नक्षलवाद
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे.
गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.[१]
उगम
पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबारी गावात 'सोनम वांगडी' या पोलीस निरीक्षकाचा एका आदिवासी तरुणाच्या तीर कामठ्याने मृत्यू झाला होता, ज्याचे पर्यवसान आसाम फ्रंटियर रॅफल्सकडून जमावावर गोळीबार करण्यात झाले. मे २५, १९६७ रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला व ४ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव केला.[२] मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन व माओवादी तसेच लेनिनवादी गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखील नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते.[३] चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी त्या उठावाचे नेतृत्व केले होते. मुजुमदारांनी १९६९ साली चळवळीची राजकीय आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)ची स्थापना केली.
प्रसार
सध्या (जानेवारी २०१०) नक्षलवादी गट व समविचारी संघटना (उदा. आंध्रप्रदेशातील 'पीपल्स वॉर ग्रुप') भारताच्या वीस राज्यांतील २२० जिल्ह्यांत कार्यरत असून[४] त्यांच्या कारवाया भारताच्या आदिवासीबहूल 'लाल पट्ट्यात' केंद्रित झाल्या आहेत.[५]
भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत.[६]
संदर्भ
- ^ "हिस्टरी ऑफ नक्षलिझम". 2009-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-27 रोजी पाहिले.
- ^ "Naxal Conflict Monitor". 2010-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-27 रोजी पाहिले.
- ^ व्यंकटेश रामकृष्णन (२१ सप्टे. २००५). फ्रंटलाइन मॅगेझिन (The Hindu).[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ अशोक हांडू. "नक्षल प्रॉब्लेम नीड्स अ हॉलिस्टिक ऍप्रोच". प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. ८ ऑगस्ट २००९
- ^ "रायझिंग माओइस्ट इन्सर्जन्सी इन इंडिया". ग्लोबल पॉलिटीशियन. १५ जाने. २००७.
- ^ ""माओइस्ट हू मिनेस इंडिया". इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून. फिलिप बौरिंग एप्रिल १८, २००६". 2006-04-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-04-17 रोजी पाहिले.