हो चि मिन्ह शहर (व्हियेतनामी: Thành phố Hồ Chí Minh, Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg उच्चार ;; जुने नाव: सैगॉन, फ्रेंच: Saigon) हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. हनोई ही व्हिएतनामची राजधानी असली तरीही हो चि मिन्ह सिटी हेच देशातील प्रमुख शहर मानले जाते.

हो चि मिन्ह शहर
Thành phố Hồ Chí Minh
व्हिएतनाममधील शहर


हो चि मिन्ह शहर is located in व्हिएतनाम
हो चि मिन्ह शहर
हो चि मिन्ह शहर
हो चि मिन्ह शहरचे व्हिएतनाममधील स्थान

गुणक: 10°46′10″N 106°40′55″E / 10.76944°N 106.68194°E / 10.76944; 106.68194

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
स्थापना वर्ष इ.स. १६९८
क्षेत्रफळ २,०९५ चौ. किमी (८०९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ७९,८१,९००
  - घनता ३,८०० /चौ. किमी (९,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://www.hochiminhcity.gov.vn/

१७व्या शतकापासून ख्मेर राजवटीचा भाग राहिलेले सैगॉन १९व्या शतकामध्ये फ्रेंचांच्या अधिपत्याखाली आले. इ.स. १९०२ पर्यंत सैगॉन फ्रेंच इंडोचीनची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या पहिल्या इंडोचीन युद्धाची परिणती व्हियेतनामच्या फाळणीत झाली व १९५५ ते १९७५ दरम्यान सैगॉन दक्षिण व्हिएतनामच्या राजधानीचे शहर राहिले. सेनापती हो चि मिन्ह ह्याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामने व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या दक्षिण व्हियेतनामचा पराभव केला व सैगॉन पुन्हा अखंड व्हियेतनामचा भाग बनले. १ मे १९७५ रोजी सैगॉनचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवले गेले.

भूगोल

संपादन

हो चि मिन्ह सिटी व्हियेतनामच्या नैऋत्य भागात राजधानी हनोईपासून १,७६० किमी (१,०९० मैल) अंतरावर स्थित आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २,०९५ चौरस किमी इतके आहे.

हवामान

संपादन

हो चि मिन्ह सिटीचे हवामान विषुवृत्तीय स्वरूपाचे असून येथील सरासरी आर्द्रता ७८-८२ टक्के असते. येथे मे ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडतो तर उर्वरित महिने कोरडे असतात. येथील तापामानात फारसा बदल् होत नसून दिवसाचे सरासरी तापमान २८ से इतके असते.

हो चि मिन्ह सिटी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 36.4
(97.5)
38.7
(101.7)
39.4
(102.9)
40.0
(104)
39.0
(102.2)
37.5
(99.5)
35.2
(95.4)
35.0
(95)
35.3
(95.5)
34.9
(94.8)
35.0
(95)
36.3
(97.3)
40.0
(104)
सरासरी कमाल °से (°फॅ) 31.6
(88.9)
32.9
(91.2)
33.9
(93)
34.6
(94.3)
34.0
(93.2)
32.4
(90.3)
32.0
(89.6)
31.8
(89.2)
31.3
(88.3)
31.2
(88.2)
31.0
(87.8)
30.8
(87.4)
32.3
(90.1)
दैनंदिन °से (°फॅ) 26.0
(78.8)
26.8
(80.2)
28.0
(82.4)
29.2
(84.6)
28.8
(83.8)
27.8
(82)
27.5
(81.5)
27.4
(81.3)
27.2
(81)
27.0
(80.6)
26.7
(80.1)
26.0
(78.8)
27.4
(81.3)
सरासरी किमान °से (°फॅ) 21.1
(70)
22.5
(72.5)
24.4
(75.9)
25.8
(78.4)
25.2
(77.4)
24.6
(76.3)
24.3
(75.7)
24.3
(75.7)
24.4
(75.9)
23.9
(75)
22.8
(73)
21.4
(70.5)
23.7
(74.7)
विक्रमी किमान °से (°फॅ) 13.8
(56.8)
16.0
(60.8)
17.4
(63.3)
20.0
(68)
20.0
(68)
19.0
(66.2)
16.2
(61.2)
20.0
(68)
16.3
(61.3)
16.5
(61.7)
15.9
(60.6)
13.9
(57)
13.8
(56.8)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 13.8
(0.543)
4.1
(0.161)
10.5
(0.413)
50.4
(1.984)
218.4
(8.598)
311.7
(12.272)
293.7
(11.563)
269.8
(10.622)
327.1
(12.878)
266.7
(10.5)
116.5
(4.587)
48.3
(1.902)
१,९३१
(७६.०२३)
सरासरी पावसाळी दिवस 2.4 1.0 1.9 5.4 17.8 19.0 22.9 22.4 23.1 20.9 12.1 6.7 155.6
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 72 70 70 72 79 82 83 83 85 84 80 77 78
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 245 246 272 239 195 171 180 172 162 182 200 226 २,४८९
स्रोत #1: विश्व हवामान संस्था (UN)[१]
स्रोत #2: (mean temperature, sunshine, record high and lows, and humidity)[२]

वाहतूक

संपादन

तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ हा हो चि मिन्ह सिटीमधील प्रमुख विमानतळ व्हियेतनाममधील सर्वात वर्दळीचा असून व्हियेतनाम एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

जुळी शहरे

संपादन

खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.[३]

संदर्भ

संपादन
  1. ^ "World Weather Information Service – Ho Chi Minh City". World Meteorological Organization. 2013-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Viet Nam: Ha Noi and Ho Chi Minh City Power Grid Development Sector Project" (PDF). 27 January 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "CÁC ĐỊA PHƯƠNG NƯỚC NGOÀI ĐÃ THIẾT LẬP QUAN HỆ HỮU NGHỊ HỢP TÁC VỚI TPHCM". www.mofahcm.gov.vn. October 9, 2010. 2015-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 8, 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन