रोन-आल्प

फ्रान्स मधील एक प्रदेश

रोन-आल्प (फ्रेंच: Rhône-Alpes; ऑक्सितान: Ròse-Aups) हा फ्रान्सच्या आग्नेय भागातील एक भूतपूर्व प्रदेश आहे. रोन-आल्पच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड हे देश आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली रोन नदी तसेच आल्प्स पर्वतरांगा ह्यांवरून ह्या प्रदेशाचे नाव रोन-आल्प असे पडले आहे. ल्योन हे फ्रान्समधील दुसरे मोठे महानगर रोन-आल्प प्रांताची राजधानी आहे. ग्रेनोबल, सेंत-एत्येनव्हालांस ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत. फ्रान्स व स्वित्झर्लंडची सीमा अंशतः ठरवणारे जिनिव्हा सरोवर रोन-आल्पच्या ईशान्य भागात स्थित आहे. आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेला रोन-आल्पची अर्थव्यवस्था युरोपामधे सहाव्या क्रमांकावर आहे.

रोन-आल्प
Rhône-Alpes
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

रोन-आल्पचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
रोन-आल्पचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ल्योन
क्षेत्रफळ ४३,६९८ चौ. किमी (१६,८७२ चौ. मैल)
लोकसंख्या ६०,५८,०००
घनता १३८.६ /चौ. किमी (३५९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-V
संकेतस्थळ http://www.rhonealpes.fr

२०१६ साली रोन-आल्प व ऑव्हेर्न्य हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प हा नवा प्रदेश निर्माण करण्यात आला.

विभाग

संपादन

खालील सहा विभाग रोन-आल्प प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

फ्रान्समधील ३ मोठी शहरे रोन-आल्प विभागात आहेत.

 
ल्यों
 
ग्रेनोबल
 
व्हालांस
 
शांबेरी

रोन-आल्प प्रदेशामध्ये आजवर ३ वेळा हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा भरवल्या गेल्या: १९२४ साली शामॉनी येथे, १९६८ साली ग्रेनोबल येथे व १९९२ साली आल्बर्तव्हिल येथे. खालील लीग १ फुटबॉल क्लब रोन-आल्प प्रदेशात स्थित आहेत.

वाहतूक

संपादन

आल्प्स पर्वतराजीमध्ये स्वित्झर्लंडच्या जवळ वसलेले रोन-आल्प हे युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे रोन-आल्पमध्ये रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: