Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

रिचर्ड लॉरेन्स (इ.स. १८००?:इंग्लंड - जून १३, इ.स. १८६१:वॉशिंग्टन डी.सी.) हा अमेरिकन अध्यक्षाचा खून करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणूस होता.

JacksonAssassinationAttempt.jpg

लॉरेन्स हा मनोरूग्ण होता. तो रंगारी होता व रंगातील रसायनांनी त्याचा आजार बळावल्याची शक्यता आहे. त्याचा असा समज होता की तो इंग्लंडचा राजा रिचर्ड तिसरा होता व अमेरिकन सरकारकडून त्याला खूप पैसे येणे होते. त्याच्या समजानुसार अमेरिकन अध्यक्ष ॲंड्र्यू जॅक्सन हे पैसे त्याला मिळु देत नव्हता.

याचा 'बदला' घेण्यासाठी लॉरेन्सने दोन पिस्तुले खरेदी केली व जॅक्सनवर पाळत ठेवु लागला. जानेवारी ३०, इ.स. १८३५ रोजी जॅक्सन दक्षिण कॅरोलिनाच्या प्रतिनिधी वॉरेन आर. डेव्हिसच्या अंत्ययात्रेसाठी गेला. लॉरेन्सने एका खांबामागुन जॅक्सनवर नजर ठेवली व जसा तो जवळ आला, त्यासरशी लॉरेन्सने पुढे होउन जॅक्सनवर मागुन पिस्तुल रोखले व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी झाडली गेलीच नाही. ते पाहता लॉरेन्सने दुसरे पिस्तुल झाडले परंतु त्याचीही तीच गत झाली. तोपर्यंत जॅक्सन व ईतरांनी लॉरेन्सला पाहिले व झटापट सुरू झाली. जॅक्सनने हातातील काठीने लॉरेन्सला टोले लगावले व ईतरांनी त्याला पकडले.

एप्रिल ११, इ.स. १८३५ रोजी लॉरेन्सवर खटला चालवण्यात आला. पहिल्या पाच मिनीटात ज्युरीने लॉरेन्सला वेडपणाच्या कारणामुळे निर्दोष ठरवला. लॉरेन्सला मनोरूग्णांच्या दवाखान्यात ठेवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला.