हो चि मिन्ह (व्हियेतनामी: Hồ Chí Minh; १९ मे १८९० - २ सप्टेंबर १९६९), जन्मनावः एंयुएन् सिन्ह कुंग (Nguyễn Sinh Cung), हे व्हियेतनामी मार्क्सवादी क्रांतीवीर व उत्तर व्हियेतनामचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष होता. उत्तर व्हियेतनामच्या १९४५ मधील निर्मितीमध्ये हो चि मिन्हचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९४१ सालापासून त्याने व्हियेत मिन्ह ही स्वातंत्र्य चळवळ चालवली व फ्रेंच इंडोचीनपासून स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्हने फ्रान्सचा पहिल्या इंडोचीन युद्धात पराभव केला. १९५४ साली जिनिव्हा करारानंतर हो चि मिन्हने उत्तर व्हियेतनाममध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केले. मृत्यूपर्यंत हो चि मिन्ह हा उत्तर व्हियेतनामचा एक बलशाली पुढारी होता.

हो चि मिन्ह
Ho Chi Minh 1946.jpg

उत्तर व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ सप्टेंबर १९४५ – २ सप्टेंबर १९६९
मागील पदाची स्थापना
पुढील तोन दुक थँग

कार्यकाळ
२ सप्टेंबर १९४५ – २० सप्टेंबर १९५५
मागील पदाची स्थापना
पुढील फाम वान दोंग

जन्म १९ मे १८९०
फ्रेंच इंडोचीन
मृत्यू २ सप्टेंबर १९६९ (वय ७९)
हनोई, उत्तर व्हियेतनाम
राष्ट्रीयत्व व्हियेतनाम
राजकीय पक्ष व्हियेतनामी कामगार पक्ष
सही हो चि मिन्हयांची सही

सध्या देखील हो चि मिन्ह व्हियेतनाममधील सर्वात स्मरणीय नेता मानला जातो. त्याला येथील समाजात राष्ट्रपित्याचे स्थान असून आदराने हो चाचा (Uncle Hồ) असे संबोधले जाते. व्हियेतनामी डाँगच्या सर्व नोटांवर त्याचे चित्र आहे. व्हियेतनाममधील बव्हंशी सरकारी इमारती व शाळांमध्ये हो चि मिन्हचे पुतळे व फोटो उभारले आहेत. हो चि मिन्हची निंदा व नालस्ती व्हियेतनाममध्ये खपवून घेतली जात नाही. त्याच्या स्मरणार्थ १ मे १९७५ रोजी दक्षिण व्हियेतनाममधील सैगॉन ह्या शहराचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवण्यात आले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत