ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेनग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. तसेच त्यात काही वस्तू मिसळून तयार केलेला हेअर मास्क केसांना दाट होण्यासाठी वाढण्यासाठी लावला जातो.[१] स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो.

बाटलीत भरलेले इटालियन ऑलिव्ह तेल

== अन्य तेल

संदर्भ

संपादन
  1. ^ Keys A, Menotti A, Karvonen MJ; et al. (1986). "The diet and 15-year death rate in the seven countries study". Am. J. Epidemiol. 124 (6): 903–15. PMID 3776973. Unknown parameter |month= ignored (सहाय्य); Explicit use of et al. in: |author= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)