जयंत्यांची यादी
पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात. उदा० छत्रपती शिवाजी महाराज जयंती [ संदर्भ हवा ]
जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.
विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या
संपादनपुढे दिलेल्या यादीतील तिथीसाठी दिलेल्या महिन्याचे नाव महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अमावास्यान्त महिन्याच्या पद्धतीनुसार आहे. पौर्णिमान्त पद्धतीनुसार वद्य पक्ष पुढच्या महिन्यात येतो. उदा0 त्या पद्धतीनुसार, मराठी ज्येष्ठ वद्य त्रयोदशी ही आषाढ वद्य त्रयोदशी होते.
- गुरू अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?)
- अंगीरस ऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी)
- अग्रसेन जयंती (आश्विन शुक्ल प्रतिपदा)
- अण्णा भाऊ साठे जयंती (१ ऑगस्ट)
- अनसूया जयंती (चैत्र वद्य चतुर्थी)
- अन्नपूर्णा (देवी) जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
- अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५
- अर्जुन जयंती (फाल्गुन पौर्णिमा)
- सम्राट अशोक जयंती -
- अहिल्यादेवी होळकर जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी
- आझाद हिंद सेना स्थापना दिवस (२१ ऑक्टोबर १९४३)
- आदि शंकराचार्य जयंती (वैशाख शुद्ध पंचमी)
- बाबासाहेब आंबेडकर जयंती (एप्रिल १४)
- औद्योगिक सुरक्षा दिवस (नोव्हेंबर २)
क-ग
संपादन- कबीर जयंती (ज्येष्ठ पौर्णिमा) (वट पौर्णिमा)
- कर्ण जयंती (माघ शुक्ल प्रतिपदा)
- माँकर्मादेवी जयंती -चैत्र शुक्ल द्वादशी
- कल्की जयंती (श्रावण शुद्ध पंचमी) (नागपंचमी) (चरक जयंती)
- कश्यपाचार्यस्वामी जयंती (माघ शुद्ध सप्तमी)
- जागतिक कामगार दिवस (मे १)
- कामदेव जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी)
- काळभैरव जयंती (कार्तिक वद्य सप्तमी)
- कुसुमाग्रज जन्मदिवस /मराठी भाषा दिवस (फेब्रुवारी २७)
- कूर्म जयंती (वैशाख/बुद्ध पौर्णिमा)
- कृष्ण जयंती (श्रावण वद्य सप्तमी)
- ख्रिस्त जयंती (डिसेंबर २५)
- गंगा जयंती (वैशाख शुद्ध सप्तमी)
- गजानन महाराज प्रकटदिन (माघ वद्य ७)
- गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी)
- गांधी जयंती (ऑक्टोबर २)
- गायत्री जयंती - ज्येष्ठ शुक्ल एकादशी
- गीता जयंती (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी)
- गुरू गोविंदसिंह जयंती - (जानेवारी ५)
- गुरू रविदास जयंती - माघ पौर्णिमा
- गोखले जयंती - ( मे ९)
- गौतम ऋषि जयंती - चैत्र शुक्ल प्रतिपदा
- संत रोहिदास जयंती - माघ पौर्णिमा
- विश्वकर्मा जयंती - माघ शुद्ध त्रयोदशी
- भारतीय ग्राहक दिन (डिसेंबर २४)
च-ज
संपादन- चंद्रशेखर आझाद जयंती (जुलै २३)
- चरक जयंती (श्रावण शुक्ल पंचमी-नागपंचमी) (कल्की जयंती)
- चित्रगुप्त जयंती (कार्तिक शुद्ध द्वितीया) (यम द्वितीया, भाऊबीज)
- चैतन्य जयंती (फाल्गुन/होळी पौर्णिमा)
- जलाराम जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी)
- जिजामाता जयंती (पौष पौर्णिमा)
- जिजामाता जयंती (१२ जानेवारी)
- जोतिबा फुले जयंती (एप्रिल ११)
- झुलेलाल जयंती (चैत्र शुक्ल २)
- भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव ( श्रावण शुद्ध त्रयोदशी - १३)
