अखमद अब्दुलखमिदोविच काडिरोव (रशियन: Ахмат Абдулхамидович Кадыров; चेचेन:Къадири lабдулхьамидан кlант Ахьмад-Хьажи; २३ ऑगस्ट, इ.स. १९५१ - ९ मे, इ.स. २००४) हा चेचन्याचा राष्ट्राध्यक्ष होता. हा ५ ऑक्टोबर, इ.स. २००३ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याआधी जुलै २००० पासूनच हा तेथील कारभार बघत असे.

अखमद काडिरोव्ह (2002)

चेचन्याच्या इचकेरिया प्रजासत्ताकचा मुख्य मुफ्ती असलेला खदिरोव दुसऱ्या चेचेन युद्धाच्या सुरुवातीस रशियास जाउन मिळाला.

९ मे, इ.स. २००४ रोजी ग्रोझ्नीमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणून त्याची हत्या केली.