२०११ फॉर्म्युला वन हंगाम हा ६२वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात पहिल्या भारतीय ग्रांप्री सह एकूण २० शर्यती होणार होत्या. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे बहरैन ग्रांप्री रद्द करण्यात आली. या हंगामात ब्रीजस्टोन ऐवजी पिरेलीला फॉर्म्युला वनच्या सर्व संघाना टायर पुरवण्याची जवाबदारी मिळाली. हंगामाच्या सुरुवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे. २०११ जपानी ग्रांप्री जिंकून सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद विजेता होण्याचा मान फेटेल ने मिळवला.
२०११ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०११ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]
खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note ४] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note ५]
^फेरारीने पहिल्या ८ शर्यतीत "स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो" नाव वापरले.[९]
^फोर्स इंडियाने “सहारा फोर्स इंडिया एफ. १ संघ” म्हणून शेवटच्या चार ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
^एच.आर.टी.ने "हिस्पॅनिया रेसिंग एफ १ संघ" म्हणून प्रथम नऊ ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
^जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[६५]
^जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[६५]