जानेवारी २३
दिनांक
(२३ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३ वा किंवा लीप वर्षात २३ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसोळावे शतक
संपादन- १५५६ - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
- १५६५ - तालिकोटची लढाई - विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा या दखनी सुलतानांनी एकी करून रामरायाचा पाडाव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली.
- १५७९ - युट्रेख्टचा तह मंजूर. नेदरलँड्स अस्तित्वात.
अठरावे शतक
संपादन- १७०८ - छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला व साताऱ्याला राज्याची नवी राजधानी जाहीर केले.
- १७१९ - रोमन पवित्र साम्राज्यात लिच्टेन्स्टेन या राज्याची निर्मिती.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५५ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला.
- १८७० - मोन्टानात अमेरिकन घोडदलाने १७३ बायका व मुलांची कत्तल केली.
- १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला.
विसावे शतक
संपादन- १९२० - नेदरलँड्सने जर्मनीचा कैसर विल्हेम दुसरा याला दोस्त राष्ट्रांच्या हाती देण्यास नकार दिला.
- १९२६ - बॉंबे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेची स्थापना.
- १९३२ - प्रभातच्या अयोध्येचा राजाची हिंदी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने लिब्याची राजधानी ट्रिपोली जिंकले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने पापुआतील जपानी सैन्याचा पराभव केला. येथून जपानी आक्रमक सैन्याची पिछेहाट सुरू झाली.
- १९५० - ईस्रायेलच्या संसदेने राजधानी जेरुसलेमला हलवण्याचा ठराव मंजूर केला.
- १९६८ - उत्तर कोरियाने अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. पेब्लो पकडली.
- १९७३ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने व्हियेतनाममध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा केली.
- १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
- १९९९ - ऑस्ट्रेलियाचा धर्मप्रसारक ग्रॅहाम स्टेन्स व दोन मुलांना हिंदू अतिरेक्यांनी ओरिसात जाळून मारले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १७१९ - जॉन लॅंडन, इंग्लिश गणितज्ञ.
- १७३७ - जॉन हॅन्कॉक, अमेरिकन क्रांतिकारी.
- १८९६ - आल्फ हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.
- १८९८ - पं. शंकरराव व्यास, गायक व संगीतशिक्षक.
- १९१५ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९२० - श्रीपाद जोशी, मराठी साहित्यिक.
- १९२६ - बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
- १९२९ - इयान थॉमसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - लॉरी मेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - आसिफ मसूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - मेगावती सुकर्णोपुत्री, इंडोनेशियाची राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - ओमर हेन्री, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - मार्टिन केंट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - ट्रेव्हर हॉन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - ग्रेग रिची, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ऍडम पारोरे, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १००२ - ऑट्टो तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- ११९९ - याकुब, खलिफा.
- १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट.
- १६६४ - शहाजीराजे भोसले.
- १९१९ - राम गणेश गडकरी, मराठी साहित्यिक.
- १९५९ - विठ्ठल नारायण चंदावरकर, शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित.
- १९६३ - नरेन्द्र मोहन सेन, भारतीय कांतिकारी.
- १९९२ - ह.भ.प. धुंडामहाराज देगलूरकर, भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक.
- २०१० - पं. दिनकर कैकिणी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- देशप्रेम दिवस
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २२ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - (जानेवारी महिना)