जैतून

(ऑलिव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)

जैतून (इंग्लिश: Olive) ही ऑलिएसी ह्या कुळामधील लहान झाडाची एक जात आहे. ही झाडे भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागात, उत्तर इराक, इराण तसेच कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील भागात आढळतात. हे झाड सगळ्या ऋतुंमध्ये फुलते. या फुलांचा रंग पांढरा आणि आकार लहान असतो.

जॉर्डनच्या मृत समुद्राजवळील ऑलिव्हचे झाड

ऑलिव्हचा वापर प्रामुख्याने ऑलिव्ह तेल बनवण्याकरिता केला जातो. ऑलिव्हची लागवड ऑलिव्ह लाकूड, ऑलिव्हचे पान आणि ऑलिव्हचे फळ यासाठी केली जाते. ऑलिव्ह तेलाची निर्मिती हा भूमध्य समुद्र भागामधील एक मोठा उद्योग आहे.


ऑलिव्हची लागवड करणारे प्रमुख देश (२०१० साली)
क्रम देश उत्पादन

(टनांमध्ये लागवड)

क्षेत्रफळ

(हेक्टर)

उत्पन्न

(क्विंटल/हेक्टर)

जग 20,578,186 9,398,623 21.985
01 स्पेन ध्वज स्पेन 8,014,000 2,092,800 38.293
02 इटली ध्वज इटली 3,170,700 1,190,800 26.627
03 ग्रीस ध्वज ग्रीस 1,809,800 834,200 21.695
04 मोरोक्को ध्वज मोरोक्को 1,483,510 735,400 20.173
05 तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान 1,415,000 826,199 17.127
06 सीरिया ध्वज सीरिया 960,400 647,500 14.832
07 ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया 876,400 1,645,100 5.327
08 इजिप्त ध्वज इजिप्त 611,900 128,700 47.545
09 अल्जीरिया ध्वज अल्जीरिया 555,200 316,300 17.553
10 पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 239,600 250,200 9.576
11 लीबिया ध्वज लीबिया 180,000 205,000 8.780
12 Flag of the United States अमेरिका 172,370 13,354 129.077
13 जॉर्डन ध्वज जॉर्डन 171,672 60,879 28.199
14 आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना 165,000 55,700 29.623
15 पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन 99,000 108,100 9.158
16 लेबेनॉन ध्वज लेबेनॉन 97,600 62,500 15.616

बाह्य दुवे

संपादन