जानेवारी ३०
दिनांक
(३० जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२५ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३० वा किंवा लीप वर्षात ३० वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसतरावे शतक
संपादन- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १८४७ - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
विसावे शतक
संपादन- १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
- १९१३ - इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.
- १९३१ - चार्ली चॅप्लिनचा सिटी लाइट्स चित्रपट प्रदर्शित.
- १९३३ - ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
- १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने मजुरो, मार्शल द्वीप वर हल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
- १९४८ - नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला. .
- १९४८ - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
- १९७२ - ब्लडी संडे-ब्रिटिश सैन्याने उत्तर आयर्लंडमध्ये कॅथॉलिकांच्या शांततामय निदर्शनावर केलेल्या गोळीबारात १३ मृत.
- १९७२ - पाकिस्तानने ब्रिटिश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
- १९७९ - टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
- १९८९ - अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
- १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रॅंडमास्टर झाला.
- १९९७ - महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
एकविसावे शतक
संपादन- २००० - केन्या एरवेझ फ्लाइट ४३१ हे एरबस ए३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.
- २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.
- २००५ - १९५३ नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
- २०२५ - अमेरिकन एरलाइन्सचे प्रवासी विमान वॉशिंग्टन मधील विमानतळावर उतरत असताना लष्कराच्या हेलिकॉप्टरची त्याला धडक बसली या विमानात ६० प्रवासी आणि ४ कर्मचारी होते तर हेलिकॉप्टर मध्ये ३ सैनिक होते या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
जन्म
संपादन- १३३ - मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
- १८५३ - लेलॅंड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन अध्यक्ष.
- १८८९ - गो.रा. परांजपे, मराठी लेखक.
- १८९४ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- १९१० - सी. सुब्रम्हण्यम - गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल.
- १९११ - पं. गजाननबुवा जोशी, भारतीय शास्त्रीय गायक.
- १९१३ - डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - अमृता शेरगिल, भारतीय चित्रकार.
- १९२७ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९२९ - ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - रमेश देव, हिंदी, मराठी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक.
- १९३० - समर बॅनर्जी, भारतीय फुटबॉल खेळाडू.
- १९३७ - बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळ खेळाडू.
- १९३९ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - डॉ. सतीश आळेकर, मराठी नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते.
- १९५१ - ट्रेव्हर लाफलिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.
मृत्यू
संपादन- ११८१ - टाकाकुरा, जपानी सम्राट.
- १६४९ - चार्ल्स पहिला, इंग्लंडचा राजा.
- १८६७ - कोमेइ, जपानी सम्राट.
- १९४८ - मोहनदास करमचंद गांधी.
- १९४८ - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- १९६८ - माखनलाल चतुर्वेदी, हिंदी पत्रकार, कवी आणि नाटककार.
- १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.
- २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
- २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.
- २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.
- २०२० - विद्या बाळ, स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या.
- २०२५ - प्रसिद्ध माहितीपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते तपन. के. बोस (७८ वर्ष)
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - (जानेवारी महिना)