विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३७

साचा:उपग्रह मध्ये काही बदल करून हवे आहेत...

संपादन

साचा:उपग्रह मध्ये काही बदल करून हवे आहेत.. मी हा साचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु तो फसलेला दिसत आहे. कृपया कोणी अनुभवी सदस्य त्यात सुधार करून देईल का ? त्यात अपेक्षित मुद्दे साच्यात दिसत नाहीत. मला किमान जीसॅट-८ लेखातील माहिती दिसणे अपेक्षित आहे.

सचिन १७:३४, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

  • डॉ.सचिन,
साचा:उपग्रह पहिला. भारतीय राष्ट्रीय उपग्रह ह्या वर्गातील इतरही लेख पहिले कोठेच साचे नाहीत. उपग्रहा साठी अजतायग आपल्या कडे साचा नसल्याचे जाणवते. नवीन साचा तत्काळ बनवता येईल आपण साच्यात अंतर्भूत करावयाच्या माहितीच्या मथळ्याची यादी गटवार द्यावी. तसेच साच्यास कृत्रिम उपग्रह असे नाव द्यावे असे वाटते. राहुल देशमुख १८:२२, १५ सप्टेंबर २०११ (UTC)
राहुलजी मला वाटते पुढील मथळ्यांचा किमान समावेश आसावा. चित्र, उपग्रह नाव, प्रक्षेपक देश, मालक देश/कंपनी, अवकाशात प्रक्षेपण-, प्रक्षेपक यान -, प्रक्षेपक स्थान -, काम बंद दिनांक -, वजन, आकार, विद्युत पुरवठा, उपग्रहावरील यंत्रे , उपग्रह कक्षा -, कार्यकाळ -, उद्देश्य -, शोध, संकेतस्थळ.
सचिन १८:५४, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

कृत्रिम उपग्रह

संपादन
  1. साचा क्रमपरिवर्तन आणि संयोजनद्वारे तपासले असता व्यवस्थित चालतो आहे असे दिसते.
  2. साचा वापराचे दस्तावेज उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. उदाहरणा दाखल वापरलेल्या लेखाची माहितीही उपलब्ध करून दिलेली आहे.
  4. आपण साचा वापरावा आणि काही मदत/सुधारणा लागल्यास कळवावे आणि अभिप्राय द्यावा.

राहुल देशमुख २२:०२, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

साचा उत्तम झाला आहे. हा लगेच आवश्यक लेखात वापरायला सुरुवात करावी असे वाटते....मंदार कुलकर्णी १३:४३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
अत्तीउत्तम साचा ! सर्व बाबी पूर्ण करत आहे .

काही गोष्टी जरूर सामावल्या जाव्यात असे वाय्क्तीत मत आहे १. उपनाभी बिंदू २. अपनाभी बिंदू धन्यवाद !

सागर:मराठी सेवक १६:०४, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

पण हे खरे आहे..!

संपादन

ग. श्री. खैर लेख पहिला, आपण पण अवश्य ह्या पानास भेट द्या.

  1. सदर पान २००७ ला बनवण्यात आले.
  2. आजतायग त्यास ५दा संपादित करण्यात आले आहे
  3. आता अस्तित्वात असलेली हि ६ वी आवृत्ती आहे.
  4. सांगकामे वगळता ह्याकामी ४ सदस्यांनी योगदान दिले आहे.
  5. ४ वर्षांनी लेखात एकाही शब्द नाही

काही काळापूर्वी संकल्पनि एकाही शब्द नसलेल्या लेखांबाबत चावडीवर लिहिले होते असे आठवते. मला असे वाटते कि निव्वळ खोके बनवण्यास अटकाव व्हावा आणि त्यासाठी नवीन लेख निर्मितीस किमान शब्दांची मर्यादा घालावी का ? (ती किती असावी, कोणत्या नामविश्वास असावी वैगरे नंतर ठरवता येईल.) आपणाकडे असलेल्या आणि माहितीगाराने इतक्यातच वापरलेल्या पुरवणीचा त्यासाठी उपयोग करता येईल असे वाटते. राहुल देशमुख १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

हे खरेच आहे :-)

संपादन

नुसते खोके असलेले लेख बनवू नयेत व त्यासाठी आपण इतर सदस्यांना उद्युक्तही करावे पण मज्जाव बिलकूल करू नये. ज्याला जे लिहायचे ते त्याने लिहावे (काही मर्यादांमध्ये राहून) हा विकिपीडियाचा मुख्य संकेत पाळण्याचा शक्यतो प्रयत्न करावा. एखाद्याचे चुकले तर ते (आधी) सुधारून घेउन मग त्या सदस्यास सूचना द्याव्यात.

असे विश्लेषण करणे चांगलेच, पण विश्लेषण आणि त्यानंतरच्या चर्चा करत बसण्यापेक्षा त्या लेखात चार शब्द घातले तर? आत्तापर्यंत दिसत आलेले आहे की चर्चांमधून फारसे काही साध्य होत नाही, वेळ उगीचच वाया जातो, वादावाद्या होतात आणि फुकट कटुता निर्माण होण्याची शक्यता होते.

अभय नातू १५:५३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

  • नवीन लेख निर्मितीस किमान शब्दांची मर्यादा घालावी का ? राहुल देशमुख १६:१८, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
नवीन लेख लिहिताना इतके शब्द लिहावे असे जरूर सुचवावे आणि त्यासाठी काही directivesही द्यावे, उदा. नवीन लेखात किमान चार ओळी लिहाव्या, वर्गीकरण करावेच करावे, लेख पूर्ण नसल्यास विस्तार साचा लावावा, लेखावर स्वतःच काम करणे अपेक्षित असेल तर कामचालू साचा लावावा, आंतरविकी दुवे द्यावे, इ.
या सूचना संपादनखिडकीखाली/वर सुद्धा घालता येतील.
अभय नातू १६:३३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
मला वाटते मुख्य नामविश्वात किमान चार शब्दांची एक ओळदेखील न लिहिता बनवलेल्या नव्या लेखांची निर्मिती नुकत्याच बसवलेल्या मीडीयाविकी पुरवण्यांच्या लॉगर सुविधेत बसवण्याची काहीतरी सोय करायला हवी.
खेरीज अभय म्हणतो, तसे संक्षिप्त मार्गदर्शनही उपयोगी पडू शकेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४६, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
 
केले.
अभय नातू १७:०३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
  • धन्यवाद अभय,
तपासले असता हे काम करते आहे. मर्यादा काय घातल्यात आणि कोणत्या नामविश्वांवर लागू केले हे कळवणे. राहुल देशमुख १७:१४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
अभय, धन्यवाद ! मात्र सध्याच्या पुरवणीमुळे अब्यूझ लॉगांमध्ये पुनर्निर्देशन केलेल्या नव्या पानांचीही नोंद होत आहे, असे दिसते. असे बदल न टिपल्यास बरे होईल. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०६, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
होय, असे होत होते, पण आता ते बदलेले आहे. बदल होण्यापूर्वीचे फिल्टरमध्ये पकडले गेलेले बदल दिसत राहतील असे वाटते.
अभय नातू ०४:३८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
मुख्य नामविश्वात पुनर्निर्देशने नसलेले लेख ज्यांत बदल केल्यावर आकार १०० बाइट पेक्षा लहान आहेत असे लेखबदल यात पकडले जातील.
सध्या अशा संपादनांची फक्त नोंद होईल. जर असे बदल खूप होत आहेत असे आढळले तर आपोआप हालचाल होईल अशी योजना करता येईल (संपादकास सूचना, लेखबदल न होऊ देणे, संपादकास बॅन करणे, इ.)
अभय नातू १७:२८, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी शब्द सूचवा

संपादन

मेमरी कार्ड साठी कुठला मराठी प्रतिशब्द वापरता येईल? संतोष दहिवळ १३:३०, २० सप्टेंबर २०११ (UTC)

माझे मत - मेमरी कार्ड हाच शब्द वापरला तरी चालेल. अजून काही आठवणीतलं .... जुळवून ते परत आठवणीत ठेवायला लागेल... :)मंदार कुलकर्णी १७:१७, २० सप्टेंबर २०११ (UTC)
स्मृतीफलक हा शब्द वापरता येईल का? आदित्य २१:२५, १६ नोव्हेंबर २०११ (UTC)
स्मृतीफलक पेक्षा स्मृतीपत्र कसे वाटते ? ---विनायक
स्मृतीपत्र जमतय !! Kaajawa ०४:३०, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)
स्मृती़कोष

विकी कॉन्फेरंस - मुंबई (भाषांतरासाठी मदत)

संपादन

कृपया खालील इमेल वाचून शक्य तेवढी मदत हवी आहे....

Bishaka said: In the last year, I've attended meetups in Pune which were entirely in Marathi, in Kerala which were entirely in Malayalam, and in Kolkata which were entirely in Bengali. Those present were able to participate because the meetups were not in English

The meetups at Pune/Kannur/Kolkata were language specific wiki meetups. So it is perfectly alright to conduct that in the respective language since the focus is on the respective language wiki projects. But since WCI is the get together of wikimedians from various Indian languages, we are not in a position to conduct common sessions in a specific Indic language due to obvious reasons.

Is any other provision being made for translation? Technically it is not feasible to translate each program to several Indic languages. But the speakers of the respective language who are good in English can assist fellow speakers (who has language issues) in this. Already Bala from Tamil wiki has come forward to assist any Tamil speakers who has language issue. Same way others can also help.

In fact WCI is giving an opportunity to the Indian State where the event is happening. Since WCI is happening in Maharashtra, Marathi wiki community should be one of the immediate beneficiary of this. Will Marathi wiki community make use of this opportunity?

For Wikimania at Israel I remember the organizers (Hebrew Wikimedians) conducted a special track (in Hebrew) with various programs targeting the Hebrew speaking people. In addition they had provided some assistance to translate the English programs to Hebrew. Last year I saw the same phenomenon in Gdansk also.

According to me Marathi wiki community need to take up this opportunity to address the speakers Marathi (It is perfectly alright to have a special track in Marathi if Marathi wiki community can plan and execute it.). Translation of all English programs to Marathi (or for that matter to any other Indian language) will not be feasible as of now. But it is definitely a good idea to reach out to more Marathi people through various programs using WCI as a platform. From my experience with Malayalam community, I should say if ever Malayalam community host WCI in Kerala, Malayalam community will make sure there will be special separate track and special programs targeted towards the speakers of Malayalam. - Shiju

तुमचे मत इमेल पाठवला तरी चालेल. ...wheredevelsdare@hotmail.com, "Pradeep" <pradeep.mohandas@gmail.com>, "Shiju Alex" <shijualexonline@gmail.com>, "Gmail Mandar" <mvkulkarni23@gmail.com> - मंदार कुलकर्णी १७:१७, २० सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियाचा झेंडा - मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये..

संपादन

नमस्कार मंडळी, दिनांक १८ ते २० नोव्हे. २०११ या काळात मुंबई येथे "WikiConference India 2011" भरवली जात आहे. याची माहिती आपणापर्यंत आत्तापर्यंत पोहोचली असेलच. अधिक माहिती http://meta.wikimedia.org/wiki/WikiConference_India_2011 येथे आहेच. या कॉन्फरन्सच्या संयोजन समितीकडून काही दिवसापूर्वी एक निवेदन आपल्याला आले आहे. कॉन्फरन्स "मुंबई" (महाराष्ट्रात) मध्ये असल्यामुळे साहजिकच मराठी मंडळीचा भरणा येथे असेलच. त्याच बरोबर "मराठी विकिपीडिया" च्या सदस्यांना आणि "मराठी विकिपीडिया" संदर्भातील विषयाला येथे निश्चितच प्राधन्य मिळेल असे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे. या विषयी मी आणि राहुल देशमुख यांनी कॉन्फरन्सच्या संयोजन समितीशी चर्चा सुरु केली असून "मराठी विकिपीडिया" साठी वेगळा Track देण्याला त्यांची मान्यता आहे.

