भूमध्य समुद्र
भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत व काळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.
तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.
उपसागर
संपादनआंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण संस्थेनुसार भूमध्य समुद्राचे खालील विभाग आहेत.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी;
- अल्बोरन समुद्र: स्पेन व मोनॅकोदरम्यान;
- बालेआरिक समुद्र: स्पेन व बालेआरिक द्वीपसमूहादरम्यान;
- लिगुरियन समुद्र: कोर्सिका व लिगुरियादरम्यान;
- तिऱ्हेनियन समुद्र: सार्दिनिया, इटालियन द्वीपकल्प व सिसिलीदरम्यान;
- आयोनियन समुद्र: इटली, आल्बेनिया व ग्रीसदरम्यान;
- एड्रियाटिक समुद्र: इटली, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, मॉंटेनिग्रो व आल्बेनियादरम्यान;
- एजियन समुद्र: ग्रीस व तुर्कस्तानदरम्यान.
प्रमुख बेटे
संपादनखालील दहा भूमध्य समुद्रामधील प्रमुख बेटे आहेत.
ध्वज | बेट | क्षेत्रफळ | लोकसंख्या |
---|---|---|---|
सिसिली | 25,460 | 5,048,995 | |
सार्दिनिया | 24,090 | 1,672,804 | |
सायप्रस | 9,248 | 803,147 | |
कोर्सिका | 8,680 | 299,209 | |
क्रीट | 8,336 | 623,666 | |
युबोइया | 3,684 | 218,032 | |
मायोर्का | 3,640 | 869,067 | |
लेस्बोस | 1,632 | 90,643 | |
ऱ्होड्स | 1,400 | 117,007 | |
चिओस | 842 | 51,936 |
ह्या शिवाय माल्टा व बालेआरिक द्वीपसमूहामधील मेनोर्का व इबिथा ही देखील भूमध्यातील महत्त्वाची बेटे आहेत.
भोवतालचे देश व प्रदेश
संपादनएकूण २१ सार्वभौम देश भूमध्य समुद्राच्या भोवताली स्थित आहेत.
- युरोप: स्पेन, फ्रान्स, मोनॅको, इटली, माल्टा, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, माँटेनिग्रो, आल्बेनिया, ग्रीस व तुर्कस्तान
- आशिया: तुर्कस्तान (अनातोलिया), सायप्रस, सीरिया, लेबेनॉन, इस्रायल, इजिप्त (सिनाई द्वीपकल्प)
- आफ्रिका: इजिप्त, लीबिया, ट्युनिसिया, अल्जीरिया and मोरोक्को
तसेच खालील भूभाग देखील भूमध्य समुद्र प्रदेशात मोडतात.
- जिब्राल्टर
- सेउता व मेलिया ही स्पेनची विशेष शहरे
- आक्रोतिरी आणि ढेकेलिया
- उत्तर सायप्रस (वादग्रस्त)
- पॅलेस्टाईनची गाझा पट्टी
मोठी शहरे
संपादनखालील यादीत भूमध्य समुद्रावर (वा जवळ) वसलेली देशांच्या राजधानीची व २ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे दिली आहेत.
हवामान
संपादनभूमध्य समुद्राचे व भोवतालच्या भूभागांचे हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे. येथील उन्हाळे उष्ण व रूक्ष तर हिवाळे सौम्य व पावसाळी असतात. भूमध्य हवामान ऑलिव्ह, द्राक्षे, संत्री इत्यादी पिकांसाठी अनुकूल आहे. ऑलिव्ह तेल, वाईन ही भूमध्य क्षेत्रामधील प्रसिद्ध उत्पादने आहेत. येथील प्रसन्न हवामानामुळे भूमध्य किनाऱ्यावरील अनेक शहरांमधे पर्यटन हा मोठा व महत्त्वाचा उद्योग आहे.
संदर्भ
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |