दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी
जानेवारी १
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१
जानेवारी १- १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.
- १८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
- १९३२ - डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.
जानेवारी २
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२
जानेवारी २- १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
- १९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
जानेवारी ३
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/३
जानेवारी ३- १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
जानेवारी ४
जानेवारी ५
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/५
जानेवारी ५- १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.
- १८६९ - कन्नड साहित्यिक वेंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
- १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.
- १९५५ - बंगाली राजकारणी ममता बॅनर्जी यांचा जन्म.
जानेवारी ६
जानेवारी ७
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/७
जानेवारी ७जन्म:
- १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- १९४८ - शोभा डे (चित्रीत), भारतीय लेखिका .
- १९५० - जॉनी लिव्हर, अभिनेता.
जानेवारी ८
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/८
जानेवारी ८- २००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
जानेवारी ९
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/९
जानेवारी ९- १९२७ - धुळे येथे वि.का. राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना.
- १९९१ - स्वतंत्र होउ पाहणार्या लिथुएनियावर (ध्वज चित्रित) सोवियेत संघाच्या सैन्याने हल्ला केला.
जानेवारी १०
जानेवारी ११
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/११
जानेवारी ११- १९८० - वयाच्या १४व्या वर्षी नायजेल शॉर्टने बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.
जानेवारी १२
जानेवारी १३
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१३
जानेवारी १३- १९३८ - चर्च ऑफ इंग्लंडने(मानचिह्न चित्रित) उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खरा असल्याचे मान्य केले.
जानेवारी १४
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१४
जानेवारी १४- १६९० - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले.
- १७६१ - अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली.
जानेवारी १५
जानेवारी १६
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१६
[[चित्र:|70px]]
जानेवारी १६
- १९७९ - इराणच्या शहा मोहम्मद रझा पेहलवीने कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.
जानेवारी १७
जानेवारी १८
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/१८
जानेवारी १८- १९१२ - इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.
जानेवारी १९
जानेवारी २०
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२०
जानेवारी २०- १९२१ - तुर्कस्तानचे (राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
जानेवारी २१
जानेवारी २२
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२२
जानेवारी २२- १९६४ - मुंबईत ७.४o सेल्सियस हा तापमानाचा नीचांक नोंदला गेला.
- १९५४ - जरासंध नगरी (प्राचीन पुरातत्त्वीय स्थळ) हे ठिकाण महाराष्ट्रातील राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून भारत सरकारने घोषित केले.
जानेवारी २३
जानेवारी २४
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२४
जानेवारी २४- इ.स. १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.
जानेवारी २५
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२५
जानेवारी २५- १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
- १९८० - सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.
- २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
जानेवारी २६
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२६
जानेवारी २६- १९५० - स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाले.
- १७८८ - ऑस्ट्रेलियातील सिडने शहराची स्थापना. हाच ऑस्ट्रेलिया स्थापना दिन मानला जातो.
जानेवारी २७
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२७
जानेवारी २७- १९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
जानेवारी २८
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२८
जानेवारी २८- १९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.(चित्रित)
- २००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
जानेवारी २९
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/२९
जानेवारी २९- १७८० - हिकीज बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.
- १९६४ - ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक शहरात नववे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. (चित्रित)
जानेवारी ३०
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/३०
जानेवारी ३०- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता.
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.
जानेवारी ३१
दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/३१
जानेवारी ३१- १९६८ - नौरूला(राष्ट्रध्वज चित्रित) ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.