या कॉन्फरन्स मध्ये "मराठी विकिपीडिया" चा झेंडा पुढे नेण्याचे मला सुचलेले काही निश्चित उद्देश असे:

  1. आपण सारे "मराठी विकिपीडिया" मधेच भेटतो, भांडतो, चर्चा करतो पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही औरच.
  2. "मराठी विकिपीडिया" जास्तीत जास्त नवीन लोकांपर्यंत पोहोचवणे
  3. "मराठी विकिपीडिया" च्या प्रगतीसाठी दिलेल्या वेळात काही साधक बाधक चर्चा करणे
  4. "मराठी विकिपीडिया" मध्ये असलेल्या मंडळींच्या अडचणींची चर्चा करून उपाय योजना तयार करणे
  5. काही विशिष्ठ विषय घेऊन परिसंवाद घडवून विचारांना चालना देणे
  6. बाकीच्या भारतीय भाषांबरोबर आपली नाळ जोडून काही चांगल्या गोष्टींचे आदान प्रदान करून सर्व भारतीय भाषा "विकिपीडिया" वर समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे... इत्यादी इत्यादी.

या साठी आपणा सर्वांचा सहभाग नुसता आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक आहे. येत्या काही काळात संयोजन समितीशी विस्ताराने चर्चा करून निश्चित आराखडा तयार होईल. तेव्हा आपल्या मौल्यवान सूचना आणि त्याहीपेक्षा मौल्यवान वेळ या कॉन्फरन्ससाठी बाजूला काढून ठेवूया.

या विषयी अधिक माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवूच. धन्यवाद..... मंदार कुलकर्णी १८:४०, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

मंदार,राहुल, चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद ! विकिपरिषदेसाठी प्रत्यक्ष येऊ शकणार्‍यांसाठी व प्रत्यक्ष येऊ न शकणार्‍यांसाठी काय काय करणे शक्य आहे, याबद्दल काही मार्गदर्शक सूचना लिहू शकाल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१६, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

. सादरीकरणासाठी निमंत्रण .

संपादन

नमस्कार मंडळी,

मुंबई विकिकॉन्फरन्स चे दर्म्यान मराठी विकिपीडियाच्या मंचाकावरून आपले विचार मांडण्यासाठी, मराठी विकिपीडिया समुदायास मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तत्सम सादरीकरणासाठी आणि तांत्रिक कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यास सदस्यांना नम्र आव्हाहन.

आपण आपले सादरीकरणाचे प्रस्ताव खालिल आराखड्यात marathiwikipedia@gmail.com वर १५ ऑक्टोबर २०११ पर्यत इमेल द्वारे इमेल विषयाच्या रकान्यात speaker -2011 असे नमूद करून सादर करावीत. निवडक प्रस्तावास सादरीकरणास निमंत्रित करण्यात येईल. ज्यास्तीत ज्यास्त सभासदांना सामाऊन घेण्याचे धोरण ठरवण्यात आले असल्याने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा. निमंत्रित सदस्यांच्या भाडे आणि मुंबईतील वास्तव्याचा आर्थिकभार आयोजकांतर्फे उचलण्याचा प्रयत्न आहे . आपल्या भरीव सहभागाची अपेक्षा. राहुल देशमुख १९:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)



 १  सदरीकरणाचे शीर्षक   

 २  सदस्याचेनाव      
 
 ३  विपत्र (इमेल) पत्ता 
 
 ४  सदस्य नाव (मराठी विपी वरील )
 
 ५  संपूर्ण पत्ता 

 ६  दूरध्वनी/भ्रमण दूरध्वनी 

 ७  संस्था 

 ८  आपल्या सादरीकरणाचा 
    ५०० शब्दात सारांश

 ९  सादरीकरण (वैकल्पिक)
राहुल,

गेल्या काही तासात बऱ्याच मंडळींनी वरील विषयावर मत प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा धागा सुटून जाऊ नये म्हणून मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते. या चावडीवरच "मुंबई विकिकॉन्फरन्स- मराठी विकिपीडिया" असे पान किंवा तत्सम पान बनवून त्यात चर्चा करता येतील काय? म्हणजे बाकी संपादकांना विनासंकोच त्यावर मत प्रदर्शन करता येईल आणि त्यांच्या सूचनांचा मुंबई विकिकॉन्फरन्सला उपयोगही होईल.....मंदार कुलकर्णी १७:३०, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

 
केले.
  • मंदार,
सदर पान सुरु करून साचा सुचालन मध्ये पण बसवले आहे.
तूर्त प्रकल्प ह्या दुव्यास संमेलन दुव्याने बदलले आहे. काही मदत लागल्यास कळवावे. राहुल देशमुख १८:३१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)
 

नवीन विभाग केल्याने बरे झाले आभारी !!

सागर:मराठी सेवक १८:५७, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

आनंदाने सहभाग घ्यायला आवडेल

संपादन
  • आनंदाने सहभाग घ्यायला आवडेल. सध्या मी विकिपीडिया इंडिया एड्युकेशन प्रोग्राम मध्ये, मराठी विकिपीडिया प्रसारित करत आहे. अनुभव मांडण्यास संधी मिळाली तर उत्तम. AbhiSuryawanshi १७:४१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)


देवनागरी साचा

संपादन

मी साचा:देवनागरी हा बनवलेला साचा रोमन आकडे देवनागरीत लिहिण्यासाठी उपयुक्त आहे. साचा:ग्रॅंडस्लॅम माहिती ह्या साच्यामध्ये देवनागरीचा वापर केला आहे.

{{देवनागरी|1234}}

= १२३४.
Abhijitsathe १७:२२, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

  • अभिजित, साचाचे नाव देवनागरी अंक जर केले तर अधिक उत्तम होईल असे वाटते. साचा वापरात जाण्या आधीच हा बदल केल्यास उत्तम. राहुल देशमुख १७:३२, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी लेखन संकेत

संपादन

शुद्धलेखनाच्या नियमात समाविष्ट न झालेले काही लेखन संकेत मराठीत आहेत. त्यांतले काही असे :

  • उच्चारित अनुस्वार असलेल्या शब्दांमधले इ-कार, उ-कार र्‍हस्व असतात. उदा० चिंच, लिंबू, डाळिंब, सडाफटिंग, उंच, कुंपण, जुंपणे, तुरुंग वगैरे. हा नियम अनुच्चारित अनुस्वारांना लागू नाही, उदा० कांहीं, केलीं, हळूंहळूं वगैरे. हल्ली मराठीत अनुच्चारित अनुस्वार द्यायची पद्धत नसल्याने असले शब्द विचारात घेण्याची आता गरज उरलेली नाही. .
  • एका शब्दात ट-ठ-ड-ढ ह्यांपैकी एकच अक्षर येऊ शकते. त्यामुळे ठोठो हा शब्द मराठीत ठो ठो असा आणि बाय-बाय याअर्थीचा टाटा, हा 'टा टा` असाच लिहायला पाहिजे. अपवाद परकीय भाषेतून मराठीत आलेले शब्द : टाटा(आडनाव), बटाटा, डाटा, डेटा, टोर्टिला, टिट फॉर टॅट, टाडा वगैरे.
  • जर दोन ट-वर्गीय एका शब्दात आलेच तर त्यांतला पहिला त-वर्गीय होतो. त्यामुळे ताट, ताठा, तोड, तिढा, थाट, थोडा, दाट, देठ, दोडका, दाढ, धीट, धाड वगैरे शब्द अस्सल मराठी वाटतात. टात, पटौदी वगैरे शब्द मराठी नाहीत.
  • श-ष-स यांतले फक्त ष हे अक्षर क-ट-ठ-ण-म वगैरेंना जोडता येते. त्यामुळे अक्सा, रिक्शा कश्ट, काश्ठ, उश्ण असले शब्द मराठीत नसतात. रिक्षा हा मूळचा इंग्रजी शब्द जर पूर्णपणे मराठीकरण झालेला असेल तर तो रिक्षा असाच लिहायला पाहिजे. याच रीतीने स हे अक्षर त-थ-यांना, श हे अक्षर च, न यांना वगैरे.

पूर्वी डाळिंब या नावाने असलेला लेख डाळींब या नावाकडे, आणि पतौडी हा लेख पटौदी या नावाकडे पुनर्निदेशित करणे योग्य नव्हते, हे वरील निवेदनामुळे लक्षात यावे....J २०:२७, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

मनापासून पटले :) Kaajawa १७:४८, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट गायक

संपादन

नमस्कार मंडळी! साचा चर्चा:माहितीचौकट गायक येथे झालेल्या चर्चेनुसार साचा:माहितीचौकट भारतीय शास्त्रीय गायक व अन्य पुनर्निर्देशित साच्यांऐवजी संबंधित लेखांमध्ये साचा:माहितीचौकट गायक हा साचा वापरण्यात आला आहे. सांगकाम्या चालवून हे बद्ल करण्यात आले आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४०, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद... पण परत एकदा विनंती करतो कि हि "जादू" आम्हा पामराला कळवावी... :)मंदार कुलकर्णी १०:१८, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

मासिक सदर

संपादन

मुख्यपानावरचे वार्षिक (अर्ध-वार्षिक तरी नक्कीच) सदर कॉरल समुद्राची लढाई आता बदला राव.... अनेक लेख जे मुखपृष्ठ नामांकनासाठी पडून आहेत त्यातील एखादा निवडावा. प्रत्येक लेखात काही तरी कमतरता असतेच, परंतु मासिक सदर द्वैमासिक तरी असावे ह्यासाठी त्यातीलच एखादा लेख नाही का चालणार?
Abhijitsathe ०१:१५, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

बदलण्यास हरकत नाही, पण अशुद्धलेखन, अपूर्ण, असंदर्भित माहिती असेलेले लेख आपल्याला मुखपृष्ठ सदर लेख म्हणून चालतील का?
जरा नेट लावून त्या यादीतील एखादा लेख परिपूर्ण बनवूया का? एकदा लेख नीट झाला की मग १ तारखेची वाट पाहण्याचीही गरज नाही. त्यातून जर सगळ्यांचे मत असेल तर सदर या वीकांतास बदलूयात.
अभय नातू ०२:३६, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
त्यातल्यात्यात मायक्रोसॉफ्ट विंडोज हा सगळ्यात जास्त प्रगल्भ वाटत आहे. त्याला करुयात का सदर?
अभय नातू ०२:३९, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
चालेल. मायक्रोसॉफ्ट विंडोज improve करू.
Abhijitsathe १८:०७, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
काही विभाग रिकामे राहिले आहेत. ते पूर्ण झाले की सदर करता येईल.
अभय नातू १४:२८, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
कुठलाच लेख सर्वार्थाने पूर्ण होऊ शकत नाही. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्यात भर घालावीच लागते. त्यामुळे बऱ्यापैकी तयार झालेले लेख मासिक सदर म्हणून टाकावेत असे वाटते. जेणे करून नंतर पण ते सर्वार्थाने पूर्ण करता येतील. शुद्धलेखनाच्या चुका असतील त्या दुरुस्त करून लगेचच संपादन करता येईल. पण त्या साठी लेख "मासिक सदर" मध्ये टाकण्यासाठी थांबू नये. आता राहिला प्रश्न संदर्भ देण्याचा. आज किती संपादक संपादन करताना 'संदर्भ' देतात? शिवाय आपणही संपादकांना 'संदर्भ' देण्यास सक्ती करत नाही. जर अशी सक्ती (शब्दश: जाऊ नका नाहीतर लगेच या विषयावर सूचनांचा पाऊस पडेल...) केली तर लेख तयार होतानाच परिपूर्ण होण्यास मदत होईल. या संदर्भात लेख लिहिण्यासंबंधी काही ठोस आचार संहिता लगोलग तयार करता येईल का? मागे या विषयावर चावडी वर चर्चा झाली पण काही निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. या संदर्भात "इंग्रजी" चे Benchmarking[मराठी शब्द सुचवा] करता येईल का? मला सुचलेले काही मुद्दे असे -
  1. नवीन लेखामध्ये कमीतकमी चार ओळी किंवा दोन परिच्छेद असावेत
  2. नवीन लेखामध्ये कमीतकमी एक किंवा दोन संदर्भ असायला हवे
  3. नवीन लेख कमीतकमी एका वर्गा मध्ये समविष्ट करण्यात यावा
  4. याच लेखाचा इतर भाषांमध्ये लेख असेल तर आठवणीने त्या भाषेची लिंक देणे आणि मराठी लेखाची लिंक त्या भाषेत देणे. कंटाळा करू नये.
  5. नवीन लेख लिहिताना जर त्या संदर्भातील छायाचित्र (प्रताधिकाराचा भंग न होणारे) लेखकाकडे असेल तर लगेचच Commons वर टाकून मुख्य लेखात आणि इतर भाषिक लेखात डकवणे.
यामुळे छोट्या लेखांची होणारी भरमसाठ वाढ आटोक्यात येईल. आणि अभय म्हणतात त्याप्रमाणे लेख परिपूर्ण होण्यास सुरुवातीपासून हातभार लागेल आणि वेळ कमी लागेल. या विषयी इतर संपादकांनी आपले मत होय/ नाही प्रकारे देऊन पुढील कार्यवाहीस आग्रही राहावे. प्रचालक अशी आचार संहिता लागू करण्यासाठी मदत करतीलच याची मला खात्री आहे.....मंदार कुलकर्णी
मासिक सदर होण्यासाठी --
लेख सर्वार्थाने परिपूर्ण होणे अपेक्षित नाही. आत्तापर्यंतच्या सगळ्या सदर लेखांत भर घालण्यात आलेली आहे.
अशुद्धलेखन असेलेले लेख मासिक सदर पाहून वाचणार्‍याचा रसभंग होतो. सदर लेखांमध्येतरी असे करू नये. हे लेख म्हणजे आपण केलेल्या प्रयत्नांतील चांगलेचुंगले जगाला दाखवण्यासाठीचे मासले आहेत. ते शुद्ध ठेवण्यात हलगर्जीपणा असू नये.
आत्तापर्यंतच्या मासिक सदरांमध्ये भरपूर संदर्भ दिलेले आहेत. हे कटाक्षाने पाळण्यात येते.
वर दिलेले बेंचमार्किंग चांगली सुरुवात आहे यात भर --
शक्यतो वेळ साधून मासिक सदर लेख निवडावे, उदा. क्रिकेट विश्वचषक संपल्यासंपल्या त्याबद्दलचा लेख. १ मेच्या आसपास संयुक्त महाराष्ट्र चळवळ, इ.
लेखातील लाल दुवे शक्य तितके घालवून तेथे छोटे तरी का होईना (अगदी खोकी नव्हे) लेख तयार करावे.
अभय नातू ०६:४६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)


नवे मासिक सदर लेख करिता सुयोग्य पर्याय उपलब्ध नसल्यास गरजे प्रमाणे जुने मासिक सदर लेख पुन्हा एकदा लावण्याच्या पर्यायाचाही विचार करता येईल किंवा कसे ? माहितगार १४:३८, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
उत्तम पर्याय आहे. याने विकिपीडियाचे मुखपृष्ठ बदलत असल्याचे दिसून येईल.
अभय नातू १४:५६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडिया मध्ये ३५६५४ लेख असताना आपल्याला महिन्याला एक चांगला लेख सापडू नये / तयार करता येऊ नये? मराठी विकिपीडिया साठी हे अजिबात आशादायक चित्र नाही असे मला वाटते. पूर्वीचे 'मासिक सदर' म्हणून आलेले लेख परत या सदरात दाखवण्यात काय हशील आहे? ज्यांना ते लेख पाहायचे असतील तर त्यांनी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह वर जाऊन ते पाहावेत. आज कित्येक संपादक अहोरात्र लेख लिहित असताना किंवा भर घालत असताना मासिक सदरासाठी लेख मिळू नयेत याचे फारच आश्चर्य वाटते. मला वैयक्तिक असे वाटते की आपल्याकडे असे अनेक चांगले लेख असू शकतात, पण ते सापडत नाहीयेत. मागे कोणीतरी त्यात भर घातली आहे पण केवळ "अलीकडील बदल" मध्ये ते दिसत नाहीत म्हणून ते कोणाच्या नजरेस पडत नसतील. प्रचालक यात मदत करू शकतील का? चांगले लेख शोधायचे काही मार्ग त्यांच्याकडे नक्कीच असतील. अगदी सहज सुचले म्हणून उदाहरण देतो. रायगड किल्ला हा लेख 'मासिक सदर' म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो का? नसेल तर त्यात योग्य ती सुधारणा करून तर येईल ना? राहिला प्रश्न शुद्धलेखनाचा. अनेक संपादक आणि 'जे' सारखे असंख्य लक्षात येईल तेंव्हा दुरुस्त्या करतोच ना? मग 'मासिक सदरच्या' लेखाला असा कितीसा वेळ लागेल? आपण प्रत्येक विभागातील १० -१० लेख जरी हुडकून काढले तरी २ ते ३ वर्षाचे 'मासिक सदर' चे काम होईल.
मंदार कुलकर्णी १६:५६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
मंदार,
मराठी विकिपीडिया मध्ये ३५६५४ लेख असताना आपल्याला महिन्याला एक चांगला लेख सापडू नये / तयार करता येऊ नये
कटू असली तरी ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वीचे 'मासिक सदर' म्हणून आलेले लेख परत या सदरात दाखवण्यात काय हशील आहे?
मुखपृष्ठ सतत बदलत राहिले तर त्यात थोडे का होईना नावीन्य राहील. तेचते पान पाहून कंटाळा येणे साहजिक आहे.
ज्यांना ते लेख पाहायचे असतील तर त्यांनी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह
आजच्या आधी किती लोकांना हे पान ठाउक होते? दुसरे म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठीची ही चर्चा नाही. आपण मुखपृष्ठात बदल करीत राहण्याचे उपाय शोधीत आहोत. जुने सदर लेख पुन्हा घालणे म्हणजे कदाचित शिळ्या कढीला पुन्हा उत आणण्यासारखे होईल पण तसे करणे हे महिनोनमहिने पान न बदलण्यापेक्षा बरे असे वाटते (म्हणजे ती कढी इतके दिवस उघड्यावर पडून राहते की तिला साय धरते...:-D)
प्रचालक यात मदत करू शकतील का? चांगले लेख शोधायचे काही मार्ग त्यांच्याकडे नक्कीच असतील.
यासाठी विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन हे पान आहे आणि त्यासाठी मुखपृष्ठावरुन दुवाही आहे. चांगले लेख मिळण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे विशेष:मोठी पाने.
मग 'मासिक सदरच्या' लेखाला असा कितीसा वेळ लागेल?
सखेद म्हणावे लागते की खूप वेळ. वरील नामनिर्देशन पानावरील अनेक सुचवण्यांतील लेखांत अशुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुकांची भरमार आहे पण ती अनेक महिने अजूनही पडून आहे. अनेक वेळा याकडे लक्ष वेधलेलेही आहे, आता आशा आहे की या चर्चेच्या संदर्भाने आपण तेथे हवे ते बदल करुन टाकूयात.
अभय नातू १६:२४, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

मासिक सदर लेखरांग

संपादन

वर माहितगारांनी सुचवल्याप्रमाणे मुखपृष्ठ सदर करण्यासाठी नवीन लेख बदलांच्या प्रतीक्षेत असताना पूर्वी मुखपृष्ठ सदर असलेल्या लेखांना पुन्हा एकदा संधी देण्याबद्दल तुमचे मत नोंदवा.

दरम्यान मी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह हे पान अद्ययावत केले आहे. यात अधिक बदल करता येतील, उदा. तक्ते लावून पान compact करता येईल, प्रत्येक लेखासमोर इवलेसे चित्र लावता येईल, इ. यासाठी मदत हवी आहे.

  1. यातील जानेवारी २००६ पासूनच्या, म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईनपासून उलट क्रमाने यावे असा प्रस्ताव (शिवाजी महाराज सोडता या आधीचे लेख यथातथाच आहेत).
  2. असा लेख पुन्हा सदर करण्याआधी त्यावरुन पुन्हा एकदा हात फिरवावा (माहिती अद्ययावत करणे, शुद्धलेखन, व्याकरण सुधारणे, इ.)
  3. यादीत नसलेला एखादा लेख मुखपृष्ठ सदर करण्याजोगा झाला आणि त्यास सदस्यांचे अनुमोदन मिळाले तर तो लेख क्रमात मध्येच घुसवावा. त्यानंतरच्या महिन्यात यादीतील पुढचा लेख निवडावा.

तुमचे मत कळवावे.

१५:२२, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

गोंधळात गोंधळ

संपादन

हो, हे जरी प्रसिद्द्ध मराठी चित्रपटाचे नाव असले आणि मी चित्रपटानवर काम करीत असलो तरी मंडळी हा गोंधळ मराठी विकितील चित्रपटाच्या लेख नवा बाबतचा आहे. त्यामुळे मीपण गोंधळून गेलो आहे. गेल्या २४ तासात मला अनेक मान्यवर सदस्याच्या अनेक सूचना माझ्या चर्चा पानावर आल्या. आपल्या सूचना आणि सहकार्य साठी मी आपला आभारी आहे.

गोंधळ असा आहे कि चित्रपटांची नवे विकी वर नाव (चित्रपट) अथवा नाव (साल चित्रपट ) अथवा नाव (भाषा चित्रपट)' अथवा नाव (साल भाषा चित्रपट ) अशा विविधतेने दिलेले आढळते. उदा. अगर तुम ना होते (चित्रपट) , अनामिका (२००८ चित्रपट) , आखरी रास्ता (हिंदी चित्रपट), कुँवारा बाप (१९७४ हिंदी चित्रपट) . नेमके नामकरण कसे असावे हाच तो गोंधळ आहे. मराठी चित्रपटांना तर नाव (चित्रपट) उदा. अशी ही बनवाबनवी (चित्रपट) भूतौशी दिलेली आहेत. काय सांगकाम्या वैगरे वापरून हे सुरळीत करता येईल का ? तसे झाले तर मला चित्रपटांची कामे पुढे नेतांना अधिक अडचणी निर्माण होणार नाही थोडे वर्गनाम बाबतही गोंधळ आहेतच. मराठी विकीवरील अशी हि बनवा बनवि म्हणजे गमत जम्मतच आहे तेव्हा अजून गोंधळात गोंधळ होऊ नये म्हणून कुपया मदत करावी.

मि राजाराम बोलतोय २ ऑक्टोबर २०११ (UTC)

गोंधळ

संपादन

राजाराम,

तुम्ही म्हणता तसे येथील चित्रपटांवरील लेखांमध्ये गोंधळ आहे खरा. गेल्या अनेक वर्षांत अनेक संपादकांनी वेगवेगळ्या वेळी हे लेख तयार केले व ते करताना प्रमाणीकरण न केले गेल्यामुळे असे झाले खरे.

तर मग आता यापुढे काही संकेत ठरवून ते पाळण्याचा प्रयत्न करुयात.

लेखनाव --
जर चित्रपटाच्या नावाशी इतर काही संदिग्ध नसेल (पुस्तक, दूरचित्रवाणीमालिका, स्थळनाम, व्यक्तिनाम, इ.) तर नुसते नाव हे शीर्षक म्हणून ठीक आहे, उदा. गोंधळात गोंधळ.
जर अशी संदिग्धता असेल तर (चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. निवडुंग (चित्रपट)
जर एकाच नावाचे अनेक भाषांतील चित्रपट असतील तर (मराठी चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. बाजी (मराठी चित्रपट)
जर एकाच नावाच्या चित्रपटाच्या एकाच भाषेत अनेक आवृत्त्या असतील तर त्याला (२००८/२००९/... चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. फादर ऑफ द ब्राइड (१९८९ चित्रपट)
जर एकाच नावाच्या चित्रपटाच्या अनेक आवृत्त्या असतील तर त्याला (२००८/२००९/१९७२/... हिंदी/मराठी/इंग्लिश... चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. डॉन (२००९ हिंदी चित्रपट)
इतर नावांकडून मूळ शीर्षकाकडे योग्य ती पुनर्निर्देशने तयार करावी, उदा. गोंधळात गोंधळ कडे गोंधळात गोंधळ (मराठी चित्रपट), गोंधळात गोंधळ (१९८८ चित्रपट), गोंधळात गोंधळ (१९८८ मराठी चित्रपट), इ.
इतर काही नियम/संकेत सुचल्यास येथे लिहावे, नंतर संकलन करून दालन:चित्रपट सारखे एखादे पान तयार करून तेथे ते लिहून ठेवावे.
अभय नातू ००:४१, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
ता.क. वरील नावे फक्त उदाहरणे आहेत. चित्रपटांची नक्की प्रकाशनवर्षे माझ्या आत्ता ध्यानात नाहीत.
अभय, मला असे वाटते की इतके नियम करण्यापेक्षा सोपे दोनच नियम अमलात आले तर पाहावे. ते असे -
नवीन चित्रपटांच्या नावाच्या शीर्षकात भाषेचा उल्लेख अत्यावश्यक असावा. उदा. बाजी (मराठी चित्रपट) , निवडुंग (मराठी चित्रपट) डॉन (हिंदी चित्रपट)
जर एकाच नावाचे दोन चित्रपट वेगवेगळ्या काळात आले तर मात्र वर्षाचा उल्लेख अवश्य करून पुनर्निर्देशन करावे. डॉन (२००९ हिंदी चित्रपट)
हे दोनच नियम लावले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील असे वाटते. सुरुवातीला जर वरील शिस्त लावली तर पुढील प्रश्न, दुरुस्त्या आणि पुनर्निर्देशने वाचतील..मंदार कुलकर्णी १७:१४, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)


बरोबर सांगितलेस, अभय! आधीच्या लेखांमध्ये प्रमाणीकरण करण्यासाठी पद्धतशीर कार्यप्रस्ताव हाती घेऊन पाठपुरावा करावा, अशी परिस्थिती आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४३, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

सजगता संदेश

संपादन

विकी कॉन्फरन्सचे सजगता संदेश एका पानावर एकाखाली एक तीन-तीन येणार नाहित यासाठी काही करता येईल काय?

संतोष दहिवळ १७:५९, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
  •   तुम्ही विकी कॉन्फरन्सला नोंदणी करा म्हणजे ... !!! - मेघनाथ ०१:३७, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • सजगता संदेशावरील उजव्या कोपर्यातील फुलीवर (X) क्लिक करा. - मी राजाराम बोलतोय
विकी कॉन्फरन्स सजगता संदेशाविषयीची अडचण चावडीवर मांडल्याबरोबर अवघ्या काही मिनिटात विकीपिडीया प्रचालक प्रणालीने तांत्रिक सुचालन व्यवस्था ठिक केल्याबद्दल धन्यवाद. संतोष दहिवळ १२:३७, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिपीडिया:चरित्र प्रकल्प अमेरिकन राष्ट्राध्यक्षविषयक लेखांचे प्रस्तावित काम पूर्ण

संपादन

नमस्कार्‍अ मंडळी! विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथे मांडलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविषयीचे लेख विस्तारण्याचे प्रस्तावित काम पुरे झाले आहे.:) वाढीव मुदतीनंतरही हे काम पुरे होण्यास ५ दिवस अधिक लागले असले, तरीही या कामाचे स्वरूप व उपलब्ध मनुष्यबळाचा तुटवडा लक्षात घेता, ४४ लेख उदयोन्मुख लेख सदरात झळकवण्यालायक स्तरापर्यंत आणणार्‍या या कामाचे महत्त्व उणावत नाही. या कामी संतोष दहिवळ, तसेच इतरही अनेक विकिसदस्यांचा व सांगकाम्यांचा वाटा आहे; त्या सर्वांचे या कामाच्या पूर्तीनिमित्त अभिनंदन ! :)

आगामी काळात चरित्र प्रकल्पावर व न्य प्रकल्पांवरही कामाचे प्रस्ताव पद्धतशीर रित्या पाठपुरावा करून हातावेगळे केले जातील, यात शंका नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२९, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)

छान! नेट (मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत..:-}) लावून सातत्याने एखाद्या विषयाचा पाठपुरावा केल्यास काय फळ मिळू शकते याचे हे एक उदाहरणच आहे. एकमेकांच्या कामावर लक्ष ठेवून लागेल तेथे मदत, दुरुस्ती, भर घालणे हे केल्याने एकमेकांच्या प्रयत्नांची बेरीजच नव्हे तर त्यावर व्याजही मिळते हे ही येथे दिसते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, एकमेकांच्या चुकांवर दहा दिवस आणि तीन पाने भरुन चर्चा आणि वाद-तंटे न करता त्या चुका सुधारुन घेउन माहितीत भर घातल्याने आपल्या कष्टांचे फळ अधिक गोड होते याची ही प्रचिती आहे.
संकल्प, संतोष आणि येथे उद्धृत न केलेल्या इतर सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि कौतुक.
अभय नातू १७:०८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


  •  प्रकल्प गुंडाळण्याची घाई करूनका राव. कामात प्रोब्लेम आहेत. माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले तर पुन्हा येरेमाझ्या मागल्या. - मेघनाथ ०४:०१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले
  म्हणजे?
अभय नातू ०४:१३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
  •  They did not use the senator Sacha which has lot many fields (used in many articles in same category – check Obama ,Bush ..) instead they prepared a small Sacha with 3-4 fields and wind up the work. In future if one has to modify this then he has to redo the work. - मेघनाथ ०४:३१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
मेघनाथ, विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथील निकषांनुसार काम पूर्ण झाले आहे. काम लपेटले नाही, हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्यासह आपणा सर्वांना अजून काम करायला वाव कायमच आहे. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:३४, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)


मेघनाथ, आपण म्हणता आहात

प्रकल्प गुंडाळण्याची घाई करूनका राव.

आता हेच पहा 'अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण' हा विकिपिडीया चरीत्र प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सुरु झाला १ मे २०११ ला आणि संपला ५ ऑक्टोबर २०११ ला म्हणजे तब्बल १५८ दिवस हा प्रकल्प चालू होता. (चालू होता म्हणजे प्रकल्पाच्या निकषानुसार, यापुढेही तो चालूच आहे फक्त प्रकल्पाचे निकष पूर्ण झाले आहेत.) विकिपिडीयाच्या सदस्यांना मेघनाथ म्हणतात तसा जर प्रकल्प लपेटायचाच असता तर त्याला १५८ दिवस कशाला पाहिजेत? आणि हा प्रकल्प तीन मुदतवाढी घेऊन सदस्यांनी पूर्ण केलेला आहे त्यामुळे लपेटण्याचा प्रश्नच येत नाही. (आणि लपेटून लपेटणारांचा फायदा काय?)

माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले तर पुन्हा येरेमाझ्या मागल्या. In future if one has to modify this then he has to redo the work.

भविष्यात येथील पानांवर एखादा सदस्य कोणत्या माहितीची भर टाकणार आहे ते आजच सांगता येत नाही. कुणाला जर पूर्वीच्या पानात बदल करायचा असेल, संपादन करायचे असेल वा अनेक पानात काही ठराविक नमुन्यात माहिती टाकायची असेल तर त्या सदस्याला त्या माहिती चौकटिचा साचा बनवावा लागतो. आणि आयत्याच साचांचा वापर करायचा असेल तर वर्ग:साचे किंवा वर्ग:व्यक्तिविषयक माहितीचौकट साचे येथे विकिपिडीयाच्या सदस्यांनी तयार केलेले अनेक आयते माहितीचौकट साचे उपलब्ध आहेत त्याचा कुणीही सदस्य वापर करु शकतो. इतर सदस्य, अनामिक सदस्य आणि मेघनाथांनीही येथील साचा:माहितीचौकट सेनेटर वापरावा आणि त्यांना हा साचा वापरून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे संपादन पूर्ण झाले हा संदेश चावडीवर टाकण्याचा सुदिन लवकरच मिळावा ही अपेक्षा.

संतोष दहिवळ १४:२०, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

सांगकामे आवरा...

संपादन

सांगकामे अनेक लेखांमध्ये घोळ घालत सुटले आहेत, त्यांना थांबवा.
Abhijitsathe १९:३२, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

झालेला घोळ

सांगकाम्याने केलेला घोळ काय झाला आहे ते सांगण्याची कृपा व्हावी. साच्यातील रोमन अंक मराठी झाल्यावर लेखात कोणताही परीणाम झाल्याचे दिसले नाही फक्त रोमन आकडे मराठीत आले आहे हे दिसल्यावरच जतन केले. घोळ घालायचा असता तर सगळ्या लेखात झाला असता. पण सांगकाम्या फक्त प्रयोग करून पाहत आहे. संतोष दहिवळ १९:४६, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

नोव्हाक जोकोविच, आना इव्हानोविच, अमेली मॉरेस्मो हे लेख पहावेत. टेबलचे रंग hexadecimal मध्ये असतात त्यात मराठी आकडे चालत नाहीत. तसेच
{{WTA}}
ह्या साच्याला रोमन आकडेच लागतात. हे सर्व बदल करण्यासाठी पुन्हा अधिक वेळ घालवावा लागला तर सांगकाम्याच्या वापराला काय अर्थ आहे? Abhijitsathe १९:५४, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठीचा साचा आणि नियम

संपादन

 तांत्रिक चावडीवरील चर्चा पहा 

नमस्कार, मराठी विकी शिकवणीचे - १ चलचित्र पहिले. सागर सर आणि राहूल सर खूप छान उपक्रम चालू केला आहात. चलचित्र मध्ये तुषार अमित,हरीश, नितीश झळकत आहात. सर्वांचे अभिनंदन.वरील वादामध्ये पडल्यास नवीन सदस्याचे म्हणणे कोण कितपत ऐकणार? न बोलून शहाणे व्ह्यवे अशी तरा आहे. आपल्या पुढील कामास लाख लाख शुभेच्या. जयंत साळगावकर ह्याची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. अजून काही करण्याजोगे असल्यास कळावे.

Bhimraopatil १२:४९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)


लय भारि Anandaaghav १७:०७, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिसंमेलनातील मराठी सत्रे

संपादन

 विकिसंमेलनातील मराठी सत्रांबद्दल महत्वाची नोंद पहा 

विजयालक्ष्मी पंडित लेखातील साचा साचा:महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे, परंतु खाली राज्यपालांच्या नावाचा उल्लेख दिसत आहे. संपादन करता वेळी तो साचा मुख्यमंत्र्यांची नावे दाखवतो. याला काय पर्याय काढता येईल. सचिन ०९:१५, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

डॉ. सचिन यांनी या साच्यातील मी नजरअंदाज केलेले शीर्षक बदलले आहे.
धन्यवाद.
अभय नातू १४:५६, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

माहितीचौकट भारतीय जिल्हा संबंधीत..

संपादन

माहितीचौकट भारतीय जिल्हा साचात संकेतस्थळ मधे कार्यालयीन शब्द जोडला जातो त्यामुळे दुवा पान व्यवस्थित जोडले जात नाही. उदा. रतलाम जिल्हा मध्ये दुवा असा येत आहे. http://ratlam.nic.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8 यात कोणी बदल करील काय?

सचिन १५:४७, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

  • केले मेघनाथ १७:०३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
मला वाटते आपल्याला आवश्यक बदल मी साच्यात केले आहेत आता आपण जोडलेले दुवे व्यवस्थित जोडले जात असतील. दुसरे असे की आपल्याला मध्यप्रदेश मधील जिल्ह्यांना माहितीचौकट भारतीय जिल्हा टाकायची असेल तर सांगकाम्या चालवून एकाच वेळी मध्यप्रदेयमधील जिल्ह्यांना ही माहितीचौकट टाकून देता येईल जेणेककरून आपला बराचसा वेळ वाचेल. असे वाटल्यास कळवावे.संतोष दहिवळ १७:०५, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

हातभार लावा

संपादन

मराठी विकिपीडियावरील नवीन चित्र संचिका चढवण्याची प्रक्रीया प्रताधिकारपूर्ण करण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडियाच्या धर्तीवर काही पानांची निर्मिती प्रस्तावीत आहे. त्या अंतर्गत en:Wikipedia:Files for upload हे पान त्यातील साचे आणि प्रक्रीया पूर्ण करावयास लागणार्‍या संबंधीत सर्व पानांची विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे येथे निर्मिती करून हवी आहे. हे कुणा एका कडून होणारे काम नाही सर्वांनी थोडा थोडा हातभार लावावा. माहितगार ०८:२१, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)

सदस्य:Vagobot ला bot flag

संपादन

सदस्य:Vagobot ला bot flag देता येईल का? हा एक सांगकाम्या आहे व अलीकडील बदल हे पान या सांगकाम्याच्या बदलांने भरलेले असते.

कॉपीराईट आणि प्रयोजन विषयक आव्हाने

संपादन

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा विश्वकोश सिडॅकच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याचे दिसते.या त्यांच्या प्रगतीचे मनःपुर्वक स्वागतच करावयास हवे.अर्थात हे स्वागत करताना या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल हे शब्द जिथ पर्यंत कॉपीराइटचा संबंध आहे तिथ निव्वळ बिनउपयोगाचे आहेत हे सर्व मराठी विकिपीडियन्सनी पक्के ध्यानात ठेवावयास हवे. जिथे कॉपीराईटचा संबंध आहे तिथे कॉपीराइट © २०११ --- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित हे वाक्यच कायदेशीर दृष्ट्या प्रभावी आहे. सोयीचे तर आहे शासनाची मोफत योजना तर आहे असा दृष्टीकोण बाळगणे अत्यंत रिस्की आहे. महाराष्ट्राचा अलिकडील राजकीय इतिहास लोकांच्या भावना विवीधकारणानी सोयीस्करपणे भडकतात आणि लोकशाहीभिमूख( कि दबणारी) शासनव्यवस्था सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीत कुठेही मागे राहात नाही असा इतिहास आहे.अशा परिस्थितीत नको असलेलेली मांडणी मराठी विकिपीडियावर आढळली आणि घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कारवाईचे मार्ग उपलब्ध नसल्यास आपल्या संपादकांकडून कळत न कळत झालेली कॉपीराईट उल्लंघने शासकीय बाबूंना आयते कोलीत उपलब्ध करून देणारच नाहीत असे नाही. असे होईलच असे नाही पण काळजी घेतेलेली बरी.

आंतरजालावरील इतरत्रच्या मजकुरावर व्यक्तीगतता, विशेषण आणि वार्तांकन शब्द वगळून मजकुर विकिशैलीत आणणे आणि कोपीराईट चे प्रश्न निवळणे थोडे सोपे आहे ; मंडळाच्या विश्वकोशाचे तसे नाही त्यातील विवीध प्रकरणे आणि परिच्छेद वेगवेगळ्या तज्ञ लेखकांच्या व्यक्तिगत लेखन शैली त्याच वेळी त्यांच्या लेखनाचे स्वरूपात अलंकारीतता कमी असल्यामुळे केवळ काही शब्द वगलून किंवा बदलून कॉपीराईटचा प्रश्न सुटण्याची शक्यता फार कमी असेल.विकिसदस्यांना स्वभाषेत लेखन करून केवळ संदर्भदेण्या पुरता मडळाच्या विश्वकोशाचा उपयोग करावा हे अधिक उचीत असेल

कॉपीराईट, मराठी विश्वकोश व मराठी विकिपीडियाची भूमिका

संपादन

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशाचे संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून जगास मोफत अर्पण झाले आहेत., असे त्यांच्या संकेत स्थळावर जाहीर झाले आहे. हि खरे तर मराठी विकिपीडिया साठी पर्वणीच समजायला हवी. आधीच कोणत्याही ज्ञान शाखेचे मराठीत उपलब्ध असलेले साहित्य तुटपुंजे आहे. त्यातच Digital स्वरूपातील माहितीचा पूर्ण अभाव. अशा स्थितीत केवळ तळाशी दिलेल्या त्यांच्या कॉपीराईट नोंदीला घाबरून , या खजिन्याकडे दुर्लक्ष्य करणे हे करंटे पणाचे ठरेल. उलट या बाबतीत विकिपीडियनस नी थोडा Practical दृष्टीकोन ठेऊन , त्यातील माहितीत थोडी भर घालून, थोडे बदल करून, माहिती अद्ययावत करून , recycled स्वरूपात विकिपीडियावर कशी आणता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्याक्ष्या विजयाताई वाड या अत्यंत सकारात्मक भूमिका असलेल्या विदुषी आहेत. व महाराष्ट्र शासनाची यातली भूमिका हि अत्यंत चांगली आहे. म्हणून विकिपीडिया प्रशासकांनी कॉपीराईट विषया बद्दल विश्वकोश निर्मिती मंडलाशी पत्र वा भेटीद्वारे विकिपीडिया व विश्वकोश यांच्यातील सहकार्याची गरज व कॉपीराईट मुक्त करण्याबाबत आग्रह करणे हे जास्त महत्वाचे आहे.

आज वरच्या सर्व भाषेतील विकिपीडियांचा आढावा घेतल्यास स्पष्ट दिसून येते कि ज्या भाषांमधील ज्ञान हे आंतर जालावर Digital स्वरूपात आलेले आहे, त्यांचेच विकिपीडिया जास्त समृध्द व अद्ययावत आहेत. Optical Character recognition , Machine translation , इ. तंत्रा मूळे अत्यंत छोट्या भाषांतील विकिपीडिया हे मराठी विकिपीडिया च्या कित्येक पट पुढे आहेत. याचाच स्पष्ट अर्थ असा कि उपलब्ध माहितीचेच येथे recycling होत असते. मराठीत यांचाही अभाव आहेच. म्हणूनच मराठी विकिपीडिया प्रशासकांनी येथे थोडी Proactive भूमिका घेऊन मराठी विकिपीडिया ची केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक वाढ कशी होईल याकडे जास्त लक्ष्य द्यावे. अन्यथा जी अवस्था मराठी विश्वकोशाची झाली , तीच मराठी विकिपीडिया ची हि होईल. Girish2k ०८:५९, १ नोव्हेंबर २०११ (UTC)


>>महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशाचे संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून जगास मोफत अर्पण झाले आहेत.,

मोफत आहेत मुक्त नव्हे हे येथे अधोरेखीत करणे महत्वाचे आहे.सरकारचे असंख्य प्रकल्प अर्पण होत असतात याचा अर्थ सरकारचा त्यावरचा अधिकार संपला असा होत नाही.मोफत उपलब्ध होणे ही मराठी जनांच्या दृष्टीने उपयोगी गोष्ट आहे पण 'अर्पण होणे' हे व्यावहारीक उपयूक्तता नसलेला (फसवे?) शब्द आहे.

>> हि खरे तर मराठी विकिपीडिया साठी पर्वणीच समजायला हवी.

संदर्भ मूल्य चांगल आहे पण कॉपी-पेस्ट करण्यास अद्यापतरी कायद्याचा आडथळा कायम आहे.

>>तळाशी दिलेल्या त्यांच्या कॉपीराईट नोंदीला ...

विकिमीडिया फाऊंडेशन आणि विकिपीडिया संस्कृती सर्वंकश पद्धतीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन टाळण्यावर भर देते. प्रश्न केवळ घाबरण्याचा नाही कायद्याच्या पालनाचा आहे . विकिपीडिया , मराठी विकिपीडिया त्याची उपयूक्तता कॉपीराईट फ्री असण्याचे फायदे आणि कॉपीराईट फ्री नको असणे याची व्यवस्थीत कल्पना संबधित प्रकल्पाचे संगणीकरण सल्लागार मार्गदर्शन: माननीय श्री. माधव शिरवळकर – सदस्य, विश्वकोश मंडळ . माननीय श्री. महेश कुलकर्णी – सहायक निर्देशक व विभाग प्रमुख, सी-डॅक जिस्ट, पुणे. यांना आहे शिवाय मंडळातील इतरही काही मडळींना याची कल्पना आहे तरी सुद्धा त्यांनी कॉपीराईटचा केलेला उल्लेख स-उद्देश आहे हे ओघानेच येते.

>>महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्याक्ष्या विजयाताई वाड या अत्यंत सकारात्मक भूमिका असलेल्या विदुषी आहेत. व महाराष्ट्र शासनाची यातली भूमिका हि अत्यंत चांगली आहे.

भूमिकेच्या सकारात्मकते बद्दल किंवा चांगली असण्या बद्दल वाद नाही. ती कॉपीराईट मुक्त करणारी आहे का ? तर सध्यातरी याचे उत्तर नकारात्मक आहे.

>> म्हणून विकिपीडिया प्रशासकांनी कॉपीराईट विषया बद्दल विश्वकोश निर्मिती मंडलाशी पत्र वा भेटीद्वारे विकिपीडिया व विश्वकोश यांच्यातील सहकार्याची गरज व कॉपीराईट मुक्त करण्याबाबत आग्रह करणे हे जास्त महत्वाचे आहे.

असे करण्यास माझा विरोध नाही पाठींबा सुद्धा आहे. (पण महाराष्ट्र शासन त्यास कॉपीराईट फ्री करत नाही तो पर्यंत सरसकट कॉपी पेस्टींग ला माझा विरोधच आहे. संदर्भा करता उपयोगी आहे हे खरे. संदर्भ देणे आणि कॉपी पेस्टींग मधला फरक कृपया सर्व विकिपीडियन्स नी समजून घेणे महत्वाचे आहे .)

>>Optical Character recognition , Machine translation

या गोष्टींचाही मी खंदा समर्थक आहे

>> म्हणूनच मराठी विकिपीडिया प्रशासकांनी येथे थोडी Proactive भूमिका घेऊन मराठी विकिपीडिया ची केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक वाढ कशी होईल याकडे जास्त लक्ष्य द्यावे. अन्यथा जी अवस्था मराठी विश्वकोशाची झाली , तीच मराठी विकिपीडिया ची हि होईल.

हा मुद्दा चर्चेस अयोग्य आहे असे नाही पण कॉपीराईटच्या मुख्य मुद्द्याचे विषयांतर होऊ नये म्हणून या क्षणी टाळतो आहे
माहितगार ०९:३२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रताधिकार उल्लंघन कटाक्षाने टाळावे

संपादन

खरे आहे. "कॉपीराइट © २०११ --- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित " असे वाक्य असणे प्रताधिकार कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण त्या खंडांसाठी विश्वकोश मंडळाच्या तज्ज्ञांनी मेहनत घेतली असून महाराष्ट्र शासनाने (व संलग्न संस्थांनी/महामंडळांनी) आर्थिक पाठबळ पुरवले; त्यातून त्या खंडांतील आशय निर्मिला गेला आहे. त्यामुळे त्या मेहनतीवर प्रकाशनाचे अधिकार व प्रताधिकार असलेल्या संस्थांशिवाय अन्य कुणाचाही कायदेशीर हक्क शाबीत होऊ शकत नाही. त्यामुळे मराठी विश्वकोशातील लेखांतला मजकूर मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्ट मारून प्रताधिकार उल्लंघू नये. तसे कारणे कायद्याचा, तसेच विकिपीडिया धोरणांचा भंग ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०९, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

मुखपृष्ठ सदर लेख

संपादन

"मुखपृष्ठ सदर लेख" या विषयावर मागे भरपूर चर्चा झाली पण निर्णय काही झालेला दिसत नाही. कॉरल समुद्राची लढाई हा लेख १ मे पासून तेथे आहे. आज त्याला ६ महिने होऊन गेले. या संदर्भात मी दिलेल्या अनेक सूचना फारश्या कोणी मनावर घेतलेल्या दिसत नाहीत. माझी आता अगदी छोटी सूचना - जर हा लेख बदलणार नसाल तर " मासिक सदर" हे नाव बदलून "वार्षिक सदर" केले तर योग्य होईल..... मंदार कुलकर्णी १६:३३, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

सहसा मुखपृष्ठ सदर १ तारखेस बदलले जाते. त्याप्रमाणे मी आज बदलले आहे. अर्थात अजून माझी १ तारीखच आहे :-)
अभय नातू १६:३८, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

अतिशय समकालीन अशा विषयावरचा मुखपृष्ठलेख पाहून आनंद वाटला. या लेखाच्या इतिहासात नाव नोंदले गेलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा आजच्या आणि उद्याच्या दृष्टीने महत्वाचे असे विषय निवडावेत तयार करावेत आणि मुखपृष्ठ लेख म्हणून झळकवावेत, त्यासाठी योगदानास तयार. येथेच विषयाची चर्चा सुरु करता येईल. चला डिसेंबर ११ चा मुखपृष्ठलेख असा कोणता असावा? - मनोज १०:०३, २ नोव्हेंबर २०११ (UTC) ता. क. (आज थ्रीजी या लेखाची सुरवात केली आहे)

मनोज,
विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे चक्कर टाकून निर्देशित लेखांची यादी पहा, असलेल्या लेखांत सुधारणा करा आणि वाटल्यास नवीन लेखही सुचवा.
सदर करण्यासाठी शक्यतो त्या त्या महिन्याला संबंधित असे लेख करण्याचा आपला प्रयत्न असतो - उदा - नोव्हेंबर - विंडोझ - सर्वप्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. मे - कारगिल युद्ध - विजयदिन, बराक ओबामा - फेब्रुवारी - पदग्रहण. इ.
अभय नातू १७:४२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट साचा करून हवा आहे.

संपादन

माहितीचौकट साचा अवयवाची माहिती (Infobox Anatomy) सारखा तयार करून पाहिजे आहे. हा विविध अवयवांकरिता वापरता येईल. कोणी तज्ञ सदस्याने तयार केल्यास विविध अवयवांच्या लेखात वापरता येईल. सचिन १५:४७, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)

सचिन, साच्यात काय काय माहिती देण्यासाठी पॅरामीटर लागतील, याविषयी कृपया लिहाल काय ? त्यावरून अपेक्षित स्वरूपाची कल्पना येईल. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:१२, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
माहिती देण्यासाठी पॅरामीटर अपेक्षित आहेत. शीर्षनाव, विकी कॉमन्स वरील चित्र, लॅटिन नाव, ग्रे'ज अँनॅटॉमी यासंदर्भातील क्रमांक,1 एंब्रिऑलिजिकल उदय स्थान, शरीरसंस्था, शरीर शास्त्रातील स्थान, रक्तपुरवठा- रोहिणी, नीला, मज्जासंस्था पुरवठा, लिंफ, एन.आय.एच. संकेतस्थळावरील Medical Subject Headings, डॉरलँड क्रमांक सचिन ०२:०७, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)

चावडीवर समद्याना टिप्याचा भौ भौ

My bot is blocked on this wiki. There is a notice on the talk page that i should contact an admin on this page.

So perhaps you could give me a link to the edit where you think that my bot was wrong. Then i could check this and explain the change.

The last edit was [१]. This was not a autonomous edit but a manual decision by myself. You can read the dicussion that resulted in this edit at de:Benutzer_Diskussion:Merlissimo#Your_bot_in_ruwiki. There is a big interwiki conflict on this page. The problem is that the page does not contain any content, so it was unable to decide which interwikis could be correct. Please read my german talk page and decide which interwiki group is the correct one for this article. Then i can add the mr article to this group globally. Merlissimo २३:३८, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

Hello,
Thanks for your message on my user talk. The edit in question was an article from which your bot removed *all* interwiki links. I understand that different translations of a word can have different meanings and hence multiple candidate target pages in other wikis. At the same time, there is no 100% guaranteed way that these conflicts can be resolved.
As to your request, I believe that enwiki interwiki links are the most reliable when linking to/from w:mr.
Regardless of this, I strongly discourage removing *all* interwiki links from a page. I'd like for you(r bot) to leave such articles alone. If at all possible, we would like to see a periodic list of such conflicts that you bot may have encountered over the last few days. Local editors can subsequently take action on these pages.
Your block was temporary and should have been removed at this time. I will reinstate your bot flag after a few blocks of edits.
Thanks for your understanding and co-operation.
अभय नातू ०५:३१, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)
w:mr sysop, bureaucrat
Just a note: If you would like to know why my bot changed something in autonomous mode you can visit tools:merliwbot/editinfo (this will not work for manual edits like above)
E.g. if you want to know why my bot removed so many interwikis on http://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=849567 just paste this link to the formular. This returns the logfile for this edit: tools:merliwbot/editinfo/uuid/4b5442a0-0f27-11e1-94b0-001b24e0442e#0
As you can read my bot solved an interwiki conflict. The bot removed interwikis from mr:अभिजात यामिकी because mr:अभिजात यामिक already contains the same interwikis. Merlissimo १०:५५, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)

वादनिवारण चावडी

संपादन

मंडळी, काही वादग्रस्त मुद्द्यांवरील चर्चा चावडीवर प्रदीर्घ काळ लांबल्याने चावडीवरील अन्य चर्चा व मुद्दे काहीसे मागे पडत आहेत. तसेच वादांचे निवारण ही काहीशी संथ गतीने चालणारी प्रक्रिया असल्याने असे विषय चावडीवर प्रदीर्घ काळ तसेच राहू देण्यामुळे विकिसमुदायाच्या मनांत गोंधळ उपजू शकतो. या कारणांमुळे विकिपीडिया:चावडी/वादनिवारण हे नवीन पान बनवून येथील वादग्रस्त चर्चा तेथे हलवल्या आहेत. सर्व सदस्यांनी वादांबद्दल उहापोह करण्यासाठी, नवीन वादग्रस्त मुद्दे मांडण्यासाठी इथून पुढे या पानाचा वापर करावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५५, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रचालकत्वासाठी दोन नवे प्रस्ताव

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मंदार कुलकर्णी यांनाराहुल देशमुख यांना प्रचालकत्व देण्यासाठी दोन प्रस्ताव मांडले आहेत. कृपया सदस्यांनी लवकरात लवकर कौल द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४७, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

नवीन बॉट (सांगकामे)

संपादन

नमस्कार, मी Narayanbot1 या नावाने बॉट (सांगकाम्या) थोडा थोडा वापरायला आज सुरुवात केली आहे आणि AWB मधून छोटे छोटे बदल करायचा प्रयत्न करीत आहे. काही चूक झाली झाली तर मोठ्या मनाने पोटात घालून त्या संदर्भात मार्गदर्शन करावे ही विनंती. तांत्रिक चावडी वरील लिखाणाप्रमाणे (सांगकाम्या चालविणार्‍या सदस्याने पहिले काही बदल हाताने तपासून पाहिले पाहिजेत इ.) हे समजून आणि पाळून काम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे ..... मंदार कुलकर्णी १८:५८, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रचालक?

संपादन

मराठी विकिपिडीयावर नवीन प्रचालकासाठी काही प्रस्ताव अलीकडेच संकल्प द्रविड यांनी विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मांडले होते. असे वाटते की याठिकाणी प्रस्तावाच्या बाजूने वा विरोधात अन्य सदस्यांकडून कौल घेतला जात असावा व हा कौल पाहून त्या प्रस्तावावर निर्णय घेतला जात असावा. सदस्यांनी दिलेला कौल मग तो प्रस्तावाच्या बाजूने असो वा विरोधात कदापिही या पानावरून वगळला जाऊ नये. या पानावर मी अलीकडेच अभिजीत साठे यांच्या प्रचालकपदाच्या बाजूने समर्थनार्थ कौल नोंदवला होता. (पहा) पण कुणीतरी प्रचालकानेच मी दिलेला कौल नंतर वगळून टाकला.(पहा) असे करण्यामागे सदर प्रचालकांचा हेतू समजण्यापलिकडे आहे. कौल जर वगळायचेच असतील तर कौल घेण्याचा हा खटाटोप कशासाठी? याचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. दुसरे असे नमूद करतो की मराठी विपीवर तसेही वादांना उधाण आलेले आहेच त्यामुळे सदर कृती एका प्रचालकाने केली असल्याने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अधिकार प्रचालकांना व इतर सदस्यांना नाही (असे मी मानतो). तरी मराठी विकिपिडीयाच्या प्रशासकांनीच याचे उत्तर ज्या कोणी प्रचालकाने ही कृती केली आहे त्यांच्याशी चर्चा (अर्थातच त्यांच्या चर्चा पानावर) करून द्यावे अशी माफक अपेक्षा. संतोष दहिवळ ०८:१०, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रिय संतोष, अहो बहुतेक माझ्या कडूनच (अगदी) चुकून बटन दाबले गेले असावे असे मला वाटते. In fact मीच तुम्हाला विचारणार होतो कि तुम्ही समर्थन दिलेले उलटले कसे? माझ्या कडूनच ही गडबड झाली आहे त्याबद्दल क्षमस्व.... मी परत ते उलटवले आहे. गैरसमज नको म्हणून लगेच कळवले. कळावे लोभ असावा.... मंदार कुलकर्णी ०९:०३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा

संपादन
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत बर्‍याच सदस्यांनी वेळोवेळी मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात सर्व सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०४:५८, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

history of marathi newspapers

संपादन

hello,every one i want a pdf books related to above subject and also wikepedia information regarding the subject,how can i get it? pls help me thank u in advance.

कृपया दर्पण (वृत्तपत्र) आणि वर्ग:वृत्तपत्रे पहावा

नमस्कार चावडी/जुनी चर्चा ३७,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.




हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

नवीन मुखपृष्ठ मथळा

संपादन

नमस्कार,

मुखपृष्ठात थोडेसे नावीन्य यावे म्हणून तेथील मथळा बदलण्याचा मी प्रस्ताव मांडीत आहे. सध्याचा सुस्वागतम् हा साचा काढून त्याच्याऐवजी थोडा मोठा पण सुटसुटीत आणि अधिक माहिती, दुवे असलेला मजकूर घालावा असा विचार आहे.

सुस्वागतम् साचा काढून त्याजागी विकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठमथळा हा नवीन पान वजा साचा घालावा. हा मथळा कसा दिसेल हे खाली दाखवलेले आहे. हा बदल केला असता मुखपृष्ठ साधारण कसे दिसेल हे धूळपाटी/मुखपृष्ठ येथे पहा. अर्थात इच्छित बदल फक्त वरच्या पट्टीत आहेत.


मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ९८,४९३ लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
वाचा

  सर्व पाने   मुखपृष्ठ सदरे
  उदयोन्मुख सदरे
  विकिप्रकल्प   मोबाईल ?

लिहा
 कसे लिहू

  काय लिहू
  इतर काय लिहीताहेत

घडवा

  चावडीवर चर्चा करा
  पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
  विविध प्रस्तावांवर कौल द्या

या पट्टीमध्ये आत्ता असलेली माहिती तर आहेच, याशिवाय --

  • बोधवाक्य
  • तीन वेगवेगळे रकाने
  • वाचा - येथे आपली मोठी दालने, वर्ग, इ. घालावे. मासल्यादाखल ४-५ दुवे दिलेले आहेत. गरज वाटल्यास ते बदलावे.
  • लिहा - येथे नवीन लेखकांना मराठी टंकण्यासाठीची मदत तसेच अपेक्षित पानांकडे हलकेच वळवण्यासाठीचा दुवा आणि अलीकडील बदल याकडेही दुवा दिलेला आहे.
  • घडवा - येथे वाचकांना मराठी विकिपीडियावरील धोरणे, कौल, इ बद्दल मते देण्यासाठी दुवे दिलेले आहेत.

आशा आहे तुम्हाला हा प्रस्ताव मान्य होईल आणि पुढील काही दिवसांतच आपण मुखपृष्ठावर बदल करू शकू.

अभय नातू ०१:२९, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)

  पाठिंबा- माझे संपूर्ण समर्थन आहे. - Mvkulkarni23


कल्पना आणि रचना छान आहे

माहितगार ०३:०३, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)

नवीन मांडणी आवडली. मुखपृष्ठ ताजतवानं वाटतं. मला layout मध्ये काही बदल करावेसे वाटले जे मी विकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठमथळा मध्ये केले. बदल बघण्यासाठी माझी आवृत्ती पहावी.
या मध्ये जर आपण {{Index}} हा साचा टाकला (जो मुखपृष्ठाच्या अगदी शेवटी आहे) तर लेख शोधणे (व लेख चाळणे) अधिक सोईस्कर होईल. - प्रबोध (चर्चा) १३:१६, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)
  पाठिंबा- Conceptually I totally agree, but सध्याचा धूळपाटीवरचा लेआऊट अधिक चांगला करता येईल, नव्हे, तो करावाच.... - Kaajawa


नवीन मुखपृष्ठ मथळा घातला

संपादन

नमस्कार,

तुमच्या पाठिंबादर्शक सूचनांनंतर मी मथळा बदलला आहे. वरीलपैकी काही सूचनांना उत्तरे --

१. माहितगार/बोधवाक्य -- आपण काही महिन्यांपूर्वी चर्चा करुन हे बोधवाक्य निवडले होते म्हणून ते आत्ता घातले आहे. यावर पुन्हा चर्चा करणेसाठी खाली नवीन विभाग करीत आहे. त्या चर्चेतून असे ठरले की बोधवाक्य बदलावे, तर मथळ्यातही बदल करता येतील.

२. प्रबोध/Index -- मला वाटते इंडेक्स घातल्याने हा मथळा वाजवीपेक्षा मोठा होईल. पण तरी प्रयोग करुन बघतो. तुम्हीपण योग्य ते बदल करुन पहा. जो चांगला वाटेल तो घेउया.

२. काजवा/धूळपाटीवरील लेआउट -- एकदम सगळे मुखपृष्ठ बदलण्यापेक्षा असे विभागवार बदल केले तर? अशाने प्रत्येक विभागवर विस्तृत पण फोकस्ड चर्चा होईल आणि चांगले निर्णय घेतले जातील असे वाटते. हे बदल करताना थीम सोडून बदल होणार नाहीत याची काळजी घेतली की झाले. तुमचे मत कळवावे.

अभय नातू ०१:५३, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)

मी विकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठमथळा मध्ये बदल केला आहे. त्या मध्ये विकिपीडिया:धूळपाटी/Index टाकला आहे. - प्रबोध (चर्चा) १२:५१, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)
धन्यवाद. मला वाटते की दोन ओळींमध्ये अनुक्रमणिका घातल्यामुळे जागा जास्त वापरली जात आहे. त्याऐवजी एकाच ओळीत हे करता आले तर बरे.
तुम्ही थेट साच्यात बदल केल्याने ते मुखपृष्ठावर दिसत आहेत. ते तात्पुरते तेथून धूळपाटीवर हलवीत आहे. नेमके स्वरूप ठरले की मग मुखपृष्ठावर प्रकाशित करू.
दोन options -- धूळपाटी/मुखपृष्ठ आणि धूळपाटी/मुखपृष्ठ२
अभय नातू ०१:२६, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)
धूळपाटी/मुखपृष्ठ आणि धूळपाटी/मुखपृष्ठ२ मध्ये बदल केले आहेत. कृपया पाहावेत. - प्रबोध (चर्चा) १५:४०, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)
अप्रतीम!!! माझ्याही डोक्यात असेच काहीतरी होते, पण htmlचे जास्त ज्ञान नसल्याने करणे जमत नव्हते :(. एक सूचना - "आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन." याला "संतवचनांप्रमाणे" लिहिले - "आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे| शहाणे करोनी सोडावे, सकलजन||" तर.... Kaajawa १४:५९, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
मराठी विपीचे बोधवाक्य अजून विचाराधीन आहे. आपण ती चर्चा येथे बघू शकता. - प्रबोध (चर्चा) १८:२७, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

महिला टेनिस खेळाडू

संपादन

ही चर्चा वादनिवारण चावडीवर हलवावी?

संपादन

ही चर्चा विकिपीडियाबद्दल न राहता कसे बोलावे, कसे वागावे, कसे प्रतिसाद द्यावे याकडे झुकत चाललेली आहे तरी ती विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवावी असे माझे मत आहे.

अभय नातू ०४:१०, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

संबंधित सर्व चर्चा वादनिवारण पानावर हलवली आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:३६, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

बोधवाक्य

संपादन
  • बोधवाक्य :आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
हे वाक्य मला स्वतःला धरून मोठ्यासंख्येतील मराठी विकिपीडियन्सना प्रेरणादायी लोकप्रीय असल तरी या वाक्यातील एकतर शहाणे करोनी सोडावे, सकलजन. हा भाग नवागतांचे विकिलेखन संकेताबद्दल मोठा गैरसमज निर्माण करणारा ठरतो कारण नवागत मंडळी स्वतःची व्यक्तिगत मते/दृष्तीकोण मांडू लागतील जे विकिसंकेतांना धरून नाही.
विकिपीड़ीया मुल्य 'प्रत्येक व्यक्तिकडे काहीना काही ज्ञान आहे आणि प्रत्येक वाचकास विवेक आहे यावर विश्वास ठेवते' आणि हि मुल्य शहाणे करोनी सोडावे, सकलजन. ने जो उत्साह निर्माण होतो त्यास मुरडतर घालत नाहीत ना या बद्दल मी साशंक आहे.कारण स्वामीजींनी ज्या परिस्थितीत हे लिहिल तेव्हा त्यांचा उद्देश केवल ज्ञान आणि माहितिच नाही तर विवेक वाटण्याचही असाव त्यात काही चुकीच आहे अस नाही ,पण विकिपीडियाची मर्यादा अशी की आपण ज्ञान आणि माहिती उपलब्ध करून देण्या पर्यंत थांबतो सोबत विवेक उपलब्ध करत नाही (वाचकांना विवेक उपजत असतोच असे गृहीत धरतो) म्हणून विकिपीडियाच्या संपादकाची व्यक्तिगत मते उपदेश स्विकार्ह होत नाहीत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे एवढाच भाग घ्यावा म्हटले तर नवागत ब्लॉगटाईप लेखन चालू करतील. अशी काळजी वाटते.
हे बोधवाक्य खूप जास्त भाषण स्वातंत्र्य देणार आहे कि जेवढ प्रत्यक्षात आपण विकिपीडियावर देत नाही,एकुण विकिपीडिया परिघाच्या मर्यादा लक्षात आणून देण्यास कुठेतरी मागे रहात
दुसरेतर असंख्य नवागत सर्व लेखन संकेत पानांचे वाचन पण करत नाहीत सरळ लेखनास चालू करतात.नवागत उत्साहात मर्जीप्रमाणे लेखन चालू करणार आणि नंतर पोलिसी थाटात जुनी मंडळी त्यांना मोडता घालणार म्हणजे आधी बोलवा आणि नंतर हाणा असे होणार नाही या संदर्भाने दक्षता घेण्याच्या दृष्टीने "आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; 'शहाणे करोनी सोडावे, सकलजन. हे मराठी विकिपीडियाचे बोध वाक्य म्हणून जसेच्या तसे न स्विकारता अधिक विचार करून त्यावरच आधारीत विकिमुल्यांची कल्पना अधिक व्यवस्थीत देणारे बोधवाक्याचा शोध घ्यावा अथवा विचार विमर्श करावा असे माझे मत आहे.माहितगार ०३:०३, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)

चावडीवर विवीढ माहितीपर लेखन वाढले आहे त्यास दंडीत करण्यापेक्षा बोधवाक्यात बदलकरण्या बद्दल माझे अजूनही कळकळीचे आवाहन आहे.माहितगार ००:२८, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

नमस्कार माहितगार,
सद्य बोधवाक्य न-वापरण्यामागचे तुमचे तर्क पटतात. जिमी वेल्स यांचे एक विकिपीडिया बद्दल एक वाक्य माझ्या वाचनात आले होते, परंतु ते मला आठवत नाही व सापडत नाही आहे. ते शोधून त्याचे मराठीत भाषांतर केल्यास कसे? - प्रबोध (चर्चा) ०६:१६, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियाचा झेंडा - मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये......

संपादन

  नमस्कार.... मराठी विकिपीडियाचा झेंडा मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फडकला. त्या करता ज्या ज्या मंडळींचे सहाय्य झाले त्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद. कार्यकर्त्यांचा उत्साह, विकिकॉन्फरन्सला आलेल्या मंडळींची आपल्या कार्यक्रमांना लावलेली संपूर्ण वेळ हजेरी, रविवार सकाळ असून फोर्ट मध्ये येऊन "मराठी" च्या चर्चासत्राला आलेली प्रेक्षक मंडळी, रात्र रात्र जागून केलेली प्रेझेन्टेशन्स, प्रेक्षकांनी आणि विशेषत: पत्रकार मंडळींनी त्यांतून निवडक गोष्टी वेचून केलेले उत्कृष्ठ वार्तांकन आणि बातम्या. फारच अलौकिक योग जुळून आला. या बरोबरच मराठी विकिपिडीयावरील तसेच भारतातील विविध भाषातील जसे संस्कृत, ओडिसी, तेलगु आणि इतर भाषांमधील मंडळींशी झालेल्या चर्चा आणि मनमोकळ्या गप्पा.... आम्हाला असे वाटते की ही विकिकॉन्फरन्स मराठी विकिपीडियासाठी एक Turning Point ठरण्यासारखी झाली आहे. या निमित्ताने आपण सारेजण पुन्हा एकत्र येऊन मराठी विकिपीडियाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करूया.... - मंदार, राहुल, माहितगार, सुधन्वा, सागर आणि अनेक मराठी विकिपीडियंस.

मी कोण आहे ?

