इ.स. १८६३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(ई.स. १८६३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६० - १८६१ - १८६२ - १८६३ - १८६४ - १८६५ - १८६६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ९ - अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.
- जानेवारी १० - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
- फेब्रुवारी ७ - एच.एम.एस. ऑर्फियुस हे जहाजन्यू झीलंडमध्ये ऑकलंडजवळ बुडाले. १८९ ठार.
- मार्च ३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- एप्रिल २४ - कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.
- मे १ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.
- मे २३ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या आरमाराने लुईझियानाच्या पोर्ट हड्सन या बंदराला वेढा घातला.
- जून ७ - फ्रेंच सैन्याने मेक्सिको सिटी जिंकले.
- जून ९ - अमेरिकन यादवी युद्ध - ब्रॅन्डी स्टेशनची लढाई.
- जून २० - वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
- जुलै ७ - अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
- जुलै १३ - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- जुलै १८ - अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
- ऑगस्ट ८ - गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
जन्म
संपादन- मार्च ११ - ऍण्ड्र्यू स्टॉडर्ट, क्रिकेट खेळाडू.
- मार्च ११ - वोबे डी व्ह्राईस, डच भाषातज्ज्ञ.
मृत्यू
संपादन- मे १० - स्टोनवॉल जॅक्सन, अमेरिकन गृहयुद्धातील दक्षिणेचा सेनापती.
- जुलै १८ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.