भाषा या आपल्या सर्वांच्याच भाषा भगिनी म्हणायला हरकत काय आहे ?
तसेच, देवनागरी लिपीत लिहील्या जाणार्‍या प्रमुख व प्रचलीत भाषा या दृष्टीनेही मराठी-हिंदी या कोणाही मराठी-हिंदी भाषकांसाठी सर्वात सोप्या व सोयीच्या आहेत. महाराष्ट्रात तसेच भारतात इंग्रजी ही ज्ञान भाषा म्हणून जाणणार्‍या व लिहू, बोलू शकणार्‍या लोकांची संख्या ही स्थानीक भाषा जाणणार्‍यां पेक्षा कित्येक पटींनी कमी आहे.


>>असे, पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की वरील प्रश्न केवळ माझ्या माहितीकरता आहे, यात कोणताही तिरकस हेतू नाही.

आकस नाही व नसावा. मूळ मुद्दयावर स्पष्टीकरण अपेक्षीत आहे, तसेच वादनिवारण चावडीला आपण तरी प्रचालक या नात्याने, विनोदाने देखील, भांडाभांडीची चावडी हे नाव वापरु नये, असे वाटते.

क.लो.अ., Girish2k ०५:५९, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hi. My bot has made more than 50 edits as you requested; Can it has bot flag please?--M.Gedawy १३:३८, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)

Can अॅंग्री बर्ड्स be restored? Kindly refer: चर्चा:अॅंग्री बर्ड्स - प्रबोध (चर्चा) १६:३५, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)


Hello. Can you please rename Mayurbot to Mayur ? This request was done one year ago, and now I think that the situation has evolved (for example, you have now a proof that the renaming has been accepted on enwiki [१]).

Thanks for your comprehension, and have a nice day. -- Quentinv57 १२:१६, १६ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hi Abhay, Will you please rename Mayurbot to Mayur as per 1 year old request.--Mayurbot ०९:२९, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)
Howdy,
Thanks for checking back after a year. I will try and follow through on this request. I am not sure if I still have the necessary admin right. If I do, I will merge the accounts.
अभय नातू २०:५१, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)

Just curious... आपण यूएसमध्ये कोठे असता? - Abhijitsathe २३:०८, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा २२".