मे ९
दिनांक
(९ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०९२ - इंग्लंडच्या लिंकनशायर काउंटीत लिंकन कॅथेड्रल खुले.
पंधरावे शतक
संपादन- १४५० - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या.
सोळावे शतक
संपादन- १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर नव्या जगाकडे निघाला.
सतरावे शतक
संपादन- १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
- १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
- १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
विसावे शतक
संपादन- १९०१ - मेलबॉर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू.
- १९१४ - जे.टी. हर्न प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
- १९१५ - पहिले महायुद्ध - आर्त्वाची दुसरी लढाई.
- १९२७ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू.
- १९३६ - इटलीने इथियोपिया बळकावले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या यु.९ या पाणबुडीने फ्रांसची डोरिस या पाणबुडीचा नाश केला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची यु.११० ही पाणबुडी ब्रिटिश आरमाराने पकडली. यातून एनिग्मा हे सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्याचे यंत्र मिळाले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - बेलग्रेडमध्ये ज्यू व्यक्तिंची सैनिकांकडून सामूहिक हत्या.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने हरमान गोरिंगला पकडले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या सैन्याने व्हिडकुन क्विसलिंगला पकडले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने प्रागमध्ये प्रवेश केला.
- १९४६ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी.
- १९४९ - रैनिये तिसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- १९५५ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश.
- १९५६ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले.
- १९६० - अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेत ८०,००० व्यक्तिंची व्हाईट हाउस समोर निदर्शने.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या विधीमंडळाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनविरुद्ध महाभियोग सुरू केला.
- १९८० - फ्लोरिडातील सनशाईन स्कायवे ब्रिजला लायबेरियाच्या मालवाहू जहाज एस.एस. समिट व्हेन्चरची धडक. ३५ ठार.
- १९८७ - पोलंडच्या लॉट एरलाइन्सचे आय.एल.६२एम. जातीचे विमान वॉर्सोच्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
- १९९२ - प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया येथील वेस्ट्रे खाणीत स्फोट. २६ कामगार ठार.
- १९९४ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
- २००४ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू.
- २००६ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
जन्म
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- ११४७ - मिनामोटोनो योरिमोटो, जपानी शोगन.
- १४३९ - पोप पायस तिसरा.
- १५४०: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप
- १८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
- १८३७ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता.
- १८६६ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
- १८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे
- १८९२ - झिटा, ऑस्ट्रियाची साम्राज्ञी.
- १९०१ - जॉर्ज डकवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - मॅन्फ्रेड आयगेन, जर्मन जैवभौतिकशास्त्रज्ञ.
- १९२८ - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
- १९३२ - कॉन्राड हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - जॉन ऍशक्रॉफ्ट, अमेरिकन सेनेटर.
- १९४३ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - अँड्रु जोन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३३८: भगवद्भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला.
- १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
- १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
- १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
- १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
- १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
- १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
- १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
- १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
- १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
- १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
- २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
- २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
- २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी
प्रतिवार्षिक पालन
संपादन- जागतिक थॅलस्सेमिया दिन.
- विजय दिन - रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
- युरोप दिन - युरोपीय संघ.
- मुक्ति दिन - जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
- स्वातंत्र्य दिन : रोमानिया
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)