एप्रिल २०
दिनांक
(२० एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
एप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६५७ - न्यू यॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
अठरावे शतक
संपादन- १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
- १७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३६ - अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
- १८७६ - बल्गेरियात उठाव.
- १८८४ - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
विसावे शतक
संपादन- १९१४ - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
- १९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
- १९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
- १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
- १९६७ - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
- १९६८ - साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- १९६८ - पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
- १९७८ - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
- १९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
- १९९८ - एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
- १९९९ - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
- २००४ - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
जन्म
संपादन- ७८८: आदि शंकराचार्य
- १६३३ - गो-कोम्यो, जपानी सम्राट.
- १८०८ - नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.
- १८९६: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर
- १९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
- १९३९ - ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर
- १९४९ - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.
- १९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- १९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल
मृत्यू
संपादन- १३१४ - पोप क्लेमेंट चौथा.
- १५२१ - झेंगडे, चीनी सम्राट.
- १९१८ - कार्ल ब्राऊन, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १९४७ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- १९५१ - इव्हानो बोनोमी, इटलीचे पंतप्रधान.
- १९६० - पन्नालाल घोष, भारतीय बासरीवादक.
- १९७० - शकील बदायूॅंनी, हिंदी आणि उर्दू गीतकार.
- १९९९ - कमलाबाई ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)