पाब्लो पिकासो

हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता.

पाब्लो पिकासो (२५ ऑक्टोबर, इ.स. १८८१ - ८ एप्रिल, इ.स. १९७३) हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते.

पाब्लो पिकासो

हुआन ग्रिस याने काढलेले पिकासोचे व्यक्तिचित्र (१९१२)
पूर्ण नावपाब्लो दिएगो होजे फ्रान्सिस्को दे पाउला हुआन नेपोमुचेनो मारिया हुलिओ दे लोस रेमेदिओस क्रिस्पिन क्रिस्पिनियानो दे ला सांतिसिमा त्रिनिदाद रुइझ इ पिकासो
जन्म ऑक्टोबर २५, १८८१
मालागा, स्पेन
मृत्यू एप्रिल ८, १९७३
मूगॅं, फ्रान्स
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
कार्यक्षेत्र चित्रकला, रेखाटन, शिल्पकला
प्रशिक्षण होजे पेरेझ (प्रशिक्षक)
शैली क्युबिझम
प्रसिद्ध कलाकृती गेर्निका (१९३७)
वडील होजे रुइझ इ ब्लास्को
आई मारिया पिकासो इ लोपेझ
Signatur Pablo Picasso
Signatur Pablo Picasso

जन्म आणि बालपण

संपादन

पिकासोचा जन्म स्पेनमधल्या आंदालुसिया प्रांतातील मालागा ह्या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत जात्याच हुशार असणा़ऱ्या पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती.

तारुण्य

संपादन

वयाच्या १९ व्या वर्षी पिकासो युरोपातील कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात येऊन दाखल झाला. नवीन देश, नवीन लोक ह्यांमुळे आलेला उपरेपणा, बरोबर रहात असलेल्या जिवलग मित्राची आत्महत्या, त्याने तरुण मनावर झालेला खोल परिणाम आणि एकाकीपणा ह्या सगळ्या भावना पिकासोच्या ह्या काळातील चित्रांमध्ये दिसून येतात.[]

कामाची उदाहरणे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=87981:2010-07-22-06-55-18&catid=82:2009-07-28-05-11-09&Itemid=94 [मृत दुवा]