विकिपीडिया:काय लिहू

Poet Jaywant Jadhav is known as a talented poet and famous storyteller from Maharashtra. He was born on June 1. In the year 75, village Kovad to Chandgad taluka district Kolhapur, he is a teacher by profession

    His two collections of poems Horpal (2016) and Kahur (2018) are famous.  His stories are being published in the collection "Kaul".  His essays, poems, children's poems, cartoons, pictures have been published in the popular newspaper Patra Tarun Bharat and in the Diwali issue of Lokmat Punyanagari Sakal.  Many of his Vatratikas have become known as "Marmik Those" in Diwali issues.  A separate collection of them is being published under the title "Marmik Those".
    He is a great painter and some of his cartoons have been published in various issues and on social media.
     He has presented his poetry on many platforms like Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Baroda, Marathi Sahitya Sammelan Kadoli, Annabhau Sathe Sahitya Sammelan Belgaum, Marathi Sahitya Sammelan Belgundi.


http://jayvantjadhav.blogspot.com/

Story-2

https://jayvantjadhav.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE
Poetry
https://jayvantjadhav.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE
Children's poetry
https://jayvantjadhav.blogspot.com/search/label/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF  % E0% A4% A4% E0% A4% BE
वात्रटिका🙂👇🏽
https://jayvantjadhav.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9F  % E0% A4% BF% E0% A4% 95% E0% A4% BE
Visit the blog above.  Don't forget to comment and share after reading stories, poems, children's poems and commentaries ..!
😊😊😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

कवी जयवंत जाधव हे एक महाराष्ट्रातील एक प्रतिभाशाली कवी आणि प्रसिद्ध कथाकार म्हणून परिचित आहेत . त्यांचा जन्म एक जून एको . पंच्याहत्तर साली गाव कोवाड ता चंदगड जि. कोल्हापूर येथे झाला असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत

   त्यांचे होरपळ ( २०१६ ) व काहूर (२०१८ ) हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत . त्यांच्या कथा " कौल " या कथा संग्रहातून प्रसिद्ध होत आहेत . त्यांनी लिहिलेल्या वात्रटिका, कविता बालकविता, व्यंगचित्रे, चित्रे लोकमत पुण्यनगरी सकाळ पुढारी तरुण भारत या लोकप्रिय वर्तमान पत्रातून व दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली आहेत . त्यांच्या वात्रटिका या अनेक दिवाळी अंक, दै .पुढारी यातून " मार्मिक ठोसे " या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत . त्यांचा एक स्वतंत्र संग्रह " मार्मिक ठोसे " नावाने प्रकाशित होत आहे .
   ते एक उत्तम चित्रकार असुन त्यांची कांही व्यंगचित्रेही विविध अंकातून व सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाली आहेत .
    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा, मराठी साहित्य संमेलन कडोली, आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन बेळगाव, मराठी साहित्य संमेलन बेळगुंदी यासारख्या अनेक व्यासपीठावर त्यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले आहे ..
    त्यांनी चंदगड तालुक्याविषयी केलेली एक कविता

(चंदगड तालुका गौरव गीत )

  • गडी चंदगडी*

गाजला चंदगड,सजला चंदगड, मनात चंदगड, जनात चंदगड जिल्ह्यात राज्यात देशात जगात चंदगड गाजतोय हा हरघडी आम्ही चंदगडी गडी चंदगडी

चंदगडी चंदगडी चंदगडी मी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी ॥ धृ ॥

चंदगड नगरीत भव्य मंदिर कलाकुसर आहे किती सुंदर वसला देव रवळनाथ युगंधर

गर्दहिरवी झाडी भोवताली कोदाळीस्थित देवी माऊली भक्तांच्या नवसाला पावली

जागृत दैवत देव वैजनाथ भक्त जमतो इथे गुणगात भक्तांच्या डोईवर सदा हात

भजन किर्तनी रममान वारकरी अध्यात्मिक आम्ही गडी चंदगडी ॥ १ ॥

अंबोलीसम सुंडी धबधबा धवल स्वप्नवत आहे पाँईट स्वप्नवेल महाबळेश्वर सिमलाही इथे फेल

ऐतिहासिक कलानिधीगड स्वराज्यांत गणती गंधर्वगड राजा महिपाळाचा महिपाळगड

नाव मोठे स्वराज्यात पारगडाचे वास्तव्य होते इथे शिवरायांचे वंशज शेलारमामा तानाजीचे


सर्प प्रदर्शनात प्रसिद्ध ढोलगरवाडी स्वातंत्र्यसेनानी,सैनिक हुतात्मे चंदगडी ॥ २ ॥

पश्चिमपट्टा लाललाल माती काळी सुपिक जमीन कर्याती पिकतात धनधान्याचे मोती

तालुक्यात होते वतनदार हेऱ्याचे सांवत इनामदार कोवाडकर देसाई सरकार

ज्यांनी त्यांची जमीन कसली सात बाराला नावे डसली कुळकायद्याने जनता हसली

उताऱ्यासाठी डायरी केली उघडी शेतीने समृद्ध आम्ही गडी चंदगडी ॥ ३ ॥

सीमेला खेटली राज्य दोन शेजारी आहेत जिल्हे तीन सात तालुके आहेत लागून

कोल्हापूर टाईप खुप बंधारे धरणे जंगमहट्टी तिलारी जांबरे कैक ठिकाणी लघु पाटबंधारे

हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी मार्कंडेय तिलारी नदींचे पाणी फिरले इथल्या सुपिक रानोरानी

