विकिपीडिया चर्चा:प्रकल्प बावन्नकशी २०१०

या प्रकल्पाविषयी आपली मते इथे मांडावीत. गणेश धामोडकर ०४:३९, ५ जानेवारी २०१० (UTC)

नामविश्व संपादन

आपल्या प्रकल्पाची सुरवात करून पुढाकार घेतल्या बद्दल अभिनंदन.

मराठी विकिपीडिया प्रकल्पांकरिता विकिपीडिया हे विकिपीडिया:नामविश्व वापरते त्यामुळे : च्या अलिकडे विकिपीडिया हाच शब्द यावयाला पाहिजे. हे प्रकल्प पान [विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०]] असे स्थानांतरीत करणे चांगले

माहितगार ०४:५०, ५ जानेवारी २०१० (UTC)

स्थानांतरण केले. गणेश धामोडकर ०५:५१, ५ जानेवारी २०१० (UTC)

पुढाकार घेउन चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. वि. नरसीकर (चर्चा) ०६:१०, ५ जानेवारी २०१० (UTC)

धन्यवाद! आपल्या सहभागाची अपेक्षा. गणेश धामोडकर ०७:०९, ५ जानेवारी २०१० (UTC)

समसमीक्षण प्रक्रिया संपादन

या प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या लेखांचे समसमीक्षण (Peer Review) व्हावा ही अपेक्षा आहे. साधारणपणे ही प्रक्रिया खालीलप्रमाणे व्हावी --

१. शक्यतो प्रकल्पात भाग घेतलेल्या सदस्यांनी असे समीक्षण करावे. त्यासाठी त्या लेखाच्या चर्चा पानावर आपले नाव समीक्षक असल्याचे लिहावे.

२.समीक्षण करून सूचना, विचार इ. त्या त्या पानाच्या चर्चा पानावर मांडावेत.

३. इतर लेखकांनी त्यास उत्तर द्यावे किंवा प्रस्तावित बदल करावे.

३.१ शक्यतो समीक्षकाने स्वतः हे बदल करू नयेत (शुद्धलेखन, व्याकरणाचे बदल जरुर करावेत).

४. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समीक्षकाने आपली सहमती दाखवण्यासाठी {{समसमीक्षित}} हा साचा तारीख व सहीसकट चर्चा पानावर लावावा.

५. प्रकल्प पानावर (किंवा उपपानावर) अशा समसमीक्षित पानांची वेगळी यादी करावी.

अभय नातू ०७:४८, ५ जानेवारी २०१० (UTC)

मान्य. लेखांना बावन्नकशी दर्जा देण्यासाठी समसमिक्षा आवश्यक. विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा येथे समसमिक्षा केल्या जावी. समसमिक्षा पास झालेल्या लेखांची यादी इथे नोंदवावी. विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमिक्षीत बावन्नकशी लेख गणेश धामोडकर ०८:१९, ५ जानेवारी २०१० (UTC)

वर्ग:बावन्नकशी संपादन

सध्या सदस्यसंख्या व लेखांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर सहज लक्ष ठेवता येते. परंतु जसजशी त्यांची संख्या वाढेल तसतसे त्यांना नियंत्रित करणे कठिण होईल. यासंबंधी काही करता येईल काय? या प्रकल्पातील लेखांचा एक वर्ग करून तो संबंधित लेखाच्या चर्चापानावर दाखवता येईल. प्रबंधकांनी इकडे लक्ष द्यावे. मी हा तात्पुरता साचा तयार केला आहे, त्यात प्रबंधकांनी या दृष्टीने योग्य ते बदल करावेत.

मुलभूत पात्रता संपादन

एख्याद्या लेखाला समसमिक्षीत बावन्नकशी लेख म्हणून मान्यता देण्यासाठी काही मुलभूत पात्रता तपासल्या जाव्यात ही अपेक्षा आहे.

  1. लेख किमान दहा ओळींचा (वाक्य) असावा.
  2. किमान एक संदर्भ उद्धृत केला असावा.
  3. व्याकरणदृष्ट्या अचूक असावा.

यात दुरुस्त्या सुचवाव्यात. गणेश धामोडकर ०९:२७, ५ जानेवारी २०१० (UTC)

आठवड्याचा उदयोन्मुख लेख संपादन

संकल्प द्रविड यांनी मांडलेल्या आठवड्याचा उदयोन्मुख लेख या संकल्पनेला हा प्रकल्प पुरकच ठरेल. या प्रकल्पाअंतर्गत आपण आठवड्याला किमान ५ बावन्नकशी लेख जरी निर्माण किंवा पुनर्लिखित करू शकलो तर त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट लेख आठवड्याचा उदयोन्मुख लेख म्हणून promote करता येईल.

शिवाय मासिक सदरासाठी जो लेख निवडला जातो त्याचा दर्जा तुलनेत अतिशय उच्च असावा अशी मान्यता आहे. उदयोन्मुख लेखासाठी इतके high standards ठेवण्याची गरज नसावी. तसेच मुखपृष्ठावरील आपणांस माहित आहे का? हे सदर आळसावून पडले आहे, त्या सदरासाठीही या प्रकल्पातील लेख निवडता येतील.

या सदरामुळे सदस्यांमध्ये चांगले लेख लिहिण्याची चुरस निर्माण होऊन मराठी विकिपिडीयाला अधिकाधीक सक्षम बनवता येईल. शिवाय नविन सदस्यांना या प्रकल्पाद्वारे चांगले लिखाण करण्याची प्रेरणा मिळून आपल्यास अपुरे पडणारे मनुष्यबळ निर्माण करता येईल.

आपली मते आवश्यक. गणेश धामोडकर ०३:५६, ६ जानेवारी २०१० (UTC)

Return to the project page "प्रकल्प बावन्नकशी २०१०".