सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १९

प्रकल्पःबावन्नकशी २०१०

संपादन

मराठी विकिपीडिया मध्ये २०१० या वर्षात सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी एक प्रयोग म्हणून प्रकल्पःबावन्नकशी २०१० हा प्रकल्प कसा राहील. आपले मत, सुचना व दुरुस्त्या हव्या आहेत.

आपल्या सक्रिय सहभाग आणि quick response बद्दल धन्यवाद. मी माहितगार आणि संकल्प द्रविड यांच्या चर्चापानावर त्यांचे विचारदेखील मागितले आहेत. गणेश धामोडकर ०७:३३, ५ जानेवारी २०१० (UTC)
प्रकल्पाच्या चर्चापानास भेट द्यावी. दुरुस्त्या सुचवाव्यात. गणेश धामोडकर ०९:२८, ५ जानेवारी २०१० (UTC)

विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा समसमिक्षेची विनंती या पानावर नोंदवली आहे. गणेश धामोडकर १२:२१, ६ जानेवारी २०१० (UTC)

प्रकल्पाच्या विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा#किमान पात्रता व साचे या विभागात आपली मदत व सुचना हव्या आहेत. समसमिक्षेत पास झालेल्या लेखांच्या चर्चापानावर आपल्या मताप्रमाणे {{समसमीक्षित}} हा साचा लावण्याचा प्रयत्न केला, पण तो अस्तित्वात नाही. गणेश धामोडकर ०७:५३, ७ जानेवारी २०१० (UTC)

global sysops proposal

संपादन

याचे भाषांतर करावयाचे आहे काय? कृपया कळविणे. वि. नरसीकर (चर्चा) ११:०५, ८ जानेवारी २०१० (UTC)

'वर्ग:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे' असा वर्ग करणे योग्य राहील काय?या वर्गात औष्णिक,जलविद्युत,अणुविद्युत असे सर्व प्रकार येतील. त्याचे उपवर्ग औष्णिक,जलविद्युत,अणुविद्युत हे राहु शकतात. कृपया दाभोळ बघा. वि. नरसीकर (चर्चा) १३:४७, ८ जानेवारी २०१० (UTC) वि. नरसीकर (चर्चा) १३:४७, ८ जानेवारी २०१० (UTC)

पान वा संचिका हटवण्यासाठी काय करावे बरे?

संपादन

विशेषतः वादग्रस्त बाबतीत

विनोद रकटे १८:२२, १० जानेवारी २०१० (UTC)

साचा बाबत

संपादन

टिनटिन चा साचा काय करता येईल?

विनोद रकटे २३:०३, १२ जानेवारी २०१० (UTC)

वेद विभागात वर्ग दुरूस्ती

संपादन

वेद विभागात वर्ग:ब्राह्मणे असा आहे.खरं म्हणजे ब्राह्मणके वा ब्राम्हणके असा वर्ग असावा.

कळावे.

विनोद रकटे १०:११, १५ जानेवारी २०१० (UTC)

साचा माहितीचौकट चित्रपट

संपादन

नमस्कार,

साचा:माहितीचौकट चित्रपट हा साचा मी वापरतो आहे. पण सध्या मला ते पान संपादन करावयाची परवानगी नाही. क्रुपया ते पान संपादित करुन काही रकाने टाकवे ही विनंती. अधिक माहीती साठी साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट हे पान बघावे. तुमच्या वेळेबद्द्ल धन्यवाद --प्रशांत शिरसाठ ०६:४४, २० जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार,
साचा:माहितीचौकट चित्रपट पानाचे सुरक्षाकवच पुन्हा पक्के करावे. माझे योग्य ते बदल झाले आहेत. मदतीबद्द्ल खूप आभार.
--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:२१, २१ जानेवारी २०१० (UTC)

खा-या पाण्याचे सरोवर वर्ग न करता कसे काय गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून येतय?

शब्दोच्चारण

संपादन

नमस्कार,

तुम्ही तुमचा अमुल्य वेळ वापरुन नेहमी माझ्या चुका सुधारता, या बद्दल हार्दिक धन्यवाद. तुम्हाला परत परत काम नको म्हणुन वाटले की शब्दांचे उच्चार तुम्हालाच विचारतो. क्रुपया खालील शब्द सुधारण्यास मदत करावी.

