[]गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ.

मध्ययुगीन पूर्व युरोपातील गुलामांचा बाजार (चित्रकार: सर्गेई वासिल्येविच इवानोव (इ.स. १८६४-इ.स. १९१०)

गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी असा अंदाज आहे,[] पण एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमाणांपेक्षा अत्यल्प मानता येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जबाजारी झालेल्या नोकरांची आहे. अनेकदा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी आयात-निर्यात हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र भागच आहे.

उद्योगीकरणाच्या आधी गुलाम आणि त्यांची श्रमशक्ती यांना आर्थिक दृष्टीने मोठेच महत्त्व होते. यंत्रयुगात मानवी श्रमांचे आर्थिक महत्त्व कमी होत चालले आहे. नोरबेर्त विनर म्हणतात: "यंत्र शक्तीमध्ये मानवी श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, पण गुलामगिरीत जी क्रूरता असते ती नाही."

१९व्या शतकाच्या सुरुवातीस गुलाम व भूदास ह्यांची संख्या लोकसंख्येच्या तीन चथुर्तांश होती.[] यंत्रयुगात प्रचंड प्रमाणावर मजूर लागत नाहीत त्यामुळे गुलामीचे आर्थिक महत्त्व निघून गेले आहे. गुलामी मात्र आर्थिक कारणांसाठी नाही तर मानवी हक्क म्हणून बेकायदेशीर केली गेली.

शब्दाचे मूळ

संपादन

गुलाम हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सेवक असा होतो. नंतर तो बहुधा मध्ययुगीन काळात उर्दू व अन्य भारतीय भाषांमध्ये आला असावा[ संदर्भ हवा ]. संस्कृतम भाषेत मात्र हा शब्द आढळत नाही.

परिभाषा

संपादन

इ.स.च्या १९व्या शतकापासून इंग्रजीत गुलामगिरी (इंग्लिश: Slavery, स्लेव्हरी) हा शब्द अमेरिकेतील गोऱ्या कातडीच्या माणसांनी काळ्या कातडीच्या माणसांच्या केलेल्या गुलामी बद्दल जास्त करून वापरला गेला आहे.

इतिहास

संपादन

आधुनिक काळ (अमेरिका खंड)

संपादन

सुरुवातीला गुलामगिरी केवळ अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमधेच नव्हती, तर उत्तर क्षेत्रातही होती. व्हरमाँट गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी प्रथम राज्य म्हणून अस्तित्वात आहे, 1777 मध्ये अमेरिकेने ब्रिटनमधून स्वतःला मुक्त केल्या नंतर ती सुरू झाली. तब्बल सात वर्षांनंतर सर्व उत्तर राज्ये गुलामगिरीत बंदी घालण्याची शपथ घेतली. पण उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षे गुलामगिरीचा अभ्यास चालूच होता. याचे उत्तर असे की उत्तर अमेरिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली ज्यामुळे गुलामगिरीचे उन्मूलन तात्काळ न बदलता आले.

पीबीएसने असे सुचवले की पेनसिल्वेनियाने 1780 मध्ये गुलामगिरीच्या क्रांतीदिनासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी केली, परंतु "हळूहळू" एक कमी सांगण्यात आले. 1850 मध्ये, पेनसिल्वेनियाच्या शेकडो बंदिवानांना बंधनात राहणे चालूच राहिले. 1961 मध्ये गृहयुद्ध सुरू होण्याआधीच एका दशकाहून अधिक काळाने उत्तर प्रदेशात दासत्त्व सुरूच राहिले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ इंग्रजी विकिपीडियातल्या Slavery ह्या लेखावरून
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-07 रोजी पाहिले.
  3. ^ http://books.google.cz/books?id=1QbX90fmCVUC&pg=&dq&hl=en#v=onepage&q=&f
  4. ^ "5 अमेरिकेतील गुलामीबद्दलची तथ्ये". mr.eferrit.com. 2020-10-02 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन