अमृत

अमरत्व देणारे पेय/ हिंदू पौराणिक कल्पना

अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे.

अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते दानवांकडून मोठ्या चलाखीने काढून घेऊन देवांकडे दिले अशी आख्यायिका आहे. समुद्रमंथनासाठी मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निर्माण झाली. त्यापैकी अमृत हे एक रत्न आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.