सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २३

Active discussions

अभय नातू 21:26, 12 एप्रिल 2006 (UTC)

एर / एअरसंपादन करा

>>एअर बस लिहिलेल्या ३४,३०० पानांपैकी किती पाने मराठी होती आणि किती हिंदी/नेपाळी/फिजी हिंदी/इ ?<< एअर बस हा शब्द फक्त मराठीत लिहिला जात असल्याने ही शंका यायचे कारण नव्हते.

एअर इंडिया हा शब्द खुद्द एअर इंडिया विमान कंपनी असाच लिहिते. .... J १६:१७, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

>>एर इंडिया कंपनी मराठीत लिहीत नाही.<< का लिहीत नाही? एअर इंडियाच्या मराठी जाहिराती नसतात? शिवा जी लिहिणारे नक्की मराठी नसतात, शिवाजी लिहिणारे मराठ्येतर असू शकतात. त्याच धर्तीवर, एर इंडिया लिहिणारे खचित मराठी नसतात, एअर इंडिया लिहिणारे अन्यभाषक असू शकतात. लता मंगेशकरांना लता जी म्हणणारे निश्चित अमराठी असतात, व्यक्तिनामाआधी मा. लावणारे खात्रीने गल्लीबोळातले किंवा हमसडकेवरचे राजकीय पुढारी असतात. मा. न लावणारे इतरही असू शकतात...J १७:०१, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

http://airindia.in वरील एअर इंडिया चा लोगो पहावा.
एर इंडिया हे लिखाण अमेरिकन accent नुसार बरोबर वाटते, परंतु भारतीय accent नुसार हे एअर इंडिया लिखाण बरोबर वाटते. मला एअर इंडिया पटते (मराठी लेखांचा शोध घेणारी मंडळी देखील type करताना एअर इंडिया असेच type करतील - स्वतःच्या अनुभवावरून).
मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणार्‍या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना. त्यामुळे Air, Fair, Oar, Oven, Bowl आदी शब्द मराठीत एअर, फेअर, ओव्हन, बाउल असे लिहिणे क्रमप्राप्त आहे. या J यांच्या मतास मी सहमत आहे.
शिवाय, मराठी भाषेतील लेखांचा शोध घेणारी मराठी भाषिक मंडळी स्वतःच्या उच्चाराप्रमाणेच टंकन करून शोधतील. - प्रबोध (चर्चा) ११:०७, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)
तुमचे एर हे लिखाण स्वीकारण्याबाबतचे मत (मूळ उच्चाराशी प्रामाणिक राहण्याबाबत) पटते. परंतु J यांचे वाक्य मी rephrase[मराठी शब्द सुचवा] करू इच्छितो
मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणार्‍या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, मराठी उच्चाराप्रमाणे लिहिले जावेत. भले ते लिखाण अप्रमाण का असेना. प्रमाण लेखनाच्या लेख नावांचे आपण पुनर्निर्देशन पाने तयार करू शकतोच!
एखादा मराठी भाषिक एर वाचून त्याचा मूळ उच्चार उच्चारू शकेल का, याची मला शंका आहे! - प्रबोध (चर्चा) ११:१५, ५ डिसेंबर २०११ (UTC)

नमस्कारसंपादन करा

बर्‍याच दिवसा नंतर आलो, चावडीवर भेट दिल्यावर दिसले की तुमचा अजुन एक चाहता आला आहे. :-)

कधी कधी वाटते तुम्हाला अनेक चाहते आहेत कि एकच चाहता अनेक रूपात समोर येतो. :-)

Maihudon ०५:२०, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

नोटवर्दी विकिमीडियन रेकग्निशन २०११ गौरवानिमित्त अभिनंदन !संपादन करा

अभय, मुंबईतील विकिमीडिया इंडिया विकिपरिषदेत उल्लेखनीय विकिमीडियन गौरव (इ.स. २०११) तुला लाभला, त्यानिमित्त तुझे मनःपूर्वक अभिनंदन ! (संदर्भ : NWR 2011 and Jury mention V1.0.pdf) ही घटना सर्व मराठी विकिसमुदायासाठीदेखील अभिनंदनीय आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:१२, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

अभिनंदनसंपादन करा

विकिमीडियन गौरव (इ.स. २०११) लाभला, त्यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! माहितगार १३:५५, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)


त्या चर्चेचा मान राखून मी (किंवा इतर कोणी) तुम्ही स्थानांतरित केलेली पाने परत स्थानांतरित केलेली नाहीत.संपादन करा

प्रश्नच उद्भवत नाही. मी केलेल्या दुरुस्त्या मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी परंपरेला धरून आहेत....J १७:४८, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

पहला गिरमिटियासंपादन करा

महोदय

कृपया पहला गिरमिटिया हा लेख माझाच आहे. त्याकरीता कृपया पहला गिरमिटिया वरील चर्चेचे अवलोकन करावे.

मराठी विकिपी़डिया वरील आपल्या भरीव कामगिरी बद्धल हार्दिक शुभेच्छा..

अभिनंदनसंपादन करा

नमस्कार अभयराव, उल्लेखनीय विकिमीडियन (इ.स. २०११)या गौरवाबद्दल अभिनंदन निनाद ०३:३५, १ डिसेंबर २०११ (UTC)


माझेपण या गौरवाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन कृपया स्विकारावे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०३, ४ डिसेंबर २०११ (UTC)

Bureaucratसंपादन करा

विकिमीडिया पदावलीतील Bureaucrat या शब्दाचे सध्याचे प्रशासक हे भाषांतर विकिप्रणालीशी अपरिचीत व्यक्तिंच्या मनात पदाच्या आधिकारांबाबत विनाकारण चुकीची समजूत निर्माण करून देणारे आणि गैरसमजांना वाव देणारे ठरत आहे.

ह्या पदनामाचा अधिक न्याय्य अनुवाद व्हावा म्हणून मी दिर्घकाळ विचार विमर्श करत आलो आहे. Bureaucrat या पदाच्या प्रत्यक्ष अधिकारांचे स्वरूप आणि मर्यादांना (प्रचालक बॉट्स तसेच खाते एकत्रिकरण विनंत्यांना स्विकृत करणे ह्या कार्यास ) अनुसरून त्याचा अनुवादात "स्विकृती अधिकारी" असा बदल करतो आहे. आपल्या समर्थनाची विनंती आहे माहितगार ०४:००, १ डिसेंबर २०११ (UTC)

मिडिया विकित Bureaucrat हा शब्द आहे. कार्पोरेट वेबसाईटमध्ये Bureaucrat हा शब्द सयूक्तीकही ठरला असता पण एका मुक्त प्रकल्पात प्रत्यक्षात काहीच ब्यूरोक्रसी नाही आणि तरीही Bureaucrat शब्द वापरला जाणे सयूक्तीक वाटत नाही शिवाय Bureaucrat शब्दाचे शब्दशः भाषांतर प्रशासक करणे प्रशस्त वाटत असेल पण मी वर म्हटल्या प्रमाणे प्रत्यक्षात acceptance देण्याच्या कृती हा मुख्य कार्यभाग आहे निर्णय हे विकिपीडियन्सच्या सहमतीने होतात. प्रशासक शब्द तसाच ठेऊ देण्यासही हरकत नव्हती पण तुमचे पदनाम प्रशासक असल्यामुळे तुम्हाला जी न केलेल्या पापाची शिक्षा अनेक चाहते देताना दिसतात या बद्दल चिंतीत तर आहेच , पण व्यक्तिशः मला ते काम हवे असून सुद्धा जी जबाबदारी माझी नाही त्याचे खापर नको आहे, ज्या शेंगाची टरपले मी टाकलीच नाहीत ती उचलण्याची तयारी असणे आणि त्याची जबाबदारि घेणे या भीन्न बाबी आहेत. तुमचे टोपण नाव फक्त प्रशासक आहे म्हणून न खालेल्ल्या शेंगाची टरपले खाल्ल्याचे (किंवा शेंगा खाल्ल्याचे) आरोप झेलणे आपल्या प्रमाणे प्रत्येक भावी ब्यूरोक्रॅटला जमेलच असे नाही त्यामुळे प्रशासक ह्या शब्दात बदल आवर्जून करावा असा माझा आग्रह आहे. माहितगार ०५:५८, २ डिसेंबर २०११ (UTC)
सदस्य मनोज यांनी आपल्या दोघांतील चर्चा वाचून "कारभारी या शब्दाचा विचार करा. एकच सुटसुटीत नामाभिधान आहे, अस्सल मराठी शब्द आहे आणि ओनरशीपचा सेन्स त्यातून अजिबात येत नाही. शिवाय आधुनिक मराठीत एका शब्दाची पुनर्स्थापना केल्याचं श्रेयही मिळेल" अशी सुचवणी केली आहे.त्यावरून मला कार्यासन (en:Chair) हा सुद्धा शब्द चांगला वाटतो आहे. माहितगार ०७:५६, २ डिसेंबर २०११ (UTC)

आपल्या दोघातील २००७ मधील चर्चा खालील प्रमाणे होती.

यूजर- सदस्य

सिसॉप(सिस्टीम ऑपरेटर):प्रबंधक,समन्वयक,प्रचालक,हुद्देदार

ब्यूरोक्रॅटःवरिष्ठ प्रबंधक,विशिष्ट प्रबंधक,प्रामान्य,अनुभाव,व्यवस्थापक,अधिकारी,विशिष्टहुद्देदार

स्टूवर्डःप्रतिपालक,मुख्य प्रबंधक,अतिविशिष्ट प्रबंधक,अतिविशिष्ट हुद्देदार

From among these choices, I like --
  • Admin - प्रबंधक
  • Sysop - प्रचालक
  • Bureaucrat - अधिकारी
  • Steward - प्रतिपालक
Abhay Natu १५:३२, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)

Usurp requestसंपादन करा

Hello. Can you please rename Mayurbot to Mayur ? This request was done one year ago, and now I think that the situation has evolved (for example, you have now a proof that the renaming has been accepted on enwiki [१]).

Thanks for your comprehension, and have a nice day. -- Quentinv57 १२:१६, १६ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hi Abhay, Will you please rename Mayurbot to Mayur as per 1 year old request.--Mayurbot ०९:२९, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)
Howdy,
Thanks for checking back after a year. I will try and follow through on this request. I am not sure if I still have the necessary admin right. If I do, I will merge the accounts.
अभय नातू २०:५१, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)
For Usurping Mayurbot to Mayur,
  1. You will have to rename Mayur to Mayur1
  2. Rename Mayurbot to Mayur

I think now it will be easier for you.--Mayurbot १६:३१, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hello अभय नातू. I have renamed Mayurbot to Mayur, as you said you agree to rename but you just did not know how to do it / did not find the time to do it. So now it is done, and you can use this time to do something else for you. Have a nice day ! -- Quentinv57 १५:२१, २ डिसेंबर २०११ (UTC)
(copy of my answer at meta-wiki) You're welcome, there is really no problem. If you need some help too one day, feel free to ask. Best regards, -- Quentinv57 १९:१५, २ डिसेंबर २०११ (UTC)


Request for bot access to निनावी २०:५६, ३ डिसेंबर २०११ (IST)

Updated the Bot request page regarding multiple operators. निनावी १८:४४, ४ डिसेंबर २०११ (IST)

Ok. No problem. Till the usable version is released, will have single operator. निनावी २२:१०, ४ डिसेंबर २०११ (IST)

Currently referring http://tukaram.googlecode.com/files/tukaram.sql निनावी ००:११, ५ डिसेंबर २०११ (IST)

Changed the reference to http://hunspell-marathi-dictionary.googlecode.com/files/shabdasampada_version9_3.sql.zip निनावी ०९:४८, ७ डिसेंबर २०११ (IST)

आभारसंपादन करा

नमस्कार,

मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच मराठी विकीस्त्रोत सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.

माझ्या माघारीच मला प्रचालक पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलेल्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०६:००, ४ डिसेंबर २०११ (UTC)

Twinkle टॅबसंपादन करा

स्थानांतरण टॅब शेजारील Twinkle टॅब मधील sub menu उदा. CSD (Speedy deletion), LAST (most recent changes), ARV (Report user to administrator - उपद्रवी सदस्यांबाबतीत), Wel (नवीन सदस्यांचे स्वागत), TB (Easy talkback), RPP (Request page protection), XFD, Warn इ. काम करत नाहित. तुम्हाला या समस्येचे समाधान देता येई काय? / करता येईल काय? संतोष दहिवळ ०७:३०, ४ डिसेंबर २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट ऑलिंपिकसंपादन करा

अभय,

ह्या साच्यात काय गोंधळ होतोय बघाल काय? I am scratching my head and cannot figure out why the last part of the infobox isn't showing links. - Abhijitsathe १५:२९, ५ डिसेंबर २०११ (UTC)

विनंतीसंपादन करा

I have 1441 edits in total. I'm mainly involved in recent changes and New pages so I think I need Rollback tool to block bad users from wrecking wikipedia . Please Grant me Rollback right if you are happy at my edits. I hope that my request for Rollback be granted. संतोष दहिवळ १०:३५, १० डिसेंबर २०११ (UTC)
Rollback अधिकार प्रचालकांशिवाय इतर सदस्यांनाही देता येतो यासाठी येथे, येथे, येथे आणि येथे तसेच येथेही पहा. तो कसा द्यावा हे मला सांगता येणार नाही पण बगझिलावरील बग १२५३४ याकामी आपल्याला मदत करू शकेल किंवा तो अधिकार कसा देता येईल यासाठी आपणच माहिती मिळवावी. संतोष दहिवळ १५:५०, ११ डिसेंबर २०११ (UTC)

BOTसंपादन करा

अभय, सांगकाम्या अकाउन्ट कसे उघडावे आणि कसे चालवावे? - Abhijitsathe १८:०५, १७ डिसेंबर २०११ (UTC)

 

.  

  विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!  
नमस्कार, अभय नातू/जुनी चर्चा २३

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)निनावीसंपादन करा

नमस्कार,

निनावीला अधिकृत सांगकाम्या करायला काहीच हरकत नाही. बदलांवर नजर आहेच. :)

निनावी ०७:३५, २२ डिसेंबर २०११ (UTC)

सदस्य नावातील बदलसंपादन करा

सदस्या नावात बदल केल्या बद्दल धन्यवाद!!१५:५३, २५ डिसेंबर २०११ (UTC)

विपिसंपादन करा

आपले नाव अलिकडील बदल पानावर प्रामुख्याने झळकायला पुन्हा सुरू झाले हे पाहून आनंद झाला. मध्यंतरीच्या काळात झालेल्या वादविवादामुळे आपण काहीसे नाराज झाला होता असे कुठेतरी वाटत होते. - Abhijitsathe २३:०९, २७ डिसेंबर २०११ (UTC)

Deccan Odysseyसंपादन करा

Pune has been dropped from the Deccan Odyssey route. (ref: Maharashtra Tourism Site) - प्रबोध (चर्चा) ०५:५३, २९ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयीसंपादन करा

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५९, १ जानेवारी २०१२ (UTC)

जानेवारी १, २०१२संपादन करा

जानेवारी १ येथील लेखात उजव्या भागात वर असलेले कॅलेंडर चुकले आहे. खरे तर रविवारने नविन वर्ष सुरू होते.कृपया आवश्यक ते बदल करावेत ही विनंती. पुढीलही महिने तपासावयास हवेत.तसेच १वा दिवस या ऍवजी १ला दिवस असे हवे.ते करता येईल काय?


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:४०, २ जानेवारी २०१२ (UTC)

स्तंभसंपादन करा

नमस्कार,

विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.

एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही नियमित स्तंभ सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी रंजक/आकर्षित स्तंभ नावे सुचवावीत हि विनंती. राहुल देशमुख ०४:३७, ४ जानेवारी २०१२ (UTC)

पानकाढा साचासंपादन करा

पानकाढा साच्यात मी थोडी अ‍ॅडिशन केली आहे जेणेकरून तो साचा लावलेली पाने महिन्यानुसार वर्गीकृत होत आहेत. एकदा पहावे. वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख - अभिजीत साठे २३:१३, ५ जानेवारी २०१२ (UTC)

तत्परता व संवेदनशिलतासंपादन करा

रुझव्हेल्ट/‎रुझवेल्ट हा फरक लगेच ताडून लेखात आवश्यक बदल केल्याबद्दलची तत्परता व बारीक गोष्टीही नजरेतून सुटु न देण्याची आपली संवेदनशिलता वाखाणण्याजोगी वाटली म्हणून माझे वैयक्तिक अभिनंदन व हा लेखनप्रपंच.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:५२, ६ जानेवारी २०१२ (UTC)

About the article of abhay and rani bang on marathi wilipediaसंपादन करा

May i know why this article was deleted? There is similar kind of article on english wikipedia. I intend to make it better soon. Please guide. Thanks आभिजीत १२:०२, १५ जानेवारी २०१२ (UTC)

About Article on Dr. Abhay Bang and rani bangसंपादन करा

Even on english wikipedia they have a common article. http://en.wikipedia.org/wiki/Abhay_and_Rani_Bang Thanks आभिजीत ०४:२५, १६ जानेवारी २०१२ (UTC)

नियंत्रित चीत्रकाम्यासंपादन करा

नमस्कार अभय,

मी चीत्रकाम्यास बॉट फ्याग ची मागणी करणारच होतो पण १०० संपादने करून मग मागणी करावी म्हणजे आपणास पण चीत्रकाम्यास सांगकाम्या घोषित करणे सोपे जाईल आसे वाटले. आता १२९ संपादने झालेली आहेत तेव्हा मी त्या आशयाची विनंती संबंधित पानावर करतो आपण कुपया फ्याग द्यावा. चीत्रकाम्या द्वारे लावण्यात येणारे साचे फोटोथोन नंतर काढून घेण्याची सोपी सुविधा पूर्वनियोजित करून ठेवली आहे. ह्या साचा द्वारे वर्ग:चित्र हवे-फोटोथोन इथे हव्या असलेल्या चित्रांच्या लेखांची यादी तयार करून ती फोटोथोन साठी उपलब्ध करणे हा मूळ उद्देश आहे. सध्यातरी चीत्रकाम्या नियंत्रित पणे अविशिष्ट लेखात साचे लावतो आहे. पण आपणास काही विशिष्ट निकड असल्यास/सुचल्यास सांगावे म्हणजे त्यास तसे निर्देश देता येतील. आपल्या सहकार्य बद्दल धन्यवाद. -- राहुल देशमुख ०८:३१, १० फेब्रुवारी २०१२ (IST)

Username rename request: White Cat -> とある白い猫संपादन करा

I'd like to request a username rename per SUL. -- Cat chi? १८:५६, १९ फेब्रुवारी २०१२ (IST)

सांगकाम्यासंपादन करा

अभय, my account सांगकाम्या अभिजीत cannot use AWB. Have I been blocked? - अभिजीत साठे ०८:२७, २२ फेब्रुवारी २०१२ (IST)

It seems to work ok now. I wasn't able to log in 30 minutes ago. - अभिजीत साठे ०८:४६, २२ फेब्रुवारी २०१२ (IST)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)संपादन करा

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमीसंपादन करा

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४३, ११ मार्च २०१२ (IST)

नमस्कार, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले काही मार्गदर्शन यासाठी झाले तर बरे होईल...मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:२९, १७ मार्च २०१२ (IST)
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५६, २७ मार्च २०१२ (IST)

Username change requestसंपादन करा

I want my username changed from Ramajois → Shriram I had placed a request on meta wiki but MBisanz told me to contact you, since you are a local crat here. I need this username change to complete my login unification. Previously I had my usernam changed to Shriram in en.wiki and I dont know this language much so I am placing the request here. Please have a look at the diff. Thank you. Ramajois (चर्चा) १७:३३, १९ मार्च २०१२ (IST)

Usurps fine if it helps me with SUL login unification. Ramajois (चर्चा) २३:५२, १९ मार्च २०१२ (IST)


राव हज चले == चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. निनावी (चर्चा) २२:३६, २० मार्च २०१२ (IST)


दुरुस्तीसंपादन करा

छत्रपती शिवाजीराजे भोसले या लेखाच्या पहिल्याच ओळीत शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकीची टंकलेखित (१९ फेब्रुवारी १६३० च्या ऐवजी १९ फेब्रुवारी १९३० अशी) झालेली आहे. कृपया आवश्यक ती दुरुस्ती करावी ही विनंती. San (चर्चा) ००:२६, ३१ मार्च २०१२ (IST)

गल्लतसंपादन करा

नमस्कार अभय, प्रचालकांना निवेदन येथे माझा मांडलेला मुद्दा समजून घेण्यात आपली गल्लत होते आहे असे वाटते,कदाचीत वाचण्यात घाई झाली असावी.शिवीगाळ आणि स्पष्ट चारीत्र्यहनन या बाबत कोणतेही कॉँप्रमाईज करण्याबद्दल कुठेही लिहिले नाही आहे.


>> मुद्दा क्रमांक ४ दुसऱ्या सदस्यावर कारवाइची /प्रचालकावर आक्षेप मागणी असते तेव्हा संबधीत व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ इत्यादीचा दुवा संदर्भाकरिता देता आला पाहिजे. सदस्यावर कारवाइची मागणी /प्रचालकावर सुयोग्य आक्षेप हे व्यक्तिगत आरोप या संज्ञेस अगदीच ताठर ठेवून चालत नाही, 'व्यक्तिगत आरोप ' संज्ञेच्या अर्थव्याप्ती सब्जेक्टीव्ह न राहता अधिकाधीक ऑब्जेक्टीव्ह होण्यासाठी उत्पात अभ्यास मध्ये अधीक निरीक्षणे नोंदवून सदस्यांनी तटस्थपणे चर्चा करून ग्राह्य आणि अग्राह्य भाषेची उदाहरणे नमुद केली जाण्याची गरज आहे.
वर म्हणल्याप्रमाणे अधिक वेळ ठेवून काहीही उपयोग नाही. सदस्यांवरील (किंवा प्रचालकांवरील) चिखलफेक ठेवून देऊन काय साध्य होणार? उद्या एखाद्या सदस्याने येथे (किंवा चावडीवर) येउन दुसऱ्या सदस्याच्या आई-बहिणीचा उद्धार केला तर निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी ते चार महिने ठेवून देणार?
आपण एक शक्यता कदाचित लक्षात घेतली नसावी,उदाहरणार्थ समजा (नानु, त्यांची क्षमा मागून कारण माझ्या अंदाजाने त्यांच्यात सावकश पण सकारात्मक बदल होत आहेत ) किंवा क्ष व्यक्ती इतर कोणत्यातरी चावडी अथवा चर्चा पानावर व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ किंवा शिवीगाळ करते , दोनदा वगळल्या नंतर आणि तसे असभ्य लेखन न करण्याचे सुचीत केल्या नंतर तीसऱ्यांदा पुर्नस्थापीत करते . या केस मध्ये प्रचालक नसलेली व्यक्ति (नानु) किंवा क्ष व्यक्तीस प्रतिबंधीत करावे अशी विन्ंती प्रचालकांना निवेदन वर करते त्या वेळी अशा विनंत्यांमध्ये क्षने चुकीचे वर्तन नेमके केव्हा आणि कुठे केले याचा इतिहासातील संदर्भ देणे गरजेचे पडते. आता क्ष किंवा त्याचा अजून एखादा मित्र व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ असू नये हा आपलाच नियम आपल्यालाच दाखवून संदर्भाचा दुवाच उडवतील . त्रास देणारी बरीच मंडळी चाणाक्ष असतात त्यामुळे भविष्यातील शक्यतेचा आधीच बंदोबस्त करण्याचा हा प्रयत्न आहे.
>>मुद्दा क्र. ३.१ आणि मुद्दा ५ मुद्द्याला सोडून लिहिलेला सगळा मजकूर काढला जावा याच्याशी सहमत असतो तरी किमान येते काही महिने (चार महिने) काढवयाचा मजकुर दोन तासांकरिता स्ट्राईक आऊट केलेल्या स्थितीत ठेवावा म्हणजे नेमके काय वगळले जाणार आहे याचा साधारण पणे सदस्यांना अदमास येऊन अप्रत्यक्ष शिक्षण होईल. मुद्दास सोडून समजून काढलेले लेखन दुसऱ्या प्रचालकास योग्य वाटले तर तो ते वापस आणू शकेल अर्थात अशा कृतीचे कारण त्या प्रचालकाने स्पष्ट करणे आवश्यक असेल.
स्ट्राइकआउट मजकूर ठेवल्याने सदस्याला अंदाज येईल हे मान्य पण चार महिने जास्त आहेत. एक आठवडा पुरेसा ठरतो. चर्चा चालू असताना सहसा सदस्य या पानावर लक्ष ठेवूनच असतात आणि उत्तर देण्यास उशीर करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. जास्त वेळ (स्ट्राइकआउट का होईना) मजकूर ठेवल्यास मजकूर काढण्यामागचा हेतूच संपतो.
आपण हाही मुद्दा नीट वाचला आहे का ? मी स्ट्राईक आऊट करण्याची मागणी व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ वगळण्याकरता केलेली नाहीच. व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ ताबोडतोबच वगळावयाचे आहेत. स्ट्राईक आऊट करण्याची मागणी हि इतर मुद्दास सोडून असेलेल्या लेखना करता तीही आठवड्याकरता नव्हे केवळ दोनतासांकरिता स्ट्राईक आऊट पोशीशन मध्ये ठेवण्याकरता केली आहे. दोन तासा करता स्ट्राईक आऊट करणे ही कायमचे नाही साधारण चार महिने पाळावे असे वाटते. मुद्दास सोडून काय आहे हे तुम्हाला मला समजणारी गोष्ट इतरांना वेगळी दिसू शकते त्यावर किमान सुरवातीचे चार एक महिने साधक बाधक चर्चेची संधी राहते, हे मुस्कटदाबीकरता चालू नाही याचा विश्वास वाढतो, शिवाय प्रचालकांना (खास करून नवीन प्रचालक मंडळी) सुद्धा क्वचीत अतीउत्साह आल्यास नवी संस्कृती रुजे पर्यंत छोती का होईना मर्यादा रहाते . हि मर्यादा न दिल्यास आणि न होवो प्रचालकांकडून अती उत्साहाने चुकिचे मुद्दे वगळले गेल्यास आणीखी नवे वाद सोडवण्यात आपणा सर्वांचा कालापव्यय होऊ नये असाही उद्देश आहे.

मला वाटते आपल्याला माझे मुद्दे पटतील आपल्या दोघांच्या सहमती झालेल्या मुद्दांचे सुयोग्य पुर्नलेखन करून , इतर सदस्यांना अजून काही मत मांडावयाचे असल्यास पहावे आणि निती म्हणून त्यास स्विकारावयास हरकत नसावी असे वाटते.माहितगार (चर्चा) २०:०४, २८ एप्रिल २०१२ (IST)

Article requestsसंपादन करा

Hi! Do you do article requests? If so, there is an article that I would like to be in Marathi. It is en:Peel District School Board, a Canadian school district. The Marathi website is at http://www.peelschools.org/marathi/home/, so it can help you use the proper terms for some things - It is fine if you just make a stub Thanks WhisperToMe (चर्चा) २१:५५, २८ एप्रिल २०१२ (IST)


नो ओपन प्रॉक्सीझसंपादन करा

याबद्दलचा पहिला संदेश वाचल्यानंतर मी त्या पानावर जाऊन पाहिले. त्या मजकुरात वापरलेल्या बऱ्याच शब्दांच्या संकल्पना मला नीट समजलेल्या नाहीत. बाउझर, ऑपरेटिंग सिस्टिम, कॉ्म्प्यूटर प्रोग्रॅम, या कल्पना जशा स्पष्ट आहेत, तशा (ओपन-क्लोज)प्रॉक्सी, अ‍ॅक्टिव्हएक्स, डोमेन, सर्व्हर वगैरे म्हणजे नक्की काय ते मला माहीत नाही. माझ्या संगणकाचा सर्व्हर कोण आहे आणि तो कुठे असतो हे मला कधीच शोधता आलेले नाही. डझनभर ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टिमांची यादी मला देता येईल पण एकाही सर्व्हरचे नाव मला ज्ञात नाही. एखादे पान शोधताना अमुक शोध इंजिनाच्या सर्व्हरला ते पान सापडत नाही असे उत्तर येते, हा दुसरा सर्व्हर कोण असतो? आंतरजालावर जाता येत नसेल तर कुणाशीतरी संपर्क करा असा संदेश येतो, तो ’कुणा’ कोण असतो, माहीत नाही. अशा परिस्थितीत ’नो ओपन प्रॊक्सीज”चे मराठीकरण करणे मला जमेल असे वाटत नाही.....J (चर्चा) ००:१४, ३ मे २०१२ (IST)


प्रयत्‍नसंपादन करा

एक प्रयत्‍न केला आहे. त्यांतील आवडतील आणि पटतील तेवढे बदल स्वीकारावेत....J (चर्चा) १९:३०, ३ मे २०१२ (IST)


एअर इंडियासंपादन करा

पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण एर इंडियाने त्यांच्या लोगोवर हिंदीमध्ये लिहिलेले आहे. त्यांनी air या इंग्लिश शब्दाचा हिंदी उच्चार लिहिलेला आहे...अभय नातू

साफ चूक. हिंदीत Air, Fare, Care आदी शब्द अनुक्रमे एयर, फ़ेयर, केयर असे लिहितात. एअर इंडिया ही मूळ टाटांची कंपनी मुंबईत स्थापन झाली होती. त्यांनी अर्थातच मराठी लिखाणाचे नियम स्वीकारले. अगदी स्थापनेच्या दिवसापासून आजपर्यंत कंपनीचे नाव हिंदी, मराठी आणि अन्य भारतीय लिप्यांमध्ये 'एअर' असेच लिहिले जात आले आहे....J

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना....प्रबोध

संस्कृत सोडली तर जगातली कुठलीही भाषा उच्चाराप्रमाणे लिहिली जात नाही. संस्कृतमध्ये 'अ', 'इ', 'उ', 'ऋ' आदी स्वरांचे प्रत्येकी १८ आणि बाकीच्या (ए, ऐ, ओ, औ, ऌ) स्वरांचे प्रत्येकी १२ उच्चार आहेत, हे सर्व उच्चार स्वतंत्रपणे लिहून दाखवण्याची परिपूर्ण सोय संस्कृत लिपीत आहे. याचा अर्थ एवढाच की, संस्कृत लिपीत लिहिलेल्या प्रत्येक संस्कृत शब्दाचा एकमेव उच्चार होतो, आणि एका उच्चाराचे एकमेव रीतीचे लिखाण होते.. . तरीसुद्धा, संस्कृत लिपीत उर्दू शब्द लिहिता येतीलच असे नाही, अर्थात इंग्रजीही नाही.

मराठी लिपीचे तसेच आहे. मराठी भाषा (अगदी)उच्चारानुसारी लिहिली जाते असे म्हणणे तितकेसे योग्य नाही. गवsत् हा बोली शब्द मराठीत गवत असा लिहिला जातो, हौंस हा शब्द हंस असा, संय्यम हा शब्द संयम असा, तर उत्छ़व् (छ़ चा उच्चार दंततालव्य-- च़छ़ज़झ़ञ या मालिकेप्रमाणे) हा बोली शब्द, उत्सव असा लिहिला जातो. केलs गेलs मेलs हे शब्द, केलं, गेलं, मेलं असे लिहिले जातात. आराsम् हा उच्चार लिहिताना आराम असा लिहितात. वगैरे वगैरे. तरीसुद्धा, मराठी आणि अन्यभाषी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत याबद्दल रूढ संकेत आहेत. त्यामुळे Air हा शब्द मराठीत लिहिताना एअर असाच लिहिला गेला पाहिजे, कारण तसा संकेत आहे..

