जिब्राल्टरची सामुद्रधुनी
अटलांटिक आणि भूमध्य समुद्राच्या दरम्यानची सामुद्रधुनी
स्पेन व मोरोक्को या देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक त्याच्या नावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आधी ग्रीक व रोमन नोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण जेबेल ए तारिक ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला.