लक्ष्मण

(सौमित्र या पानावरून पुनर्निर्देशित)

लक्ष्मण (शत्रुघ्नाचा जुळा सख्खा भाऊ) (संस्कृत: लक्ष्मण, चिनी: लोमान; जावी: लक्स्मना, लस्मना; ख्मेर: फ्र्या ल्याक्सा; लाओ: फ्रा लाक्षाना; मलय: लक्समना; मारानाव: मांगावर्ना; तमिळ: इलक्कुवान; थाई: พระลักษมณ์ , फ्रा लाक ; युआन: लाख्खाना ;) हा रामायणात उल्लेख असलेला अयोध्येच्या इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्नी सुमित्रा यांचा एक पुत्र आणि रामाच्या तीन भावांपैकी एक भाऊ होता. त्याला ऊर्मिला नावाची पत्नी होती. तिच्यापासून लक्ष्मणाला अंगदधर्मकेतु हे दोन पुत्र लाभले. रामायणातील संदर्भांनुसार याने राम व सीता यांना चौदा वर्षांच्या वनवासात सोबत केली, तसेच राम-रावण युद्धादरम्यान रामाच्या पक्षातून लढताना अनेकदा पराक्रम गाजवला.

राम-लक्ष्मणाचे आंध्रप्रदेशातील कारागिरीच्या नमुन्याचे पारंपरिक चित्र (कालखंड: इ.स.चे १८ वे शतक, संग्रह: ब्रिटिश संग्रहालय)

दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रा हिला दोन जुळे पुत्र होते, एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न..