- भगवान श्री जिव्हेश्वर व माता अंकिनी-दशांकीनी विवाह सोहळा प्रारंभ (माघ शुद्ध ४)
- भगवान श्री जिव्हेश्वर व माता अंकिनी-दशांकीनी विवाह सोहळा (माघ शुद्ध १२)
ट-न
संपादन- लोकमान्य टिळक जयंती (जुलै २३)
- भारतीय डॉक्टर दिवस (बिधनचंद्र रॉय जयंती) जुलै १
- तलत महमूद जयंती (फेब्रुवारी २४)
- तुकडोजी महाराज जयंती (एप्रिल ३०)
- तुळशीदास जयंती (श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी)
- त्रिपुर भैरव जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
- दत्त जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
- दधीची जयंती (भाद्रपद शुद्ध अष्टमी)
- दयानंद सरस्वती जयंती (माघ वद्य दशमी)
- दुर्योधन जयंती (आश्विन वद्य नवमी)
- जागतिक दूरसंचार दिवस (मे १७)
- धन्वंतरी जयंती (आश्विन वद्य/धन त्रयोदशी)
- ध्यानचंद जयंती (राष्ट्रीय क्रीडा दिवस) २९ ऑगस्ट
- नकुल-सहदेव जयंती (फाल्गुन अमावास्या)
- नर्मदा जयंती (माघ शुद्ध नवमी)
- नानक जयंती (कार्तिक/त्रिपुरारी पौर्णिमा)
- संत नामदेव महाराज महासमाधि (आषाढ कृ .त्रयोदशी)
- नारद जयंती (वैशाख वद्य प्रतिपदा)
- नृसिंह जयंती (वैशाख शुद्ध चतुर्दशी)
- नेहरू जयंती(बाल दिन) (नोव्हेंबर १४)
प-म
संपादन- परशुराम जयंती (वैशाख शुद्ध तृतीया/अक्षय्य तृतीया)
- आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस (फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती) -१२ मे
- जागतिक पर्यटन दिवस (२७ सप्टेंबर)
- जागतिक पर्यावरण दिवस (५ जून)
- पार्श्वनाथ जयंती (मार्गशीर्ष वद्य दशमी)
- पीतांबरा (बगलामुखी) जयंती (वैशाख शुक्ल अष्टमी)
- मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस (डॉ. हसमुख सांकलिया जयंती, डिसेंबर १०)
- पैगंबर जयंती(शिया)(१७ रबिलावर)
- पैगंबर जयंती(सुन्नी) (१२ रबिलावर)
- महाराणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया)
- फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती (१२ मे)
- बगलामुखी (पीतांबरा) जयंती (वैशाख शुक्ल अष्टमी)
- बटुक भैरव जयंती (ज्येष्ठ शुक्ल दशमी)
- बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध द्वितीया)
- भारतीय बालदिन (नेहरू जयंती, १४ नोव्हेंबर); आंतरराष्ट्रीय बालदिन १ जून
- बी.सी. रॉय जयंती (भारतीय डॉक्टरदिन, १जुलै)
- बुद्ध जयंती (वैशाख पौर्णिमा)
- बिरसा मुंडा जयंती (१५ नोव्हेंबर)
- भानुदास महाराज जयंती (माघ वद्य अष्टमी)
- भीम जयंती (आश्विन वद्य नवमी)
- भीष्म जयंती (माघ वद्य नवमी)
- भैरव जयंती (माघ पौर्णिमा)
- मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया)
- मदन जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी)
- मध्वाचार्य जयंती (आश्विन शुद्ध/विजया दशमी)
- मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस (फेब्रुवारी २७)
- महाराष्ट्र दिन (मे १)
- महावीर जयंती (चैत्र शुद्ध त्रयोदशी)
- जागतिक महिला दिन/मातृदिन (मे ८)
- मार्कंडेय जयंती (माघ शुद्ध तृतीया)
- संत मुक्ताबाई जयंती (आश्विन शुक्ल प्रतिपदा)
- जागतिक मुद्रण दिन (फेब्रुवारी २४)
- मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती (सप्टेंबर १५); अभियंता दिन
य-ज्ञ
संपादन- युधिष्ठिर जयंती (माघ पौर्णिमा की आश्विन शुक्ल पंचमी?)
- जागतिक रक्तदान दिवस (ऑक्टोबर १)
- रविदास जयंती (माघ पौर्णिमा)
- रवींद्रनाथ टागोर जयंती (मे ८)
- राणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुद्ध तृतीया)
- रावण जयंती (आश्विन शुक्ल दशमी)
- लहुजी वस्ताद जयंती,रोहिणी भाटे जयंती (नोव्हेंबर १४)
- राजाराम महाराज जयंती (फेब्रुवारी २४ )
- राणी लक्ष्मीबाई जयंती (डिसेंबर १२)
- राधाकृष्णन जयंती (शिक्षक दिन) (सप्टेंबर ५)
- रामदास जयंती; श्रीराम नवमी (चैत्र शुद्ध नवमी)
- समर्थ रामदासस्वामी जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
- रामानुजाचार्य जयंती (वैशाख शुद्ध षष्ठी)
- जागतिक रेडक्रॉस दिवस (मे ८)
- राष्ट्रीय अखंडता दिवस (ऑक्टोबर ४)
- ललित जयंती (माघ पौर्णिमा)
- लवकुश जयंती (श्रावण/नारळी पौर्णिमा)
- लक्ष्मी जयंती (माघ शुद्ध पंचमी)(वसंत पंचमी)
- लालबहाद्दुर शास्त्री जयंती(ऑक्टोबर २)
- लाला लजपतराय जयंती (जानेवारी २८)
- वराह जयंती (भाद्रपद शुद्ध तृतीया)
- वल्लभभाई पटेल जयंती (ऑक्टोबर ३१)
- वल्लभाचार्य जयंती (चैत्र वद्य एकादशी/वरूथिनी एकादशी)
- वामन जयंती (भाद्रपद शुद्ध द्वादशी)
- वाल्मीकी जयंती (आश्विन/कोजागिरी पौर्णिमा)
- विनोबा भावे जयंती (सप्टेंबर ११)
- विवेकानंद जयंती (पौष वद्य सप्तमी); (जानेवारी १२) (राष्ट्रीय युवक दिन)
- विश्वकर्मा जयंती (माघ शुद्ध त्रयोदशी)
- मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती (सप्टेंबर १५); अभियंता दिन
- व्यास जयंती (आषाढ पौर्णिमा/व्यास पौर्णिमा/गुरुपौर्णिमा)
- आदि शंकराचार्य जयंती (वैशाख शुद्ध पंचमी)
- शनि जयंती (वैशाख अमावास्या)
- शाकंभरी जयंती (पौष पौर्णिमा)
- शालिवाहन जयंती (चैत्र शुद्ध दशमी)
- शाहू जयंती (जून २६)
- शुकदेव जयंती (चैत्र अमावास्या)
- शेक्सपियर जयंती(आणि पुण्यतिथी) (एप्रिल २३); पुस्तकदिन
- श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती (जुलै ६)
- शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी) /फाल्गुन कृष्ण तृतीया
- संभाजी जयंती (मे१४)/ज्येष्ठ एकादशी
- सरस्वती जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी) की माघ शुद्ध (वसंत) पंचमी?.
- संस्कृत दिवस (श्रावण/नारळी पौर्णिमा)
- सहदेव-नकुल जयंती (फाल्गुन अमावास्या)
- सहस्रबाहू (सहस्रार्जुन) जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी)
- सांदीपनी जयंती (मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी)
- सावरकर जयंती (मे २८)
- सावित्रीबाई फुले जयंती(महिला मुक्तिदिन) (जानेवारी ३)
- सिद्धारूढस्वामी जयंती(हुबळी) (चैत्र शुद्ध नवमी)
- सीता जयंती (वैशाख शुद्ध नवमी) आणि काही ठिकाणी, (माघ वद्य अष्टमी)
- सुभाषचंद्र बोस जयंती (जानेवारी २३)
- सूरदास जयंती (वैशाख शुद्ध पंचमी)
- संतुजी लाड (५ मार्च)[१]
- सोपान जयंती (काार्तिक. पौर्णिमा/त्रिपुरारी पौर्णिमा))
- संत सेवालाल महाराज जयंती (अक्कलकोटस्वामी) जयंती (चैत्र शुद्ध द्वितीया)
- (जागतिक) स्काउट दिवस (बेडेन-पॉवेल जन्मदिवस) (फेब्रुवारी २२)
- स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
- स्वामी समर्थ जयंती (चैत्र शुद्ध द्वितीया)
- हयग्रीव जयंती (वैशाख शुद्ध द्वितीया)
- डॉ. हसमुख सांकलिया जयंती : (डिसेंबर १०); मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस
- हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा)
- हरगोविंदसिंह जयंती (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा)
- हिंदी दिवस (सप्टेंबर १४)
- हेडगेवार जयंती (चैत्र शुद्ध प्रतिपदा)
- ज्ञानेश्वर जयंती (श्रावण वद्य सप्तमी)