आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ
(एफ.आय.ए. या पानावरून पुनर्निर्देशित)
फेदेराश्यों ॲंतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील (फ्रेंच: Fédération Internationale de l'Automobile ; लघुरूप: एफ.आय.ए) अर्थात आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आसोसिआश्यों ॲंतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस (फ्रेंच: Association Internationale des Automobile Clubs Reconnus ; लघुरूप: एआयसीर) या नावाने स्थापण्यात आली. विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून एफ.आय.ए.ची सर्वसामान्यांमध्ये परिचित आहे.
लघुरूप | एफ.आय.ए. |
---|---|
स्थापना | २० जून, इ.स. १९०४ |
प्रकार | क्रीडा संघटना |
उद्देश्य | मोटारस्पोर्ट्स |
मुख्यालय | प्लास द ला कोंकोर्द |
स्थान | |
सदस्यत्व | २२२ सदस्य संघटना |
Leader | ज्याँ तोट |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
एफ.आय.ए.चे मुख्यालय पॅरीस, फ्रान्स येथील प्लास द ला कोंकोर्द या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए.मध्ये जगभरातील १२५ देशांमधील २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत. ज्याँ तोट हे एफ.आय.ए.चे अध्यक्ष आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |