पार्क दे प्रेंस
पार्क दे प्रेंस (फ्रेंच: Parc des Princes) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. हा क्लब इ.स. १९७३ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे. मूळत: एक बहुपयोगी स्टेडियम म्हणून इ.स. १८९७ साली बांधले गेलेले पार्क दे प्रेंस १९९८ फिफा विश्वचषकासाठी स्ताद दा फ्रान्स हे स्टेडियम बांधले जाणाच्या आधी फ्रान्स संघाचे राष्ट्रीय मैदान होते. इ.स. १९०३ पासून इ.स. १९६७ सालापर्यंत तूर द फ्रांस ह्या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीचा शेवट ह्याच स्टेडियममध्ये होत असे.
पार्क दे प्रेंस | |
---|---|
स्थान | पॅरिस, फ्रान्स |
उद्घाटन | १८ जुलै, इ.स. १८९७ |
पुनर्बांधणी | इ.स. १९३२, इ.स. १९७२ |
बांधकाम खर्च | १७.३२ लाख युरो |
आसन क्षमता | ४८,७१२ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. |
आजवर येथे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. इ.स. १९०० उन्हाळी ऑलिंपिक, इ.स. १९३८ व इ.स. १९९८ फिफा विश्वचषक, २ युएफा यूरो अंतिम सामने, ३ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामने तसेच २ युएफा कप अंतिम सामने खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |