मे १
दिनांक
(१ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादनचौदावे शतक
संपादन- १३२८ - एडिनबर्ग-नॉर्थहॅम्पटनचा तह - इंग्लंडने स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
अठरावे शतक
संपादन- १७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली.
- १७३९ - चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तीन महिने लढलेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३४ - इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.
- १८८२ - पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना.
- १८८४ - अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे या मागणीची घोषणा.
- १८८६ - अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- १८९० - जगात पहिल्यांदा जागतिक कामगार दिन साजरा केला गेला.
- १८९७ - स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
- १८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.
विसावे शतक
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
- १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९३१ - न्यू यॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्वात आले.
- १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
- १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
- १९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
- १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
- १९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
- १९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
- १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
- १९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
एकविसावे शतक
संपादन- २००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.
जन्म
संपादन- १२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १९१३ - बलराज साहनी, हिंदी चित्रपट अभिनेता. (मृ. १९७३)
- १९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
- १९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
- १९२२ - मधु लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते. (मृ. १९९५)
- १९३२ - एस.एम. कृष्णा, कर्नाटकचे १६वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री,
- १९४३ - सोनल मानसिंह, भारतीय नृत्यांगना.
- १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
- १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - अनुष्का शर्मा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- ४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.
- १३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.
- १५७२ - पोप पायस पाचवा.
- १९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
- १९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- १९५८ - गणेश शिवराम उर्फ नाना जोग, मराठी नाटककार.
- १९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक.
- १९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
- १९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
- १९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- १९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- २००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र.
- मराठी राजभाषा दिन
- गुजरात दिन - गुजरात.
- कामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
- लेइ दिन - हवाई.
- बेल्टेन - आयर्लंड.
- राष्ट्रीय प्रेम दिन - चेक प्रजासत्ताक.
- कायदा दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
- जागतिक अस्थमा निवारण दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)