सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा २
'मनुष्य हा जन्मभर विद्यार्थिच असतो' या उक्तिशी मि सहमत आहे.'trial and errors' द्वारे हळुहळु शिकत आहे. अजुन नामोहरम झालो नाही.आपण सर्व आहातच त्यामुळे एकटेपणा वाटत नाही. i will be on the right track in a month or two. Thanks 4 help.
bhatkya ०५:५१, ४ ऑगस्ट २००९ (UTC)
महाराष्ट्रातील किल्ले
संपादनआपल्या सूचनेप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील किल्ले साचा :महाराष्ट्रातील किल्ले येथे टाकले आहेत.
त्यांची नावे बरोबर आहेत का?
क्षितिज पाडळकर १३:३५, १५ ऑगस्ट २००९ (UTC)
नम्र विनंती
संपादनकोणी सदगृहस्थ मला खालील साचा बनवून देउ शकेल काय? मी त्याचा अत्यंत आभारी राहील. हा साचा मला औषधी वृक्ष साठी हवा आहे. याने माझे काम सुकर होइल. प्रत्येक वेळेस Cut/Paste त्रासदायक आहे.असा साचा बनवता येउ शकतो काय?
ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
*संस्कृत- *हिंदी- *बंगाली- *गुजराती- *मळ्यालम- *तामिळ- *तेलगु- *इंग्रजी- *लॅटीन- ===वर्णन=== हा एक ===उत्पत्तिस्थान=== भारतात ===उपयोग=== '''सर्वसाधारण''' - '''आयुर्वेदानुसार''' - इत्यादी रोगांवर ===संदर्भ=== [[वर्ग: ]]
औषधी वनस्पती हा साचा तयार आहे. हा कसा वापरावा याचे उदाहरण अंकोल या लेखात दिले आहे.
अभय नातू १७:२८, २० ऑगस्ट २००९ (UTC)
वनस्पती लेख
संपादननमस्कार,
तुम्ही औषधी वनस्पतींवर तयार करीत असलेले लेख पाहिले. छानच!!! माहिती भरताना काही मदत लागली तर माझ्या चर्चा पानावर किंवा चावडीवर जरूर विचारावे.
अभय नातू १६:४८, २० ऑगस्ट २००९ (UTC)
मी आपला अत्यंत आभारी आहे.
bhatkya १७:३५, २० ऑगस्ट २००९ (UTC)
मदत हवी
संपादन- विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी परिष्कृत करण्यात मदत हवी आहे.
माहीतगार ०७:०२, २१ ऑगस्ट २००९ (UTC)
गौरव
संपादनछायाचित्रकाराचा बार्नस्टार | ||
नमस्कार V.narsikar, आपण पुढाकार घेऊन मराठी विकिवर चढवलेल्या वनस्पतींच्या चित्रांमुळे संबंधित लेख अधिक उठावदार होण्यास नक्कीच मदत झाली आहे. तुमच्याकडून असेच योगदान यापुढेही होत रहावे या अपेक्षेसह हा बार्नस्टार सर्व विकिपीडियन सदस्यांच्या वतीने मी आपणास प्रदान करत आहे. क्षितिज पाडळकर १६:५२, २१ ऑगस्ट २००९ (UTC) |
गौरव चिन्हाबद्दल अभिनंदन
संपादन- विकिपीडिया:वनस्पती/नेहमीचे प्रश्न हा नवीन विभाग जोडला आहे,कृपया पाहून प्रश्न कसे वाढवता येतील ते पहावे .कारण बहूतेक वेळा प्रश्नांमध्येच किंवा प्रश्नांमुळेच उत्तरे मिळायला लागतात असे होते. या प्रश्नांबद्दल चावडी व ग्रूप वर शक्य तेवढी व्यापक चर्चा घडवण्याचा मानस आहे.
अशी चर्चा मागेही मी घडवली होती पण ती इतर मराठी संकेतस्थळावर घडवली होती. त्यामुळे लगेच नाही तरी गेल्या तीन वर्षात चर्चेत सहभागी बरीच मंडळी नंतर येथे लिहून गेली किंवा लिहित आहेत.
माहीतगार ०६:४०, २२ ऑगस्ट २००९ (UTC)
font-size
संपादनfont-size:150%; होता font-size:185%; बदलला. पाहून घावे हे बदल तुम्ही सुद्धा करून पाहू शकालमाहीतगार ०७:०८, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
ता.क. कृपया, विकिपीडियात खालील सिंगल डॅशचा उपयोग कमीत कमी करावा असा संकेत आहे. कारण तो संपादकांना एकमेकांना confuse करतो असे आढळून येते.
सहसा नवीन विभागा करता शीर्षक न आठवल्यामुळे असे होत असावे. आपण लिहिलेल्या संदेशातीलच एखादा शब्द == == मध्ये टाकावा. किंवा बरोबरचेचिन्ह == नवीन विभाग== किंवा ==माझे मत== किंवा ==सहाय्य हवे== त्या शिवाय सदस्य नाव कळफलकाच्या डाव्या वरच्या कोपर्यातील (1) च्या डावीकडील तरंग चिन्ह् चार वेळा ~~~~ असे लिहावे नाव लिहीण्याची आवशकता नाही.नाव वेळ आपो आप उमटते. माहीतगार ०७:०८, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
---------------------------------------------------------------------
सहाय्य हवे
संपादनमला इंग्रजीतला साचा:Cleanupimage।explanation हा साचा, (जो खराब/अस्पष्ट छायाचित्रांसाठी वापरला जातो) मराठीत करुन हवा आहे. 'क्षितिज' किंवा कोणी मदत करु शकेल काय?
V.narsikar ०३:१४, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
इंग्रजीतला म्हणजे इंग्रजी विकिपीडियातला ना ? (कारण छायाचित्रांच्या बाबतीत कॉमन्सही बर्याचदा वापरले जाते) ते कळावे.
इंग्रजी विकिपीडियातील पानाला मराठी विकिपीडियात दुवा देताना :en: असे आधी लिहावे. जसे साचा:Cleanupimage।explanation इंग्लिश विकिपीडियातील साचा असेल तर [[:en:Template:cleanupimage]] असे लिहावे en:Template:cleanupimage असे दिसेल किंवा कॉमन्सवरील असेल तर [[commons:Template:cleanupimage]] असे लिहावे commons:Template:cleanupimage असे दिसेल
इंग्रजी विकिपीडियाकडे असलेल्या स्वयंसेवी मनुष्यबळाळाच्या संख्येमुळे तसेच त्या मनुष्यबळाच्या तांत्रिक कौशल्यामुळे इंग्रजी विकिपीडियात वावरणार्या लोकांकरिता ते साचे खूप वाचन-सुलभ झाले आहेत पण ते (त्यांचा विस्तार,संख्या आणि क्लिष्टता) विशेषतः दुसर्या भाषिक विकिपीडियांसमोर एक आवाहन आ वासून उभे आहे. या संदर्भात,खास करून चर्चा पानावरील प्रकल्प संयोजन साचांच्या बाबत मी अगदी अलीकडे गेल्याच आठवड्यात बाकी भारतीय भाषी विकिपीडियन काय करत आहेत याची इमेल लिस्ट वर चर्चा घडवून आणली. अर्थात इतर जर्मन फ्रेंच जपानिज विकिपीडिया काय करत आहेत याची माहिती घेण्याचाही मानस आहे.
कन्नड आणि मल्याळम विकिपीडियन्स च्या प्रतिसादांचा सारांश.
- साचाचा वाचकास दर्शनिय भाग आधी जसा दिसतो तसा भाषांतरीत करून घ्यावा.
- इंग्रजी साचे इंग्रजी नावां सहीत त्यांच्या सर्व उपसाच्यांसहीत आपआपल्या स्थानिक विकिपीडियात घ्यावेत.
- वाचकास दर्शनिय भाग आधी बदलावा.
- कालौघात उरलेले भाषांतर करावे.
- सर्व साचे व्यवस्थित चालताहेत असे पाहून ते स्थानिक भाषेच्या शिर्षकपाना कडे स्थानांतरीत करावेत.
- नंतर जिथे त्यांचे दुवे दिले आहेत त्या त्या पानावर बॉट ने तीथे स्थानिक भाषेतील रूपे वापरावीत
- हे करताना इंग्रजी विकिपीडियाती templatesच्या /doc पानावर आपल्या भाषेतील साचाचा आंतरविकि दुवा द्यावयाचे विसरू नये
- हे करताना कुठेही इंग्रजी भाषेतून घेतलेल्या पानाचा आंतरविकि दुवे देणे विसरू नये.
माहीतगार ०७:३५, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
माहीतगार ०७:०८, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
_____________________________________________________________________________________________
(१)
वर्ग:साचा जीवचौकट ची गरज असलेले वनस्पती लेख
संपादनtrend-कल(कलणे)/झुकाव
synonyms-समशब्द/समानार्थी
हे योग्य वाटल्यास वापरावे.
bhatkya ०६:०८, १६ ऑगस्ट २००९ (UTC)
(२)कृपया'वर्ग:साचा जीवचौकट ची गरज असलेले वनस्पती लेख' हा साचा दुरुस्त करा
संपादनकृपया यातील (नाव = ) व(शास्त्रीय वर्गीकरण = ) तपासावे. ते (;"। नाव) आणी (;"।शास्त्रीय वर्गीकरण) असे दिसते.बघा=आले,लाजाळु,अंजन
V.narsikar १६:३५, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
- इकडे बघतो आहे.गाडगीळ सरांचेही या संदर्भात एक इमेल आले ते मी त्यांना पाठवलेल्या उत्तरासहीत इमेल करेन.माहीतगार १३:१५, २५ ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:चर्चापान साचे
संपादनइंग्रजी विकिपीडियातून शोधलेल्या विकिपीडिया:चर्चापान साचे लेखाचे भाषांतरात आपला सहयोग होऊ शकला तर बघावे. आपल्याला हवे असलेल्या साचांच्या निर्मिती करताना थोडी मदत होऊ शकेल. माहीतगार १३:१५, २५ ऑगस्ट २००९ (UTC)
- Thanks for prompt helpमाहीतगार १४:३६, २६ ऑगस्ट २००९ (UTC)
क्लिष्ट साचे बनल्यानंतर सोपे जातात. पण बने पर्यंत शब्द कोडे सोडवल्याचा अनुभव येतो :) . साचे विषयक खालील सहाय्य लेखांमध्येही भाषांतरातही जमेल तसे सहकार्य हवे आहे.काही ठिकाणी मला माहीत असलेले तांत्रिक शब्द बदलून ठेवले आहेत.
माहीतगार १२:२५, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
- मशिन ट्रान्सलेशन करिता मुख्यत्वे मी Baraha Pad मध्ये कंट्रोल H ने Find- Replace करून करतो अर्थात Replace All वापरताना बरिच काळजी घ्यावी लागते.(फायरफॉक्स मधील कंट्रोल F कंट्रोल V वापरून सुद्धा बर्याचदा करतो)
विकिपीडिया:साचांचे दस्तएवज मध्ये मी असे केले आहे. त्यामुळे मशिन ट्रान्सलेशन प्रकरण पुढच्या सुधारणा करताना तुम्हाला किती सहाय्यभूत ठरले याचा खरे तर प्रतिसाद हवा आहे म्हणजे पुढे ते किती आणि वापरावे याचा मला अंदाजा येईल.
- mw:Help:Extension:ParserFunctions चे मिडियाविकिवर भाषांतर mw:Help:Extension:ParserFunctions/mr येथे चालू केले आहे ते पूर्ण झाले की मराठी विकिपीडियावर आणेन.
धन्यवाद माहीतगार १५:१४, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
होय हवे तर आहे
संपादनचुकले तरी बिनधास्त करा.चुकत चुकतच जमत जाते.जीव चौकटीला धूळपाटीवर तात्पुरते म्हणून काम घेतले, आणि कदाचित इंग्रजी विकिपीडिया पेक्षा चांगले करू आणि सध्याच्या गोष्टींनाही जुळवून घेईल असे वाटत आहे. माहीतगार १६:१८, २६ ऑगस्ट २००९ (UTC)
अभिनंदन
संपादनएक छोटे भाषांतर करून पूर्ण झाले
संपादननमस्कार
हे सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता एक छोटे भाषांतर करून पूर्ण झाले आहे. या सहाय्य पानातील माहिती उमगण्यास कितपत सोपी आहे किंवा अवघद आहे ते रिकाम्या धूळपाटीवर प्रयोग करून बघून कळवावे.
माहीतगार १५:५५, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
अजून एक सोपे भाषांतर
संपादनमी अजून एक सोपे भाषांतर विकिपीडिया:धूळपाटी९ येथे थोडे केले आहे, तुम्ही शिल्लक भाषांतर निपटून घ्या, मी जरा मॉठे आणि क्लिष्ट हाताळतो . माहीतगार ०६:१८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
जीवचौकटीचे सोपेकरण
संपादन१)बरीचशी मंडळी विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पपानावर डायरेक्टली पोहोचत आहेत.विकिपीडिया:साचे ही कल्पना पूर्ण पणे नवीन असते. त्यांना ती माहीत व्हावी आणि माहीत करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा. २) या विभागास प्राजक्ता आणि गाडगीळ सर आणिक कितीतरी बरीच तज्ञ मंडळी भेट देत आहेत. तुम्ही बदल कसे घडवले ते त्यांनाही जरूर सांगावेत, - परंतु तुम्हाला जे बदल जमले त्या बदलांना मर्यादा आहेत साचा:जीवचौकट च्या पॅरामीटर्सच्या बाहेर जाऊन ते बदल लेखात घडणार नाहीत.साचा:जीवचौकट पॅरामीटर्सच्या क्लिष्ट आहेत; ह्या मंडळींना दोन प्रामुख्याने अडचणी आहेत, यातील सध्याची जीवचौकटीत वापरलेले शब्द त्यांना जसेच्या तसे मान्य होणे अपेक्षीत नाही , दुसरे त्यांना नेमके मराठी शब्द कोणते वापरावयाचे यावर त्यांचा येत्या काळात बराच खल होत रहाणार आहे.आणि साचा:जीवचौकट किचकट पॅरामीटर्स रोज बदलणे शक्य होणार नाही म्हणून मी नवीन साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण प्रणालीची व्यवस्था केली आहे.
हि नवीन प्रणाली समजून घेण्याच्या आधी जीवचौकट मध्ये अडचणी का येत आहेत हे आधी समजावून घेऊ.
जीवचौकट हा साचा ज्या लेख पानात दिसतो त्यात तुम्ही माहिती भरता ती सोडून ते एक वस्तुत: प्रतिबिंब आहे. विकिपीडियातील सर्व विकिपीडिया:साचे आंतर्न्यासित (Transclude) झालेले एक प्रतिबिंब असतात.
समजा एका आरशात मी चंद्राची प्रतिमा पहात आहे बदल करण्याचे माझ्याकडे जे मार्ग आहेत एक मी चंद्र आरशात चंद्र जीथे दिसतो त्याच्याच बाजूला चांदणी चिटकवतो (सध्या आपल्या या चांदण्या चिटकत नव्हत्या त्या तुमच्या प्रयत्नामुळे जमत आहेत असे दिसते) ; परंतु मला मुळ चंद्राचाच आकार लहान मोठा करावयाचा असेल किंवा त्याचा रंग बदलणे इत्यादी बदल करावयाचे असतील तर ते चंद्रावरही करू शकतो.
आपला जीवचौकट साचा (चंद्र) आकाशातल्या चंद्रा सारखा दुर नाही तो विकिपीडियाच्या आतच आहे. विकिफ्डिया लेखातील वापरलेल्या साचांची यादी तो लेख संपादनासाठी उघडल्या नंतर लेखाच्या तळाशी दिसते.
आता आपण साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण कडे वळू
अपल्याला {{ वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण }} साचा येथे दिल्याप्रमाणे कोणत्याही वनस्पती लेखात लावता येईल , तो लावल्या नंतर लेखात उजवी कडे तो खालील प्रमाणे लेखाचे नाव आपोआप घेईल
V.narsikar/जुनी चर्चा २ |
---|
जीवचौकट (चर्चा २/जीवचौकट संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
उदाहरणे
- लेख बहावा
साचा:बहावा/चित्र जीवचौकट (संपादन)[लपवा]
साचा:बहावा/जीवचौकट वनस्पती प्रकल्प (संपादन)[दाखवा]
साचा:बहावा/चित्र ही लिंक उघडून तीथे आपल्याला बहाव्याचे चित्र जतन करता येईल.
त्यानंतर साचा:बहावा/जीवचौकट ही लिंक उघडून तीथे {{Subst:वनचौकट}} हे साचा:बहावा/जीवचौकट पानावर जतन करावयाचे आहे.त्या नंतर तुम्हाला वनचौकटीतील माहिती लेखात खालील प्रमाणे दिसेल. याचा फायदा असा की या तक्त्यातील माहिती साचा:बहावा/जीवचौकट येथे जाऊन कुणालाही सहज पणे बदलता येईल सध्याची नावे बदलणे/नवीन नावांची भर टाकणे/ नको असलेली नावे काढणे इत्यादी गोष्टी टेबल फॉर्मॅट असल्यामुळे सहज करता येतील.
एकदा का इंग्रजी -मराठी शब्दांचे प्रमाणी करण झालेकी नंतर आपल्याला आपल्या सवडीने तांत्रीक दृष्ट्या किचकट असलेल्या साचा:जीवचौकट चे प्रमाणीकरण प्राणी आणि वनस्पतीशास्त्र तज्ञांच्या सहमतीने घडवता येईल असा बेत आहे..
काही शंका / सुचना असतीलतर जरूर कळवणे
माहीतगार १२:०८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
तीळ
संपादनआता तीळ लेख पुन्हा एकदा बघा चित्र येत आहे. माझी पद्धत आधीच्या साचा:जीवचौकट प्रमाणे ऍड्व्हान्स नाही साचा:तीळ/चित्र मध्ये तुम्ही इतरत्र सारखे [[चित्रःचित्राचेनाव|इवलेसे|चित्राची माहिती]] असेच लिहावे माहीतगार १४:५५, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
- त्रास मुळीच नाही उलट माझे प्रयोग तुम्ही करून लगेच प्रतिसाद मिळाल्यामुळे सहाय्य देण्यात मी नेमका कुठे कमी पडलो ते लक्षात येते. सर्वांच्या चर्चा पानावरील माहीतीच नंतर मी नेहमीचे प्रश्न मध्ये संकलीत करत असतो.
माहीतगार १५:०६, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
हे भाषांतर सोबत करूयात ?
संपादनसर्वांना माहिती चौकटीत काय होते आहे हे समजणे कदाचित साचा:Infobox/doc आणि साचा:माहितीचौकट/doc पानाच्या भाषांतरामुळे सोपे जाईल.माहीतगार १२:५७, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
वर्गःसंचिका
संपादननमस्कार,
इतर आवश्यक वाटलेली सहाय्य पाने बनवण्यात व्यस्त होतो त्यामुळे तुमच्या शंकेचे तत्काळ उत्तर देऊ शकलो नाही, क्षमस्व.
मराठी विकिपीडियात पुरेशा संपादनबळा अभावी चित्र संचिकांची बोटांवर मोजण्या पलिकडे वर्गीकरणे झालेली नाहीत. जी काही (बोटावर मोजण्या एवढी) झाली आहेत ती वर्ग:संचिका येथे आढळतात.हि वर्गीकरणे कशी करावीत या बद्दल सदस्य:अभय नातू यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळू शकल्यास पहावे.
तुमच्या प्रमाणेच हे काम बाकी असल्याची जाणीव सध्या विकि रजेवर असलेले सदस्य:Sankalpdravid यांना झाली होती असे दिसते. त्या मुळे वर्ग:संचिका येथे संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस स्पष्ट होतो. त्यामुळे किमान आज मी या बद्दल एक प्रकल्प पान सुरू केले.
या बद्दल आपण नव्याने वर्गिकरण निती सुचवू शकता किंवा इंग्रजी विकिपीडिया आणि कॉमन्सवर सध्या वर्गिकरणे चित्र वर्गीकरणे कशी पार पाडली जातात ते सुद्धा अभ्यासू शकतात.
माहीतगार ०७:३९, २ सप्टेंबर २००९ (UTC)
- नमस्कार,
- विकिपीडियावर संचिका व चित्रांचे वर्गीकरण करताना खालील नियम पाळावे.
- ०. फक्त मराठी विकिपीडियावर चढवलेल्या चित्रांचेच वर्गीकरण करावे. कॉमन्सवरील चित्रांचे वर्गीकरण करू नये.
- १. शक्यतो सगळ्या संचिका व चित्रांचे वर्गीकरण करावे. एक चित्र अनेक वर्गांत बसत असेल तर सगळ्या वर्गांत त्याचे वर्गीकरण करावे.
- २. चित्रांसाठी वर्ग तयार करताना वर्गनावास चित्रे हा प्रत्यय लावावा, उदा. पोस्टर चित्रे, क्रिकेट चित्रे, इ.
- ३. चित्रांना विषयानुरुप वर्गांत घालावे. उदा. भारतीय रेल्वे चित्रे. असे वर्ग नसतील तर तयार करावे. अनेक चित्रे असतील किंवा असू शकतील असेच वर्ग तयार करावे. दोन-चार चित्रे असतील असे वर्ग तयार करू नयेत. - भारतीय रेल्वे चित्रे ठीक, पण भारतीय रेल्वेची पिंपरीजवळील चित्रे उचित नाही. अर्थात, पिंपरीजवळील रेल्वेची अनेक चित्रे चढवल्यास हा ही वर्ग तयार करावा. या नियमामागे वर्गसंख्या कमी करण्याचा हेतू नसून वर्गवृक्ष सुटसुटीत ठेवणे हाच आहे.