निसर्ग हवापाणी जगात लै भारी शेतीवाडीत रमतो गडी चंदगडी ॥ ४॥

टपोरे दाणे भाताच्या तुर्‍यात ऊस डोलतो कसा कुऱ्यात असतो एक नंबर उताऱ्यात

वाटाना भुईमूग बिनिस हरभरा प्रसिद्ध सोले दिडघे नि मसुरा मिरची गहू मका नाचना साजरा

इथल्या काजूची चव आगळी पिकली पौष्टीक गोड रताळी कुठे नारळ कुठे पिकते केळी

आंबे फणस करवंदाची झाडी रानमेवा चाखतो गडी चंदगडी ॥ ५ ॥

'ओलम','इको'ला खाजगी सवलत शेतकऱ्यांचाही सहकारी दौलत तिन्ही कारखाने कसे उभे डौलत

शिनोळी हलकर्णी एमआयडीसी जुळली नाळ आधुनिक उद्योगाशी जलविद्युत प्रकल्प तिलारी पायथ्याशी

तेल राईसमील,पोल्ट्री जोरदार चिकण,काजूफॅक्टरीत रोजगार आली धवलक्रांती दुधाची धार

विकासात घेतोय आता आघाडी कष्टकरी उद्योगी गडी चंदगडी ॥६॥

साहित्यात झाले नाव देशभर पद्मश्री रणजित देसाई स्वामीकार सिनेनिर्माता दळवी विजयकुमार

पाडूरंग जाधव,पांडूरंग कुंभार शंकर हदगल,पारु नाईक,केसरकर साबळे,नामदेव कांबळे,चांदेकर

शि तु गावडे,बी एन,हणमंत, के जे शिवणगेकर,कोकीतकर,खाडे बिर्जे एकनाथ तात्यांचाही 'ठोकळा' गाजे

नंदकुमार मोरेंचा प्रबंध 'भाषा चंदगडी' या कवितेचे कवी जयवंत जाधव चंदगडी ॥ ७ ॥

सुर्यकांत दळवी एक नट थोर प्रसिद्ध नामदेव निकम शाहीर विकास 'जलवा' टीव्ही स्टार

इथे मिळते सारे शिक्षण दर्जेदार घडले क्लासवन अधिकारी फार खेळाडूही जिद्दी आणि उर्जेदार

वल्लभ नि मनवाडकर राष्ट्रीय विनर सुरज सिद्धार्थ प्रो कब्बडी स्टार गोळा फेकीत बेनके किर्तीकुमार

शिवछत्रपती क्रीडा पुरकार पै.नाईक मारुती महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर चंदगडी ॥ ८ ॥

प्रसिद्ध हाफ चड्डी चंदगडी डोकीस शोभे टर्कीनची घडी असा रुबाबदार गडी चंदगडी

नऊवारी साडी चंदगडी कास गोलमोठा कुंकू कपाळी खास आता नव्या फॅशनची मिजास

आहे मायेचा ओलावा खोल असते पाहुणचारालाही मोल चंदगडी भाषेतील प्रेमळ बोल

सुर पश्चिमेला कोकणी, पूर्वेला कानडी प्रमाण भाषेतही खुलतो गडी चंदगडी ॥ ९ ॥

नाट्य आणि सांस्कृतिक चळवळ कामगार,भूमीहीनांचीही कळकळ तरुण रक्तात राजकारण सळसळं

जेष्ठ,तरुण नेत्यांत मोठी धडाडी कुठे आघाडी,आहे कुठे बिघाडी कांही प्रामाणिक,कांहीत लबाडी

आमदार झाले व्हीबी, व्ही.के . नरसिंगराव पाटील नावाचे दोघे राजेश पाटलांचे नशीब चमके

मंत्री भरमूआण्णांना लाल दिव्याची गाडी आणि राजकारणी आम्ही गडी चंदगडी ॥ १० ॥

गाजला चंदगड,सजला चंदगड, मनात चंदगड, जनात चंदगड जिल्ह्यात राज्यात देशात जगात चंदगड गाजतोय हा हरघडी

                 आम्ही चंदगडी
                 मी गडी चंदगडी
                 आम्ही चंदगडी
                 मी गडी चंदगडी

चंदगडी चंदगडी चंदगडी मी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी चंदगडी आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी ॥ धृ ॥


     ©जयवंत गणपती जाधव,
     कोवाड ता.चंदगड जि.कोल्हापूर
     मोबाईल 9403463881