चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू कालगणनेनुसार चैत्र पौर्णिमा ही वर्षाची पहिली पोयउरणीम आहे । चैत्र शुक्ल प्रतिपदा , म्हणजेच गुढीपाडव्यापासून एक पक्षाने ही पौर्णिमा येते । चैत्र पौर्णिमा ही सध्या साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. हिंदू जैनबौद्ध या सर्व धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे विशेष महत्त्व आहे.

हिंदू धर्म

संपादन

चैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन, श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्मदिवस मानला जातो । ( उत्तर भारतात हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे मानले जाते)। या दिवशी राज्यभरातील हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात. सुर्योदयाला हनुमानाचा जन्म सोहळा पार पडतो . चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते.

बौद्ध धर्म

संपादन

चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येतते. सिंहली मान्यतेनुसार संबोधी प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी भगवान बुद्धांच्या लंका (श्रीलंका) भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस, महावंसच्या मान्यतेनुसार तेथील परंपरा मानते की, बुद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूुोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दुःख, नुकसान , निवारण करावे म्हणून केवळ करुणेपोटी तथागत बुद्ध हयांनी ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केले गेले.

कल्याणीचा नाग राजा मणिअख्खिका जो ययद्धात भाग घेण्यास आला होता, भगवंताजवळ आला आणि म्हणाला – भगवान आपण आपल्या अपार करुणेचा वर्षाव आम्हांवर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशीच करुणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले.

भारतीय मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी सुजाताने बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खीर दिली होती.

हे ही पहा

संपादन