- ४. प्रत्येक नवीन वर्गाला अंततः विकिपीडिया चित्रे हा मूळ वर्ग असावा - उदा. भारतीय रेल्वे चित्रे --> भारत चित्रे --> विकिपीडिया चित्रे. किंवा भारतीय रेल्वे चित्रे --> रेल्वे चित्रे --> विकिपीडिया चित्रे. एखाद्या चित्रवर्गापासून विकिपीडिया चित्रे वर्गापर्यंत अनेक मार्ग असू शकतात.
- चित्र नसलेल्या संचिकांचे (.wmv, .ogg, .mp3) विकिपीडिया चित्रे च्या वर्गवृक्षात वर्गीकरण करू नये. अशा संचिकांना वरीलप्रमाणेच नियम लागू होतात पण त्यांचे मूळवर्ग विकिपीडिया ध्वनिसंचिका, विकिपीडिया चलचित्रसंचिका, इ. असतील.
- वरील नियम सदस्यांच्या सूचनांनुसार बदलतील. बदलल्यास चावडीवर सूचना देण्यात यावी.
- अधिक माहिती हवी असल्यास किंवा वरीलपैखी एखादा नियम स्पष्ट नसल्यास माझ्या चर्चापानावर संदेश ठेवालच.
- अभय नातू १९:१०, २ सप्टेंबर २००९ (UTC)
ठिकाय बघतो
संपादन- ठिकाय बघतो आणि सांगतो, पण खरेच तुम्ही आणि अभय नी या वीषयावर चर्चा केली हे लक्षात आले पण इतर सहाय्य साचांच्या निर्मितीतील व्यस्ततेने पूर्ण कॉन्संट्रेट करू शकलो नाहिये या बद्दल क्षमस्व.
सर्वच विकिपीडियन्सना या चर्चेचा लाभ व्हावा म्हणून अभयनी चर्चा विकिपीडिया:चावडी येथे नेली आहे तेव्हा या विषयावरील प्रतिसाद तेथे देत आहे.माहीतगार ०७:२८, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनचावडीवरच्या चर्चा आटोपल्यावर मग बघु.
V.narsikar ०७:५६, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
- तीथे प्रतिसाद नोंदवला आहे माहीतगार ०८:०५, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनविकिएडीट 1.4.0
संपादनविकिएडीट 1.4.0 हे साधन आपण वापरून पाहिलेले नसल्यामुळे तुम्हाला ते भाषांतर अवघड गेले असते म्हणून मी आज भाषांतराची विनंती केलेली नव्हती तरी पण आपण स्वतःहून भाषांतरात सहभाग दएऊन मदत केलीत बरे वाटले. धन्यवाद. माहीतगार १४:२८, ८ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादननमस्कार,
तुम्ही माझ्या केयरटेकर या स्टार ट्रेक:व्हॉयेजर लेखातील चुका सुधारल्या बद्दल, खूप खुप धन्यवाद!!
- --प्रशांत शिरसाठ १२:५२, ९ सप्टेंबर २००९ (UTC)
भाषाशास्त्र इतिहास
संपादन- भाषाशास्त्र#इतिहास येथे पहीले दोन परिच्छेद संस्कृताच्या भाषाशास्त्र इतिहास संदर्भाने येत आहेत कदाचित आपल्याला भाषांतर करण्यास आवडेल. त्या विषयास बाकी सुद्धा बर्याच मराठी शब्दांची आवश्यकता आहे. आणि बाकी व्याकरण आणि भाषाशास्त्र विषयातील इंग्रजी विकिपीडियातील भाषांतरे हे मराठी भाषा आणि मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने प्राधान्याचे भाग आहेत. आपला सहयोग जमेस धरतो आहे.
माहीतगार १४:५६, ११ सप्टेंबर २००९ (UTC)
- भाषाशास्त्र होय मला कल्पना आहे.या विषयात म्हणूनच मी आपल्याशी सुरूवात भाषाशास्त्र#इतिहास पासून केली.मराठी भाषा तज्ञ सुद्धा मोजकेच असावेत. गरज मराठी भाषेच्या प्राध्यापकांची अथवा विद्यार्थ्यांची कमी पण आपल्या सारख्या भाषांतरे करणार्यांची आणि मराठी वापरू इच्छिणार्यांची अधिक आहे.मराठी टिकवण्याकरता प्रवाहा विरूद्ध पोहतच आहोत तर ते व्यवस्थित पोहले तर आपल्या श्रमाचे चीज होईल असे माझे व्यक्तिगत मत आहे म्हणून हा प्रपंच.
मशिन ट्रान्सलेशन आणि इतर भाषांतर यूक्त्या तयार नाही केल्या तर जगातील अद्यावत ज्ञान मराठी भाषेत तत्काळ उपलब्ध नाही केले तर लोक इंग्रजी भाषेच्या मागे पळतच रहाणार. आणि भाषांतरे दर्जेदार आणि वेगाने होऊन हवी असतील तर तंत्रज्ञांना भाषाशास्त्राचे आणि व्याकरणाचे सर्वंकश ज्ञान उपलब्ध करावयास नको काय?
कदाचित आपण भारतीयांना कधी भारताबाहेरचे प्रदेश जिंकुन तिथल्या लोकांशी त्यांच्या भाषेत संपर्क करावयास लागला नाही. आम्ही आमचे धर्म ग्रंथ जगातील इतर भाषेत उपलब्ध व्हावेत म्हणून प्रयत्न जे काही केले ते केवळ बौद्ध धर्माच्या योगाने त्यातही त्या त्या प्रदेशाचे लोक पाली शिकले आपण काही तीबेटी,सिंहली,चिनी भाषेच्या व्याकरणाचा त्याकरिता अभ्यास केला नाही.
मराठी विकिपीडियाकरिता मराठी भाषेचा अभ्यास करताना काही मह्त्वाच्या ट्प्प्यांचे अभ्यासाचे क्रेडीट इंग्रजांना आणि फ्रेंचाना जाते असे लक्षात आले. ते एकोणिसाव शतक होत. इथे गणेश , विठ्ठलच नव्हे तर साक्षात मराठी भाषे बद्दलचे साहीत्य इत्यादी लेख आम्ही इंग्रजी विकिपीडियाच्या दर्जा पर्यंत पोहोचवू शकलो नाही आहोत.
ज्ञान असेल तर भाषा टिकेल लोक येऊन वाचतील.आपल्याकडे संपाद्कांची संख्या कितीही वाढवली तरी मशिन ट्रान्सलेशन आणि इतर विवीध यूक्त्यांचा वापर न करता आपण इंग्रजी भाषेच्या पासंगालाही पुरणार नाही. त्यातच मराठी लोकांच्या भाषा प्रेमाबद्दल मी तरीकुठे बोलू शकतो.माझीही मुले इंग्रजी माध्यमातच शिकतात. घरी टाईम्स ऑफ इंडीयाच वाचतो.
खूप दिवसा पासूनचे मनातील विचार मोकळे करण्यास एक संधी तुमच्या प्रतिक्रीयेनी दिली. घडेल तेवढे करू बाकी उपरवाले की मर्जी.
121.247.66.174 १३:४८, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
हजार एक एंट्रीचे विक्शनरीचे आवश्य्यक काम करण्यात गुंतलो आहे=
संपादन- एक दोन् दिवसात लक्षय घालतो.माहीतगार १०:१३, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
धुळपाटी न
संपादननमस्कार,
धुळपाटी न हे पान सदस्य:V.narsikar/धुळपाटी न येथे स्थानांतरित केले तर चालेल का? धुळपाटी न हे पान विकिपीडियाच्या मुख्य नामविश्वात आहे व लेख धरले जाते. सदस्य पानाखाली स्थानांतरित केले असता इतर काही बदल होणार नाही.
