सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १८
अल्पमती
संपादनमी आपला आभारी आहे.
अल्पमती ०५:४३, १४ ऑक्टोबर २००९ (UTC)
मी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता अभियान, मुद्रित शोधन व लेख सुशोभीकरण अभियान सुरु केले आहे. आपली काहीच हरकत नसावी असे वाटते.
अल्पमती १६:१४, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
राम नारायण येथे मी केलेले भाषांतर (काही भाग)कोणीतरी उडविले आहे. मदत करु शकता काय?
अल्पमती ०९:१०, २७ ऑक्टोबर २००९ (UTC)
(फरक) (इति) . . बान की-मून; ०८:०३ . . (-१९९) . . Razimantv (चर्चा | योगदान) (this ip is doing it on multiple wikis99.35.9.52 (चर्चा)यांची आवृत्ती 439941 परतवली.)
कृपया वरील 'अलिकडील बदल' बघावा. या IP add. वर पहारा ठेवावयास हवा. तशी system मध्ये सोय असेल तर चांगले.
अल्पमती १०:४७, ३० ऑक्टोबर २००९ (UTC)
Feed back बद्दल
संपादनस्ट्रॅटेजी विकिवर Related to India येथील चर्चा पहावी .यास अधीक वजन द्यायचे असेल तर proper feed back मुळे अधीक चांगली insight मिळू शकेल या करिता विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा हे पान स्ट्रॅटेजी विकिवरून् आणले, actual field feed back घेण्याकरिता चांगले वाटते. एक तर त्या अनुषंगाने तुमचाही feed back आणि इतर येथील किंवा mr-wiki ग्रूपवरून कुणाचा feedback घेता येईल ते सुचवावे.माहितगार १५:१०, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)
जुन्या चर्चा
संपादननमस्कार, जुन्या चर्चांना आर्काइव्ह करण्याचा प्रयत्न केले, जुन्या चर्चा साचाही वापरून पाहिला, जमले नाही. नेमके काय करावे याविषयी माहिती हवी. Gypsypkd १०:३७, १ नोव्हेंबर २००९ (UTC)
निवडणुक २००९
संपादनसंध्या मी एक विश्लेशन तयार केलेले आहे.
- भाग १ मध्ये प्रमुख पक्षांना मतदारसंघानुसार मिळालेली मते(%) आहेत. सदस्य:Maihudon/temp#इतर माहिती
- भाग २ मध्ये मिळालेल्या मता वरून काहि निष्कर्ष काढले आहेत.सदस्य:Maihudon/temp#प्रमुख पक्षाला मिळालेली मते
आपण हे विश्लेशन मुख्य लेखात टाकु शकतो का? (संदर्भ??). निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर मिळालेली माहिती मी वापरली आहे. जर शक्य असेल तर शुध्दलेखन व निष्कर्षांवर थोडे लक्ष देणे.
त्याशिवाय मी मनसे इफेक्टचा एक विभाग लेखात बनवन्याचा प्रयत्न करतोय सदस्य:Maihudon/temp#मनसे इफेक्ट तो देखिल टाकु शकतो कि नाही कलवणे.
Maihudon १८:२१, १ नोव्हेंबर २००९ (UTC)
- डॉन,
- विश्लेषणे छानच आहेत. त्यातील प्रमुख पक्षाला मिळालेली मते हा तक्ता मुख्य लेखात घालावा. इतर माहिती या तक्त्याबद्दल मुख्य लेखात प्रस्तावना घालावी व उपपानावर (२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मतदारसंघानुसार मतांची टक्केवारी) तेथील माहिती घालावी.
- मनसे इफेक्ट बद्दलही मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम नावाच्या विभागात प्रस्तावना करुन २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मनसे परिणाम (किंवा तत्सम शीर्षकाच्या) उपपानावर माहिती घालावी.
- पुन्हा एकदा शाबास!
- अभय नातू ०२:५३, २ नोव्हेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादननमस्कार, तुम्ही तातडीने मदत केल्याबद्दल आभारी आहे. यापुढेही मी हक्काने वारंवार त्रास देईनच. Gypsypkd ०४:५२, २ नोव्हेंबर २००९ (UTC)
साचा:धूळपाटीसाचा
संपादनसाचा:धूळपाटीसाचा येथे स्वागत साचात सुधारणा केल्या आहेत प्रतिक्रीया मिळाल्यास काही बदल करून स्वागत साचा बदलता येईल.माहीतगार ०८:५८, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
महाराष्ट्रातील विभाग
संपादनकृपया [वर्ग:महाराष्ट्रतील विभाग] यास [वर्ग:महाराष्ट्रातील विभाग] असा बदल करुन देता येइल काय? अग्रीम धन्यवाद.
