कूर्म अवतार

भगवान विष्णु यांचा कासवरूपातील अवतार

कूर्म अवतार याला 'कच्छप अवतार' [] देखील म्हणतात.हा श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो,देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे.कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला[] साजरा केला जातो.

कूर्म अवतार

कूर्मावताराचे चित्र
मराठी कूर्म अवतार
संस्कृत कूर्मावतारः
कन्नड ಕೂರ್ಮಾವತಾರ
तमिळ கூர்ம_அவதாரம்
या अवताराची मुख्य देवता विष्णू
नामोल्लेख भगवतपुराण ,महाभारत ,विष्णू पुराण,पद्मपुराण,लिङ्गपुराण
तीर्थक्षेत्रे श्रीकुर्मम् कुर्मनाथस्वामी मंदिर श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
पितळी रथावरील कूर्म अवताराची प्रतिमा, सियरसोल राजबाड़ी, पश्चिम बंगाल, भारत

पौराणिक कथा

संपादन

एकदा, देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माला दिली. ह्या वेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून हत्तीच्या पायांखाली तुडविली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, " तुझ वैभव नष्ट होईल ! " या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निःष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरू शुकाचार्य ह्यांच्यापाशी संजीवनी विदया होती. त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवांकडे मात्र अशा प्रकारची विदया नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली.त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला.देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. पण मंदारचलच्या खाली आधार नसल्याने, समुद्रात बुडायला लागला. ते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म (कासव) कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन पूर्ण झाले.[]

मंदिर

संपादन

श्रीकुर्मनाथस्वामी(श्रीकुर्मम्) मंदिर, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील गारा मंडळाचे एक हिंदू मंदिर आहे.[]

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "कूर्म अवतार - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-09-06 रोजी पाहिले.
  2. ^ "वैशाख पौर्णिमा". विकिपीडिया. 2017-11-09.
  3. ^ "समुद्रमंथन". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-06 रोजी पाहिले.
  4. ^ "Kurmanathaswamy temple, Srikurmam". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-25.