अभय नातू १६:४०, १७ सप्टेंबर २००९ (UTC)
होय. जरुर चालेल. stretgic planning चे भाषांतर तेथे करत आहे,१ पान झाले आहे. कारण त्याचे मुख्य पान edit साठी open होत नाही. कृपया ते योग्य जागी transfer करावे ही विनंती.
V.narsikar
तीथे नवी बीटा व्हर्शन इम्प्लीमेंट केली जाते आहे असे दिसते काल मलाही थोडी समस्या आली पण Alt+ Shift+ e असे एकत्र दाबून मी ती केली. आज काही प्रॉब्लेम जाणवला नाही.माहीतगार ०५:०८, १८ सप्टेंबर २००९ (UTC)
- strategy वरील भाषांतर मदतीकरिता धन्यवाद!
थॅंक्स, बाकीचे भाषांतर मी करून घेईन काळजी नसावीमाहीतगार ०५:१३, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
संपादनमोक्षगुंडम विश्वेश्वरैया येथील माहिती चौकटीत सुयोग्य बदल केले सवडीने तपसून घ्यावेमाहीतगार १२:४९, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
Proof reading of FUEL entries
संपादन- po येथील ६००च्या आसपास फ्यूएल एंट्रीज मराठी विक्शनरीतःस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी तथे स्थानांतरीत करून् झाल्या आहेत उपसंपादकाच्या म्हणजे माझ्या डुलक्या लागलेल्या जागा शोधुन मुद्रण शुद्धी म्हणजे प्रूफ रिडींग मध्ये सहाय्य हवे आहे. माहीतगार ०४:५०, २२ सप्टेंबर २००९ (UTC)
- बापरे तुम्ही तर हे काम फारच वेगाने तडीस नेले या बद्दल धन्यवाद. हे काम झाल्या नंतर विक्शनरीच्या संदर्भात माझे एक रेंगाळलेली इतर काही कामे आहेत पण तुमच्या मनातील इतर विकिपीडियावरील योगदान योजना केलेल्या कामात मी सतत व्यत्यय तर आणत नाही असे वाटल्यामुळे एक मन सांगते आहे की माहीतगार आवरते घ्या.
माहीतगार १४:३१, २२ सप्टेंबर २००९ (UTC)
भारतीय इतिहास
संपादनधन्यवाद. विकीपीडियामध्ये भरण्याजोगा भारतीय इतिहास हा मोठा विषय आहे . अजून भरपूर काम करायचे आहे. मदत केव्हाही चालेल आणि कोणत्याही स्वरुपात.
अजयबिडवे ११:३६, २४ सप्टेंबर २००९ (UTC)
लेखाच्या भाषांतरा बद्दलचा नवा प्रयोग
संपादनआपण लाळ या लेखात भाषातरास सहाय्य केल्या बद्दल धन्य्वाद. आपण अनुभवल्या प्रमाणे इंग्रजी विकिपीडियातील लेख घेऊन त्यातील वाक्ये पूर्णविराम अर्ध विराम कॉमा and आणि or ह्या अव्ययांच्या टिकणी तोडून तक्त्याच्या स्वरूपात भाषांतरांकरिता उपलब्ध करून देण्याचा हा माझा पहीलाच प्रयत्न होता. तुम्ही त्यात भाषांतराचा प्रयत्न केल्या मुळे असे तक्त्यात रूपांतरण केल्यामुळे भाषांतरअस तुम्हाला सुलभ वाटले का कठीण वाटले या बद्दल् तुमचे स्पष्ट मत कळवलेत तर बरे होईल म्हणजे पुढेही असा मार्ग अनुसरावा किंवा नाही या बद्दल निर्णय घेणे सोपे जाईल.
Mahitgar १२:०३, २७ सप्टेंबर २००९ (UTC)
The Rosetta Barnstar
संपादनमराठी विकिपीडिया ज्ञानकोशात अनुवाद/भाषांतरणे करून वैशिष्ट्यपूर्ण भर घातल्या बद्दल मी हे रोसेट्टा निशाण आपल्याला बहाल करत आहे. | ||
संदेश Mahitgar ०८:५५, ३० सप्टेंबर २००९ (UTC) |
Speed
संपादनही ही! धन्यवाद. भारतीय महामर्गांवर बिल्कुल लेख नव्हते, म्हणुन मागच्या १ महिन्यापासुन लेख तैयार करत होतो. आज, सुरवातीचे template तैयार झाले, म्हणुन सुरवात केली. तुमच्या आधाराबद्द्ल धन्यवाद! अजुन खूप काम करायाचे आहे :) प्रशांत शिरसाठ १३:३२, ३० सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनतुम्च्या चांगल्या प्रोस्थाहनाबद्दल खूप खुप धन्यवाद. अश्या प्रोस्थाहनाने, अजुन जास्त काम करावेसे वाटते, व मी करत राहीन, तुमच्या अमुल्य सहभागाने!!! --प्रशांत शिरसाठ ०६:४३, १ ऑक्टोबर २००९ (UTC)
बार्नस्टार
संपादनहो मागची एक बॅच बरेच कामकरून विश्रांती घेत असताना दुसरी पूर्ण नवीन बॅच आली आहे खरी आणि त्यांनीही पहाता पहाता खूप कामकेले त्यामुळेच मला वातते अभय नातूंनी बार्नस्टार सुविधेची आठवण दिली. हे बार्नस्टार तुम्ही सुद्ध इतरांना देऊ शकता .त्यात काही बंधने नाहीत केवळ सदिच्छा आहेत.
बाकी सध्या मी *गूगल सादरीकरण जे तुम्ही सुद्धा बदलू शकता या दुव्यावरील एका पॉवर पॉंईंट वर काम करत आहे. अजून सुरवातीची स्टेजच आहे पण तुम्हालाही पहाता यावे म्हणून देत आहे. सुयोग्य बदल कर्ण्यास नेहमीप्रमाणेच स्वागत आहे. Mahitgar १५:२०, ३० सप्टेंबर २००९ (UTC)
२५,००० चा टप्पा
संपादनहर्दिक अभिनंदन, माझ्या स्टार ट्रेक:द नेक्सट जनरेशन ह्या लेखाने, २५,००० चा टप्पा आज आपण सगळ्यांनी गाठला!!! :)
--प्रशांत शिरसाठ ०८:०३, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनआपल्या अभिनंदनपर संदेशाबद्दल धन्यवाद. विकिपीडियाच्या यशात आपल्या (सगळ्यां) सारख्या उत्साही सदस्यांचाच वाटा सगळ्यात मोठा आहे. असे अनेक सदस्य एकमेकांना मदत करीत येथे ज्ञानात भर घालत असल्याचे पाहून काम करण्यास अजून हुरुप येतो!
अभय नातू १५:३६, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनआपण माझ्यासाठी विशेष मदतीचा हात देऊ केल्याबद्दल आपले आभार मानतो. असेच प्रेम असू द्या. मला कधीही मदत लागली तर मी नि:संकोचपणे आपल्याला कळविन. Gypsypkd १२:११, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)
सहाय्य विनंती
संपादनसहाय्य:विस्तार:पृथकककारके या सहाय्य पानात तुमच्या सवडीने,सहज जमेल तेवढे भाषांतरात सहाय्य हवे आहे.
आपला Mahitgar ०७:५६, ११ ऑक्टोबर २००९ (UTC)
सही आणि टोपण नाव
संपादनविशेष:पसंती पानावर जाऊन तुम्ही तुमचे टोपणनाव टाकू शकता किंवा बदलू शकता.म्हणजे प्रत्येक वेळी टाईप करण्याची आवश्य्कता रहाणार नाही. तसेच सही करण्याकरिता तुमच्या संगणक कळफलकावरील डावीकडे वरच्या कोपर्यात Esc कळीच्या खाली, 1 च्या डावीकडे टॅबच्यावर ~ हे तरंगचिन्ह असते ते ~~~~ असे चार वेळा दाबून जतन करावे म्हणजे तुमची सही आपोआप उमटते.
विजेचा लपंडाव
संपादनभाषाशास्त्र यामधील सुमारे ५० मिनिटे बसुन online केलेले एक मोठे भाषांतर विज गेल्यामुळे उडले. इकडे याचा फारच त्रास आहे हो. Link लागल्यावर प्रत्येक वेळेस save करण्याचे भान रहात नाही. यात, autosave option नाही काय? एका विशिष्ट वेळेनंतर (preset time) ऑपरेट होइल असे? असेल तर कृपया मदत करा ही नम्रतापूर्वक विनंती.
अल्पमती ११:०१, १४ ऑक्टोबर २००९ (UTC)
- तुमच्या प्रयत्नावर असा वीजेने केलेला खेळखंडोबा वाचून वाईट वाटले, हा प्रॉब्लेम मला सुद्धा भेडसावतोच, तुमची सूचना येथे मांडू शकता त्या शिवाय स्ट्रॅटेजी विकिवरही प्रस्ताव ठेवता येईल. विकिपीडिया:मेलिंग लिस्ट च्या माध्यमातूनही तुम्हाला या विषयावर चर्चा घडवता येईलकिमान एक चांगला विषय सुरू होईल.
खरेतर अशाच इंटरनेट कनेक्शन इंटरप्शन प्रॉब्लेममुळे विकिपीडिया तुमच्या संगणकावर कूकीज मेंटेन करते त्यामुळे एखादवेळेस पान जतन नाही होऊ शकले तरी बॅक कळीवर जाऊन तुम्हाला तुम्ही टाईप केलेले बर्याचदा जसेच्या तसे वापस प्राप्त होते. प्राप्त परिस्थितीत कळफलक शॉर्टकट्सवापरून मध्ये मध्ये सेव्ह करण्याची सवय ठेवणे बरे पडते.त्या शिवाय मोठे सलग लेखन झाले तर जतन करण्यापूर्वी Ctrl +A आणि Ctrl +C करून ठेवणे.
त्या शिवाय मी सुद्धा अधून मधून भाषांतर करावयाचा परिच्छेद गूगल डॉकूमेंट्स वरही नेतो .मजकूर तीथे नेऊन भाषांतर करण्याचा माझा उद्देश वेगळा (रिप्लेस ऑल सुविधा) जरी असला तरी स्वयमेव-जतन करण्याचे काम आपसूक होतेच.
अर्थात स्वयमेव-जतन पद्धती तातडीने अमलबजावणीत मला मुख्यत्वे दोन-तीन शक्य आडचणी कडे निर्देश करावयास आवडेल. एकतर स्वयमेव-जतन पद्धतीत मला वाटते सर्व पातळींवर बँड विड्थ जास्त लागत असावी. उपयोगकर्ता म्हणून आपल्या संगणकाची हार्डवेअर कपॅसिटीपण अधीक असावयास हवी.आपल्या सारख्या विकसनशील देशात अजूनही नव्व्द टक्के लोकांकडे अशी हार्डवेयर कपॅसिटी आहेका या बद्दल मला शंका आहे. मी स्वत: गूगल डॉक भरपूर वापरले आहे. पण हार्डवेयर प्रॉब्लेम मुळे बर्याचदा माझा संगणक हॅंग होण्याचा अनुभव घेतला आहे.
दुसरा प्रॉब्लेम विकिमीडिया फाऊंडेशन च्या बाजूने यावार काय इन्व्हेस्टमेंट लागेल याची मला व्यक्तिशहा कल्पना नाही.विकिमीडिया फाऊंडेशन हि केवळ डोनेशन्सवर तगून असलेली संस्था आहे. आणि लगेच असा खर्च पेलवेल का नाही माहित नाही पण चर्चा न छेडण्यापेक्षा छेडणे चांगले.
Mahitgar १३:२३, १४ ऑक्टोबर २००९ (UTC)
उ. : दिवाळीच्या फराळाचे पदार्थ
संपादन- ) .. हो ना, योगायोग खरा!
बाकी, तुम्ही स्वतः निर्मिलेल्या व मराठी विकिपीडियावर चढवलेल्या चिवडा, बेसनाच्या लाडवांच्या व बुंदीच्या लाडवांच्या संचिका पाहिल्या. त्या तुम्ही थेट विकिमीडिया कॉमन्स येथे चढवल्यात, तर सर्व भाषांतील विकिपीडिया, विक्शनरी वगैरे विकिप्रकल्पांतून त्या वापरता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०१:४७, १९ ऑक्टोबर २००९ (UTC)
क्षमस्व
संपादननमस्कार नरसीकर,
माझा काहीसा गोंधळ झाल्याने मी आता इकडे लिहिलेला उपसंदेश हटवला आहे. वर लिहिलेल्या कालच्या संदेशात विकिमीडिया कॉमन्स संकेतस्थळाचा दुवा जडवायचे काम नीट केले नव्हते, ते आता दुरुस्त केले आहे. कृपया माझा कालचा वरील संदेश पुन्हा पाहा.
बाकी, तुम्हांला जर स्वतः काढलेली चित्रे चढवायची असतील, तर वर दिलेल्या विकिमीडिया कॉमन्स सामायिक विदागारात चढवणे उत्तम राहील.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०१:१०, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
स्वच्छता मोहीम
संपादनस्वच्छतेला कसली हरकत! हे तर महत्वाचे काम आहे, म्हणूनच मी खास तुमच्यासाठी हा बार्नस्टार तयार केला आहे. काही न्याहाळकांवर या साच्यातील उप-संपादकाचा या शब्दातील अनुस्वार नीट दिसत नाही. हा उसंडुचा प्रकार नसून न्याहाळकातील क्षती आहे. :-)
अभय नातू १६:२८, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
अभिनंदन
संपादनअगदी अलिकडे पर्यंत तुम्ही साचे वापरताना पुरेसे कम्फर्टेबल नाही असे वाटत असे , तुमच्या आजच्या संपादनांकडे पाहून तुम्ही साचे वापरताना आणि संपादीत करताना पूर्वीपेक्षा अधिक कम्फर्टेबल वाटत आहात हे पाहून बरे वाटले. माहितगार १४:०२, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)
- सोबतच आवश्यक तीथे {{विकिकरण}} हा साचा लावण्याबद्दलसुद्धा विचार करता येईल.
#REDIRECT [[Article Name]] च्या एवजी #पुर्ननिर्देशन [[Article Name]] असे लिहिलेतरी जमेल. अर्थात तुमच्या आवडी प्रमाणे.माहितगार १६:०७, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)
राम नारायण भाषांतर
संपादनया पानाचा इतिहास पाहिला असता माहितगार व तुम्ही सोडून दोन लेखकांनी बदल केले आहेत. हे दोन्ही बदल छोटे आहेत आणि त्यातून तुमचे काम घालवल्यासारखे वाटले नाही.
--अभय नातू १६:४७, २७ ऑक्टोबर २००९ (UTC)
- Thanks for helping translating the article, I don't understand any Marathi so it's very much appreciated. Hekerui १८:१७, २७ ऑक्टोबर २००९ (UTC)
प्राधान्य भाषांतरन विनंती
संपादनस्ट्रॅटेजी विकिवर चालू असलेल्या कमाअच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या संपादकांच्या उअपयोगाच्या दृष्टीने विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा हे पान भाषांतरीत करण्यात प्राधान्याने भाषांतरअत सहाय्य मिळावे हि विनंती आणि तेथील कार्यात ही काही भर टाकू शकाल तर् स्वागतच आहे..माहितगार १४:४५, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)
- भाषांतरत मदत केल्याबद्दल धन्यवाद, त्यातील प्रश्नांवर तुमची काही मते असतील तर ती सुद्धा कळ्वावीत,आणि अशी मुलाखत अजून कुणाची घेतायेईल का अजून मराठी विकिपीडीया तेवढा प्रगत व्हावयाचा आहे ? तुमचे काय मत आहे ?माहितगार १३:०६, १ नोव्हेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनमी संपादन केलेले लेख तुम्हाला आवडल्याचे कळविले, खूप खूप आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद. Gypsypkd १०:२५, १ नोव्हेंबर २००९ (UTC)
महाराष्ट्रतील विभाग
संपादनया वर्गात मराठवाडा हा एकच लेख आहे आणि त्या लेखात महाराष्ट्रतील विभाग हा वर्ग कोठे उद्धृत केला आहे हे कळत नाही!? नेमक्या कोणत्या साच्यात/लेख-विभागात हे लिहिले आहे?
अभय नातू १५:४७, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
- महाराष्ट्राचे प्रांत पेक्षा महाराष्ट्राचे राजकीय विभाग असा वर्ग अधिक योग्य वाटतो.
- अभय नातू १६:४१, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)
एक छोटे भाषांतर
संपादनइंग्रजी विकिपीडीयानंतर जर्मन भाषा विकिपीडीया एक चांगला विकसित विकिपीडिया: आहे त्यांच्याकडे [[ de:Wikipedia:Mentorenprogramm अशी काही एक यशस्वी संकल्पना आहे. त्याच धर्तीवर "माझ्या सदस्य पानावर सहाय्य चमूतील मेंटॉर म्हणजेच विकिमार्गदर्शकास पाठवा " करण्याचा प्रयत्न आहे.खाली एकदा टिचकी मारून पहावी आणि तुमचे या बद्दल एकुण मत कळ्वावे. तसेच विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मेंटॉर कार्यक्रम ओळख येथेही एक् छोट्याशा भाषांतरआत सहाय्य हवे आहे. माहितगार ०५:५९, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)
भाषांतर सहाय्याकरिता धन्यवाद माहितगार ०७:२९, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)
<inputbox>
type=comment
editintro=विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मेंटॉर कार्यक्रम ओळख येथे नोंद असल्यामुळे साचात दिसत आहे.
preload=विकिपीडिया:साहाय्यचमूमेंटॉरकार्यक्रम/preload
default=विशेष:Mypage
buttonlabel=माझ्या सदस्य पानावर सहाय्य चमूतील मेंटॉर म्हणजेच विकिमार्गदर्शकास पाठवा
hidden=yes
</inputbox>
वरील माहितीने खालील बटन बनले आहे.
*Welcome!
संपादन- Welcome! Please,do click here to read following message in english[दाखवा]
या वरील पट्टीत [दाखवा] ऐवजी [show/hide] असे हवे.कारण ते इंग्रजी जाणणाराच वापरणार आहे.सुचना पटल्यास आवश्यक ते बदल करावेत.
- तुमची सूचना चांगली आहे. या बद्दल एकतर हे काही बदल करावयाचा झाला तर तो प्र्चालकांनी अमलात आणावयास हवा आणि असा बदल शक्य होण्याकरिता जावा स्क्रीप्ट प्रोग्रामिंगचे ज्ञान लागेल. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना सुद्धा दाखवा सारखा एखादा मराठी शब्द वाचता येतोच. इतर विकिपीडीयावरून येणार्या लोकांना कॉमनसेन्स ने दाखवा म्हणजे शो असणार याचा अंदाज सवयीने येतोच आहे हे मी आधीच अनुभवलेही आहे.आणि असे येणारे लोक बहुभाषिकतेला जुळवून घेण्यासही सरावलेले असतातच .त्यामुळे आम्ही इतके सगळे इंग्रजी शब्द शिकतो वाचतो सहन करतो. इंग्रजी भाषिकांना ही एखादा मराठी शब्द सहन करू द्यात.
अर्थात हे म्हणताना तुमच्या म्हणण्याचे महत्व नाकारावयाचे नाही.तूमअच्या प्रतिक्रीये नंतर, मी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडियातील सदस्यांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण लगेच असे काही हाती लागेल असे वाटत नाही कालौघात शक्य होई पर्यंत सहन करावे लागेल असे वाटते .त्या चर्चेचा सारांश माझ्या खालील प्रतिसादांवरून ध्यानात यावा.
तर अशा परिस्थितीतही साचा:धूळपाटीसाचा येथील वेलकम मेसेज मुळ स्वागत साचात टाकावा असे माझ्या मनात घाटत आहे.तुमचा अभिप्राय कळवावा हि वनंती माहितगार ०८:२८, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
While our present provision is good for Marathi languge reader in exceptional cases where we need to support non -marathi reader we want to have additional option of "hide"; and "show"; english words .
We at Marathi Languge wikipedia en:Wikipedia:NavFrame by using Marathi Languge options for word "hide"; and "show"; at MediaWiki:Common.js so whenever any template is taken from enwiki it automatically shows Marathi alternates for "hide"; and "show"; words.
Well I do not have necessary Java and css expertise. May be some one can help me out by giving more apropriate MediaWiki:Common.js syntax for this purpose.Mahitgar (talk) 12:32, 4 November 2009 (UTC)
Thanks for replying my query about having an alternate navframe otpion.Your soultion of using both english and marathi languge with backlash would not be favorite since we have such need only at 2-3 places that too is not very important because people coming from english wiki are already understanding Marathi Words with common sense.We want to be helpfull to interwiki visitors if having indipendat option is easily possible.We need eglish words only at community page header template mr:साचा:समाज मुखपृष्ठ मथळा साचा ,mr:विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ#Bot policy and welcome template which is being revised at a local sandbox at mr:साचा:धूळपाटीसाचा
Thanks and regards
Mahitgar (talk) 08:02, 5 November 2009 (UTC)
नवीन लेख
संपादननवीन लेख बनवण्याकरिता खालील इन्पूटबॉक्स वापरावात आणि प्रत्यक्षात येणार्या अडचणींची माहिती द्यावी म्हणजे तो स्वागत साचा आणि इतर सुयोग्य ठिकाणी ऊपलब्धकरून देता येईल. गरजे नुसार विकिपीडिया:नवीनलेख/preload येथेही बदल करण्यास हरकत नाही.