  1. नाईट = Night
  2. ड्रोन = Drone
  3. एक्सट्रिम रिस्क = Extreme Risk
  4. ईन द फ्लेश = In the Flesh
  5. वन्स अपॉन अ टाईम = Once Upon a Time
  6. टाईमलेस = Timeless
  7. ईनफायनाईट रिग्रेस = Infinite Regress
  8. नथिंग य्हुमन = Nothing Human
  9. थर्टी डेज = Thirty Days
  10. काऊंटरपॉईंट = Counterpoint
  11. लेटेंट ईमेज = Latent Image
  12. ब्राईड ऑफ चॅकोटीका = Bride of Chaotica!
  13. ग्रॅव्हिटी = Gravity
  14. ब्लिस = Bliss
  15. डार्क फ्रंटियर = Dark Frontier
  16. द डीसिज = The Disease
  17. कोर्सः ऑब्लिव्हीयन = Course: Oblivion
  18. द फाईट = The Fight
  19. थिंक टँक = Think Tank
  20. जगरनॉट = Juggernaut
  21. समवान टु वॉच ओव्हर मी = Someone to Watch Over Me
  22. रीलेटिव्हीटी = Relativity
  23. वॉरहेड = Warhead
  24. ईक्विनॉक्स = Equinox
  25. सर्व्हायव्हल इंस्टिंक्ट = Survival Instinct
  26. बार्ज ऑफ द डेड = Barge of the Dead
  27. टींकर, टेनर, डॉक्टर, स्पाय = Tinker, Tenor, Doctor, Spy
  28. ऍलीस = Alice
  29. रीडल्स = Riddles
  30. ड्रॅगॉन्स तीथ = Dragon's Teeth
  31. वन स्मॉल स्टेप = One Small Step
  32. द व्हॉयेजर कंस्पिरसी = The Voyager Conspiracy
  33. पाथफाइंडर = Pathfinder
  34. फेयर हेवन = Fair Haven
  35. ब्लिंक ऑफ ऍन आय = Blink of an Eye
  36. व्हरट्युसो = Virtuoso
  37. मेमोरीयल = Memorial
  38. सूनकातसी = Tsunkatse
  39. कलेक्टिव्ह = Collective
  40. स्पिरीट फोक = Spirit Folk
  41. ऍशेस टु ऍशेस = Ashes to Ashes
  42. चाईल्डस प्ले = Child's Play
  43. गुड शेपर्ड = Good Shepherd
  44. लिव्ह फास्ट ऍंड प्रॉस्पर = Live Fast and Prosper
  45. म्युस = Muse
  46. फ्युरी = Fury
  47. लाईफ लाईन = Life Line
  48. द हाँटिंग ऑफ डेक ट्वेलव्ह = The Haunting of Deck Twelve
  49. युनीमेट्रिक्स झिरो = Unimatrix Zero

मदतीसाठी खूप खुप आभारी व तसदी बद्दल क्षमस्व.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १३:११, २५ जानेवारी २०१० (UTC)

डेल्टा क्वाड्रंट/आल्फा क्वाड्रंट‎

संपादन

नमस्कार,

मी डेल्टा क्वाड्रंट व आल्फा क्वाड्रंट‎ या लेखांना पान काढा म्हणून टाकले होते. तुम्ही त्यांना पुनर्निर्देशित केले. माझ्याकडून काय चुकले?

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०६:२४, २६ जानेवारी २०१० (UTC)

स्टाइनबेक

संपादन

ओके. बदल माघारी घेतला आहे. बाकी, कॉमन = सर्रास (विद्यमान संदर्भाने), सामायिक (एरवी).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२३, २७ जानेवारी २०१० (UTC)

साच्यांचे वर्गीकरण

संपादन

नमस्कार! आपण साचा:पेशवे साचा बनवल्याचे पाहिले. परंतु तो साचा 'वर्ग:साचे' या वर्गात किंवा त्याच्या उपवर्गांत समाविष्ट केला नव्हता (आता तो साचा मी साच्यांमध्ये वर्ग केला आहे.). नवीन साचे बनवताना ते 'साचे' या वर्गात किंवा त्याअंतर्गत उपवर्गांत जरूर समाविष्ट करावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३९, ३० जानेवारी २०१० (UTC)

पदकासाठी मनःपूर्वक धन्यवाद! मधल्या वर्षभराच्या विकिनिद्रेनंतर आता सहभाग घेताना समाधान वाटतं.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५२, ३१ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार

संपादन

रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी हा नवा लेख लिहिला आहे आणि वाय.व्ही. रेड्डी मध्ये साचा क्रम हा साचा पहिल्यांदा लावून पाहिला आहे. कृपया दोन्ही लेख पाहून त्यातील उणीवा दूर कराव्या. नंतर इतर गव्हर्नर मध्ये तो साचा लावणार असल्याने मला नव्या असलेल्या विषयाबद्दल तुम्हाला त्रास देत आहे. काही सूचना असल्यास जरुर सांगा किंवा थेट बदल करून टाका. तुम्ही केलेले बदल पाहून मग मी तसे नव्या लेखात टाकीन. रिझर्व बँकेच्या वेबसाईट वरील गव्हर्नरची चित्रे वापरता येतील का? Gypsypkd ०६:३३, ३१ जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

संपादन

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

मदत हवी

संपादन

इंगजी विकिपिडियावर काही तासापूर्वी मला अटकाव करण्या त आला आहे. मी काहीच केले नसताना हा प्रतिबंध का? i try secure login but failed.please help me.

विनोद रकटे २३:११, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)

धन्यवाद काम झाले.

पण नेमके काय घडले? विनोद रकटे २३:५५, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)

ह्यात बदल कधी होतील ?

संपादन

मी खाली काही बदल दिले आहेत जे मी ह्यापूर्वी देखील सूचविले होते परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले असावे.पुन्हा एकदा हे असेच व अनेक शब्द आहेत जे वेगळ्याच प्रकारे नोंदविण्यात आले आहेत..ह्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.Prasannakumar १५:३२, ३ मार्च २०१० (UTC)

१५:२७, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:कड्डलोर ‎ (नवीन पान: कड्डलोर नसून फक्त कडलूर असा शब्द आहे..वारंवार इंग्रजी शब्दानुसार ...) (वर) १५:२५, ३ मार्च २०१० (इति | फरक) कड्डलोर ‎ (वर) १५:२४, ३ मार्च २०१० (इति | फरक) वेल्लोर ‎ (वर) १५:२३, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:वेल्लोर ‎ (नवीन पान: वेल्लूर असा शब्द आहे वेल्लोर नव्हे ते ब्रिटीश शब्दरचनेनुसार लिहि...) (वर) १५:१८, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:चेन्नई ‎ (नवीन पान: चेन्नई च्या ऐवजी चेन्नै असा बदल करावा. जसे मुंबई पूर्वी मुंबै असेच...) (वर) १५:१७, ३ मार्च २०१० (इति | फरक) चेन्नई ‎ (वर) १५:१५, ३ मार्च २०१० (इति | फरक) नागरकोइल ‎ (वर) १५:१४, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:नागरकोइल ‎ (नवीन पान: Nagercoil (Tamil: நாகர்கோவில் नागरकोविल असे नाव आहे. बदल अपेक्षित आहे.Prasannakumar १५:३२, ३ मार्च २०१० (UTC)) (वर) १५:१२, ३ मार्च २०१० (इति | फरक) चर्चा:पुदुक्कट्टै ‎ (→नामांतर हवे.: नवीन विभाग) (वर) १५:१०, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:नमक्कल ‎ (नवीन पान: नमक्कल असे नाव नसून नामक्कल असे आहे.बदल करावा. Prasannakumar १५:३२, ३ मार्च २०१० (UTC)) (वर) १५:१०, ३ मार्च २०१० (इति | फरक) नमक्कल ‎ (वर) १५:०९, ३ मार्च २०१० (इति | फरक) चर्चा:दिंडीगुल ‎ (→नामांतर हवे.: नवीन विभाग) (वर) १५:०७, ३ मार्च २०१० (इति | फरक) पलानी ‎ (वर) १५:०६, ३ मार्च २०१० (इति | फरक) न चर्चा:पलानी ‎ (नवीन पान: पलानी नसून पळनि असे नाव आहे.कृपया बदल करावा. Prasannakumar १५:३२, ३ मार्च २०१० (UTC)) (वर) १५:०५, ३ मार्च २०१० (इति | फरक) पलानी ‎

चित्र वापरण्याची परवानगी

संपादन

नमस्कार, मी बाबाराव सावरकर यांच्यावर एक लेख लिहिला, त्यात बाबारावांचे चित्र नाही म्हणून मी सावरकर.ओआरजी या संकेतस्थळावरून संचालकांशी संपर्क साधला, त्यांनी त्यांच्याकडील कोणतेही चित्र विकिवर चढविण्यासाठी मला मेल पाठविली आहे. संबंधीत चित्रे चढवितांना काय काय करावे लागेल ? आधी ती चित्रे माझ्या पी. सी. वर घ्यावी लागतील का ? की कॉपी पेस्ट पुरेसे आहे ? ती परवानगी जोडावी लागेल का ? आवश्यक असल्यास परवानगी कुठे आणि कशी पाठवायची ? याबद्दल सविस्तर कळवा. तुमच्याकडून माहिती मिळाल्याशिवाय ती चित्रे मला चढविता येणार नाहीत. तसेच लेख तपासता आला तर त्याबद्दलही कळवा. Gypsypkd ०५:३५, ६ मार्च २०१० (UTC)

नमस्कार, अवर्गीकृत चित्रांचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल माहिती हवी. मी हाच प्रश्न दि. १९-०२-२०१० रोजी चावडीवरही मांडला होता. पण कोणी उत्तर दिले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. Gypsypkd ०५:०६, ९ मार्च २०१० (UTC)


मी काही चित्रांची वर्गीकरणे आज केलेली आहेत.कृपया ते तपासुन योग्य वा अयोग्य ते कळवावे व चुक असल्यास आवश्यक तो बदल सुचवावा, ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५२, १० मार्च २०१० (UTC)

आपण केलेली एकूण संपादन कशी मोजतात ?

संपादन

संपादनांच्या इतिहासात फक्त यादी स्वरूपात ती दर्शविली जातात ,एकूण किती संपादनं झाली हे कसे कळेल? संपादन म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपात मोजतात ? मला ह्यातली विशेष माहिती नाही आणि वाचण्यात आले नसल्याने सरळ प्रश्न विचारत आहे.त्या नंतर आणखी दोन प्रश्न आहेत.१) आपल्या सदस्य खात्यात आपण जे भाषेचे साचे टाकतो ते टाकण्याचा अधिकार सदस्यास आहे का?जर असेल तर त्यास कसे जाणता येईल कि त्याला कोणत्या स्तराची भाषा येते.तो साचा कुठे दिलेला आहे? त्यासाठी काही निकष आहेत का? २)स्टार (कार्याबद्दल देतात ते.) पद्धती काय आहे? तीची थोडक्यात माहिती द्यावी.म्हणजे तीच्याने काही अधिक अधिकार वगैरे मिळतात का किंवा तीचे निकष काय आहेत.Prasannakumar १२:५०, ११ मार्च २०१० (UTC)

२०१० इंडियन प्रीमियर लीग ‎

संपादन

मनोज सदस्याने २०१० भारतीय प्रीमियर लीगचे पान २०१० इंडियन प्रीमियर लीग कडे पुननिर्देशित केले आहे. माझ्या मते भारतीय प्रीमियर लीग नाव योग्य आहे. तुमचे मत कळवावे.

Maihudon ०६:३६, १२ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



भाषांतर

संपादन

विकिपीडिया:चावडी/प्रगती‎ येथे टाकलेल्या आवाहनाच्या उतार्‍याचे भाषांतर केले आहे. कृपया तपासावे व आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१३, १८ मार्च २०१० (UTC)

उलटविणे

संपादन

सदस्य:Mahitgar यांच्या सदस्यपानात केलेले बदल उलटविण्याचा मी प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. कृपया मदत करा. वि. नरसीकर (चर्चा) ०९:२१, १९ मार्च २०१० (UTC)‎

बदल केला आहे.विचार कळवा.चर्चा हि पाहणे. विनोद रकटे.

