माघ शुद्ध चतुर्थी
माघ शुद्ध चतुर्थी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौथी तिथी आहे.
गणेश जयंती
संपादनगणेश जयंतीसंबंधी एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागील गोष्ट तुम्ही निश्चितच ऐकलेली असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओततर. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगतात आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना बाल गणेशला त्याप्रमाणे गणेश आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत बसतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव त्यांना भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि भगवान शंकरच आपले पिता आहेत हे बाल गणेशला माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यापासून रोखतो. महादेव सुद्धा ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. भगवान शंकरांना राग अनावर होतो. दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येतात तेव्हा आपल्या मुलाची अशी स्थिती पाहून अत्यंत त्यांना अत्यंत दुःख होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा भगवान शंकराकडे त्या हट्ट धरतात. तेव्हा महादेव त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. देवता प्राण्याच्या शोधार्थ निघतात शेवटी त्यांना हत्तीचे डोके मिळते. अखेर महादेव ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात.