वऱ्हाड

(बेरार या पानावरून पुनर्निर्देशित)

वऱ्हाड किंवा बेरार हा महाराष्ट्रातील एक प्रदेश आहे. यात सध्याच्या खानदेशविदर्भातला काही भाग समाविष्ट होते. यात अमरावती जिल्हा, जळगाव, खामगावच्या आसपासचा प्रदेश तसेच अकोला, एलिचपूर, बुलढाणा, वाशीम, बडनेरा, कारंजा, इ. प्रदेशही वऱ्हाडात मोडतो. एलिचपूर ही वर्‍हाडची राजधानी होती.

हा प्रदेश बराच काळ निजामाच्या ताब्यात होता. तो ब्रिटिशांनी जिंकून घेतल्यावर त्याचा समावेश मध्य प्रांतात झाला व त्याजोगे सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार या नावाने प्रांत रचला गेला. भाषावार प्रांतरचनेनंतर वर्‍हाड महाराष्ट्रात समाविष्ट झाले.

विदर्भ म्हणजेच वर्‍हाड असल्याची चुकीची समजून प्रचलित आहे..