लीग १

व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा

लीग १ (फ्रेंच: Ligue 1) ही फ्रान्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी लीग २ ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर लीग २ मधील सर्वोत्तम ३ संघांना लीग १ मध्ये बढती मिळते.

लीग १
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९३२
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी लीग २
राष्ट्रीय चषक कुप दे फ्रान्स
त्रोफी दे शांपियों
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. (३ रे विजेतेपद)
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे ए.एस. सेंत-एत्येन (१० विजेतेपदे)
संकेतस्थळ ligue1.com
२०१३-१४

१९३२ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ह्या स्पर्धेचे नाव २००२ सालापर्यंत डिव्हिजन १ असे होते. आजवर ७६ फ्रेंच लीग १ मध्ये सहभाग घेतला असून ए.एस. सेंत-एत्येनने आजवर १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ

संपादन
संघ शहर
ए.सी. अझाक्सियो अझाक्सियो
एस.सी. बास्तिया बास्तिया
एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू बोर्दू
एव्हियां टी.जी. ॲन्सी, ऑत-साव्वा
एन अवांत दे गिगां गिगां, कोत-द'आर्मोर
लील ओ.एस.सी. लील
एफ.सी. नाँत नाँत
ऑलिंपिक ल्यों ल्यों
ऑलिंपिक दे मार्सेल मार्सेल
माँपेलिये एच.एस.सी. माँपेलिये
ओ.जी.सी. नीस नीस
पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. पॅरिस (पार्क दे प्रेंस)
ए.एस. मोनॅको एफ.सी. मोनॅको
स्ताद ऱ्हेन एफ.सी. ऱ्हेन
स्ताद दे रेंस रेंस
ए.एस. सेंत-एत्येन सेंत-एत्येन
तुलूझ एफ.सी. तुलूझ
व्हालेंस्येन एफ.सी. व्हालेस्येंन, नोर
एफ.सी. लोरीयां लोरीयां, मॉर्बियां
एफ.सी. सोशॉ-माँबेल्यार माँबेल्यार, दूब

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत