बुद्ध एर फ्लाइट १०३

(बुद्ध एरवेझ दुर्घटना, २०११ या पानावरून पुनर्निर्देशित)

सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सकाळी बुद्ध एरवेझच्या बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानाला फ्लाइट क्रमांक बीएचए १०३ च्या दरम्यान अपघात झाला. विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोटदंडा येथे कोसळले. त्यात १० भारतीयांसह एकूण १९ प्रवासी मृत्युमुखी पडले. इतर ९ प्रवाशांपैकी २ अमेरिकन, एक जपानी व ६ नेपाळी प्रवासी होते. यात चालकदलातील सर्व म्हणजे ३ही जणांचा मृत्यू झाला.

बुद्ध एरवेझ दुर्घटना, २०११
अपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे एक बीचक्रॅफ्ट-डी विमान.
अपघात सारांश
तारीख सप्टेंबर २५, २०११
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ कोटदंडा, नेपाळ
27°37′21″N 85°22′40″E / 27.62250°N 85.37778°E / 27.62250; 85.37778
प्रवासी १९ पैकी १० भारतीय
कर्मचारी
मृत्यू १९
बचावले काही नाही.
विमान प्रकार बीचक्राफ्ट १९००-डी
वाहतूक कंपनी बुद्ध एरवेझ, खाजगी कंपनी.
विमानाचा शेपूटक्रमांक VT-AXV
पासून काठमांडू,नेपाळ
शेवट काठमांडू, नेपाळ

नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे.

विमान संपादन

बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानास दोन इंजिने व पंखे असतात व त्याची क्षमता १९ असते. अपघातग्रस्त विमान १३ वर्षे जुने आणि ९एन-एईके या क्रमांकाचे होते.

मृतांची नावे संपादन

अ.क्र. नाव राष्ट्रीयत्व
कॅप्टन जनबुद्ध ताम्राकार   नेपाळी
सहचालक पद्मा अधिकारी   नेपाळी
परिचारिका अस्मिता श्रेष्ठ   नेपाळी
शारदा कर्माचार्य   नेपाळी
जगजन कर्माचार्य   नेपाळी
निरंजन कर्माचार्य   नेपाळी
पंकज मेहता   भारतीय
छाया मेहता   भारतीय
एम मरुथचालम   भारतीय
१० एम मनिमरन   भारतीय
११ एके क्रिसुनन   भारतीय
१२ भीएम कान्कासावेसन   भारतीय
१३ टी धनशेकरन   भारतीय
१४ कत्तुर महालिङगम   भारतीय
१५ मिनाक्षी सुंदरम   भारतीय
१६ के त्यागराजन   भारतीय
१७ ॲन्ड्र्यू वाडे   अमेरिकन
१८ नेटली नेलन   अमेरिकन
१९ उजिमा तोसिनोरी   जपानी