एप्रिल २६
दिनांक
(२६ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
एप्रिल २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११६ वा किंवा लीप वर्षात ११७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
पंधरावे शतकसंपादन करा
- १४७८ - इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.
सतरावे शतकसंपादन करा
- १६०७ - इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८०२ - नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
- १८६५ - अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
विसावे शतकसंपादन करा
- १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
- १९२४ - रमाबाई रानडे यांचे निधन.
- १९२५ - पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.
- १९३७ - जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.
- १९४२ - मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
- १९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
- १९६२ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
- १९६४ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
- १९७० - सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू
- १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
- १९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
- १९८६ - युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
- १९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
- १९९४ - चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
- १९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००२ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्याला ठार मारले.
- २००५ - २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.
जन्मसंपादन करा
- १२१ - मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
- ५७० - मुहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचे संस्थापक.
- १४७९ - वल्लभाचार्य पुष्टिमार्गाचे संस्थापक.
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
- १६४८ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८९४ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
- १९०० - चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
- १९०८ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- १९१७ - आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
- १९५३ - मौशमी चॅटर्जी, भारतीय अभिनेत्री.
- १९६३ - जेट ली, चीनी अभिनेता.
मृत्यूसंपादन करा
- ११९२ - गो-शिराकावा, जपानी सम्राट.
- १४८९ - अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
- १९२० - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
- १९२४ - रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.
- १९३२ - विल्यम लॉकवुड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.
- १९८७ - शंकरसिंग रघुवंशी, शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार.
- १९९९ - मनमोहन अधिकारी, लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- एकत्रीकरण दिन - टांझानिया.
- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - (एप्रिल महिना)