अल्पमती ११:०७, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
मला तो विदर्भ साठी हवा आहे.कि त्याला 'महाराष्ट्रातील प्रांत' असा करु? अल्पमती १६:१३, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
टेस्टींग
संपादनया इनमूटबॉक्स चे केवळ मराठी टायपिंगचे इरॅटीक होते आहे काही ठिकाणी होते काही ठिकाणी होत नाही. (वगवेगळ्या ठिकाणी) टेस्टींग करतो आहे. तुमच्या चर्चा पानावरील disturbance करिता क्षमस्व
हबल दुर्बिण
संपादन120.61.9.50 यांनी रिकामे केलेले पान उलटविले. तसेच वरील लेखावरील चर्चा कृपया बघा.
V.narsikar १६:१३, ११ नोव्हेंबर २००९ (UTC)
मुखपृष्ठ
संपादनमुखपृष्ठावर अजुनही "२५,००० चा टप्पा" असे title दिसत आहे, ते ३०,००० करावयास पाहिजे का?
कृपयासदस्य:अनिरुद्ध बघा. ही जाहिरात समजायची काय?
१५:५४, १६ नोव्हेंबर २००९ (UTC)
आपणास प्रश्न करण्याचा माझा हेतू फक्त माझ्या मनातील धूसर संकल्पना ठळक करण्याचाच होता.जाहिरातीबद्दल विकिपीडियाचे नियम शोधत बसुन ते इंग्रजीत वाचणे यापेक्षा एक प्रश्न टाकला तर माझ्यासारख्या अनेकांचे समाधान त्याद्वारे होते असा माझा समज आहे. आपणांस ते त्रासदायक तर ठरत नाहीना?
०३:१०, १७ नोव्हेंबर २००९ (UTC)
61.12.20.203 यांनी केलेले बदल कृपया तपासा.
०७:४१, १८ नोव्हेंबर २००९ (UTC)
हे उमगले नाही, सहाय्य हवे
संपादनमागे म्हटल्या विकि चावडीवर चर्चा केल्या प्रमाणे जर्मन विकिपीडियाच्या de:Wikipedia:Mentorenprogramm मेंटॉर प्रोग्राम संबधीत साचा de:Vorlage:Mentor हा मराठी विकिपीडियात साचा:Mentor येथे आणला मूळ जर्मन किंवा साचा:Mentor मी कुठेही पान काढा किंवा delete साचा अंतर्भूत केलेला नाही तरी पण पान काढा किंवा delete साचा कुठून येतो आहे काही कळत नाहीये (आणि तसा तो येऊ नये या करता काय करता येईल) . I am quite confused. जरा तपासून पाहणार का please मी कुठे चुकतो आहे ते.
de:Wikipedia:Mentorenprogramm ची मराठ् विकितील टेस्टींग विकिपीडिया:धूळपाटी२१ येथे घेत आहे .मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने काही उपयूक्त सूचना असेल तर जरूर द्यावी.
- ता. क.: मला जर्मन भाषा येत नाही भाषांतरणे गूगल ट्रान्सलेट वरून घेतली आहेत.( अर्थात त्याचा प्रथम दर्शनी तरी delete साचाशी संबंध दिसत नाही आहे)
- माहितगार १५:४९, २२ नोव्हेंबर २००९ (UTC)
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, साचा:!) मी इंग्रजी विकिपीडियातून घेतला असला तरी तो जर्मन विकिपीडियावर किंवा जर्मन मंडळींच्या इंग्रजी विकिपीडियातील लेखात अधिक आढळतो. इंग्रजी विकिपीडिया काही alternative syntax वापरत असल्यास कल्पना नाही . साचा:!) आपल्या साचा त मेटा वरील SWMT team (small wikipedia monitoring team) सदस्याने delet साचा लावला आहे , बहूधा नजरचूकीए लावला असावा असा अंदाज आहे मी त्यांना clarification आणि साचा:!) चा उपयोग् चूकीचा असेल तर alternative syntax सूचवण्याची विनंती केली आहे.
- ता.क. मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरी routin patrol करिता मराठी विकि समूदाय पुरेसा समर्थ आहे असे वाटते. SWMT team च्या रडार वर केवळ मराठी विकिक्वोट आणि मराठी विकिबूक्स ठेवावेत आणि त्यांच्या रडार मधून मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरी वगळावेत अशी मी त्यांना विनंती केली आहे मला वाटते या विनंतीस तुमचे आणि बाकी मराठी विकिपीडियन्स चे समर्थन असेल
- माहितगार ०५:३६, २३ नोव्हेंबर २००९ (UTC)
प्रताधिकार बाबतची सूचना
संपादन- संचिका चढवा येथे गेल्यानंतर सध्या प्रताधिकारीत चित्रे न चढवण्याबद्दल सूचना अंतर्भूत केलेली दिसत नाही .
"इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाचातसा उतरवू नये. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येइल" हि सध्याची सूचना प्रताधिकाराबाबत्ची भूमिका पुरेशी सुस्प्ष्ट मांडते आहे असे वाटत नाही. सुचवणीचा सवडीने आंतर्भाव केलात तरी चालेल कृपया नोंद घ्यावी माहितगार ०७:३२, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
मेंटॉर प्रोग्राम
संपादन- यापूर्वी या चर्चा पानावर आणि चावडीवर चर्चा केल्या प्रमाणे जर्मन विकिपीडियावरील मेंटॉर प्रोग्राम(जर्मन विकिपीडियावरील प्रकरण खूपच elaborate असावे वाटते) प्राथमीक स्तरावर मार्गदर्शक येथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भ पानावर मराठी विकिवरील पान आणि मूळ जर्मन पान असा तक्ता संदर्भाकरिता उपलब्ध केला आहे.
- ज्या गोष्टीत मराठी विकित घेताना अडचणी आल्या त्या प्रकल्पाच्या चर्चा पानावर नमुद केल्या आहेत. तीथेही काही वेळ देऊ शकाल तर पहावे.
- अर्थात अशा कोणत्याही गोष्टीचे यश सदस्यांच्या सहभागावर अवलंबून आहे, या बाबतीत अधीक पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तीथे एक राऊंड मारलात आणि काही मत प्रदर्शन केले तर बरे होईल त्या नंतर इतरही अनुभवी सदस्यांना संपर्क करून मग नवीन सदस्यांना त्याबद्दलमाहिती देता येईल.
- माहितगार १५:१९, २९ नोव्हेंबर २००९ (UTC)
प्रबंधक कि व्यवस्थापक?
संपादनप्रबंधक कि व्यवस्थापक? जर मॅनेजर ह्या अर्थाने शब्द प्रयोग केला असेल,तर माझ्या माहिती प्रमाणे मराठीत व्यवस्थापक असे म्हणतात.प्रबंधक हा शब्द सहसा हिंदीत पहावयास मिळतो. उदा. आजकाल बँकामध्ये हिंदी शब्दप्रयोग करण्याची पद्दत असल्याने (महाराष्ट्रात) पुर्वी असणारी "शाखा व्यवस्थापक" पाटी आता मुख्य /शाखा प्रबंधक अशी दिसु लागली आहे.
मधू दंडवते
संपादननमस्कार अभय,
विकीवर मधु दंडवते आणि मधू दंडवते हे दोन वेगळे लेख आहेत.ते एकत्र करता येतील का?
संभाजीराजे १६:५३, २ डिसेंबर २००९ (UTC)
आभारी आहे
संपादनप्रयत्न करुन बघतो. योगेश 117.195.65.61 ०५:१४, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- होय तो सदस्य प्रवेश चालतो. आधी इन्ग्रजीत प्रवेश केला मग मराठी विकित, पळ्णार्या साखळी च्या समस्येवर हा उपाय काढला. मराठीत सदस्य पृष्ठही बनवले आहे. Yogesh Khandke ०५:३५, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- गूड मला स्वतःला नेहमी भेडसावणार्या गोष्टीबद्दल अजूनपर्यंत कोणी प्रश्न का उपस्थित केला नाही याचे मला आश्चर्य वाटत होते.मी माझे होमपेजच विशेष:सदस्यप्रवेशकरून प्रश्न माझ्यापूरता मिटवला. हे आपण जुन्या न्याहाळक आवृत्तीमूळे होते म्हटले आहे, मी स्क्रिन रिझोलूशचा संबध असावा या गैरसमजात होतो.या निमित्ताने माझ्य माहिती संचयात भर. अभय, मला वटते इतर भाषी विकिपीडिया प्रमाणे केवळ सदस्य प्रवेश एवजी नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा असे लांब वाक्य देता येईल का ? कारण संस्कृत विकिपीडियाचे लोकलायझेशनकरताना मी हा प्रश्न "प्रविशतु / लेखां सृजतु" असे अधीक शब्द घेऊन धसास लावला आहे. 219.64.92.196 ०६:२१, ३ डिसेंबर २००९ (UTC)
’हे नवीनच काही तरी’
संपादनबराहा फाँट वापरकर्त्यांनी सिंगल इनव्हऋटेड कॉमा वापरला तर त्याचे दृश्य टिंब चिन्हात दिसते आहे पूर्वी माझे लक्ष गेले नाही का त्यांनी काही नवे बदल केले आहेत माहित नाही पण हे असे विकिपीडियातच होते आहे.त्याच्या बराहा पॅड मधे नेहमी प्रमाणे इन्बव्हर्टेड कॉमाच येतो आहे ! या गोष्टीचा मराठी भाषेस किंवा फॉर्म्टींगच्या दृष्टीने काही फायदा वाटतो का ? किंवा असा बदल नको असल्याचे त्यांना कळवणे अधीक श्रेयस्कर आहे ?माहितगार ०८:१०, ३ डिसेंबर २००९ (UTC)
अलीकडील बदल
संपादन(स्थांनांतराची नोंद) ऍवजी स्थानांतराची नोंद असा बदल कृपया करावा.(शुद्धलेखन) वि. नरसीकर (चर्चा) ११:३२, ३ डिसेंबर २००९ (UTC)
About redirect page
संपादननमस्कार अभय,
एम.ए.अय्यंगार हे पान अनंतशयनम अय्यंगार या नावाने redirect करायचे तर काय करावे लागेल? अय्यंगार हे लोकसभेचे अध्यक्ष होते. वाचक लेख शोधताना अनंतशयनम अय्यंगार या नावाने शोध घ्यायची पण शक्यता आहेच. तेव्हा redirect page असेल तर चांगले होईल.