संपादन

तळ्यात पाणि वाढले तर त्यात खळखळाट अधिक जोरात ऐकु येण्याचा संभव असतो,पण फळांनी लगडलेला वृक्ष नम्रतेने खाली झुकतो ; अनुभवाची समृद्धी वाढताना आपण (उथळ) तळ्या प्रमाणे खळखळाट करावा का फळांनी लगडलेल्या वृक्षाचे उदाहरण अनुसरावे हे ज्या त्या प्राण्याने स्वतः ठरवायचे असते. आपल नेतृत्व उथळ पाणी असलेल्या तळ्यास सुपूर्त करावयाच का फळांनी लगडल्यानंतर फळांच्या वजनाने नम्र होणारा वृक्षवत व्यक्तिकडे नेतृत्व सोपवायच याच भान मानवी मनांनी ठेवाव त्यामुळे समुहाच्या समृद्धीचा मार्ग अधिक आश्वस्त होतो परमहंस ०४:०१, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)

साचा - कायदा, शिक्षण,

संपादन

कायदा या विषयावर साचा हवा आहे. त्यात विविध कायद्याची थोडक्यात माहिती देता येईल. साचा:कायदे , साचा:माहितीचौकट कायदा.

इंग्रजी विकिपीडियावर शोधून अनुवादीत व जरूरी नुसार स्थानिकीकरण करावे.आंतरजालावरील अनुपलब्धता पहाता कायदा विषयक माहिती प्राधान्याने उपलब्ध करणे गरजेचे आहे , मी सध्या व्यस्त आहे पण जमेल तसे सहाय्य करेन. हे साचे बनवण्यास सहाय्य करावे माहितगार १३:०२, २२ नोव्हेंबर २०११ (UTC)

तसेच शिक्षण या विषयावर साचा असावा असे वाटते. पण त्यात काय असावे, त्याविषयी जास्त विचार करणे गरजेचे आहे.

कार्यशाळा घेऊ शकणारे कार्यकर्ते हवेत

संपादन

नमस्कार, अलिकडे मुंबईत पार पडलेल्या मराठी ट्रॅकबद्दल आपण सर्वांनी वृत्तमाध्यमातून वाचले असेल. मराठी विकिपीडियाबद्दलच्या आकडेवारीचे विश्लेषण आणि फिल्डसर्वेक्षणातून आलेल्या निष्क्रर्षानुसार महाराष्ट्रात मुंबई पुणे आणि इतर सात शहरातून प्रत्य्क्षा कार्यशाळा घेऊन समाजातील विवीधस्तर तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्गाकरीता मराठी विकिपीडिया शिकवण्या घेण्याची गरज आहे.विविध संस्थांकडून आमंत्रणे आणि परवानग्या मिळत आहेत पण एकाच दिवशी एका पेक्षा जास्त ठिकाणी उपस्थितीच्या विनंती येत आहेत माणूस बळ अपूरे पडत आहे. अशा कार्यशाळा घेण्याकरिता करिता मराठी विकिपीडियाच्या जाणत्या चाहत्यांनी मोठ्याप्रमाणावर पुढाकार घेऊन सहकार्य देऊ करावे हि नम्र विनंती माहितगार २१:२३, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कार्यकर्त्यांना मराठी विपीच्या जुन्या-जाणत्यांनी प्रशिक्षण दिल्यास कसे? याने हि खात्री राहील कि सर्व कार्यशाळांमधून सारखे मार्गदर्शन होईल. - प्रबोध (चर्चा) ०६:२३, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

Tamil Wiki Media Contest

संपादन
Tamil Wiki Media Contest
 

Greetings from the Tamil Wiki Community,
We are organising a Media Contest for images/videos/audios related to Tamil, Tamils and Tamil Nadu.

  • Prize Money: Total prize money for the contest is 850 US$. First prize is 200 US $ and there are a total of 9 prizes including three continuous contribution prizes. Certificates will be awarded to prize winners
  • Upload: Files have to be uploaded to Wikimedia commons through the Contest portal using a customised version of the commons upload wizard. Or if you choose to upload directly to commons, the category "TamilWiki Media Contest" has to be added to the files.
  • Dates : Nov 15, 2011 - Feb 29, 2012
  • Themes : Anything related to Tamil and Tamils (more detailed rules here)
  • All files should be uploaders' own work. Copyright expired and PD/CC images of others are not eligible.

We invite you all to participate in the contest. Please spread the word among your friends and share our Facebook page:  

--Sodabottle (talk) 07:28, 24 November 2011 (UTC)


मराठी विकिपीडिया वर भ्रष्टाचार  ?

संपादन

चर्चा वादानिवारण चावडीवर हलवली. - प्रबोध (चर्चा) १०:३३, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

इ.स.च्या पानावरील नोंदी

संपादन

नमस्कार,

इ.सच्या वर्षांसाठी मराठी विकिपीडियावर २-३,००० लेख आहेत. त्यातील बहुसंख्य लेख (मुख्यत्वे इ.स. १५००च्या आधीचे) रिकामेच आहेत. तरी ही पाने निरर्थक राहू नये म्हणून मी प्रत्येक वर्षाच्या पानावर एक तरी नोंद करण्याचा उद्योग गेले काही दिवस चालविला आहे. आजच्या घडीला इ.स. १-इ.स. १०० पर्यंतच्या प्रत्येक पानावर एकतरी नोंद आहे. यासाठी मी इंग्लिश विकिपीडियाचा मोठा आधार घेतलेला आहे.

तरी हेच काम पुढे चालू ठेवण्यात आपली सुद्धा मदत हवी आहे. चार-पाच संपादकांनी रोज एखादे तरी वर्षपान भरल्यास आठ-दहा महिन्यात मराठी विकिपीडियाचा हा पैलू सुद्धा उजळून निघेल अशी आशा.

अभय नातू ०१:४५, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

मी सध्या हे शिकतो आहे

संपादन

उल्लेखनीय विकिमीडियन गौरव इ.स. २०११ (विकिपरिषद भारत इ.स. २०११)

संपादन

मंडळी, मुंबईतील विकिमीडिया इंडिया विकिपरिषदेत "अभय नातू" यांना उल्लेखनीय विकिमीडियन गौरव (इ.स. २०११) लाभला, त्यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! (संदर्भ : NWR 2011 and Jury mention V1.0.pdf) ही घटना सर्व मराठी विकिसमुदायासाठीदेखील अभिनंदनीय आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:१५, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

"अभय नातू" यांचे हार्दिक अभिनंदन!! - प्रबोध (चर्चा) १५:००, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)
अभय नातू ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. गेली तीन वर्षे मी पाहतो आहे, अनेक सदस्य येतात, जातात, कधीकधी येतात. अभय नातू मात्र अविरत कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनेक वेळा प्रचंड वैयक्तिक टीका झाली आहे परंतु ते आपल्या ध्येयावर कायम आहेत... असे अनेक सदस्य येथे येउन मराठी विकिपीडियाची भरभराट व्हावी हीच इच्छा! अभय ह्यांचे मनापासून अभिनंदन!! - Abhijitsathe १६:२२, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)
अभय, २००५ पासून तुम्ही मराठी विकिपीडिया साठी अविरत प्रयत्न करीत आहात त्यासाठी ही फुलाची पाकळी संपूर्ण "विकिपीडिया भारत" समूहाकडून तुम्हाला मिळाली आहे त्याचा विशेष आनंद आहे. ....Mvkulkarni23 १६:४५, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)
@अभय नातू - हार्दिक अभिनंदन!!! & +१ for Abhijitsatheची कॉमेंट. ---Kaajawa १७:५३, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)
अभय, हार्दिक अभिनंदन - कोल्हापुरी १८:२४, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

नमस्कार,

तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि कौतुकाबद्दल शतशः धन्यवाद. हा सन्मान फक्त माझा नसून मराठी विकिपीडियावर काम करणार्‍या सगळ्या संपादकांचा आहे असे मी समजतो आणि यापुढे आपल्यातील अनेक विकिपीडियनांना हा सन्मान प्राप्त होईल अशी आशा करतो.

अभय नातू ०४:४०, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

त्यांचे आणि माझे तीव्र मतभेद झाले आहेत. भविष्यातही ते होणार नाहीत याची काहीही गॅरंटी नाही. तरीही याघडीला या बहुमानाबद्दल अभय नातूंचे अभिनंदन. -मनोज २०:२१, २८ नोव्हेंबर २०११ (UTC)

White Space Problem

संपादन
 

Pls refer screenshot, I opened marathi wikipedia frontpage without logging in, and found that more than 50% for front page is consumed by notices and white spaces... requesting to remove excessive white spaces (marked in screenshot with red numbered rectangles). We can refer en.wikipedia for reference. Kaajawa ०४:२६, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

काही साईट नोटीस मध्ये टेक्स्ट खूप आहे. तो कमीत कमी जागेत बसवण्याकरता दाखवा लपवा साचात नव्या सुटेबल ग्राफीक सपोर्ट सहीत हवे आहे. साईट नोटीस मध्ये जसे अलिकडील बदल मध्ये दाखवा लपवा साचा लावला तसे जमु शकले नव्हते. तांत्रीक सहाय्याअभावी खोळंबले आहेमाहितगार ०४:४३, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)
[विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण/साईटनोटीस/1‎] बघा. तुमच्या बदलांनतर काही बदल केले आहेत (वाक्ये छोटी केलीयेत, आणि साचा:लुप्त टाकलाय....). जर ठीक असेल तर लागू करायला हरकत नसावी. Kaajawa १०:२०, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

चावडी नांव बदलणे बाबत

संपादन

मध्यंतरी पुण्याला अनुवाद दौड साठी आलो होतो तेव्हा चावडी हे नांव बदलण्या बाबत चर्चा ऐकली. मी चावडी या ऐवजी गप्पागोष्टी किंवा पंचायत हा शब्द सुचवतो. पंचायत हा शब्द आपण नेहमी वापरतो जसे तुला काय पंचायत आहे. ग्रामपंचायत व पंचायतराज मध्ये सार्वजनिक चर्चा करुन निर्णय घेणे हे अभिप्रेत आहे. प्राचीन काळी पंचपरमेश्वर ही कल्पना सर्व भारतात लागु होती. आजही काही ठिकाणी जसे खाप पंचायत आदि लागु आहे. त्यामुळे पंचायत हा शब्द आपण स्वीकारु शकता.

हल्ली मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे.

संपादन

हल्ली मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे. ही अशुद्ध भाषाच शुद्ध मानली जात आहे. उदाहरण: कांदा भेटला नाही, आज दादरला राडा झाला,.. कृपया अशुद्ध मराठी शब्दांची आणि भाषेच्या वापराची लिस्ट बनवावी. ह्यामुळे वाचकांना शुद्ध आणि अशुध्द मराठी भाषेमाधला फरक कळेल आणि भाषा शुद्ध राहील.


माफ करा पण मराठी भाषा ही बदलत चालली आहे. तशी ती दर पीढीसोबत बदलतच असते. आज जी शुद्ध भाषा आपण म्हणता तिलाही साठ वर्षांपूर्वी अशुद्ध म्हणून नावे ठेवली गेलीच होती. मुळात भाषेत शुद्ध अशुद्ध ::असे काही नसते. प्रमाण भाषा असते, तीही बदलती असते. एवढे खरे की प्रमाण भाषेचा शब्दांची एक सूची मात्र असला पाहिजे (जसा इंग्लिशमध्ये ऑक्सफर्ड शब्दकोष आहे) आणि दर एक ते पाच वर्षांनी तिचा रिव्ह्यू घेऊन भर घालण्याचे काम केले पाहिजे.-मनोज १९:५५, २८ नोव्हेंबर २०११ (UTC)

चावडी Archival

संपादन

चावडीचे सद्य पान कूप मोठे झाले आहे. त्याला archive[मराठी शब्द सुचवा] करता येईल का? आणि archival साठी एखादा नियम लावता येईल का? उदा. ३० अथवा ४० बिंदू नंतर archive करते ई. - प्रबोध (चर्चा) ०५:१२, १ डिसेंबर २०११ (UTC)