लंडन पॅडिंग्टन स्थानक
लंडन पॅडिंग्टन स्टेशन तथा लंडन पॅडिंग्टन किंवा नुसतेच पॅडिंग्टन हे युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन शहराच्या पॅडिंग्टन परिसरातील प्रेड स्ट्रीटवर स्थित रेल्वे स्थानक आणि लंडन अंडरग्राउंडचे मोठे स्थानक आहे. या स्थानकावरुग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि त्यातून तयार झालेल्या कंपन्या १८३८पासून अविरत रेल्वे सेवा पुरवतात. ग्रेट वेस्टर्न स्थानकावरील बव्हंश सेवा पुरवते. या स्थानकावरील मुख्य मार्गिका असलेला भाग १८५४पासूनचा आहे. याची रचना इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेलने केली होती.
पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न मेन लाइनचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. टर्मिनस आहे. येथून पश्चिम लंडन आणि थेम्स खोऱ्याला प्रवासी आणि प्रादेशिक प्रवासी सेवा पुरवते. याशिवाय येथून नैऋत्य इंग्लंड आणि दक्षिण वेल्सला लांब-अंतराच्या सेवा पुरवते. हे स्थानक हीथ्रो एक्स्प्रेसचे पूर्वेकडील आणि एलिझाबेथ लाइनवरील शेनफिल्डकडील सेवांसाठी पश्चिमेकडील अंतिम स्थानक आहे. एलिझाबेथ लाइन सेवा पॅडिंग्टन मार्गे पश्चिमेकडे रेडिंग, हीथ्रो टर्मिनल ५, टर्मिनल ४ आणि पूर्वेकडे अॅबी वूडपर्यंत धावतात . [१] पॅडिंग्टन स्थानक अंडरग्राउंडच्या फेर झोन १ मध्ये आहे. येथून बेकरलू, सर्कल, डिस्ट्रिक्ट आणि हॅमरस्मिथ आणि सिटी लाईन्सना जोडलेली दोन स्वतंत्र अंडरग्राउंड स्टेशन आहेत. नेटवर्क रेलद्वारे चालविल्या जाणाऱ्या लंडनमधील ११ स्थानकांपैकी हे एक आहे.
पॅडिंग्टन स्थानकापासू सेंट्रल लाइनवरील लँकेस्टर गेट स्टेशन दक्षिणेला थोडेसे चालत जाण्याच्या अंतरावर आहे. दक्षिणेला तसेच थोडे पुढे हाइड पार्क आणि केन्सिंग्टन गार्डन्सची या दोन जुळ्या बागा आहेत. [२] पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्यांचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. येथून हीथ्रो विमानतळावर दोन सेवा जातात: हीथ्रो एक्सप्रेस अधिक भाडे घेउन विनाथांबा प्रवास करते, तर एलिझाबेथ लाइन याच मार्गाने जाते मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबत जाते. [३] [४]
स्थानकात १-१२ आणि १४ क्रमांकाचे एकूण १३ फलाट आहेत. [५]
हीथ्रो एक्सप्रेस ७ क्रमांकाच्या फलाटावरून ये-जा करते. [६] येथे तिकीट कार्यालयात विमानप्रवाशांसाठी विमानांची माहिती दिसते. [७] [८] [९]
पॅडिंग्टन पासून ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या पश्चिम लंडन, थेम्स खोरे, रेडिंग आणि डिडकोट येथे जाणाऱ्या उपनगरीय गाड्या निघतात.[१०]
रेल्वे सेवा
संपादनग्रेट वेस्टर्न रेल्वे
संपादन- ताशी १ गाडी बेडविन
- ताशी २ गाड्या ब्रिस्टल टेंपल मीड्स, दोन तासांनी १ गाटी वेस्टन-सुपर-मेर पर्यंत
- ताशी २ गाड्या कार्डिफ सेंट्रल, ताशी १ गाडी स्वानसीपर्यंत
- ताशी १ गाडी चेल्टेनहॅम स्पा
- दोन तासांनी १ गाडी एक्सेटर सेंट डेव्हिड्स (काही सेवा पुढे नैऋत्येस विविध गंतव्यस्थानांसाठी विस्तारित)
- दोन तासांनी १ गाडी न्यूबरी (एक्झेटर सेंट डेव्हिड्स इंटरसिटी सेवेसह)
- ताशी २ गाड्या ऑक्सफर्ड, ताशी एक गाडी ग्रेट मालवर्न (काही सेवा हीयरफोर्ड पर्यंत विस्तारित)
- ताशी १ गाडी एक्झेटर सेंट डेव्हिड्स मार्गे प्लिमथ (२ तासातून १ गाडी पेन्झान्सपर्यंत विस्तारित)
- ताशी २ गाड्या डिडकोट पार्कवे
एलिझाबेथ लाइन
संपादन(अंडरग्राउंड एलिझाबेथ लाइन फलाट ए आणि बी वरून चालते)
- ताशी ४ गाड्या हीथ्रो टर्मिनल ४
- ताशी २ गाड्या हीथ्रो टर्मिनल ५
- ताशी २ गाड्या रेडिंग
- ताशी २ गाड्या मेडेनहेड
- ताशी ८ गाड्या अॅबी वूड
- ताशी ८ गाड्या शेनफिल्ड
हिथ्रो एक्सप्रेस
संपादन- ताशी ४ गाड्या हीथ्रो टर्मिनल 5
संदर्भ
संपादन- ^ Lydall, Ross (4 May 2022). "Crossrail opening date finally announced". Evening Standard. London.
- ^ "Lancaster Gate Tube Station". LondonTown.com. 21 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "Our Company". Heathrow Express. 2 August 2008 रोजी पाहिले.
- ^ "Welcome". Heathrow Connect. 2 August 2008 रोजी पाहिले.
- ^ "Paddington". Network Rail. 3 September 2017 रोजी पाहिले.
- ^ Yonge & Padgett 2010.
- ^ "Heathrow Express brings back Check-in to reduce passenger stress". AirRailNews. 1 December 2009. 2022-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Rosslare to Fishguard". Stena Line. n.d. 3 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "They ran on nicer lines in the end they united together They ran on hmane lines Along the lines of fainess were in good copany lines". The Independent. 4 February 1996. 7 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "Great Western Route Utilisation Study" (PDF). Figure 3.12. Network Rail. March 2010. 1 September 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 February 2012 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- नेटवर्क रेलवरील पॅडिंग्टन स्टेशनवरील स्टेशनची माहिती
- राष्ट्रीय रेल्वेकडून पॅडिंग्टन रेल्वे स्थानकावरील गाड्यांच्या वेळा आणि स्थानक माहिती (स्टेशन कोड: PAD)
- पॅडिंग्टन स्टेशन (नेटवर्क रेलचे आभासी संग्रहण)