बोईंग ७०७

(बोईंग ७०७-३२३सी या पानावरून पुनर्निर्देशित)

बोईंग ७०७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान होते.

बोईंग ७०७
प्रकार मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण डिसेंबर २०, इ.स. १९५७
समावेश ऑक्टोबर , १९५८
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता पॅन अमेरिकन एअरलाइन्स
उत्पादन काळ १९५८-१९७९
उत्पादित संख्या १,०१०
प्रति एककी किंमत ४३ लाख अमेरिकन डॉलर (१९५५ मधील)
मूळ प्रकार बोईंग ३६७-८०
उपप्रकार सी-१३७ स्ट्रॅटोलायनर
ई-३ सेंट्री
ई-६ मर्क्युरी
ई-८ जॉइंट स्टार्स

चार इंजिने असलेले हे विमान बोईंगने १९५० च्या दशकात विकसीत केले. या विमानाच्या १,०१० प्रतिकृती विकण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सफल झालेल्या पहिल्या काही जेट विमानांपैकी ७०७ (सेव्हेन ओह सेव्हेन) होते. या विमानाने बोईंगला विमान उत्पादकांत अग्रगण्य स्थान दिले व बोईंगच्या ७x७ प्रकारच्या विमानांची सुरुवात करून दिली.

या विमानाचा छोटा आणि अधिक वेगवान उपप्रकार बोईंग ७२० नावाने विकण्यात आला होता.