विकिपीडिया:धूळपाटी वरून पाहूयात
/preload
संपादनएखाद्या नविन लेखात {Insert:खाद्यपदार्थ/preload} असा काहिसा साचा लावल्यावर( हे माझे imagination आहे,कृपया हसु नका) खाद्यपदार्थ/preload मधील किंवा तत्सम (*/preload*) मधील मजकुर त्यात आपोआप यावा अशी काही जादु करता येउ शकते काय? मी एक प्रयत्न केला आहे.धुळपाटी न मध्ये उजवीकडील चौकटीत 'खाद्यपदार्थ/preload' असा मजकुर टाकल्यावर आणि click केल्यावर ते पान दिसते. अशा प्रकारे {:वनस्पती/preload}, {:पक्षि/preload}, (:व्यक्ती/preload} असे standardised formats करता येउ शकतात काय? जीवचौकट ,.......चौकट वगैरे आपोआप तयार व्हावयास हवी. कॉपी/पेस्ट वगैरे भानगड नको. अहो! मला या प्रकाराची काही कल्पना नाही.सहज विचार मनात आला म्णुन मांडला. हसण्याजोगा किंवा अशक्य असेल तर हा मजकुर कृपया काढा.माझे टोपणनाव माहित आहे ना.
V.narsikar ११:४६, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
- होय माझ्याही मनात नेमक तेच होत तत्सम (*/preload*) तयार करून संबधीत प्रकल्पात लावून ठेवता येतील व पसंबधीत प्रकल्पांच्या निमंत्रण साचांसोबत ते नवनवीन सदस्यांना सहज उपलब्ध राहील, तुम्ही यात पुढाकार घेतल्या बद्दल धन्यवाद (माझ मुख्य लक्ष सध्या स्ट्रॅटेजी विकिवर केंद्रीत करू शकेन) .केवळ एक छोटी सूचना (स्वतः स्वतंत्र लेख नसणारी अविश्वकोशिय आणि सहाय्य पाने) जसेकी धूळपाट्या आणि /preload वगैरे पानांची नावे विकिपीडिया: या शब्दा किंवा सहाय्य: शब्दा पासून सुरू केल्यास बरे राहील. अविशिष्ट लेख वरून तेथे नवखे वाचक पोहोचून गोंधळण्याची शक्यता कमी राहील. या संदर्भात अधिक माहिती विकिपीडिया:नामविश्व या पानावर उपलब्ध आहे.माहितगार १३:१०, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
टेस्टींग
संपादनकेवळ मराठी टायपिंगचे (वगवेगळ्या ठिकाणी) टेस्टींग करतो आहे. तुमच्या चर्चा पानावरील disturbance करिता क्षमस्व
विक्शनरी प्रीलोड
संपादन- विक्शनरी वरील कामा करिता शुभ्च्छा , विक्शनरी संबधातील चर्चा विक्शनरीत इतरांनाही भविष्यातही वाचता यावी यादृष्टीने मी सविस्तर उत्तर आपल्या विक्शनरीतील सदस्य चर्चा पानावर दिले आहे.माहितगार ०७:२४, १० नोव्हेंबर २००९ (UTC)
हबल दुर्बिण
संपादननरसीकर,
कोणीतरी भ्याडाने केलेला उत्पात परतवल्याबद्दल धन्यवाद. असे अनेक निरुद्योगी प्राणी निरर्थक उत्पात करीत हिंडत असतात, त्यांच्याबद्दल काही करण्यात वेळ घालवणे आपल्या फायद्याचे नाही. रिकामटेकड्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते कंटाळून निघून जातात असा माझा विकिपीडियावरील चार वर्षांचा अनुभव आहे. जर एखाद्या सदस्याने हे उद्योग केले तर त्याला समज देता येते पण निनावी बदलांकडे लक्ष ठेवून योग्य ते बदल परतवणे हे आपल्या हिताचे.
मी गेले काही दिवस (पोटापाण्याच्या :-}) कामात अत्यंत व्यग्र असल्याने नेहमीसारखा वेळ येथे देता येत नाही आहे, पण तुम्ही आणि इतर मंडळी विकिपीडियाची चांगली काळजी घेता हे मला माहिती असल्याने मी निर्धास्त आहे. तरीही मदत लागली तर संदेश पाठवालच.
क.लो.अ.
अभय नातू १८:२१, ११ नोव्हेंबर २००९ (UTC)
- जाणीवपूर्वक उत्पात करणार्यांचे बदल तत्काळ पलटवावेत. वस्तुतः मराठी लोकांकडून केल्या जाणार्या जाणीवपूर्व उत्पाताचे प्रमाण अत्यल्प आहे.सहसा {{Fasthelp}} या साचातील तूमचा अंक पत्ता नोंदवला जात आहे ही सूचना सूचक असल्यामूळे - (अंकपत्ते हे वेगवेगळ्या व्यकिंकडे बदलते असतात पण काही कायदेशीर वेळ आलीच तर कोणत्यावेळेस कोणत्या अंकपत्ता च्या सहाय्याने विशीष्ट इंटरनेटकनेक्श्न चा शोध घेतायेतो) ,- इतर विकिपीडीयांच्या तूलनेत मराठी विकिपीडियावरील जाणीवपूर्वक उत्पाताचे प्रमाण कमी राहीले असावे असे मला वाटते.
- जाणीवपूर्व उत्पात करणार्यांचा विकिपीडिया:पहारा आणि गस्त#यांच्या योगदानावर लक्ष ठेवा येथे नोंद घेऊन ठेवावी. अभयनी म्हटल्याप्रमाणे इतर विकिपीडीयावरील सूद्धा अनूभव असाच आहेकी बहूधा उत्पात करणारी मंडळी चार सहा महिन्यांनी आपोआप दिसेनाशी होतात. त्यामूळे त्यांचे बदल पलटवणे हे श्रेयस्कर असते.
माहितगार ०५:३०, १२ नोव्हेंबर २००९ (UTC)
मराठी माती
संपादन- मला वाटते सध्या तशी आवश्यकता नाही . एकतर मराठी आणि marathi शब्दाच्या गूगल सर्चला तसेही मराठी विकिपीडिया पहिल्या दोन-चार क्रमात येत आहे.आणि आपल्या लेखांचा दर्जा जसा जसा उपयूक्त होत जाईल इतर संकेतस्थळांवरून दुव्यांची आपोआपच संख्या वाढत आहे.
- अशा विनंत्याही करण्यात गैर काही आहे असे नाही परंतू ते reciprocal असता कामा नये कारण आपण विकिपीडियात विश्वासार्हता कमी होऊ नये म्हणून बाह्यदुवे आवश्यक आणि कमीत कमी ठेवतो बाह्यदुव्यांचा मराठी विकिपीडियातून जाहीरात सदृश्य उपयोग व्हावयास नको..सध्या मराठी विकिपीडिया फ्लेक्सिबल असला तरी केव्हान केव्हा या संकेताची अमल बजावणी गृहीत धरलेली बरी.
- दुसरे तर मराठी माती ने स्वतःहून असंख्य लेखांच्या बाह्यदुव्यांमधून जाणीवपूर्वक स्वतःचे दुवे टाकून घेतल्याचे आढळून आले आहे. स्वतःहून स्वतःची माहिती टाकणे वस्तूतः विकिपीडीया संकेतांचे उल्लंघन होते.खासकरून त्यांनी ज्या प्द्धतीने दुवे वाढवून घेतले आहेत तसे करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती कालौघात लोकांनी त्यांच्या संकेतस्थळाचा संदर्भ दिला कि काम होते .त्यांनी इतर पानांवर टाकवून घेतलेले दुवे केव्हाना केव्हा बॉटच्या सहाय्याने वगळले जातील.
- माहितगार १५:२४, १२ नोव्हेंबर २००९ (UTC)