संभाजीराजे १३:५४, ३ डिसेंबर २००९ (UTC)
शब्द-अक्षर
संपादननमस्कार नातू साहेब,आपल्या प्रकल्पात बरेचसे शब्द मुळ शब्दांपेक्षा थोडे वेगळे लिहिले गेले आहेत,विशेषतः तमिळ किंवा दक्षिणेकडचे, तेव्हा माझी अशी विनंती आहे असा कोणताही शब्द किंवा विषय आपल्या समोर आल्यास नि:संकोचपणे मला पाठवुन द्यावा मी माझ्या परिने आपणास मदत करण्याचा प्रयत्न करिन.कळावे,धन्यवाद.
कूल आयडिआ ! भन्नाट कल्पना
संपादननक्कीच मी त्यासाठी एक लेख तयार करतो आणि तुम्हास पाठवुन देतो. त्यात शक्य तितकी माहिती अंतर्भुत करण्याचा प्रयत्न करिन
अभिनेत्यांच्या गावाविषयी
संपादनइथे काही अभिनेते/नेत्र्यांची गावांचा उल्लेख करताना असे लक्षात येते कि काही जण एकाच गावचे आहेत (सामाईक गाव).तेव्हा त्यांचे गावानुसार वर्गीकरण करण्याची सोय असावी.जसे उदा.नयनतारा,तृषा कृष्णन व विद्या बालन ह्या तिघी पलक्कड केरळच्या आहेत तर पलक्कड असा वर्ग करता येईल? इंग्रजीत जसे मुंबई पिपल किंवा बँगलोर पिपल असतो तसा.मी ह्याविषयी आधीच एका चर्चेत मत मांडले आहे.
लोकसभा सदस्य
संपादनलोकसभा सदस्य हा वर्ग आधीच उपलब्ध मला माहितच नव्हते. ते वापरता येतीलच. पण त्या वर्गांमध्ये एकही उपवर्ग उपलब्ध नाही.तेव्हा मला अपेक्षित असलेले वर्ग लोकसभा सदस्य या वर्गात हलवता येतील का?मी आधीच अनेक लेखांमध्ये लोकसभा सदस्यत्वाचा उल्लेख केला आहे तेव्हा सगळे वर्ग हलविणे त्रासदायक ठरेल.मग काय करावे?
संभाजीराजे १९:३६, ३ डिसेंबर २००९ (UTC)
समर्थ रामदास स्वामी
संपादनसमर्थ रामदास स्वामी हा लेख कृपया बघावा. त्यात मी चित्र टाकले आहे. हे माझ्या संग्रहातील चित्र आहे. ते कोठुन आणल्या गेले ते लक्षात नाही. सुमारे १ वर्षापुर्वीचे ते चित्र आहे. जर आपल्यास योग्य वाटत असेल तर ते ठेवावे अन्यथा काढावे.होय. प्रताधिकार वगैरेची भानगड नको. वि. नरसीकर (चर्चा) ११:०१, ७ डिसेंबर २००९ (UTC)
दिवाळी अंक
संपादननमस्कार,
सर्वप्रथम इतके दिवस विकिपीडिया पासून दूर राहिल्याबद्दल क्षमस्व. आता मी दुप्पट जोमाने काम सुरू करीत आहे.
दिवाळी अंकाची कल्पना अतिशय आवडली. तसेच २५००० लेखांचा टप्पा गाठल्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे.
आता नेहमी भेटूच.
क.लो.अ.
-कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०४, ७ डिसेंबर २००९ (UTC)
तुम्ही हा बदल पाहिलात काय ?
संपादन- तुम्ही हा बदल पाहिलात काय ? सर्च इंजिनमध्ये त्यांची त्यांनाच नसती गोष्ट आढळली दिसते:)
- मला वाटते अजून थोडे दिवस शांत रहावे आपोआप काही सुधारणा होते का पहावे.
- माहितगार १४:४८, ८ डिसेंबर २००९ (UTC)
अलीकडील बदल
संपादन(फरक) (इति) यापेक्षा (फरक) (इतिहास) असे पूर्ण लिहावयास काय हरकत आहे? वि. नरसीकर (चर्चा) ०३:२५, १० डिसेंबर २००९ (UTC)
विकिवरील खाते बंद करण्यासंबंधी
संपादनगेले काही दिवस मी मराठी विकिपीडियावर भारतीय राजकारण या विषयावर माझे योगदान द्यायचा जाणीवपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न करत होतो.गेले काही दिवस सकाळी उठल्यानंतर पहिले काम विकि बघणे असे.
पण गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींमुळे माझा मराठी विकिवरील विश्वास उडाला आहे. मी लिहिलेले लेख परिपूर्ण नक्कीच नाहीत. पण त्यात बदल काय करावा याविषयी कोणताही रचनात्मक सल्ला न देता केवळ "या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी." असा शेरा मारला आहे. संबंधीची चर्चा चर्चापानावर असणे तर सोडाच तर चर्चापान तयारच नाही.
मराठी वेबदुनियेत इतर अनेक दर्जेदार संकेतस्थळे आहेत. मला वाटते मी माझे योगदान त्या संकेतस्थळांवर देऊ शकेन. माहितीचा स्त्रोत म्हणून कोणीही मराठी विकिपीडिया बघायला जात नाही. कारण महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीविषयी मराठी विकिपीडियापेक्षा अधिक माहिती इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध आहे.तेव्हा मराठी विकिपीडियापेक्षा मला इतर मराठी संकेतस्थळांवर लेखन करायला आवडेल.
सबब माझे मराठी विकिपीडियावरील खाते बंद करण्यात यावे ही विनंती. खाते बंद करता येत नसेल तरीही ’संभाजीराजे’ या नावाने मराठी विकिवर यापुढे एकही लेख दिसणार नाही.
संभाजीराजे ०२:११, १२ डिसेंबर २००९ (UTC)
- तुम्हा दोघांची चर्चा कोणत्या विशीष्ट लेखाच्या संदर्भाने चालू असल्यास कल्पना नाही, परंतु साचांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे याबाबत सहमत आहे.
- अजून सुधारणा विषयक सूचना लावलेल्या बहूसंख्य साचांचा उद्देश त्या लेखाचे संबधीत लेखाचे सुधारणा घडवून आणणार्या विशीष्ट प्रक्ल्पा संबधीत वर्गीकरणाचा असतो. या सुधारणा काळाच्या ओघात होणे अपेक्षीत असते आणि हे सहसा सार्वत्रिक सहयोगाचे अवाहन असते. पण बर्याचदा खासकरून नवीन सदस्य या सूचना साचे व्यक्तिगत टिपण्णी वाटत असावेत असे मला आढळून आले आहे. असा गैरसमज होऊ नये याकरिता काही तरी करावयास हवे पण नेमके काय करता येईल ते ठरवता येत नाही आहेत. काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात.
- विस्तार साचात काहितरी तांत्रीक अडचण आहे कि ज्यामुळे तो बर्याचदा तुटल्या सारखा दिसतो.
- लेखांवर साचे लावण्याचे कारण बर्याचदा त्याचे आपोआप ज्या प्रकारची सुधारणाहवी आहे त्या वर्गात आणि प्रक्ल्पात वर्गीकरण होते.लेख पानावंर साचांची गर्दी होऊ नये म्हणून लेख प्रकल्पान्वये चर्चा पान साचे असावयास हवेत. पण हे सर्व करण्यास पुरेसे संपादन (सक्रीय सदस्य) बळ हवे या मुद्द्यावर गाडी येऊन अडते खरी.
- व्यक्तिगत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक प्रकल्पाची योजना आखली आहे पाहू कसा काय रिस्पॉन्स मिळतो ते.
- शुद्धलेखन विषयक बर्याच साचांची मी रचना केली आहे ते संबधीत प्रकल्पात पाहून सुधारता येतील पण खास करून विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका साचात योगदान आणि त्याचा वापर सदस्यांकडून चर्चा पानावर वाढवून हवा आहे . तो कसा वाढवता येईल याबद्दलही प्रतिसादाची अपेक्षा आहे.माहितगार ०७:२८, १२ डिसेंबर २००९ (UTC)
Sir, I am a member of some other language Wiki and want to hide myself. I suppose you are someone special in Marathi Wiki. I wanted to ask when do you people award Barnstars to your fellow language members? While seeing some articles (taking help of a Marathi friend) which are to be translated or to be connected with mine I see the writer's profile and find either no Barnstars or only a few awarded to them. Accordingly I may suggest the same for my language project also, we are too behind Marathi Wiki to catch you but can definately learn from you. Reply here itself, thank you in advance.
आपल्या सर्वांच्या उत्तराबद्दल धन्यवाद. माझा गैरसमज दूर झाला आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे मराठी विकीवर भारतीय राजकारण विषयक लेख लिहायला आवडतील.
