ऊर्मिला
ऊर्मिला ही रामायणातील संदर्भांनुसार विदेहाचा राजा असलेल्या जनक कुळातील सीरध्वज जनकाची कन्या व सीतेची बहीण होती. अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ याचा पुत्र व रामाचा धाकटा भाऊ असलेल्या लक्ष्मणाशी तिचे लग्न झाले. उर्मिलेला लक्ष्मणापासून अंगद[१] व धर्मकेतु असे दोन पुत्र झाले.
पुराणकथा:लक्ष्मणाने चौदा वर्षे वनवास न झोपता व्यतित केला. हे शक्य झाले ते ऊर्मिलामुळे.कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणासाठी निद्रा घ्यायची.अशाप्रकारे चौदा वर्षे तिने झोपून व्यतित केली.
संदर्भ व नोंदीसंपादन करा
- ^ [भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. p. २०.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |