काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परम भक्त मार्कंडेय ऋषी यांना दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले. मात्र सर्वपरिचित सप्त चिरंजीवांमध्ये मार्कंडेयांचा समावेश नाही.

मार्कंडेय हे भारतातल्या पद्मशाली समाजाचे दैवत आहे.

मार्कंडेय यांच्यावरील पुस्तके

संपादन
  • मार्कंडेय पुराण कथासार (काशिनाथ जोशी)
  • मृत्युंजय मार्कंडेय (लेखक : प्रो. विजय जी. यंगलवार)
  • शिवभक्त मार्कंडेय चरित्र (लेखक : पंडित मार्कंडेय रामस्वामी कस्तुरी)