अवांतर: मंत्रीमंडळ आणि मंत्रीपद या शब्दांमध्ये चुकीचे काय आहे? मराठी वर्तमानपत्रांमध्ये हे दोन शब्द सर्रास वापरले जातात.
संभाजीराजे ०७:०१, १३ डिसेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनआपुलकीने कौतुक केल्याबद्दल धन्यवाद! :) सध्या वेळ आणि उत्साह या दोन्ही गोष्टी जुळून आल्यामुळे उरक वढला आहे.. मलाही त्यामुळे हर्ष वाटतोय्.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५६, १७ डिसेंबर २००९ (UTC)
चर्चा:वेदोक्त
संपादनवेदोक्त बद्द्ल लेख वाचुन वाईट वाटले.वादग्रस्त(आपल्या विचार सरणीमुळे)लेख हे दुवा देऊन च लिहावेत .लेखाचे मी समर्थन करतो. संदर्भ खालीलप्रमाणे आहेत.तसेच मुळ लेखात मला जाणुनबूजुन बदल केलेले जाणवले आहेत,याची विशेष नोंद घ्यावी.
संदर्भ - 1. राजर्षि विशेषांक (रविवार दिनांक), पृ. 10 2. उक्त, पृ. 11 3. उक्त, पृ. 9 4. शाहू छत्रपती आणि लोकमान्य, पृ. 42-43 5. उक्त, पृ. 42
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 1986 - वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.
उ:वेदोक्त
संपादननमस्कार आपल्या" या शब्दात मी प्रत्येकाला त्यात गृहीत धरले आहे.माफी असावी. मूळ लेख येथे आहे.http://khattamitha.blogspot.com/2008/04/1.html
बाकी काही नाही.
उ:वेदोक्त
संपादनमुळात विकिपिडियावर वेदोक्त म्हणजे काय?याची माहीती हवी.याचा अतिशय पुढिल भाग म्हणजे वेदोक्त वाद.. अनुनासिक ऊच्चारातील फरक होय.काहीवेळा मुद्दामहुन संस्कृत श्लोकाचे पठन हे कुळ व जाती भेदामूळे अयोग्य ऊच्चारात वा नियमानुसार केले जात नाही.मुळात ही देव भाषा असा वेदिक व द्र्विड संस्कृतील समज.
धन्यवाद.
संपादनकसं काय बुवा तुम्हास विकिकरण जमते? कळावे.लो.अ.
उ. टपालतिकिटावरील चित्रे
संपादननमस्कार अभय!
विकिमीडिया कॉमन्स संस्थळावरील या वर्णनानुसार भारतीय टपालतिकिटांची चित्रे खालील परिस्थितीमध्ये प्रताधिकारमुक्त समजली जातात :
- ६० वर्षांहून जुनी भारतीय टपालतिकिटे (म्हणजे इ.स. २००९ सालात इ.स. १९४९ सालापूर्वीची तिकिटे) प्रताधिकारमुक्त मानली जातात.
- टपालतिकिटांविषयी एखादे प्रकाशन (पुस्तक इ.) किंवा लेख असल्यास, टपालतिकिटांचे कृष्णधवल चित्र चालू शकते. (याचा अर्थ : अन्य विषयांसाठी, उद., विकिपीडियावरील व्यक्तिविषयक लेख सजवायला तिकिटांची चित्रे वापरू नयेत. टपालतिकिटांविषयी विकिपीडियावरील लेखात तिकिटांची कृष्णधवल चित्रेच चालू शकतील; रंगीत नाहीत.) तिकितांची रंगीत चित्रे वापरण्यासाठी टपाल खात्याच्या जनरल डायरेक्टरांची (लेखी) अनुमती मिळवावी लागेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:२७, १८ डिसेंबर २००९ (UTC)
सातत्य उत्पाती
संपादन- विशेष:योगदान/202.138.97.9 या अंकपत्त्यावरून येणार्या मराठी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिपीडियाचवरील योगदानाचा ट्रॅक घेण्याचा प्रयत्न केला. बर्यापैकी डोके खाजवावे लागले.मी या क्षेत्रातील तज्ञ नाही पण उत्पाताच्या पद्धतीतील दिर्घ एकसारखे पणा वरून आयपी बहूधा स्टॅटीक.असावा अशी शंका येते. जाणीव पूर्वक उत्पात प्रथम दर्शनी प्राथमिकवर्गीय मराठी शालेय विद्यार्थ्याकडून उत्पात केल्याचा आभास निर्मिती करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे असे वाटते कारण काही पानातील पलटवलेले उत्पात इतिहासपानात जाऊन पुन्हा आणलेले दिसताहेत.उत्पात नित्य आणि खूप मोठाही नाही पण दिर्घ गामी सातत्य जाणवते.
माहितगार ०६:१६, १९ डिसेंबर २००९ (UTC)
मदत हवी
संपादनसाचे बनविण्यासाठी मदत हवी.
साचे बनविण्यासाठी मदत हवी.
संपादनइंग्रजी विकीपिडियातून लेख हे भाषांतरीत करायचे आहेत.जी एम आर टि चा लेख जमला नाहि.
बटन
संपादन- संकल्पजींनी आमच्या परस्परातील चर्चे नुसार खालील बटनातील प्रीलोडकंटेंट बनवून दिले आहे. नवागतांना सहाय्य पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण सुद्धा एकदा बघून घेतल्यास बरे होईल असे वाटते माहितगार ०५:३६, २३ डिसेंबर २००९ (UTC)
उत्तर भारतीय नावे
संपादननमस्कार!
उत्तर भारतीयांमध्ये मूळ पहिल्या नावांतील भागांची लेखने वेगळी लिहिली जातात, हे माहीत आहे. परंतु, ती दोन शब्द मिळून होणारी पहिली नावेच आहेत (फर्स्ट नेम). आपल्याकडे जसा पहिले नाव - मधले नाव - आडनाव असा क्रम पाळला जातो, तोच क्रम उत्तर भारतीय नावांमध्येही असतो; फक्त आपल्याकडे पहिले नाव सलग लिहायची रीत आहे. खेरीज, बंगाली नावांपैकी काही नावे इंग्लिश व हिंदीत अकारण मोडून लिहिली जातात (उद.: सत्येंद्रनाथ बोस; त्याचे बंगाली नाव बंगालीत सलग लिहितात. तशीच अन्य उदाहरणे : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सुभाषचंद्र बोस); ती बंगालीत सलगच लिहिली जातात. पंजाबी नावांपैकी 'सिंग' हा धार्मिक नामवाचक प्रत्यय व्यक्तीच्या पहिल्या नावाशी संलग्न असतो, त्यामुळे तिथे पहिल्या नावाशी 'सिंग' किंवा 'कौर' जोडायची मराठीत रीत आहे. उदा.: मनमोहनसिंग. मुळात 'सिंग'/ 'सिंह' हा प्रत्यय उपखंडातील क्षत्रिय कुळांमध्ये 'वर्मा' या जुन्या क्षत्रियवाचक प्रत्ययासारखा वापरयची रीत मध्ययुगापासून आचरली जाऊ लागली (आठवा, 'रविवर्मा'). त्यामुळे ते पहिल्या नावाशी संलग्न धरले जाते.
याखेरीज हिंदू उत्तर भारतीय पहिल्या नावांमध्येही घटक शब्द तोडून लिहिले जातात; पण त्यांचे मराठीतील लेखन सलगच असते. उदा.: हिंदीत 'अटल बिहारी वाजपेयी' आणि मराठीत 'अटलबिहारी वाजपेयी'.
या सांस्कृतिक व भाषिक वैशिष्ट्यांना लक्षात घेऊन ते बदल केले होते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:१३, २४ डिसेंबर २००९ (UTC)
- प्रसंगी मूळ मथळे स्थानिक भाषेतील नावाप्रमाणे ठेवायला हरकत नाही (आणि पहिल्या ओळीत स्थानिक भाषेनुसार व मराठी लेखनरीतीनुसार, अशा दोन्ही पद्धतींनी नावे नोंदवावीत). पण मराठी मजकुरात उपखंडातील नावांबाबत रूढ मराठी संकेत वापरावेत, असे वाटते. अन्यथा मराठीत सर्वत्र 'अटलबिहारी वाजपेयी', 'मुलायमसिंह यादव' असे लिहिले जात असताना, मराठी विकिपीडियावरील मजकुरात सर्वत्र 'अटल बिहारी वाजपेयी', 'मुलायम सिंह यादव' असे लिहिले जाताना दिसणे, मराठीच्या भाषिक प्रवृत्ती लक्षात घेता आगळेच वाटेल.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:३८, २४ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार अभय, मी खूप दिवसांनी परत आलो आहे. तुमचे नाव अलिकडील बदल मध्ये दिसले, तुम्ही आला आहात म्हणून तुम्हाला कळविले. Gypsypkd ०५:२३, २५ डिसेंबर २००९ (UTC)
मी टाकलेली चित्रे
संपादनमी बाहेरगावी जातांना कॅमेरा बरोबर असतो.चांगली व विकिपीडिया च्या दृष्टीने उपयुक्त वाटली ती चित्रे काढतो व तेथे टाकतो.मला पूर्ण कल्पना आहे कि ती चित्रे विकिपीडियाच्या मानकांप्रमाणे नाहीत.कारण माझेपाशी असलेल्या कॅमेर्याची क्षमता पुरेपूर नाही.तरीही, केवळ नुसता लेखांचा मथळा असेल त्यापेक्षा ओबडधोबड कां होइना,चित्र असले तर तेथे भेट देणार्यास काही ना काही तरी कळेल या हेतूपोटी मी चित्रे टाकत असतो.पहा-कोयता कोणासही, (विकिपीडियाच्या नीतीप्रमाणे) ती वगळण्याचा/बदलण्याचा हक्क आहेच.काही वनस्पतींची चित्रे, कोणी ती वनस्पती ओळखुन त्याचे चित्र काढुन ती येथे टाकेल, अशी शक्यता मलातरी कमीच वाटते. मी टाकलेल्या चित्रांपेक्षा चांगली चित्रे टाकणार्यांचे नेहमी स्वागतच आहे. सहज मनात विचार आला म्हणुन लिहीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०४:४९, २६ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार, माहीतगार यांच्याशी झालेली चर्चा वाचली म्हणालात आणि मदत करण्यास तुम्ही नेहमी तयार असता हे मी अनुभवले आहेच, धन्यवाद. मी संपादन केलेल्या लेखांमध्ये त्यांचे स्रोत लिहिलेले नाही, पक्षी किंबहुना सर्व सजीवसृष्टी बद्दलची माहिती पुस्तकांशिवाय काही व्यक्तींनी सांगितलेली माहिती आणि अनुभव असे सगळे घटक त्यात आले. आता किमान पुस्तकांची नावे तरी लेखात टाकावयाचे असल्यास संदर्भ म्हणून काय करता येईल? नावे (संदर्भ आणि व्यक्ती) देणे यासाठी काही शॉर्टकट आहे का? की प्रत्येक लेख उघडूनच तसे संदर्भ लिहावे लागतील? पक्षी यादी बद्दल नवे पान करावे की आहे त्यातच जास्तीची माहिती भरावी? कळावे. Gypsypkd ०५:३७, २६ डिसेंबर २००९ (UTC)
संचिकेत किल्ल्याविषयक चित्रे टाकायची आहेत
संपादन| नाव =हरिश्चंद्रगड | उंची = ४००० फूट | प्रकार = गिरीदुर्ग | श्रेणी = मध्यम | ठिकाण = नगर, महाराष्ट्र | डोंगररांग = माळशेज | अवस्था = व्यवस्थित | गाव = पाचनई,खिरेश्वर }} -->
अशा विविध प्रकारच्या संचिकेत किल्ल्याविषयक चित्रे टाकायची आहेत.मदत हवी जेणेकरुन महाराष्ट्रातील एकही किल्ला विकिपिडियावर फोटोशिवाय असणार नाही. कर्हाडे १८:३०, २८ डिसेंबर २००९ (UTC)
प्रोत्साहनाबद्दल मी आपला आभारी आहे.फोटोशॉप हे सॉफ्टवेअर पण टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याने चित्रांची प्रतवारी अधिक सुधरेल. धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०३:४०, २९ डिसेंबर २००९ (UTC)
Little help.
संपादनCan you please check why images are not displaying on तोरणमाळ ?
I copied the image links from en:Toranmal . Obviously, I am missing something.
धन्यवाद. --दीप देवेंद्र नरसे १९:००, २९ डिसेंबर २००९ (UTC)
डेव्हिड डिऑप
संपादनडेव्हिड डिऑपमध्ये Bordeaux आणि Leopold Senghor चे मराठीकरण केल्याबद्दल धन्यवाद. अमराठी नावांच्या मराठीकरणासंबंधी मराठी विकिपेडियाचे काही विशेष नियम असल्यास कळवावेत. गणेश धामोडकर ०९:२७, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
इमेल कँपेनच्या दृष्टीने तांत्रीक सहाय्य हवे
संपादन- काही इंटरनेट मित्रांकरवी email marathi font list कँपेन करवण्याचा मानस आहे. email marathi font list पानातील दाखवा-लपवा आणि विकिपीडिया धूळपाटीवर मराठीत टायपींग करून पहा बटन हे ईमेलवर जाऊ शकेल असे तांत्रीक सहाय्य हवे आहे.
माहितगार ११:०७, १ जानेवारी २०१० (UTC)
तांत्रीक सहाय्य हवे २
संपादन- विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/धूळपाटी येथे पहावे मराठी विकिपीडियावर दाखवा लपवा साचाच्या आत जीथे जीथे इनपूट् बॉक्स बटन लावले तीथे बटनाच्याकहाली एक् ब्लँक विनाकारण तयार होते आहे. सेम सिंटॅक्स इंग्रजी विकिपीडीयात टेस्ट केल्यास असे होत नाही आहे. या प्रॉब्लेम मुळे हवे असलेले लेख प्रकल्पात माझे गाडे थोडे अडते आहे.कुठे चुकतो आहे ते कृ. तपासून सांगावे. माहितगार १६:०१, १ जानेवारी २०१० (UTC)
प्रचालक गट
संपादन- शुभेच्छांकरिता धन्यवाद माहितगार ०४:५०, २ जानेवारी २०१० (UTC)