लिगुरिया
लिगुरिया (इटालियन: Liguria) हा इटली देशाचा एक प्रदेश आहे. लिगुरियाच्या पश्चिमेला फ्रान्स, उत्तरेला प्यिमाँत, पूर्वेला एमिलिया-रोमान्या व तोस्काना तर दक्षिणेला लिगुरियन समुद्र आहेत. जेनोवा ही लिगुरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सव्होना हे लिगुरियामधील दुसरे मोठे शहर आहे.
लिगुरिया Liguria | |||
इटलीचा प्रदेश | |||
| |||
लिगुरियाचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | जेनोवा | ||
क्षेत्रफळ | ५,४२० चौ. किमी (२,०९० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १६,१४,९२४ | ||
घनता | २९८ /चौ. किमी (७७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-42 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.liguria.it/ |
उत्तरेकडील आल्प्स पर्वतरांग तर दक्षिणेकडील समुद्र ह्यांच्या मध्ये चिंचोळ्या भूभागावरील लिगुरिया हे येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या लिगुरियामध्ये वाइन व ऑलिव्ह तेल ही उत्पादने प्रामुख्याने बनवली जातात.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |