सरस्वती

ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे ; ती या त्रिदेवीपैकी(सरस्वती लक्ष्मी आणि पा
Disambig-dark.svg

सरस्वती (Sanskrit: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे ; ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे.

सरस्वती
Saraswati.jpg

ज्ञान, संगीत, कला, भाषण, ज्ञान आणि शिक्षणाची देवी - इत्यादींची अधिपती देवता

मराठी सरस्वती
संस्कृत सरस्वती देवी
कन्नड ಸರಸ್ವತಿ
तमिळ சரசுவதி
निवासस्थान ब्रह्मलोक
लोक ब्रह्मलोक
वाहन मोर, हंस
पती ब्रह्म
अन्य नावे/ नामांतरे शारदा, शतरूपा, वीणावादिनी, वीणापाणि, वाग्देवी, वागेश्वरी, भारती
मंत्र श्री सरस्वत्यै नमः
नामोल्लेख महाभारत शान्ती पर्व, देवी भागवत,ऋग्वेद
तीर्थक्षेत्रे शृंगेरी शारदा पीठम

चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर तिच्या बाजूला असतो. हातात वीणा असते. सरस्वतीचे वाहन हंस आहे ; पण जैन पुराणांमधून आणि लोककथांमधून सरस्वती वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. (कार्तिकस्वामीचे वाहनही मोर आहे.)

हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी [१] म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.

सरस्वतीचे वर्णन करणार सुप्रसिद्ध श्लोकसंपादन करा

सरस्वती वंदनासंपादन करा

या कुन्देन्दुतुषारहारधवला

या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा

या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा माम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याऽपहा ॥[२]


शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं,

वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌।

हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌,

वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥[३]

संदर्भ यादीसंपादन करा

  1. ^ "वसंत पंचमी". विकिपीडिया. 2019-05-07.
  2. ^ "सरस्वती वंदना या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना॥ या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः … | संस्कृत | Vedic mantras, Hindu mantras, Yoga mantras". Pinterest (इंग्रजी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.
  3. ^ "आरती: माँ सरस्वती वंदना - Aarti Maa Saraswati Vandana". BhaktiBharat.com (हिंदी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

सरस्वती माता की आरती इन हिन्दी - Saraswati Mata Ki Aarti in Hindi. BhaktiSansar.in.