नमस्कार

संपादन

आहो नातू ,आम्हासा काही बार्नस्टार वगैरे देणार आहात कि नाही? काय् राव मराठी माणसाचा हुरूप वाढवा कि? १३००हून अधिक संपादन झाली हाहाहा,अहो गमतीने म्हणालो सहज कानावर घालू म्हटलं..काय? क.लो.अ.Prasannakumar ०३:४६, २० मार्च २०१० (UTC)

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद

संपादन

नमस्कार अभय नातू, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद.क.लो.अ. Pra.K. ०३:२९, २२ मार्च २०१० (UTC)

हे ही बघा

संपादन

कृपया येथे बघा. वि. नरसीकर (चर्चा) १६:२६, २२ मार्च २०१० (UTC)


नाही.त्याची खंत बाळगु नका.सहज म्हणुन सांगीतले.मी गौरवासाठी काम करत नाही. 'न मे कर्मफले स्पृहा' हे मनात ठेउन मी काम करतो. सहज म्हणुन सांगीतले. तसाही,गौरव तर Gypsypkd यांनी केलेलाच आहे.आपण केलेल्या गौरवाबद्दल मनःपुर्वक आभार.


वि. नरसीकर (चर्चा) ०७:५४, २४ मार्च २०१० (UTC)

म.भा. संवर्धना बद्दल लेखात...

संपादन

नमस्कार ,आपला संदेश पाहिला आपली सूचना आवडली आणि त्याच प्रकारे लेखाची मांडणी व्हावी असे माझे मत आहे. पूर्वीचा जुना लेख अजुनही पूर्णपणे मिटविला नसल्याने (तो जवळपास तसाच ठेवला आहे फक्त मांडणी बदलली आहे.) त्यात बदल करीत असताना अशा (नकारात्मक आशयाचा) प्रकारचा मजकूर काढून नव्यावे सकारात्मक लिखाणावर भर देण्याचा माझा विचार आहे,आपण ह्यात काही योगदान देऊ शकला तर खूपच मदत होईल आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आवडतील.क.लो.अ.Pra.K. ०२:४१, २५ मार्च २०१० (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



शुद्धलेखन चिकित्सेत मदत हवी

संपादन
विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश लेखाच्या विकिकरणाचे प्राथमिक काम तरी झाल्याचे जाणवते. हा लेख मराठी विकिबुक्सवर हलवतो आहे.लेख आंतरजालावर इतरत्रही प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे संदर्भ विभागात नुकताच काही बदल केला आहे त्याच्या शुद्धलेखन तपासणित सहाय्य हवे आहे.माहितगार १९:०८, १ एप्रिल २०१० (UTC)

मासिक सदर बदलून बरेच महिने झाले, एप्रिल महिन्यासाठी बदलल्यास बरे होईल.

अजयबिडवे २०:१४, १ एप्रिल २०१० (UTC)

३ एप्रिल् उदयोन्मुख लेख

संपादन

नमस्कार अभय! मी या शनिवाराचा उदयोन्मुख लेख वेळेअभावी बदलू शकणार नाही असे दिसते. जमल्यास आपण तो बदलू शकाल काय? विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/३ एप्रिल २०१० हे पान बनवावे लागेल, तर साचा:ताजा उदयोन्मुख लेख बदलावा लागेल. कृपया आवश्यक ते बदल करावेत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:१६, १ एप्रिल २०१० (UTC)


मी कोकिळेचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.तो (.wav) या sound file च्या format मध्ये आहे. मला तो कोकीळ या लेखात आवाजाची फाईल टाकायची आहे. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. मी एक प्रयत्न केला होता पण तो फसला. वि. नरसीकर (चर्चा) १०:५२, २ एप्रिल २०१० (UTC)

काम झाले. वि. नरसीकर (चर्चा) १४:५९, २ एप्रिल २०१० (UTC)

राज्य शासनाची पदे

संपादन

राज्य शासनात असलेली विविध पदे (सचिव (शासन),उपसचिव(शासन), कक्ष अधिकारी (शासन))व इतर अधिकारी व तेथील पदे आणि विविध विभाग (उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, रोजगार हमी योजना,महसूल, आरोग्य, विधी व न्याय,सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे इत्यादी)यावर लेख लिहिणे योग्य राहील काय? कृपया मार्गदर्शन करा.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३९, ३ एप्रिल २०१० (UTC)


धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१६, ५ एप्रिल २०१० (UTC)


Thank You ( from Poland )

संपादन

धन्यवाद :२०१० पोलंड टी.यु. १५४ दुर्घटना !!! --Indu ०१:४८, ११ एप्रिल २०१० (UTC)


श्री गणेश अथर्वशीर्ष

संपादन

हे पान मी वाचले. त्यावर काही लिहावे असे वाटले होते. पण "गणेश अथर्वशीर्ष" हा मथळा बरोबर आहे की नाही अशीच शंका आली. (१) मथळ्यात 'श्री' असावा का? साधारणपणे श्री, सर, माननीय, बॅरिस्टर वगैरे शब्द मथळ्यात व्यक्तिनावाच्या अगोदर येत नाहीत, देवाच्या नावाआधी का यावेत? (२) गणेश अथर्वशीर्ष हेच नाव या अथर्वशीर्षाचे आहे की आणखी काही? (३) या तथाकथित गणेश अथर्वशीर्षाव्यतिरिक्त आणखी काही अथर्वशीर्षे आहेत का? (४) अथर्वशीर्षात गणेशविद्या असा शब्द आहे, पण देवतेचे नाव गणेश असे न देता गणपति असे दिले आहे. (शिवपुत्र हा शब्द आहे). मात्र, शेवटी श्रीमद् गणेशाथर्वशीर्षोपनिषत्समाप्तः असे लिहिले आहे. हे शेवटचे वाक्य मूळ स्तोत्राचा हिस्सा नाही. मग मथळ्यात गणेश शब्द असावा का? (५) अथर्वशीर्षाचा अथर्वन् या ऋषीशी संबंध आहे का की अथर्ववेदाशी? (अथर्ववेदात असेलही, पण शोधूनही हे शीर्ष मला सापडले नाही.) की अथर्वशीर्ष म्हणजे केवळ शांत डोके? (६) गणेश, गुणेश, आणि विनायक यांच्यापेक्षा गणपति ही निराळी विभूति(व्यक्ति, देवता इ .इ.)आहे हे नक्की. म्हणजे गणेश अथर्वशीर्ष हे नाव मुळातच अयोग्य आहे. (७) देवी अथर्वशीर्ष नावाचे एक अथर्वशीर्ष आंतरजालावर सापडले. कदाचित आणखीही अथर्वशीर्षे असावीत. (८) आदि शंकराचार्यांनी अथर्वशीर्षांबद्दल लिहिले आहे असे समजले, पण त्यांनी त्यांच्या लिखाणांत या तथाकथित गणेश अथर्वशीर्षाबद्दल काहीही उल्लेख सापडला नाही. म्हणजे त्यांच्या काळात हे अथर्वशीर्ष नव्हते का?

मला वाटते लेखाचा मथळा 'अथर्वशीर्ष' असा करावा. त्यात तूर्त गणपति अथर्वशीर्ष आणि देवी अथर्वशीर्ष यांची मिळेल तेवढी माहिती आणि मूळ स्तोत्रे द्यावीत. आधीच छापलेल्या लिखाणाचे संपादन करणे त्यामानाने सोपे आहे, ते करण्याचा यथावकाश प्रयत्न करीत आहे.--J १०:४७, १२ एप्रिल २०१० (UTC)

मदत हवी

संपादन

नमस्कार अभय, मी लुई ब्रेल नावाचा लेख लिहिण्यास सुरूवात केली आहे. यातील फ्रेंच नावे देवनागरीत लिहून / तपासून द्यावे. तसेच लेख मांडणी किंवा इतर काही बदल आवश्यक वाटत असल्यास तेही करावे. येवढ्यात तुम्ही, माहितगार खूप बिझी आहात असे वाटते. असो. Gypsypkd ०९:४९, १३ एप्रिल २०१० (UTC)

व्यस्त आहात?

संपादन

१)एवढ्यात बरेच व्यस्त दिसता.सहज ख्याली खुशाली विचारण्यासाठी लिहित आहे. २) मी दिनांक १४ एप्रिल रोजी काही संचिकांची वर्गीकरणे केलेली आहेत. ती आपल्या सवडीने बघुन घ्यावीत.त्यात काही दुरुस्त्या असेल तर त्या कृपया सुचवाव्यात. आपल्या दि. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेप्रमाणे ती केलेली आहेत.झालेली चर्चा

वि. नरसीकर (चर्चा) ०६:३३, १७ एप्रिल २०१० (UTC)

मिडियाविकी

संपादन

मिडियाविकी चर्चा:Anontalkpagetext‎ हा लेख बघावा. कृपया यातही आवश्यक ते बदल करावेत ही विनंती. (बरयाच चे बर्‍याच करावे.)


मिडियाविकी:Anontalkpagetext येथे मुळ संदेशात. चर्चापानावर 'बर्‍याच' मी केले आहे. 'बर्‍याच' पायी आपणास बराच त्रास देतो आहे.क्षमस्व. वि. नरसीकर (चर्चा) ०७:४८, ३० एप्रिल २०१० (UTC)

महाराष्ट्रच्या जिल्हा

संपादन

There is a very good collection of articles related to the districts of Maharashtra in Marathi at DES website. The files in pdf can be converted using webdunia conversion tool to convert CDAC (DVB TT Surekh) to unicode. I think these are very good reference materials to elaborate articles about the districts of Maharashta. --Eukesh १३:३३, ५ मे २०१० (UTC)

चित्र

संपादन

नमस्कार, मी चित्र:Chantamani (Kalamb) 1.jpg हे चित्र चढविले आहे. यात इंग्रजी नावात चूक झालेली आहे म्हणून ते चित्र कृपया काढून टाकावे, मी नवे, सुधारीत चित्र चढवीन. Gypsypkd ०५:५०, ९ मे २०१० (UTC)

विमानतळ

संपादन

विमानतळांचे वेगळे लेख बनविणे अपेक्षित नाही काय? वि. नरसीकर (चर्चा) १७:४५, २२ मे २०१० (UTC)

धन्यवाद. 117.198.87.132 १७:५१, २२ मे २०१० (UTC)

जोडाक्षरे

संपादन

अचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१३, २३ मे २०१० (UTC)

काम झाले.तसदीबद्दल क्षमस्व. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४६, २३ मे २०१० (UTC)

मौलिक मार्गदर्शन

संपादन

मला विमानतळांवरील लेखांसाठी आपल्या मौलिक मार्गदर्शनाबद्दल व माझे काम कमी व सुरळीत करण्याबद्दल मनापासुन आभार.कधी याचे तर कधी त्याचे बोट धरुन मार्गक्रमण सुरू आहे. आज ज्या टप्प्यावर पोचलो त्याचे जास्तित-जास्त श्रेय माहितगार, आपण व संकल्प यांना देण्यास मला बिलकुल संकोच वाटत नाही.ईतरांचाही त्यात वाटा आहेच.Gypsypkd हे पण सतत प्रोत्साहनपर भूमिकेत आहेत.कधीही न बघितलेल्या व्यक्तिबद्दल आपलेपणा दर्शविल्याबद्दलपण आपणा सर्वांस धन्यवाद देतो.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५७, २३ मे २०१० (UTC)

एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२

संपादन

यातील साच्यात,५०पेक्षा जास्त व्यक्ति मृत पावलेले अपघात निळ्या रंगात दाखविलेले आहेत असे नमुद आहे परंतु एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ हे हिरव्या रंगात दिसत आहे. योग्य ती दुरुस्ती करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:४६, २६ मे २०१० (UTC)

पुनर्निर्देशित पाने २०१० फिफा विश्वचषक संघ

संपादन

नमस्कार, तुम्ही केलेली पुनर्निर्देशित पाने पाहिली. खरतर ती पाने तशीच हवी आहेत. अधिक माहिती साठी पहा २००६ फिफा विश्वचषक संघचर्चा:२००६ फिफा विश्वचषक संघ.

Maihudon १८:५२, २६ मे २०१० (UTC)

हे तपासावे

संपादन

नमस्कार, मुखपृष्ठ वरील आणि हे आपणास माहीत आहे का? मध्ये कोल्हा (Jackal) व खोकड (Fox) असे लिहिण्यात आले आहे. संदर्भ ग्रंथ आणि मराठी-इंग्रजी शब्दकोश वरून मात्र खोकड (Jackal) आणि कोल्हा (Fox) (अगदी उलट) आहे असे दिसते. संस्कृत संदर्भ ग्रंथाप्रमाणे शृगाल, जंबूक आणि क्रोष्टु असे तीन पशू श्रेणी क्रव्याद मधील कुळ श्वानाद्य अंतर्गत येतात. लांडगा (सं वृक, इं Wolf), खोकड (सं शृगाल, इं Jackal) आणि कोल्हा (सं जंबूक, क्रोष्टु, इं Fox) असे आहे. या विषयी आणखी संदर्भ पाहता आले तर पहावे. आमचे गाव लहान आणि माझ्या जवळील साधने मर्यादीत असल्याने तुम्हाला कळविले आहे. वरीलप्रमाणे नोंदी बघून आवश्यक बदल करावे लागतील. Gypsypkd ०३:५३, २७ मे २०१० (UTC)


खुलाश्याबद्दल धन्यवाद.मला वाटते अधुन मधुन इंग्रजी विकीवर कटाक्ष टाकणे जरुरी आहे.त्याने माझे अनेक कन्सेप्टस् आपोआप क्लिअर होतील.

वि. नरसीकर (चर्चा) ०४:०७, २७ मे २०१० (UTC)

लेख पहावा

संपादन

नमस्कार, येवढ्यात खूप व्यस्त आहात का? याच पानावर असलेल्या दि. ०९ मे (चित्र काढा) आणि दि. २७ मे (हे तपासावे) अशा दोन वेगवेगळ्या विनंत्या केल्या आहेत. (चिंतामणीचे दुसरे फोटो मी कॉमन्सवर चढवून मूळ लेखात लावले आहेत) आठवण म्हणून पुन्हा लिहिले. तसेच कोहोजगड हा लेख आणि त्याचे चर्चापान पहा. Gypsypkd ०६:१२, ३१ मे २०१० (UTC)

नमस्कार

संपादन

नमस्कार अभय, काय हल्ली वरचेवर भेट होत नाही म्हणून सहज चौकशी करावी असे वाटले,नविन लेखांतील आमच्या कामा कडे लक्ष असूद्या म्हटलं ,काही कमीजास्त असेल तर कळवा,दुसरे सहस्त्र (२०००)पार केले आम्ही,हाहाहा,अधूनमधून टिचकी मारा आमच्याकडे,क.लो.अ.Pra.K. १४:४४, १ जून २०१० (UTC)

विमानतळ आणि शहरांची योग्य नाव.

संपादन

तमिळनाडुतील विमानतळांच्या नावात योग्य बदल करावा.

  • तुतिकोरिन वगैरे असे काही नाव नसून तुत्तकुडि असे नाव आहे,बदल अपेक्षीत
  • तसेच वेल्लोर नसून वेल्लूर असे नाव आहे.
  • दिंडुक्कल हे नाव असून दिंडिगुल वगैरे असे काही नाही.
  • तंजावर असे मराठीत म्हणत असतीलही परंतु स्थानिक उच्चार आणि नाव तंजावूर असे आहे ,तमिळ मध्ये ऊर ह्या शब्दाचा अर्थ गाव असा होतो. वेल्लूर,कडलूर,कोइमतूर इ.क.लो.अ.
  • कोयमतूर किंवा कोवै असा स्थानिक उच्चार होतो आणि उल्लेखही कोवै असाच होतो.

चे.प्रसन्नकुमार ०७:००, ६ जून २०१० (UTC)

विमानतळांच्या नावात योग्य बदल करावा.

संपादन

सदस्य प्रसन्नकुमार यांनी मला दिलेला संदेश जोडला आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती. संदेश तुतिकोरिन वगैरे असे काही नाव नसून तुत्तकुडि असे नाव आहे,बदल अपेक्षीत चे.प्रसन्नकुमार ०६:५३, ६ जून २०१० (UTC) तसेच वेल्लोर नसून वेल्लूर असे नाव आहे. क.लो.अ. दिंडुक्कल हे नाव असून दिंडिगुल वगैरे असे काही नाही. तंजावर असे मराठीत म्हणत असतीलही परंतु स्थानिक उच्चार आणि नाव तंजावूर असे आहे ,तमिळ मध्ये ऊर ह्या शब्दाचा अर्थ गाव असा होतो. वेल्लूर,कडलूर,कोइमतूर इ.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०६:५६, ६ जून २०१० (UTC)

वि. नरसीकर (चर्चा) ०७:०१, ६ जून २०१० (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा १९".