एप्रिल २१
दिनांक
(२१ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
एप्रिल २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १११ वा किंवा लीप वर्षात ११२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनइ.स.पू. आठवे शतक
संपादन- ७५३ - रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
सोळावे शतक
संपादन- १५२६ - इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मुघल साम्राज्याची भारतात स्थापना.
सतरावे शतक
संपादन- १६५९ - शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.
अठरावे शतक
संपादन- १७२० - बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.
- १७८२ - राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.
- १७९२ - ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३६ - सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
विसावे शतक
संपादन- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाऊ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- १९३० - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- १९३२ - नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
- १९४४ - फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
- १९६० - ब्राझीलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझीलियाला हलवण्यात आली.
- १९६६ - इथियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- १९६७ - ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- १९७२ - अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
- १९७५ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- १९८७ - श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- १९८९ - चीनची राजधानी बीजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- १९९२ - सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
- २००० - आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणला.
- २००९ - हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १७२९ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १८६४ - मॅक्स वेबर, जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ.
- १९०९ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.
- १९१० - आर.सी. तलवार, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
- १९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी.
- १९३४ - डॉ. गुंथर सोन्थायमर, महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक.
- १९३६ - जेम्स डॉब्सन, ख्रिस्ती धर्मप्रसारक.
- १९४४ - ग्विटी नोविन, इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक.
- १९४५ - श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच.
- १९५० - शिवाजी साटम, भारतीय अभिनेता.
- १९७६ - शब्बीर अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ७४८ - गेन्शो, जपानी सम्राज्ञी.
- १०१३ - पोप अलेक्झांडर दुसरा.
- १५०९ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १९१८ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १९३८ - मुहम्मद इकबाल, भारतीय कवी.
- १९६४ - भारतीदासन, द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी.
- १९७१ - फ्रांस्वा डुव्हालिये, हैतीचा हुकुमशहा.
- १९७३ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १९८५ - टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१३ - शकुंतलादेवी, गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्थापना दिन - रोम.
- तिरादेन्तेस दिन - ब्राझील.
- ग्राउनेशन दिन - रासतफारी.
- सचिव दिन
- भारतीय नागरी सेवा दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)