महाराष्ट्रात इंग्रजी शब्दांच्या मराठी उच्चारासाठी ऑक्सफर्डच्या कोशाचा आधार घेतला जातो, तर दक्षिणी भारतात केंब्रिजचा कोश प्रमाण मानला जातो. (उत्तरी भारतांत कोणता ते माहीत नाही!) साहजिकच दाक्षिणात्यांचे इंग्रजी उच्चार महाराष्ट्रीयांच्या इंग्रजी शब्दांच्या उच्चारांपेक्षा वेगळे असतात. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न उद्भवतच नाही. कॅनेडियन उच्चार आयरिशांपेक्षा आणि ऑस्ट्रेलियींपेक्षा वेगळे असणार हे गृहीत धरलेले असते. तसे ते असायला शब्दकोशांची कोणतीच आडकाठी नसते. मात्र, या सर्व लोकांचे इंग्रजी लिखाण अगदी समान आणि प्रमाण असते. मराठीतही एअर हे लिखाण प्रमाण आहे, याबद्दल कुठलीही शंका बाळगायचे कारण नाही..

ऑक्सफर्ड कोशात Air चा उच्चार एअs (eə*) असा दिला आहे. डॅनियल जोन्सच्या कोशातही तसाच..मग अमेरिकनांनी हा एर उच्चार कुठून आणला?....J

त्यामुळे air हा शब्द मराठी भाषेत कसा उच्चारला जातो ते विचारात घ्यायचे कारण नाही; तो शब्द कसा लिहिला जात आला आहे आणि सध्या कसा लिहिला जात आहे हे महत्त्वाचे. विकिपीडिया हे लिखित माध्यम आहे, येथे लिहिलेला शब्द कसा उच्चारतात याला फारसे महत्त्व नाही. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात इंग्रजी शब्दांचे उच्चार ' दक्षिणी लंडनच्या शैक्षणिक संस्था असलेल्या उपविभागात जसे उच्चारले जातात तसे दिले आहेत.' अशी माहिती असते. याचा अर्थ दक्षिणी लंडनच्या अन्य उपविभागांत, किंवा इंग्लंडच्या अन्य भागांत किंवा जगात अन्य देशांत उच्चार वेगळे असू शकतात हे मान्य करण्यात आलेले आहे. इंग्लंद, इंग्लैंड, लंदन एयर, केयर, फ़ेयर हे हिंदी लिखाण मराठी विकिपीडियावर जसे चालणार नाही तसे, एर, केर्, फेर्, बेर्, टेर्, हेर, मेर असले अमेरिकी पद्धतीचे लिखाण मराठी विकीवर असता कामा नये. ..J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)

मी याच्याशी अगदी असहमत आहे. ...बहुतांश विद्वान लिहिताना/बोलताना/वाचताना किमान आठवीपर्यंत मराठी शिकलेले नसावे हे अगदी स्पष्ट दिसून येते. ...एअर, फेअर हे उच्चार इंग्लिशमधून व्हाया हिंदी आला असल्याचे माझे ठाम मत आहे...अभय नातू

एअर, फेअर हे हे हिंदी उच्चार नाहीत हे वरती स्पष्ट केलेच आहे. मराठीतले विद्वान आठवीपर्यंतही शिकलेले नसतात हे विधान आपणां सर्वांच्या बाबतीत अपमानास्पद आहे. इंग्रजी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत आणि मराठी विशेष नामांचे इंग्रजी स्पेलिंग कसे करावे याचे धडे मराठी विद्वानांना थॉमस कॅन्डीने १९या शतकांत देऊन ठेवले आहेत. दुर्दैवाने हिंदीत थॉमस कॅन्डी नव्हता, म्हणून हिंदीभाषकांना एअर हा शब्द एयर असा, आणि बँक हा शब्द बैंक असा लिहावा लागतो...J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)

जंजीरासंपादन करा

मुरुड जंजिरा लेखातील हे लेखन प्रथमदर्शनी आपण आणल्याचे दिसते . हे आपले स्वत्:चे लेखन , अप्रताधिकारीत मजकुराचा अनुवाद आहे किंवा नेमके कसे ?माहितगार (चर्चा) १२:२३, २१ मे २०१२ (IST)

सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादीसंपादन करा

विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी या यादीत अर्वाचीन इतिहास विभागात बोल्शेव्हिक क्रांती नावाचा लेख आहे आणि या लेखासमोर इंग्रजी दुवा Russian Revolution of 1917 हा दिलेला आहे. परंतू Russian Revolution of 1917 हा लेख मराठीत रशियन क्रांती (१९०७) या नावाने आधीच लिहिला गेला आहे.

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा २३".